Skip to main content

मिक्स पराठा ...

लेखक पियुशा यांनी रविवार, 20/11/2011 10:55 या दिवशी प्रकाशित केले.
मिक्स पराठा.
साहित्य : गव्हाच पीठ ४ वाट्या ,बेसन पीठ १/२ वाटी, उकडलेले बटाटे ४-५ , कोथिंबीर बारीक चिरलेली आवडीनुसार , १ छोटा चमचा जीरा पावडर , एक अर्धा चमचा लाल मिरची पावडर, एक चमचा गरम मसाला , आल-लसूण पेस्ट १ चमचा , पुदिन्याची पान बारीक चिरून ( यात तुम्ही आपल्या आवडीनुसार भाज्या वापरू शकता ) आवडीनुसार .हिरवी मिरची पेस्ट एक चमचा ,२ मध्यम कांदे बारीक चिरून ,हळद, मीठ चवीनुसार (चाट मसाला ऑपशणल) , बटर / तूप कृती : गव्हाच पीठ , बेसन एकत्र चाळून चवीनुसार मीठ घालुन कणिक भिजवून घ्यावी ,कणिक भिजवताना दोन चमचे तेल घालावं कणिक मऊ होईल. एका पॅनमध्ये तेल गरम करा ,त्यात बारीक चिरलेला कांदा गुलाबी होईस्तोवर परतून घ्या ,आता त्यात गरम मसाला , लाल तिखट ,हि.मिरची पेस्ट ,आल लसून पेस्ट , हळद ,मीठ ,जीरा पावडर ,कोथिंबीर , पुदिना अन उकडलेले बटाटे हाताने स्म्यश करून टाका ,मिश्रण नीट परतून घ्या आता हे मिश्रण थोड थंड झाल की हाताने पुन्हा एकदा एकजीव करा ,कणकेची पारी करून त्यात हे मिश्रण भरून पराठा लाटा . वरून भरपूर बटर / तुप लावा गरम गरम टेस्टी पराठा ,दही / सॉस , पुदिन्याची चटणी बरोबर सर्व करा .

वाचने 15379
प्रतिक्रिया 51

प्रतिक्रिया

मस्त. पण वेगवेगळे फोटो न काढता एकच फोटू विविध कोनांतून काढून दाखवायचे प्रयोजन काही समजले नाय ब्वा. ती लाल चटणी म्हणजे शेजवान सॉस आहे का? अगदी तशीच दिसतेय. शिवाय तुम्ही पाकृत वर्णित केलेली पुदिना चटणी कुठेच दिसत नाही.

In reply to by प्रचेतस

ती लाल चटणी म्हणजे शेजवान सॉस आहे का? नाही तो टंमाटो सॉस आहे तुम्ही पाकृत वर्णित केलेली पुदिना चटणी कुठेच दिसत नाही पुदिना परठ्यात घातलेला अस वर्णन आहे ते ,ती हिरवी चट्नी पुदिन्याची नाही कोथिम्बिरिची आहे :)

In reply to by पियुशा

नाही तो टंमाटो सॉस आहे
सॉसला फारच तेल सुटले आहे ब्वा.
पुदिना परठ्यात घातलेला अस वर्णन आहे ते
गरम गरम टेस्टी पराठा ,दही / सॉस , पुदिन्याची चटणी बरोबर सर्व करा . हे तुम्हीच वर लिहिले आहे ना?

In reply to by प्रचेतस

....पुदिन्याची चटणी बरोबर सर्व करा
पुदिन्याची चटणी आपली आपणच, आपल्याला हवी तशी बनवायची आहे. पियुशाबैंनी त्या चटणीची कृति दिलेली नाही. पुदिना प्राठ्यात मिक्सून टाकलाय नं मग चटणीसाठी उरला नसेल..... ;-)

In reply to by प्रचेतस

कमाल आहे बुवा
मग काय पियुशाबै येणारेत करून द्यायला?

In reply to by प्रास

मग काय पियुशाबै येणारेत करून द्यायला?
अहो त्यांनी यायची काय जरूर है, पण गेलाबाजार निदान चटणीची पाकृ तरी द्यायला नको का?

