Skip to main content

भारत द.अफ्रिका म्याच भारत हारणार ?

लेखक उग्रसेन यांनी शनिवार, 12/03/2011 18:21 या दिवशी प्रकाशित केले.

वाचने 1305
प्रतिक्रिया 32

प्रतिक्रिया

सच्या आन विरुची ब्याटींग सोडली तर आज लय चव घातली भारतानं. पावनेचारशे रन होतेन असे वाटून राह्यले होते. दोनशे सदुष्ट वर दोन औट होते. आन दोनशे सत्त्यान्नव सारे औट झाले. च्यामारी. भारत कोणाच्या भरुशावर वर्ल्ड कप जिकायचं सपन पाहून राह्यल कोणास ठाऊक. आफ्रिका कितव्या ओहरीत जिंकन तेवढीच गोठ राह्यली आता. :( बाबुराव :(

In reply to by उगा काहितरीच

कसा धीर धरु भौ. भज्जी, जहीर,मुनाफ यायला विकेटा मिळतीन का भो. ब्याट्समन क्रीज सोडून बाजूला उभा राह्यला तरी यायचे चेंडू ष्टांपावर जानार नाय. देवा काय तरी चमत्त्कार कर रे बाबा. बाबुराव :)

In reply to by उग्रसेन

कसा धीर धरु भौ -->हातावर प्रसाद धरतात तसा!! दुसरा काही उपाय सुचतो का धिर धरल्याशिवाय ? :| धरा धिर !!! हाकानाका :)

In reply to by उगा काहितरीच

आमचे आपले जरा जगावेगळेच प्रवीण कुमार धोनीच्या कंपूतला .त्याला दुखापत झाली ( म्हणजे खरी झाली का .....) तर नेहेराची वर्णी लागली ( आल्या आल्या ह्यांच्या पाठीत उसण भरली म्हणे .) म्हणजे इतके दिवस खेळवले नाही त्याचे अधिकृत कारण . चावला इतक्या सामन्यातून खरच समस्त भारतीय प्रेक्षकांना चावला . मग '' नेहरा लाव देश बचाव '' अशी घोषणा बाजी झाली . साहेब आले .मग धोनी ने शांत डोक्याने त्याला शेवटची ओवर दिली . ''आता दाखव तुझा पराक्रम ? आता'' अश्विन लाव देश बचाव '' अशी एक घोषणा सुरु होणार . फार पूर्वी नेहरा जेव्हा फॉर्मात होता व धोनी नवशिक्या. तेव्हा नेहराने त्याला अत्यंत सभ्य भाषेत एक झेल सोडल्याबद्दल सुनावले होते . जुना हिशोब चुकता झाला . ह्या दृश्यांची फीत हवी असेल तर तू नळी वर आहे पूर्वी कोटा सिस्टम व आता कंपुबाजी त्यामुळे असे प्रकार सर्रास होणार .

In reply to by निनाद मुक्काम …

निराश झालो (सचिन सारखाच) , :( मनमोहन पंतप्रधान आणि धोणी कॅप्टन दोघाचेही दोष आता समोर यायला लागलेत , देशाची वाट लागायला आता फारसा वेळ लागणार नाही !!!

शेवटच्या १० ओवर्स भारत अत्यंत घाण खेळला. विकेट स्लो झाली असली तरीही बॉलला १ रन ह्या गतीने ३२० अशक्य नव्हतेच. पण आता स्लो झालेल्या आणि वळणार्‍या विकेटचा फायदा उठवता यायला हवा. आहे हा स्कोअर सुद्धा अतिशय वाईट नाहीये! लेट अस होप फॉर द बेस्ट!! चिअर अप गाईज स्टिल अ फुल इनिंग टु गो!!!

