Skip to main content

गाजर सूप

लेखक स्वाती दिनेश यांनी सोमवार, 17/01/2011 11:16 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या बाजारात उत्तम गाजरे आहेत, सारखी कोशिंबिर किती करणार? आणि फिल्मी गाजर का हलवा सुध्दा वजन आणि साखरेला मारकच ना.. म्हणून आमच्या सुझानची खासियत हे गाजर सूप- साहित्य- ५-६ मध्यम गाजरे, १ लहान कांदा, २ पेरं आल्याचा तुकडा, ३-४ मिरे, २ लवंगा, दालचिनीची एक मोठी काडी,ड्राय बेसल लिव्ह्ज,मीठ कृती- गाजरांची सालं काढा. मोठे तुकडे करा. कांदा सालं काढून अर्धा करा. गाजराचे तुकडे आणि कांदा एका मोठ्या उभट पातेल्यात किवा कुकरात घ्या. त्यात आले,मिरी,दालचिनी,लवंगा इ. सर्व मसाला घाला आणि उकडा. हे सर्व मिश्रण मिक्सर मधून फिरवून घ्या किवा हँड ब्लेंडरने घोटा. दाट, रवाळ पल्प तयार होईल. गरजेनुसार गरम पाणी घाला. मीठ घाला.बेसल लिव्ज घाला. खळखळून उकळू द्या. कोथिंबिरीने सजवा. गाजराचे सूप तयार आहे.

वाचने 7489
प्रतिक्रिया 28

प्रतिक्रिया

हायला !! काय शॉल्लेट दिसतय. (काही नालायक लोक पूनम मध्ये कसली कसली सूपं पित असतात, त्यांना हे पण ट्राय करा म्हणाव.)

In reply to by परिकथेतील राजकुमार

बाहेरचं आयतं हादाडन्यात जी मजा आहे ती घरी करुन खान्यात नाही, हे त्याना माहीत असावे.

खुपच छान. ते लवंग, मिरी, दालचीनी ह्यांची वेगळी फोडणी दिली तर ? म्हणजे आधी गाजर आणि कांदा वाफवुन त्याची प्युरी किंवा स्मॅश करायच. मग तुपावर वरच्या गरम मसाल्याची फोडणी द्यायची. म्हणजे लहान मुलांच्या तोंडात नाही येणार.

मस्तच! अश्याचप्रकारे अजुन एक दोन काँबीनेशन्स १) दुधी भोपळा + बटाटा व वर दिलेले इतर इतर घटक २) बीट + टोमॅटो व वर दिलेले इतर इतर घटक देखील मस्त सुप बनतात!! थंडीच्या दिवसात अशी सुप्स प्यायची मजा वेगळीच!

In reply to by सहज

थंडीच्या दिवसात अशी सुप्स प्यायची मजा वेगळीच! थंडीच्या दिवसात सहजराव (जहाल आणि मादक सरबताऐवजी) सूप पितात हे वाचून डोळे पाणावले!

मस्त वरुन जर साजुक तुपातली, काळीमीरी +ठेचलेल्या लसणाची फोडणी असेल तर लज्जत नक्कीच वाढेल. :) आवांतर : ते केसु आणि दिनेश तिकडे डाएटचा बोर्‍या वाजवत असताना तुझा हा उतारा झक्कासच ;)

In reply to by गणपा

आठवडाभर हे असलं डायेटवालं खाल्लं की विकांताला डायेटला विश्रांती द्यावी लागते..;) बाकी सुप एकदम फक्कड होते ..टूक टूक..

In reply to by गवि

रंग छान आहे. कडवट नसेल ना पण ?
गवि गवि गवि... अहो बाटलीतल्या वेगवेगळ्या रंगाच्या द्रव्यांबद्दल कधी हा प्रश्न पडलाय का तुम्हाला? मग उगाच सूपाबद्दल कशाला शंका ? ;) तळीराम

In reply to by परिकथेतील राजकुमार

नाही..म्हणजे तसं असेल तर सुपासोबत काहीतरी चकणा चावायला घेऊन बसायला बरं म्हणून विचारलं. ;) - गळिराम

करून पाहायला पाहिजे.. गाजराचा फ्लेवर राहात नाही ना पण? टोम्याटो सूपही असंच करतात काय?

स्वातीताई, माझ्या लेकीचं फार आवडतं सूप आहे हे. आता तुझ्या पद्धतीने करून पाहीन. थोडं वेगळं करते मी. मसाले न घालता थोडी जायफळ पावडर आणि मिरपूड घालायची.

आह्ह... :) अवांतर :--- आयटी कंपनी मधील मॅनेजर मंडळी रोज गाजराचं सुप पीत असावीत, कारण बरेच टीम मेंबर्स त्यांचा मॅनिजर फकस्त गाजरंच दाखवतो असे म्हणताना मी ऐकलं आहे. ;)

सूप छानच! वर सहजराव म्हणतात तसे बीट घातले तर, मस्त रंग येईल!

आजच हे सूप केले होते. अगदी वेगळी आणि छान चव लागते. माझ्याकडून थोडे आले जास्त झाले ते पुढच्यावेळेस कमी घालीन.:)