कलादालन

फिलाडेल्फीया

Primary tabs

दोन तीन विकांतापुर्वी फिलाडेल्फीया ला गेलो होतो... त्याची काही प्रकाशचित्रे. इंडिपेंडन्स हॉल Image removed. फस्ट बँक Image removed. लिबर्टी बेल Image removed. असंच टीपी Image removed. अमेरिकेतल्या सर्वात जुन्या(पहिल्या) झू मधील मोर Image removed. Image removed. वाघ Image removed. कुठलातरी पक्षी (नाव विसरलो) Image removed. पोलर बेअर Image removed. पेंग्वीन Image removed. Image removed. म्युझीयम ऑफ आर्ट्स Image removed. Image removed. Image removed. सिटी हॉल Image removed. चर्च Image removed.
मेघवेडा

मस्त फोटो!

त्या झूमधल्या आणखी एका प्राण्याचा फोटो होता ना रे?!?! तो कुठे दिसत नाही! :D

प्राजु

>>>त्या झूमधल्या आणखी एका प्राण्याचा फोटो होता ना रे?!?! तो कुठे दिसत नाही!

ह्म्म! अरे त्या बिचर्‍या प्राण्याचा फोटो कुणी काढलाच नाही. ;)

शेवटचे दोन जे फोटो आहेत, ते प्रोसेस केलेले आहेत का?
खूप आवडले.

प्रभो

शेवटचे २ मॅनुअल मोड मधे 'सेपीया' टोन मधे काढले आहेत..पोस्ट प्रोसेसिंग काही नाही.. :)

सुहास..

पोलर बेअर पाहुन प्रभोचाच आधी पाहिलेला एक फोटो आठवला !!

बाकी चे फोटो पण छान

गणपा

गेल्यावेळे सारखे ह्यातलेही निवडक फोटो खास आतल्या गोटासाठी राखुन ठेवलेत का ? ;)

आवांतर : म्युझीयम ऑफ आर्ट्स च्या कळसावरची कलाकृती आवडली.

स्वप्निल..

आतल्या गोटातले फोटो कधी?? ;)

बाकी फोटो मस्तच .. :)

स्पंदना

म्युझीयम ऑफ आर्ट्स च्या कळसावरची कलाकृती आवडली.

गणपादाशी सहमत.

मस्त कलंदर

वाह..
मस्तच आहेत फोटो. मला व्यक्तिशः टीपी वाला आणि म्युझिअम ऑफ आर्टसच्या प्रवेशद्वाराच्या मनोर्‍यावरचे फोटो जास्त आवडले.

पैसा

झक्कास फोटो. बरोबर थोडी थोडी माहिती का नाही दिलीस? की स्वतंत्र लेख येणार आहे?

रेवती

मस्त फोटू!
प्राण्यांचे फोटू तर गोडच येतात.
वरच्या काही प्रतिसादांमध्ये आडवळणाने प्रभोची खिल्ली उडवलेली पाहून अंमळ (आनंद झाला) दु:ख झाले.
तू असाच फिरत रहा आणि फोटू टाकत रहा.
दरवेळी पेश्शल फोटू दोन तीन टाकलेस तरी धाग्याचा टि आर पी वाढेल अशी एक आगाऊपणे दिलेली सुचना.
आम्हीही दोन वर्षापूर्वी गेलो होतो. ती क्रायोला फॅक्टरीही पाहिली होती.

Pain

रॉकी तिथलाच ना हो ? त्याचा पुतळा आहे त्या इमारतीचा फोटो टाका ना.

अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिथल्या विमानतळावर फ्री वायफाय आहे :)

मिसळभोक्ता

तुम्ही ए टी & टी चे कष्टमर असाल, तर सगळीकडे वाय-फाय फ्री असते.

Pain

नाही, त्याची गरज नाही. त्यांचा डिस्क्लेमर अ‍ॅक्सेप्ट केला की कोणालाही वापरता येते.

प्रभो

हो रॉकीचं चित्रीकरण इथेच झालं..

हा रॉकी ३ मधे असलेला त्याचा पुतळा जो सिलव्हेस्टर ने फिली सिटी ला भेट दिला...