भारत म्याच हारणार होता असं वाटलंच होतं. साडेतिनशे रन झाले असते तर म्याच जिंकलोबी असतो. पर क्रिकेटात जर तर ला काय महत्त्व नसतं :( आशिष नेहराचे विशेष आभार. मद्दान करणा-या मिपामंडळीचा आभार. (दु:खी )बाबुराव

शेवटची ओवर भज्जीला न देता रड्या नेहराला देणार्‍या धोणीच्या बैलाला होsss. बाबुरावांनी हा धागा काढून पनवती लावल्याबद्दल त्यांच्यापण बैलाला होssss. (कोण राहिलं आता.... हां) रडतराऊत नेहराच्या पण बैलाला होsssssssssss. (बाबुराव हलकेच्या घ्या बर्का)

In reply to by रमताराम

बाबुराव हलकेच्या घ्या बर्का प्रतिसाद हलकेच घेतला. पर म्याच हलकेच घेतला नाय. नेहराला काय गरज होती शेवटची ओव्हर द्याची. फोकलीच्याला चार रन हानल्यावर बी सिक्सर माराचा बॉल टाकला. म्याच ते हरते पर माझा बॅलेन्स जातो त्याचे काय ? च्यामारी त्या धोनीच्या. बाबुराव :)

In reply to by उग्रसेन

शेवटून दुसरी ओवर भज्जीला काढून जहीरला दिली तेव्हाच आम्ही निश्चिंत झालो की म्हणजे भज्जी शेवटच्या ओवरला येणार म्हणून. पण नेहरा चेंडू घेऊन यष्ट्यांकडे आला तेव्हा आम्ही 'नोssssss' असे जोरात ओरडलो (आसपासचे सगळे दचकले) नि मनात म्हटले की संपला खेळ आता, आणि तसेच झाले. चला आता आम्ही असे म्हटलो म्हणून आमच्याही बैलाला होssssss. जाऊ द्या ते सगळं क्रिकेट गिकेट नेऊन घाला की हो तिकडे.... बारा गडगड्याच्या हिरीत्त.

In reply to by रमताराम

अगदी असेच तपशीलात किंचीतसा फरक पण नेहरा चेंडू घेऊन यष्ट्यांकडे आला तेव्हा आम्ही 'नोssssss' असे जोरात ओरडलो (आसपासचे सगळे दचकले) नि मनात म्हटले की संपला खेळ आता, आणि तसेच झाले. पण नेहरा चेंडू घेऊन यष्ट्यांकडे आला तेव्हा आमच्याकडची छोटी छोटी पोरेसोरे देखील 'हारलो तेजायलाssssss' असे जोरात ओरडली (आसपासचे सगळे +१ म्हणाले) नि सगळ्यांच कळले की संपला खेळ आता, आणि तसेच झाले.

In reply to by कानडाऊ योगेशु

नेहरा इतका वाईट प्लेअर ए तर त्याला खेळायला का घेतात? तेसुद्धा खर्‍या वर्ल्ड कपात..

In reply to by शिल्पा ब

कधी काळची पूर्वपुण्याई! २००३ च्या वर्ल्ड कप मध्ये इंग्लंडविरूध्य तो चांगला खेळला होता.एका स्पेलमध्ये त्याने त्याच्या वाट्याची सर्व १० षटके टाकली होती.

खर सांगतो. आपल्याला आधीच कळत भारत कधी जिंकणार. जेव्हा सचिन फेल जातो तेव्हा यश नक्की. सचिनचे शतक झाले तेव्हाच कळले कि आता आपण हरणार.

In reply to by सुधारक

हा मूर्ख पूर्वग्रह किती दिवस बाळगणार कोण जाणे. जरा क्रिक-इन्फोच्या संस्थळावर सचिनचे प्रोफाईल पहा. त्या मधे क्रिकेट फॅक्ट्स खाली 'फॅक्ट्स' पहा. या मॅचपूर्वी त्याने ४८ शतके काढली होती त्यापैकी ३३ सामने आपण जिंकले आहेत. ग्रो अप, गोर्‍या लोकांची री ओढण्याची वृत्ती सोडा आता. आता 'स्टॅटिस्टिक्स डजन्ट टेल एवरिथिंग' हा (मीच शहाणा कारण मी म्हणतो म्हणून अशा वृत्तीचा) मूर्ख तर्क येईल तो आगाऊच फाट्यावर मारण्यात येत आहे.

