Skip to main content

विस्मरणात गेलेले पदार्थ--------- १)डांगर...............

लेखक निवेदिता-ताई यांनी बुधवार, 13/10/2010 20:46 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः-- एक वाटी हरबरा डाळ, अर्धा वाटी उडीद डाळ, पाव वाटी धने, दोन टे. स्पून जिरे. दही एक वाटी, फोडणीचे साहित्य. थोडा कढीपत्ता, कोथिंबीर, एक कांदा.लाल तिखट, मिठ. कॄती:- एक वाटी हरबरा डाळ, अर्धा वाटी उडीद डाळ, पाव वाटी धने, दोन टे. स्पून जिरे.हे सर्व खमंग भाजुन घ्यावे.ते गार झाल्यावर मि़क्सर् मधून जरासे जाडसर दळावे.हे एकदम करुन ठेवले तरी चालते, यातील सर्व पदार्थ भाजले आता त्यातील थोडे तयार पिठ घेउन ते थोडेसे दही घालून भिजवावे, कांदा बारीक चिरुन त्यात कच्चाच घालावा, कोथिंबीर बारीक चिरुन, चवीनुसार मिरची पावडर , मिठ घालावे.व अजून थोडे दही घालुन सरसरीत करावे, वरुन मोहरी, हिंग, हळद, कढीपत्ता घालून खम्ंग फोडणी घालावी. झक्कास तोंडीलावणे तय्यार.

वाचने 10529
प्रतिक्रिया 27

प्रतिक्रिया

नाही नाही ,डांगर हा पदार्थ विसरण्या सारखा नाहीच मुळी . आता परत माझ्या घरच थोड वेगळ असत, म्हणजे आम्ही फक्त उडीद डाळीच करतो अन दही असलच पाहीजे अस ही नाही, नुसत पाण्यात सुद्धा कालवल तरी छान लागत. तो कच्चा कांदा, मिरची अन कोथींबीर आहाहा !!

In reply to by स्पंदना

नाही नाही ,डांगर हा पदार्थ विसरण्या सारखा नाहीच मुळी . असेच म्हणतो! माझा देखील आवडता पदार्थ. बाकी त्यात काय असते ते माहीत नाही, त्या पिठाचे डांगर पदार्थ मात्र मला देखील करता येतो आणि अर्थातच खाता येतो. :-)

In reply to by स्पंदना

कोण म्हणतं.. विस्मरणात गेलंय डांगर?? आमच्याकडे खूप आवडतं. आम्ही सुद्धा फक्त उदड डाळीचे करतो. (करतो म्हणजे सहस्त्रबुद्धेंच्या ६५ प्रकारच्या पिठांमधून उचलून आणतो) ;) अतिशय लाडका पदार्थ. कशाबरोबरही छानच लागतो, पोळी, भाकरी, भात.. :)

आम्हाला पोह्याचं डांगर आवडतं.. (कोकणातला) तात्या. -- शुद्धकल्याण गावा तर करीमखासाहेब, हिराबाई, आणि भीमण्णांनी, हमीर गावा तर गजाननबुवा, यशवंतबुवा, आणि मधुबुवांनी!

पोह्याच्या पापडाचे पिठ असते ते. पापड न लटता , तसेच गोळा करून खावे . बरोबर कच्चे गोडे तेल असेल तर काय ? आणि हो त्यामध्ये "टाकणखार" घालतात असे वाट्ते.

हा विस्मरणात नक्कीच गेला नाही. कदाचीत नव्या पिढीला माहीत नसेल. कच्चा कांदा, कोथिंबीर, हिरवी मिरचिचे तुकडे (लाल तिखटा ऐवजी) यासाह दह्यात भिजविलेले डांगर आणि त्यात हिंग घालुन चरचरित फोडणी म्हणजे एक भन्नाट चव असते.

