जे न देखे रवी...
शनि गेला मंगळाकडे
Primary tabs
शनि गेला मंगळकडे
मागायाला हात
म्हणे, युतीवे आपण दोघे
करू सर्वांवर मात
मंगळ म्हणे शनीला,
रंग माझा बदलतो आहे,
पृथ्वीवरचा माणूस
इकडे यायला निघतो आहे.
चंद्र म्हणे, माणसाचा आता
भरवसा नाही राहिला.
मला अक्षता टाकून एकदा
रोहिणीला पाहून हसला.
राहू - केतूने ऐकला संवाद
म्हणे त्यांना सावध रहा.
माणसासाठी अधुन-मधून
आपापली स्थाने बदलत रहा.
मंगळ म्हणे शनीला,
रंग माझा बदलतो आहे,
पृथ्वीवरचा माणूस
इकडे यायला निघतो आहे.
हे छानच
राहू - केतूने ऐकला संवाद
म्हणे त्यांना सावध रहा.
माणसासाठी अधुन-मधून
आपापली स्थाने बदलत रहा.
हे छानच.....
(आकाशात धुमकेतुची वाट पाहणारा)
मदनबाण.....
राहू - केतूने ऐकला संवाद
म्हणे त्यांना सावध रहा.
माणसासाठी अधुन-मधून
आपापली स्थाने बदलत रहा.
हे कडवं सह्ही आहे! :)
आपला,
(मराठी आंतरजालावरचा शनि) तात्या.
छान कविता. तुम्ही कुठल्या अर्थाने लिहिली आहे माहित नाही. पण राजकीय दृष्ट्या विचार केला तरी त्यांत बरीच ओळखीची पात्रे दिसू लागतात.
वेगळी पात्रे निवडुन केलेली कविता छान झाली आहे.