Skip to main content

कोंबडी वडे

लेखक समई यांनी बुधवार, 09/02/2011 21:36 या दिवशी प्रकाशित केले.
मला कोंबडी वडया ला लागणार पिठ द्ळुन आणायच आहे. माझ्या कडे आहे ति रेसिपि अशि आहे.. १ किलो तांदुळ-- धुवुन वालवुन घ्यायचा १ वाटि-उडिद डाळ - भाजुन १ वाटि चणा डाळ - भाजुन ३ चमचे धणे भाजुन २ चमचे बडीशेप भाजुन २५ ग्राम मेथ्या (भाजाय्च्या नाहित्...अजुन कडु होतात) २ मुठि गहु भाजुन वरिल सर्व एक्त्र द्ळुन अणायच थालिपिठाच्या पिठासारख.. या मध्ये अजुन काहि सुधारणा अस्तिल तर सांगा.. बाकि कोंब्डि वडे रेसिपि लवकरच फोटोसहित कोणि टाकल्यास आभारि आहे :):)

वाचने 7553
प्रतिक्रिया 12

प्रतिक्रिया

सुंदर आहेत रेसेपी !! अभिनव लेखण प्रकारामुळे मिपावर पाककृती लेखणाचा नविन पायंडा पडेल असे वाटते. - दिपस्तंभ

In reply to by रेवती

ओये ... कोंबडी वडे व्हेजं च असतात ... त्यात काय कोंबडी णसते काय ... अधिक प्रकाश जाणकार टाकतील

In reply to by टारझन

माहितिये रे. शक्यतो वड्यांबरोबर चिकन करीचा फोटू असतो तो बघायला आले होते. तुझं भारी लक्ष रे ....

माझी आई दुसर्‍या दिवशी वडे करायचे असतील तर ते पीठ आदल्या दिवशीच रात्री भिजवायची व इडलीच्या पीठा प्रमाणे आंबवायची. रात्री भिजवताना त्यात एका वाटीत गरम कोळसा ठेवुन त्यावर थोडे तुप टाकुन झाकुन ठेवते. त्यामुळे दुसर्‍या दिवशी त्याला मस्त एक smoked taste येते.