Skip to main content

कोबीची भजी

लेखक कच्चा पापड पक्का पापड यांनी शनिवार, 26/02/2011 15:54 या दिवशी प्रकाशित केले.
उरलेली कोबीची भाजी, ह. डाळिचे पीठ, तिखट, मीठ, बारीक चिरलेला का॑दा, आल लसुण पेस्ट, १ अ॑ड . उरलेली कोबीची भाजी मिक्सर मधे बारीक करुन घेणे. . वरिल सर्व पदार्थ भाजी मधे घालुन गरम तेलात भजी तळणे. . . .

वाचने 6977
प्रतिक्रिया 12

प्रतिक्रिया

पुरातन काळात जेंव्हा आमच्याकडे ब्लॅक अँड व्हाईट टिव्ही होता आणि फक्त दुरदर्शन हीच वाहिणी यायची , तेंव्हा मुकबधीरांसाठी खास बातम्या येत असत त्यात सगळं पाहुन ( साइन कन्व्हेण्शन्स) बातम्या समजुन घेता येत , ही पाककृती वाचन दृष्टया विकलांगांनाही समजावी म्हणुन एक अभिनव प्रकारे मांडल्या गेली असल्याने पाककृती क्षेत्रात मैल्याचा दगड ठरावी . बाकी आधी ही "कोदा ची भजी " आहे असे वाटल्याने दोन सेकंद रोचक वाटुन गेले . - कच्चा कच पक्का पक

अंडे? ही भजी अंडे न घालता मस्त होतात. माझ्या लग्नाच्या केळवणाला सगळ्या जेवणाबरोबर मैत्रिणीच्या घरी ही भजी केली होती. त्यानंतर तितकी चांगली भजी खाल्ली नाहीत. तुमच्या फोटोतील भजी जरा मध्यम आचेवर तळायला हवी होती काय?

In reply to by रेवती

माझ्या लग्नाच्या केळवणाला सगळ्या जेवणाबरोबर मैत्रिणीच्या घरी ही भजी केली होती.
ती उरलेल्या भाजीची नसवीत अशी आशा व्यक्त करतो आणि माझे भाषण संपवतो.

In reply to by परिकथेतील राजकुमार

अरे हो, बरी आठवण झाली. तू लग्न कधी करतोयस परा?;)

मस्त ही भजी आमच्याकडे सोवळ्याच्या स्वंयपाकात कांदा भज्याला ऑपशन म्हनुन करतात. पण आमच्याकडे सोवळ्यात अंडे चालत नाही. ;)

In reply to by मुलूखावेगळी

आमच्याकडेही नैवेद्याच्या स्वयंपाकात तसेच चातुर्मास पाळणार्‍यासाठी कोबीची भजी करतात. कोबी बारीक चिरुन त्यात हळ्द, तिखट, मीठ घालून साधारण अर्धा तास ठेवायचे. कोबीला पाणी सुटते त्यात मावेल इतपत पीठ आणि अगदी थोडे पाणी घालून पीठ भिजवायचे. मस्त खेकडा भजी होतात.

ही कोबिची भाजी पांढरी का दिसतेय... भजी मस्तच.. आणी कोबी असताना कांदा का घातलाय....दोन्ही चवी एक्त्र ...?????????

आमच्याकडे याला कोबीचे मुटके म्हणतात आणी ते भज्यासारखे डीप फ्राय न करता रोल करून शॅलो फ्राय करतात. त्यात अंडे वापरत नाहीत.

चांगली पाकृ.. बाकी ते फोटो म्हणजे.. आपल्या कडे १.३ मेगापिक्सल कॅमेरा असलेला सेल आहे हे दाखवण्याचा क्षीण प्रयत्न!