Skip to main content

पापलेट फ्राय,पापलेट करी आणि फ्राय प्रॉन

लेखक दीविरा यांनी रविवार, 09/01/2011 12:43 या दिवशी प्रकाशित केले.
पापलेट फ्राय,पापलेट करी आणि फ्राय प्रॉन समस्त मिपाकर मायबाप, लेखनाचा पहिलाच प्रयास आहे,कृपया सांभाळून घेणे. साहित्य: १. स्वछ तुकडे पापलेटाचे हवे असतील तितके. २. लसूण आवडीनुसार. ३. आले आवडीनुसार. ४. लाल तीखट आवडीनुसार. ५. हळद चीमुटभर. ६. लिंबू. ७. गरम मसाला आवडीनुसार. ८. पिठ तांदळाचे लागेल तेवढे ९. तेल तळन्या पुरते. १०.मीठ चवीप्रामाणे. कृती: प्रथम मासा धुऊन घेणे. मग त्याला साहित्यातिल सगळे(तांदळाचे पिठ सोडुन) ईतर सगळे चोळून ठेवणे १०-१५ मीनिटस. मग तांदळाचे पिठ एका ताटात घ्या आणि त्यात पीसेस घोळवून तव्यात तळुन घेणे. फीश करी. साहित्य: १. नारळ १/२ २. लसुण ३-४ पाकळी. ३. आले थोडेसे. ४. चिंच थोडीशी. ५. गरम मसाला. ६. लाल तीखट ७. मीठ चवीप्रामाणे. कृती: प्रथम नारळ,आले,लसुण व गरम पाण्यात भीजवलेली चिंच,थोडेसे पाणी घालुन,मिक्सर मधुन वाटून घेणे. कढई मध्ये थोडेसे तेल घालुन मग त्यात वरील वाटलेला मासाला, चवी नुसार मीठ,तीखट,गरम मसाला व हळद घालुन छान उकळी आल्यावर त्यात मासे हलकेच सोडावे.२-३ मि शिजवावे. मासे जास्ती वेळ शिजवू नयेत. फ्राय प्रॉन साहित्य: फिश फ्राय प्रमाणे फक्त चाट मसाला चवीनुसार. कृती: प्रॉन साफ करुन घेणे. मग सगळा मसाला लावुन वरुन तांदळाचे पिठ भुरभुरावे आणी तव्यावर १-२ मि तळावे. जास्ती वेळ तळल्यास रबरी लागते. आता गरम गरम भाता बरोबर ताव मारणे. फोटो आहेत पण दिसत नाहीत काय करावे? :)

वाचने 10647
प्रतिक्रिया 43

प्रतिक्रिया

जेवण झालेलं असूनही फोटो पाहून परत भूक लागली :). दुसरा, तिसरा आणि शेवटचा तर ख ल्ला स!

"http://lh6.ggpht.com/_qYGYhTRMxV0/TSde-WWV1YI/AAAAAAAAABo/qXPDG95HKno/s…" आता जमले. हुश्श!

In reply to by दीविरा

अरे वा! छान! अवांतरः तुम्ही पिढीजात श्रीमंत दिसता आहात - पानात २-२ प्रकारचे कांदे दिसता आहेत :)

In reply to by अवलिया

बरं होतं आधी फटू नव्हते ते. उगा आग्रह करून फटू मागवून घेतले, स्वतः मेला, दुसऱ्यांचीही पंचाईत करून टाकली. ;)

पहील्यावहील्या लेखाबद्दल व उच्च फोटोंबद्दल अभिनंदन! बल्लवाचार्य श्री गणपा यांचा हा लेख - 'मदत -मिपावर फोटो चिकटवणे' आपल्याला उपयुक्त होईल. अजुन पाकृ येउ द्यात!

अहो ते कांदे शेजार्‍याकडून फोटोपुरते उसने आणले होते, त्यांनी कार घेतली तर ४ कांदे फुकट मिळाले ;)

In reply to by दीविरा

त्यांनी कार घेतली तर ४ कांदे आजकाल आनंदाच्या प्रसंगी पेढ्यांच्या ऐवजी कांदे देण्याची प्रथा आवडली.;) जुनी प्रथा मोडल्याचे श्रेय मिळाले ते वेगळेच!;)

फटु विषेतः केळीच्या पानावर वाढलेले पदार्थ बघुन भूकेचा डोंब उसळला आहे. आता आज मासे खाल्ल्या शिवाय समाधान नाही होणार. बाय दे वे. कुठे राहता हो? जरा पत्ता कळवा. :-O

In reply to by दीविरा

कोरडे धन्यवाद काय देता. निदान सगळ्या प्रतिक्रीया बघुन लोकभावनेचा आदर करा हो.