In reply to by प्रचेतस

@ वल्ली पुदीना चट्नी : सहित्य : पुदिना १ जुडी , हिरव्या मिरच्या ४-५. दहि ३ चमचे ,लसुन पा़क्ळ्या ५-६ ,मिठ चविनुसार वरिल साहित्य मिक्सिमध्ये बारिक वाटुन घ्या, एका फोड्नीपात्रात तेल जिर मोहरि ,हिन्ग्,कढिपत्ता याची खमन्ग फोड्नी करुन चट्नीवर घाला :)

In reply to by शिल्पा ब

तुम्ही चटणी केलीत की कळवा हो!!
आम्हास कुठलीही पाकृ करण्याची वा टाकण्याची हौस नाही काही आणि केली तरीही तुम्हास ती कळवण्याची तसदी घेण्याचे कुठले कारणही आम्हास दिसत नाही.

In reply to by प्रचेतस

पार अगदी "चटणीची पाकृ नाही, चटणी दिसत नाही" करु करु सार्वजनिकरीत्या विचारलेत म्हणुन म्हंटलं एवढं विचारलंच आहे तर केल्यावर कळवा.

In reply to by शिल्पा ब

विचारले म्हणून केलेच पाहीजे असे तर नाही ना. शिवाय विचारले म्हणजे आम्ही ते करूच असे लिहिलेले तुमच्या दिव्य दृष्टीला दिसले असल्यास त्याला माझा इलाज नाही. शिवाय विचारणे आणि करणे यातील फरक तुम्हास कळत असावा हा आमचा भ्रम या निमित्ताने दूर झाला हे चांगलेच.

In reply to by प्रचेतस

सामान्य लोकं साधारणपणे पाकृ वगैरे करणार असतील (कधी का होईना) तर अगदी सगळं विचारुन घेतात..आयत्या वेळी गोंधळ नको म्हणुन...आपण असामान्य विद्वान आहात हे यानिमित्ताने समजले.

In reply to by शिल्पा ब

सामान्य लोकं साधारणपणे पाकृ वगैरे करणार असतील (कधी का होईना) तर अगदी सगळं विचारुन घेतात.
परत तेच. विचारणे आणि करणे हा फरक तुम्हास अजूनही कळला नाही.
आयत्या वेळी गोंधळ नको म्हणुन..
झाला गोंधळ तर झाला, काय फरक पडतोय.
आपण असामान्य विद्वान आहात हे यानिमित्ताने समजले.
धन्यवाद. आपणही अतिसामान्य विदुषी आहात याचाही साक्षात्कार झाला.

In reply to by पियुशा

पुदिन्याच्या चटणीची नवीनच पद्धत कळली. फोडणी घालून केलेली ही चटणी करुन बघितल्या जाईल.

>>गव्हाच पीठ , बेसन एकत्र चाळून चवीनुसार मीठ घालुन कणिक भिजवून घ्यावी पिठे चाळल्यानंतर त्यातील कोंडा वेगळा होतो. नेमके या कोंड्यातच सगळे सत्त्व असते म्हणे. तुम्ही हे चाळून घेऊन सत्त्व काढून टाकलेले असल्याने शरीरास पौष्टीक घटक मिळणार नाहीत. मागेही तुम्ही अंड्याची काहीतरी कृती दिली होती. त्यातसुद्धा अंडी अति उकडून त्यातील पोषकद्रव्ये नष्ट केली होती. आता चवीबद्दल देवाला आणि तुम्हालाच माहित, पण निदान पौष्टीक तरी असावी ना पाककृती.

In reply to by अन्या दातार

आता चवीबद्दल देवाला आणि तुम्हालाच माहित तुम्ही करा,अन सान्गा कसे आहेत ते :)

In reply to by अन्या दातार

टिप्पणी मूळ मुद्द्याला बगल देऊन केल्याबद्दल निषेध! मुळ मुद्दा कुठ्ला कनिक चाळुन घेन्याचा ? मला वाटत कनिक चाळुन नाही घेतली तर पोळ्या वातड होतिल कोन्ड्यामुळे ,! आम्ही तर चाळुनच घेतो नेहमी ! ज्याचा त्याचा चॉइस यु नो ;) अन पॉष्टीक बद्द्ल बोलशील तर गव्हाच्या पिठात सोयाबीन घाल दळुन ,अजुन पॉष्टीक होतील पराठे ;)

In reply to by प्रचेतस

गव्हाच पीठ चाळून घ्याची गरज नाही.पण बेसन पीठ चाळूनच घ्यावे.