आणी ह्या रॉकी स्टेप्स (म्युझीयमच्या पायर्‍या)

Pain

धन्यवाद :)

मी याचा मोठा फॅन आहे आणि तिथे एकदा तरी जायची इच्छा आहे!

नितिन थत्ते

मस्त फोटो.

क्यामेरा कोणता?

अवांतरः छ शि आं ह अड्ड्याच्या अंतर्देशीय टर्मिनलवर पण वाय फाय फ्री आहे. हिरव्या देशातच असतं असं नाही. :)

शिल्पा ब

मस्त फोटो...मोर तर भारीच गुबगुबीत दिसतोय..
रेवती तुम्हीसुद्धा फिलाडेल्फियाला गेला होता का? वा वा !! वाचून आनंद झाला.

रेवती

ही ही ही!;)
चला, हेतू सफल झाला. समजलं बर्‍याचजणांना...;)

Pain

मोरावरून आठवले-

लहानपणी मोराचे कान फार तिखट असतात असे निबंधाच्या पुस्तकात वाचले होते आणि तेव्हा तिखट याचा अर्थ तीक्ष्ण हे माहित नव्हते. पुष्कळ दिवस तिखट म्हणजे चवीला तिखट अशीच माझी समजूत होती :D

मिसळभोक्ता

वासूची सासू मध्ये हे नाव ऐकल्यापासून असलेले कुतूहल शमले.

त्यात सॅन फ्रांसिस्कोचा पण उल्लेख होता. त्याचेच कुतूहल शमवायला तिथे गेलात वाटते :-)

@प्रभो :- फोटो छानच आहेत.

शिर्षक वाचल्या वाचल्या आधी वासूची सासूच आठवले होते. प्रभावळकर साहेब त्याचा जो उच्चार करतात तो लजवाब ;)

प्रभो फोटु भारी आहेत रे एकदम. नुसते फोटुच काढले का काही खरेदी पण केलीस तिकडे ? काय आणले नाहीतर कॅफेत पाय टाकु द्यायचो नाही बघ ;)

असुर

मस्त फटू रे प्रभो!
'सेपिया'मोड वाले फटु अप्रतिम!
फक्त त्या 'इंडिपेंडन्स हॉल'च्या घुमटाला असं कैदेत का टाकलंय तेव्हढं एकदा विचारुन घे राव! :-)

--असुर

बेसनलाडू

पेन्स लॅन्डिन्ग या महत्त्वाच्या ठिकाणाचा फोटो काढला नाहीस? विलिअम पेन पहिल्यांदा तिथे उतरला. त्या ठिकाणी उभे राहून (फिलाडेल्फियात) समोर पाहिले की न्यू जर्सी राज्य (काही भाग) दिसते :)
(प्रवासी)बेसनलाडू

शिल्पा ब

अरे वा!!! तुम्ही सुद्धा गेला होता का फिलाडेल्फियात ? छान छान....नव्या जुन्याचा असाच संगम होत राहिला पाहिजे.

बेसनलाडू

त्यानंतर गेल्या वर्षी (२००९) तेथे बीएमएम कन्वेन्शन झाले तेव्हाही जायचे होते; आशा भोसलेंचा लाइव कार्यक्रम, नाना पाटेकरांची मुलाखत वगैरे आकर्षणे होती. पण जमले नाही :(
(दुर्दैवी)बेसनलाडू

प्रभो

तिथेही गेलो होतो...जवळ जवळ सर्व फिली फिरलो.....

हे पेन्स लँडींग

गणपा

काय रे चोच्या अस लोकांनी विचारल्या वर एक एक फोटु वाढवत चालाला आहेस.
आता आमची चरणधुळ त्या फिलाडेल्फीयाला लागली नाही त्यामुळे अजुन काय आकर्षणे आहेत ती आम्हाला ठाउक नाहीत.
एकदाच दे बघु सगळ्या आकर्षणाचे फोटु. लोकांच्या आमंत्रणाची वाट नको बघत बसुस.

सहज

काही फोटोवरुन नॅशनल ट्रेझर सिनेमाची आठवण झाली.

तसेच नाव, गाव, प्राणी, पक्षी, फूल खेळाची पण आठवण झाली. किमान फिलाडेल्फीयाचे (गाव) वेगळे व प्राणी, फूल वगैरे तरी वेगळे टाकायचेस प्रभो.

