Skip to main content

कैरीचे फ़ुटे (गोड लोणचे)

लेखक निवेदिता-ताई यांनी बुधवार, 09/03/2011 14:01 या दिवशी प्रकाशित केले.
आज सकाळीच मंडईत गेले होते तो तिथे ह्या महाराणीचे आगमन झालेले दिसले, ह्या हंगामातील पहिली कैरी.........पाहूनच तोंडाला पाणी सुटले. मग काय घेतली पटकन....हो संपायला नको....आणी घरी आल्या आल्य़ा चालू झाले लगेच काम. प्रथम कैरी स्वच्छ धुवुन - पुसुन घेतली. त्याच्यावरील साले काढून टाकली, त्याच्या अगदी बारीक फ़ोडी केल्या.एक वाटी फ़ोडी असतिल तर एक वाटी चिरलेला गुळ, मिरची पावडर- मिठ चविनुसार, घालून सगळे एकत्र करुन ठेवले.
आणी त्याला मोहरी, हिंग, हळद घालून खमंग फ़ोडणी दिली व पुन्हा एकत्र केले.. हे घ्या तय्यार....कैरीचे फुटे--
हे लोणचे चार- पाच दिवस टिकते....(उरले तर)

वाचने 8232
प्रतिक्रिया 30

प्रतिक्रिया

In reply to by परिकथेतील राजकुमार

पाणी सुटुन तुझा पेग ज्यादा माईल्ड झाला नाही ना? का त्यावर काही उपाय केला होतास?

>> ह्या हंगामातील पहिली कैरी.........पाहूनच तोंडाला पाणी सुटले अगदी अगदी. कैरी पाहुन तोंडाला पाणी न सुटणारे विरळेच! बाकी लोणच अगदी 'झ्याक' झालय. या विकांताला करेन म्हणते! ;)

superb... मी पण कैरीचे असेच लोणचे करते. एकदम मस्त. तोंडाला पाणी सुटले. आमच्या कडे ते कधी ४ दिवस टिकतच नाही. २ दिवसातच संपते. ;)

करकरीत कैरीचे लोणचे... तोंडाला पाणी सुटले बघा. हंगामातील या पहिल्या कैर्‍यांची गंमत म्हणजे त्या कोवळ्या असतात. त्यामुळे ही कैरी खाताना दात फार आंबत नाहीत. चला आज आणतोच कैरी :)

कालच केले होते हे लोणचे मी इथे. यात एक.. फोडणी गार झाल्यावर घालयची लोणच्यावर. आणि दुसरे म्हणजे.. हे लोणचे २-३ दिवसाम्तच संपवावे.. रादर संपतेच. :)

अग्ग्ग्ग्ग्ग्ग! अगदी चवदार असते हे लोणचे. आम्ही याला कैरीचे 'चालू' लोणचे म्हणतो. तसेच पटकन संपवायच्या साखरांबा, गुळांब्यालाही 'चालू' मुरांबा म्हणतो.;) आता भारतीय दुकानात जाते आणि आणतेच एक तरी कैरी (चव नसेना का त्या कैरीला)!

In reply to by रेवती

रेवती, अगं त्या 'चालु' मुरांब्याची पाकृ दे ना... मला पण खुप आवडतो मुरांबा :)

In reply to by Mrunalini

कैरी आणून मुरांबा करीन तेंव्हा पाकृ देइनच. तोपर्यंत हा जरा वेगळा मुरांबा बघ. http://www.misalpav.com/node/8242

In reply to by रेवती

मस्त आहे ग.. करुन बघेल एकदा. इथे ते हापुस आंबे मिळत नाहीत. त्यामुळे जे afican आंबे आहेत, त्याचा करुन बघेल.

In reply to by निवेदिता-ताई

निवेदीता ताई.. मुरंबा कर नक्की.. पण खबरदार त्या "घरच्या हापुस" आंब्याच्या मुरंब्याचा फोटो इथे टाकलास तर!!! संपाद़कीय अधिकारात तुझ्या सगळ्या पाकृ उडविल्या जातील. ;) * सांगायचा मुद्दा असा की, आमची जळजळ होते गं *

ओह कैरी !कैरी म्हणजे माझी सर्वात प्रिय ,कैरीचा प्रत्येक पदार्थ मला आवडतो म्हणुन हाही आवडला:)