जे न देखे रवी...
॥ स्फूर्ती देवीची आरती ॥
Primary tabs
॥ स्फूर्ती देवीची आरती ॥
स्फूर्ते अवघड भारी तुजविण संसारी ।
अज्ञानी वत्सांच्या ज्ञाना विस्तारी ॥
वारी वारी मजला अकर्मण्याद्वारी ।
कृतीच्या स्फूर्ती ने आम्हा निवारी ॥ १ ॥
जय देवी जय देवी, जय स्फूर्ती देवी ।
निष्चळ मन हो सत्वर, वर दे संजीवनी ॥ धृ ॥
त्रिभुवनी भुवनी पाहता तुलना तुज नाही ।
तव किमयेचे कौतुक कळते लवलाही ॥
अगणित मनुजा प्रेरक कमालीची ठरशी ।
ती शक्ती तू मज दे, गाईन तव कीर्ती ॥ २ ॥
उत्स्फूर्त वदने स्फूर्ती देशी निजदासा ।
आळसापासुनी सोडवी, वाढवी जीवनाशा ॥
स्फूर्ते तुज वाचून कोण वाढवी यशा ।
'नरेंद्र' तल्लीन झाला, तव धरी जिज्ञासा ॥ ३ ॥
नरेंद्र गोळे २००४१०२०
नवरात्रीला ह्या आरतीस आळवणार्याला स्फूर्ती प्राप्त व्हावी हीच प्रार्थना.
ही आरती मायबोली व मनोगतावर ह्याआधीही प्रसिद्ध झालेली असली
तरी इथल्या वाचकांस कदाचित नवीही वाटू शकेल.
इथल्या वाचकांस कदाचित नवीही वाटू शकेल.
धन्यवाद. आरती आवडली. मी प्रथमच वाचली.
हेच म्हणतो..
तात्या.
धन्यवाद विकास.
वाचणारे अनेक असले तरी अभिप्राय काही सगळेच देत नाहीत.
अभिप्रायार्थ धन्यवाद!