Skip to main content

फ्लावरच्या देठचि भा़जि

लेखक Shubhangi Pingale यांनी गुरुवार, 21/10/2010 14:43 या दिवशी प्रकाशित केले.
first time देत आहे काहि चु़कलल्यास शमा करा आपण फ्लावरचि भाजि करतो आणी त्याचा देठ फेकुन देतो पण तस न करता तो बारिक चिरुन घ्यावा एका टोपात पाणि आणि मिठ टाकुन थोडावेळ तसच ठेवावे. आता फोडणी टोपात तेल घालावे राई, जीर, हळ्द, हिग घालावे कादा घालावा तो बदामि झाला कि त्यात आवडी नुसार मिरचि पावडर आणि त्यानुसार साखर घालावि न॑तर भाजि निथळून घालावि टोपावर झाकण घालुन त्यात थोड पाणी घालावे (ताटात). थोडावेळाने टोप ऊचलुन कु़कर मध्ये ठेवावे चार ते पाच शिट्टया घेवून ब॑द करावा (देठ थोडा शिजायला ‍वेळ लागतो.

वाचने 4594
प्रतिक्रिया 22

प्रतिक्रिया

In reply to by Shubhangi Pingale

आणि विसरलिच कि थोडा शेगदान्याचा कुट पण टाकावा
छे छे ! अहो आमच्या नान्याला दाणे बघितले तरी पित्त होते.

In reply to by प्राजु

दोनातले दाखवायचे कोणते अन खायचे कोणते हो? ;) (तुम्हाला वाटेल तसे घ्या )

In reply to by पर्नल नेने मराठे

टोप म्हणजे पातेलं गो.. नाहीतर जिरेटोप वगैरे घेशील! :P

In reply to by मेघवेडा

ह्म्म ..अगदिच जिरेटोपात नाहि गेले ..पण मला वाटले भान्ड्याचा नविन ब्रान्ड आला आहे कि काय बाजारात.

In reply to by मेघवेडा

हा हा हा!! खुर्चीतून सांडलो :D शिवाजी म्हाराजांच्या जिरेटोपात चुचू फ्लॉवरच्या देठांची भाजी करतेय आणि महाराज हैराण होऊन चुचूकडे बघतायेत असं चित्र समोर आलं

In reply to by विंजिनेर

शक्य आहे. चुचु काहीही करू शकते यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. झाल्यास महाराज काही बोलायला जाणार इतक्यात "तुम्ही बसा हो तिथं शांतपणे" असं नुसतं डोळ्यांनीच सांगेलसुद्धा ती महाराजांना! ;)

In reply to by मेघवेडा

म्ही बसा हो तिथं शांतपणे" असं नुसतं डोळ्यांनीच सांगेलसुद्धा ती महाराजांना!
एवढं म्हणून थांबली तर ठीक आहे.. पण पुढे आच्रत-बाव्लत म्हणाली तर काय घ्या????

In reply to by मस्त कलंदर

ध्यान पण म्हणेल... काही भरोसा नाही चुचुचा...

>>> शिवाजी म्हाराजांच्या जिरेटोपात चुचू फ्लॉवरच्या देठांची भाजी करतेय आणि महाराज हैराण होऊन चुचूकडे बघतायेत असं चित्र समोर आलं.. च्यामारी फुटलो... - पिंगू

देठात काही विशेष जीवनसत्व वगैरे असतं का? नाहीतर फुलं सोडून कशाला उगाच देठाची भाजी करत बसायचं?

In reply to by शिल्पा ब

नाहीतर फुलं सोडून कशाला उगाच देठाची भाजी करत बसायचं? आम्हालाही तीच शंका आहे.. जर फ्लावर विकत घेतलाच आहे तर तो सोडून त्याच्या देठाची भाजी करण्यात काय मतलब आहे? (बाकी फ्लावर कोलंबीची गरम मसाल्याची पातळ भाजी करावी. त्यात गावठी लादीपाव हाताने तुकडा तोडून भिजवावा... आणि अल्लगद जिभेवर सोडावा!!! ला इलाहा इल्लिलाह!!!!!!!) :)

फ्लावर म्हणजे कोणतं फ्लावर... जास्वंदाचं, स्वस्तीकाचं, की अजून कोणतं? मराठीत फ्लावरला काय म्हणतात?

महाराजांविषयी भलतं-सलतं लिहिणार्‍या लेनकुळातील प्रतिसादकर्त्यांना ५० फ्लॉवर्सचे देठ (भाजी न करता) खाण्याची शिक्षा फर्मावण्यात यावी! सुनील (स्वंयंघोषित अध्यक्ष, मंबाजी ब्रिगेड) सदस्य भरती सुरू आहे