Skip to main content

मारामारी----

लेखक निवेदिता-ताई यांनी गुरुवार, 10/02/2011 20:00 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या 'इकडे' सर्वात जास्त आवडणारा हा प्रकार.. साहित्य- दोन उडीद वडे, एक ईडली, झणझणीत सांबार भरपुर, वरुन सजावटीसाठी बारीक शेव, कोथिंबीर. कॄती-- एक प्लेट घ्या , जरा खोलगट असावी, त्यात वडे व ईडली ठेवा, त्यावर भरपुर सांबार घाला , शेव व कोथिंबीर वरुन पसरावी. ह ही घ्या मारामारी..
https://picasaweb.google.com/nivulifeisthebest/hhGzpE?feat=embedwebsite" आहे ना मस्त.

वाचने 6211
प्रतिक्रिया 14

प्रतिक्रिया

एकदम झकास. ------------ मारामारी हे नाव बहुतेक गुजर मस्तानी मध्ये पण आहे असे पुसटसे आठवते आहे. लक्षात येत नाहिये नक्की .. पण ह्या नावाचा पदार्थ (वेगळा) खाल्लेला आहे. बहुतेक मस्तानीच असावी.

In reply to by रेवती

पुण्यातल्या अमृततुल्यमधे 'मारामारी' म्हणजे चहा आणि कॉफी एकत्र ! चू भू दे घे !

In reply to by संदीप चित्रे

बरोबर आठवले मला आठवत्च नव्हते कुठे हा प्रकार प्यायला आहे. मस्तानीत वेगवेगळॅए नावे होती.. बहुतेक ती गुडनाईट होती, उगच तीला मारामारीचे नाव दिले. ... मुळ मुद्दा हे पाकृ पण भारीच

मारामारी हा ज्युसचा प्रकार ऐकुन माहित व्हता... (अननस+संत्रे, किंवा अननस+मोसंबी ) पण हा वडे+इडली वाला प्रकार नविनच कळला... :) (खाबुराव) :)

In reply to by मदनबाण

ज्युस च्या अश्या प्रकाराला गंगा-जमुना बोलतात .. मारामारी नाहि ऐकले अजुन.

In reply to by गणेशा

ज्युस च्या अश्या प्रकाराला गंगा-जमुना बोलतात .. मारामारी नाहि ऐकले अजुन. इथे टिचकी मारुन पहा :--- http://www.lifeunordinary.com/2010/03/maramari.html जालावर शोध घेतल्यास अजुन नवे प्रकार सापडतील... ;)

डिश मधील वडे इडली सोबत मारामारी करत असतील, मला पहिले खा मला पहिले खा ! म्हणून या डिश चे नाव मारामारी ठेवलेले दिसते !