Skip to main content

तुमचे मिपावर किती आयडी आहेत? तुमच्या सदसद्विवेकबुद्धीला स्मरून उत्तर द्यावे!

लेखक सुनील यांनी बुधवार, 20/10/2010 18:07 या दिवशी प्रकाशित केले.

वाचने 1194
प्रतिक्रिया 43

प्रतिक्रिया

सदर माहितीचा तुम्हाला काय उपयोग सुनीलराव ? ह्या माहितीच्या आधारे कसला लेख लिहला तर त्याचाही काय फायदा ? समजा मी जर म्हणलो की " माझे इथे १७६० आयडी आहेत" तर तुम्ही ह्यावर काय करु शकता ? - छोटा डॉन

In reply to by छोटा डॉन

>>काय फायदा ? ते कदाचित एक नवीन संकेत स्थळ काढायचा विचार करत असतील. त्यासाठी होऊ शकेल थोडाफार फायदा.

In reply to by गांधीवादी

तुमच्याकडून ह्याच प्रतिसादाची अपेक्षा होती. ती पूर्ण झाल्यामुळे आनंद झाला आणि डोळे आनंदाश्रूंनी डबडबले!

In reply to by गांधीवादी

तुम्ही ठाण्याचे काय हो? वडार-वाडीचा उल्लेख आला म्हणून विचारतोय. प्रशांत नगर चे नविन नाव आजकाल वडारवाडी झालंयं.... इती: कोपर्‍यावरचा ब्लु-डार्टवाला.

In reply to by मराठे

हो, तिथे सुद्धा राहिलो आहे, green acres , वाघबीळ नाका, विजय नगरी शेजारी.घोडबंदर रोड.

In reply to by मराठे

हॅ हॅ हॅ. ब्लू डार्टवाल्याचा अभ्यास कमी पडतोय. ब्लूडार्टकडून आत शिरलं की रस्त्याच्या उजवीकडे प्रशांतनगर आणि डावीकडे वडारवाडी. (जागेची प्रसिद्धी वडारवाडी अशी झाल्याचे ऐकले नाही).

आयडी एकच आहे. आम्ही ७/८ जण एकमेकांचे आयडी आलटून पालटून वापरत असतो, त्यामुळे दुसर्‍या आयडीची गरजच पडत नाही.

In reply to by परिकथेतील राजकुमार

>>आम्ही ७/८ जण एकमेकांचे आयडी आलटून पालटून वापरत असतो, "मिपावरची id कुपोषित बालके" "मिपावर id चा दुष्काळ" कोणता लेख लिहावा आता ? आपण ७/८ जनाची एकच id वापरत आहात असे बघून मला कीव येते आहे. माझा एक देऊ का ?

In reply to by गांधीवादी

आपण ७/८ जनाची एकच id वापरत आहात असे बघून मला कीव येते आहे. माझा एक देऊ का ?
गांधीवादी तुम्ही जन्मापासूनच येवढे बुद्धीमान आहात, का लहानपणी डोक्यावर वगैरे पडला होतात ?
आम्ही ७/८ जण एकमेकांचे आयडी आलटून पालटून वापरत असतो,
७/८ जण एकमेकांचे आयडी वापरतात तेंव्हा ते निश्चीतच संख्येने ७ / ८ असणार नाहीत का ?

In reply to by परिकथेतील राजकुमार

>>लहानपणी डोक्यावर वगैरे पडला होतात ? नाही. गुडघ्यावर पडलो होतो.

>>तुमच्या सदसद्विवेकबुद्धीला स्मरून उत्तर द्यावे! एकतर सदसद्विवेकबुद्धीची मारामार आणि जी आहे ती सुद्धा विस्मरणात गेलेली, मग काय उत्तर द्यायचं *टा

यदायदाही धर्मस्य ग्लानिर्भवति संपादक| अभ्युत्थानं अधर्मस्य तदायड्या: सृजाम्यहं || परित्राणाय दुर्लक्षितां विनाशायच कंपूनां | कौलसंस्थापनार्थाय संभवामि बले बले ||

In reply to by नगरीनिरंजन

कौलसंस्थापनार्थाय संभवामि बले बले || =)) =)) खरंय.

In reply to by नगरीनिरंजन

कौलसंस्थापनार्थाय संभवामि बले बले || =)) सुनीलभौ, तुम्हाला विदा जमा करायच्या कामावर नेमलेय का? :) का तुम्ही पण प्रकट वा छुपे संमं ते सांगा, म्हणजे मी सांगेन माझे किती आयडी आहेत ते! :P :D

सद्सद्विवेक बुद्धीला खूप स्मरून पाहिलं पण एक्सेल्शीट सापडली नाही. :(

In reply to by नितिन थत्ते

अशक्य पांचट - हत्ती का नाचतो ? . . . कोल्हा : HI, मी कोल्हा आहे. हत्ती : नाचू का मग ? कोल्हा : नाच की !! म्हणून हत्ती नाचतो .... :) :) :-D

In reply to by मेघवेडा

मेव्या, काय हे??? :D :D :D कॉफी सांडून खराब झालेला किबोर्ड बदलून देणार का वगैरे चुकार प्रश्न नाय विचारत मी! :-) --असुर

आतापर्यंत झालेल्या मतदानाचा निष्कर्ष. दोन आयडी ०% व तीन आयडी २६% - एका आयडीनी घातलेला गोंधळ निस्तरायला दुसरा एक आयडी पुरेसा नाही. दुसरे दोन फेक आयडी लागतात! तीनपेक्षा जास्त आयडी ०% - स्मरणशक्तीची बोंबाबोंब!

छ्या. फक्त २२ मते पडली आहेत इथं. हा विदा निष्कर्षासाठी पुरेसा नाही. ;) मतदान इतकं कमी का झालं असावं याचा विचार करतोय.

In reply to by श्रावण मोडक

आवाहन कृपया सर्व सभासदांनी आपापल्या सगळ्या (आठवतील त्या) आयडींनी प्रवेश करून मतदान करावे!!!!!

In reply to by सुनील

आय डी आठवतायत हो.... पासवर्डसाठी एक्सेल शीट लागत्ये.