जे न देखे रवी...

(नको)

Primary tabs

जयन्ता५२ ह्यांचे 'नको' वाचून आमच्या मनात नकोनकोते विचार तरळून गेले! ;)

निरख मला, गिळू नको
सोडा ओत! पाणी नको

गात्रात शिरशिरी येता
चषक असा टाळू नको

घेतोस का शपथा अशा?
टाळून मला पळू नको!

अशक्य नाहीच, पण
'ऑन द रॉक्स' घेऊ नको

चेतविले आहेस मला
जिवा त्या का जाळू नको?

--------------------------------
चतुरंग

विसोबा खेचर

निरख मला, गिळू नको
सोडा ओत! पाणी नको

वा! विडंबन छान आहे! :)

अवांतर : जयन्ता५२ हे आमचे एकेकाळचे मनोगती मित्र. ते मिपावरही सभासद आहेत पण जयन्ता५२ या नावाने ते इथे प्रकट होत नाहीत! बिचार्‍या आमच्या जयन्तरावांच्या श्रद्धा मालकांच्या पायावर वाहिलेल्या असल्यामुळे मालकांना कळेल की काय या भितीने जयन्ता५२ य नावाने इथेही वावरायची त्यांची हिंमत होत नाही! :)

तात्या.

निरख मला, गिळू नको
सोडा ओत! पाणी नको
गात्रात शिरशिरी येता
चषक असा टाळू नको

बाकी, "ढवळ्याशेजारी बांधला पवळ्या.........."
:)