In reply to by रमताराम

हा प्रतिसाद लवलाट आहे. वन अ‍ॅक्युरेट मेजरमेंट इज सुपिरियर दॅन थाउजंड ब्रिलियंट ओपिनियन्स असं अभय बंग म्हणत असतात त्याची खात्री पटली.

In reply to by सुधारक

हा दुवा कृपया पहा व सचिनने केलेल्या ४८ एकदिवसीय शतकातील किती सामने भारताने जिंकले आहेत हे शेवटचा रकाना पाहून सांगा.

In reply to by सुधारक

बदला...बदला.....विचार बदला आधी. सचिनचे शतक झाल्यावर बाकीच्यांनी किती धावा केल्यात त्या चेकवा एकदा. मग समजेल आपण का हरतो ते. निम्मे रन्स तर सचिनचेच असतात. आणि बोलर्स....ते तर भरवतच असतात दुसर्‍यांना. मग का नाही हरणार आपण???????

In reply to by नन्दादीप

विचार बदला आधी. विचार बदलण्याची 'परंपरा' नाहीये आपल्याकडे नन्दादीप. अहो माझ्या मताच्या विरोधी हजारो उदाहरणे असली तरी ते सग्गळे अपवादच असतात नि एक उदाहरण बाजूचे असले तरी ती सिद्धता असते. कारण शेवटी सत्य म्हणजे 'मला जसे आहे असे वाटते ते.' पुरावा कसला मागताय डोंबलाचा. आम्ही सांगतो ना मग ते ब्रह्मवाक्य.

In reply to by रमताराम

जौद्या हो नंदादिप, ररा सचिन वर टिका केली की लोकं विचारजंत वंत होतात म्हणे. ;)

In reply to by सुधारक

सचिन फेल जातो तेव्हा यश नक्की असाच म्हणाचा होता पर रमतारम आन सहजदादाच्या आकडेवारीमुळं तसं काय म्हन्नार नाय. बाबुराव मांजरेकर. :)

सगळेजण नेहराला शिव्या देताहेत पण स्लॉग ओव्हर्स मधे ६ बॉल १४ रन ही काही इतकी भयंकर घटना नाही. खरी गोष्ट ही आहे की भारत फक्त ४८.२ ओव्हर्सच खेळू शकला. तिथेच भारत मॅच हरला.

वर्ल्ड कप फीक्स आहे. भारतच फायनलला पोचणार.. ते घडले नाही तर इथे, जाहीरातदार, सट्टेबाज, गूतवणूक्दार व बहूराश्ट्रीय कंपन्या इत्यादींचा पोपट नाय का व्हनार......... जस चील.

शीर्षकात म्याच या शब्दानंतर अर्धविराम नसल्याने आणि शेवटच्या शब्दात योग्य अक्षराऐवजी 'र' टाकला असल्याने मत दिले नव्हते.

भरभक्कम भागीदारी नंतर सुद्धा कसे हरणे शक्य होते हे धोनी आणि कंपनी ने पूर्ण क्रिकेट खेळणाऱ्या देशांना दाखवून देले ह्या बद्दल त्यांचे जाहीर आभार. या बद्दल या सर्वांचे तोंड भरून कौतुक . आता सर्व जण सचिन चे शतक झाले कि भारत नेहमी हरतो असे म्हणायला मोकळे .( पण भरल्या ताटात ओक .... , बाकी कंपू बद्दल कोण बोलणार ?) धोनीला एक सल्ला : कृपया आपल्या आणि भारताच्या नशिबा बरोबर आणि आपल्या टीम च्या batting order बरोबर खेळू नये.

ह्या हारल्यामुळे बिल्कुल णिराष झालो नाही. कारण १. तेंडल्याचं शतक २. हरभजन ला विकेट्स ३. नेहरा , मुनाफ आणि झहीर या फास्टर्स ने मस्त बॉलिंग केल्या . नेहरा च्या शेवटच्या ओव्हर ला १३ रण जाणे काही अशक्य गोष्ट नव्हती. नेहरा ने त्या आधी उत्तम बोलिंग केली होती. :) हारलं की शिव्या घालणे सोडा :)