Pain

अरेच्च्या, मी सुरुवात केली खरे पण आता हे रेडिओवरच्या आपकी पसंद सारखे वाटते आहे.
लोक विनंती करतात आणि प्रभो त्या त्या प्रेक्षणीय स्थळांचे फोटो दाखवतात !

sneharani

मस्त आलेत फोटो
शेवटचे दोन तर अगदी मस्त!
:)

प्रचेतस

फोटॉ एकदम सुरेख,
पोलर बेअर आणि पेंग्वीनला मात्र बर्फाशिवाय पाहून भडभडून आले.

Pain

त्यांना साध्या वातावरणात कसे करमते ? उकडत नाही का फार?

मी-सौरभ

काही चालती बोलती प्रेक्षणीय स्थळ पण टिपलीत कि नाही?

:)

हॅ हॅ हॅ.. संवेदनशील भागांची चित्रे ते चेपुवर लावायचे. तिथे बाजार उठवल्यापासून कमी केले आहे त्यांनी .

Pain

चेपु म्हणजे काय?

मस्त कलंदर

माझे नांव llपुण्याचे पेशवेll नाही.. तरी उत्तर देतेय.
चेपु=चेहरापुस्तक=फेसबुक!!!

श्री.प्रभो हे आमचे मित्र आहेत...
पण श्री प्रभो ह्यांना फिलाडेल्फियात जाऊन काय बघायचे ते नीटसे कळलेले दिसत नाही....
फिलीमध्ये (हां, हिरवा माज असलेली लोकं फिलाडेल्फियाला फिली म्हणतात!!) भेट द्यायची सर्वात महत्वाची ठिकाणं दोनच आहेत...
आणि ती दोन्ही समोरासमोर आहेत...
ते आहेत जगातील बेस्ट फिली चीझ स्टेक मिळण्यावे स्टॅन्डस!!!
चव अशी की जिंदगीभर याद राहील!!!!
हात प्रभो!!! उगीच पीठ मारलेल्या भाज्या वगैरे रेसेपीज लिहितोस!!!!
जर फिलीला जाऊन तिथला स्पेशल चीझ स्टेक खाल्ला नसशील तर सब झूट है!!!!

राहवले नाही म्हणुन लिहिले, क्षमा केली पाहिजे||
प्रतिसाद संपादित केला आहे : संपादक मंडळ

नितिन थत्ते

आपल्या डॉ आनंदीबाई जोशी बहुधा फिलाडेल्फियामध्येच शिकल्या.

मस्त कलंदर

हो... बहुधा नाही नक्कीच!!!!
त्यांचे कॉलेज आधी फक्त स्त्रियांसाठीचे 'वीमेन्स मेडिकल ऑफ पेनिसिल्व्हेनिया' होते. आता तेही को-एड कॉलेज झाले आहे.
हा त्या कॉलेजचा आनंदीबाई शिकल्या तेव्हाचा जुना फोटो असावा. (आता ते दुसर्‍या ठिकाणी हलवले गेले आहे)

चित्रा

बरीच भटकंती चालली आहे असे दिसते आहे.

रेवती

अगं हो, सध्या 'लग्नाळू' असल्याची जाहिरात करत गावोगाव, स्टेटोस्टेट फिरतोय तो!;)

सूर्य

'असच टीपी' चित्र सर्वात जास्त आवडले. शेवटचे दोन सुद्धा मस्त आलेत.

- सूर्य.

प्रभो

सर्व वाचक-प्रतिसादक मित्र, मैत्रीणी, काका-काकू व एका आजीचे ;) आभार..

@थत्तेचाचा : कॅमेरा Cannon SX120is ,10 MP,10X zoom

@पिडांकाका : बीफ खात नसल्याने फिली चिज स्टेक ला लांबूनच नमस्कार केला.. :)

धमाल मुलगा

तुला हल्ली काय क्यामेराफिव्हर चढलाय कळेना...पण चांगले फोटु काढतोयस हों... चान चान :)

काही फोटु पाहुन 'द फ्री मेसन्स' च्या स्थापत्यकलेची आठवण आल्यावाचुन राहिली नाही.

अवांतरः ह्या टिरिपेच्या फोटुंचं प्रायव्हेट सर्कुलेशन कधी रे? ;)