शणवारच्या सुट्टीचा सदुपयोग म्हण्तात की काय या धाग्याला? ;-) बाकी प्राठे छान दिसतायत बरं का! (चवीबद्दल न खाता कस्काय बोलणार?) :-)

In reply to by ५० फक्त

>>हुरडा पार्टीला बोलावशिल ना तेंव्हा हेच करुन आण झाSSSSलं! कित्ती कित्ती ऑप्टीमिस्टीक असाल हो ५०राव? ;)

In reply to by अन्या दातार

ऑप्टिमिस्टिक नाय रे, खरंच आहे ते, बघ तुला पण आमंत्रण पाठवतो, अभ्यासाची खैरना बाळगता येणार का हुरडा पार्टीला जानेवारीत ?

In reply to by ५० फक्त

अभ्यासाची खैरना बाळगता येणार का हुरडा पार्टीला जानेवारीत
एखादी गाळलेली जागा राहिली आहे का भरायची?

In reply to by आत्मशून्य

अहो त्यात बेसनापण आहे.त्याचाही रंग येणारच न! हळदीच म्हणाल तर पियू कणिक मळताना स्वप्नात गुंग झाली असेल!

ह्याला मिक्स पराठा असे नांव का दिले आहे? हा एक वेगळ्या प्रकारचा आलू पराठा वाटतो आहे.

In reply to by प्रभाकर पेठकर

त्या प्राठ्यात तेल + कांदा + गरम मसाला + लाल तिखट + हि.मिरची + आल + लसून + हळद + मीठ + जीरा + कोथिंबीर + पुदिना + बटाटे इतकं सगळं 'मिक्स' नै का केलंय? मग? ;-)

मिक्स पराठा म्हणजे वर दिलेला पराठा होत नाही. सो मी तरी असहमत. बाकी हा परोठा पौष्टीक म्हणता येईल. - पिंगू

In reply to by पिंगू

तुने तो कॉमेंट्स पढी ही नही. वरती मी बोटे चालवून काय झक मारली का? अगदी विदा देऊन मी आक्षेप घेतला तरी तुम्ही म्हणता, परोठा पौष्टीक??? :shock: घोर कलियुग रे देवा!!!!

In reply to by अन्या दातार

@ अन्या तु काय सगळ पौष्टीकच खातोस का रे ;) म्हणजे अगदी ,जिवनसत्वे,प्रथिने,कर्बोदके,सत्व्-बित्व ,क्यालरिज चेक करुन ;) अन तसेही मी या पराठ्याला पौष्टीक कुठे म्हनल रे ? ;) आपल गरिबाच साध खाण आहे ते ;) त्यात कसला आलाय पौष्टीकपणा ;)

सुगरण आहे हो पोरगी. फक्त हे पदार्थ खाण्यासाठी इन्शुरन्स वैग्रे असणे कंपलसरी आहे का ?

सुगरण आहे हो पोरगी. सगळ्याना माहीत आहे मि पा वर ;) फक्त हे पदार्थ खाण्यासाठी इन्शुरन्स वैग्रे असणे कंपलसरी आहे का ? हे तुम्ही तुमच्या जबाबदारीवर खाणे , काही कमिजास्त झाल तर आमची जबाबदारी नाही ;) तुमचा इन्शुरन्स आहे ना ? तो कधी कामी येणार मग ;) की नुसते हफ्ते भरणार? ;)

फोटो तर लय झ्याक आलेत.चवही तशीच असणार. आत्तापर्यंत एवढा चान दिसणारा पराठा मी फक्त हॉटेलमध्येच खालालय. मी बनवते तेव्हा आतलं सगळ सारण कवर फोडून बाहेर आल्लेल असत! बोलाव कधी तरी खायला!

In reply to by किचेन

फोटो तर लय झ्याक आलेत.चवही तशीच असणार.
फोटोची चव कशी बघणार? प्रिन्टाऊट काढून की डायरेक्ट स्क्रीनवर?