Skip to main content

हमारे पाक इरादे...

लेखक शेखस्पिअर यांनी सोमवार, 16/06/2008 21:54 या दिवशी प्रकाशित केले.
जीवनात ही घडी अशीच राहू दे... हे तुम्ही ऐकले आहेच... जेवणात ही कढी अशीच राहू दे... हे ही तुम्ही कुठेतरी ऐकले असेल... पण त्याच्या पुढचे माझ्याकडून ऐका... आणि हो;चालीत कढी गायली तर चव छान लागेल.. जेवणात ही कढी अशीच राहू दे.. त्यावरी तुपाचा तवंग नाचू दे.. || घुसळले वाडग्यात दही देखणे.. उमलुनी येते नवनीत वेगळे.. उरलेला ताकवा कढीस लाभू दे...|| हळुच तुपात फोडणीला जिरा आगळा.. कडिपत्ता स्पर्शुनी ये गंध वेगळा.. हळदीतुन अंग अंग धुंद होऊ दे.. || राहू देत 'उकळी'ला नित्य हासता.. स्वर्गीचा नाद फुटे कढी भुरकता.. पंगतीला कढी पीत धन्य होऊ दे.. ||

वाचने 5019
प्रतिक्रिया 10

प्रतिक्रिया

(कढीप्रेमी)बेसनलाडू याला विडंबन म्हणावे काय? (पृच्छक)बेसनलाडू

हळुच तुपात फोडणीला जिरा आगळा.. कडिपत्ता स्पर्शुनी ये गंध वेगळा.. हळदीतुन अंग अंग धुंद होऊ दे.. || वा! कढी छानच झाल्ये! :)

In reply to by विसोबा खेचर

तुमची प्रतिक्रिया ऐकून मल कढ आला... शब्द चुकीचे असतील तर भावना समजून घ्या..

In reply to by शेखस्पिअर

काल तुझ्या बहिणीला घातला डोळा काश्मीरी थाटाचा ठसका वेगळा मधूनच लुडबुडला बेसनाचा गोळा दोन्ही बहीणींचा मज लागला लळा... (लागला कारे तडका?)

जेवणात ही कढी अशीच राहू दे.. त्यावरी तुपाचा तवंग नाचू दे.. || स्पेशल गुजराथी खिचडी, कढी याची आठवण झाली . ( बडोद्याचा वारकरी) अमोल