In reply to by रेवती

हा हा "भयानक सहमत" :) हा हा हा पाककृती हा विभागच अतिरेकी घोषीत करा बुवा :)

मला लग्न होईपर्यंत डांगर दह्यात घालून खातात हे माहिती नव्हते. नंतर कळले. आमच्याकडे पोह्याचे डांगर लाट्या करून तेलात बुडवून खात. ते झकास लागते.

य्म्म्मीच असत. त्याची रेसिपी १ वाटी पोह्याचे पीठ १ चमचा लाल भडक तिखट (लाल मिरची ची पुड) १/२ चमचा मिठ पाव चमचा पापडखार २वाट्या पाणी इराणी हिंग नसल्यास वनदेवी हिंग तोही नसल्यास साधा हिंग वासा नुसार साधारण २/३ चिमट्या. प्रथम पोह्याचे पिठ..पोहे मंद आचेवर भाजुन घ्यावेत व ते घरघंटीवर दळुन आणावेत. पोह्याच्या पिठात हिंग, पापड खार, तिखट चांगले मिसळुन घ्यावे. नंतर चवीप्रमाणे मिठ पाण्यात घालावे व त्याला चांगली उकळी येवु द्यावी. याला मिठवणी म्हणतात. हि मिठवणी तिखट मिसळ्लेल्या पिठात आवश्यकतेनुसार घालावी. ह्याची कन्सिसटन्सी पोळीच्या पिठासारखि पाहिजे..नंतर यात थोड तेल घालुन चांगल मळून घ्याव. मग मिक्सरला तेला चा हात लावुन त्यात हे पिठ मउसर फिरवुन घ्याव. आणि मग हाणाव...पण जरा जपुन.. कारणा आजच्या नंतर नेहमी उद्या उगवत असतो... ;)..सो तिखट झेपेल एवढं घाला.. :) ;)

In reply to by राधा१

राधा १ कध्धी ऐकल सुद्धा नाही हो अस पण डांगर !! हे परत आणि तेला बरोबर खायच? कस? वरुन तेल घेउन?

अग मस्त लागत नक्की करुन बघ. लहानपणी आम्ही पोह्याचे पापड करायचो..अर्धे वाळत घालायचॉ आणि अर्धे गट्टम करायचो..कच्चे/ओले..!! अपर्णा ताई..कच्चया तेलात बुडवुन, माखुन..!!! पण मला नाही आवडत तस..त्या पेक्षा मी नंतर ताक पिते..

In reply to by मराठमोळा

>>पण डांगर म्हणजे खान्देशात लाल भोपळ्याला म्हणतात नाही हो.... खान्देशातले डांगर म्हणजे मस्क मेलन (इंग्लिश) खान्देशात लाल भोपळ्याला लाल भोपळाच म्हणतात

In reply to by मराठमोळा

पण डांगर म्हणजे खान्देशात लाल भोपळ्याला म्हणतात. त्यामुळे गल्लत झाली >>. होय आणी त्याची आम्ही भाजी सुध्दा करतो ...अर्थातत्यात अजुन एक अनुस्वार हवा " डांगरं" धन्यवाद

निवेदिता ताई मस्तच. मी केला होता हा प्रकार एकदा पण चणाडाळ ऐवजी मी चण्याचे डाळे म्हणजे चिवड्यात घालतो ती घेतली होती. छान लागतो.

मस्त मस्त ! लेखातल्या आणि प्रतिसादातल्या पाकृ देखील. फोटु कुठ हाय ? दरवेळी असे चालणार नाही बॉ !

छानच!! लहानपणी गावी गेल्यावर गरम गरम नाचण्याच्या भाकरीत ताजे ताजे डांगर पसरवून मग भाकरी दुमडून खायचो.. आजीची आठवण आली.. झक्कासच!!

मस्त......... आम्ही कच्च्या कांद्याच्या ऐवजी तो फोडणी मध्येच परतून टाकतो.... एक नंबर होते... खिचडी..पापड्...डांगर..... मस्त मेनू!!!!