Skip to main content

गाजर हलवा पाय (Pie)

लेखक सानिकास्वप्निल यांनी सोमवार, 23/01/2012 07:07 या दिवशी प्रकाशित केले.
आपण गाजर हलवा नेहमीच आवडीने खातो आणी हिवाळ्यात तर घरोघरी हमखास बनवला जातो :) मी विचार केला नेहमीचा हलवा बनवून सर्व्ह करण्यापेक्षा त्यात काहीतरी वेगळेपण असले पाहिजे म्हणून हा छोटासा बदल :) चला तर मग सुरुवातीपासून सुरु करुयात ;) साहित्य: १ किलो गाजरे सालं काढून किसून घेणे १ मग भरून गरम दूध ३/४ -१ वाटी साखर (आवडीप्रमाणे कमी-जास्त) ३-४ टेस्पून खवा (घरी केलेला ताजा खवा वापरावा किंवा साय, मिल्क पावडर वापरली तरी चालेल ) ४ टेस्पून साजुक तुप सू़का-मेवा १ टीस्पून वेलचीपूड ९-१० मॅकविटीज (मारी) बिस्कीटे ५० मिली फ्रेश क्रीम . पाकृ: एका भांड्यात २ टेस्पून साजुक तुप गरम करून त्यात गाजराचा कीस परतून घ्यावा. . गाजराचा कीस चांगला परतला गेला की त्यात थोडे-थोडे करुन दूध घालावे व सतत परतत राहावे. . दूध पूर्ण आटले की त्यात खवा घालावा . सतत परतून मिश्रण घट्ट होऊ लागेल. . मिश्रण सुकत आले की त्यात साखर घालावी. साखर विरघळल्यावर मिश्रण पातळ होईल. सतत ढवळत रहावे. . हलवा साधारण सुकत आला की वरून २ टेस्पून साजुकतुप सोडावे म्हणजे हलव्याला चकाकी येते व हलवा खमंग लागतो. . त्यात आवडीप्रमाणे सुकामेवा व वेलचीपूड घालावी . हलवा थोडा पातळ असेल,पूर्ण गार झाला की एकसंध होईल. . गाजर हलवा तयार आहे. तुम्ही असाच किंवा व्हॅनिला आईस्क्रीम बरोबर सर्व्ह करु शकता :) . अब आ गया ट्विस्ट ;) फ्रेश क्रीम थोडं व्हॅनिला एसेन्स व थोडी साखर घालून व्हिप करुन घेणे. आपल्याला पाय बनवायचा आहे त्यासाठी मारी बिस्कीटांचे तुकडे करावे व एका झिपलॉक बॅगमधे ठेवून त्यावर लाटणे फिरवून चुरा करावा. . तयार चुर्‍यात वितळलेले बटर घालून सगळ्या चुर्‍याला नीट चोळून घ्यावे. . आता तुमच्याकडे जर स्प्रींगफोर्मचा केक टीन असेल तर तुम्ही तो वापरु शकता. माझ्याकडे नाही आहे म्हणून मी पेस्ट्री कटरचा वापर करत आहे. (तसेही मला Individually सर्व्ह करायला सोपे पडले :) ) पेस्ट्री कटरमध्ये बिस्कीटांचा चुरा नीट दाबून पसरावा. . त्यावर तयार गाजर हलव्याचा थर पसरावा. (गाजर हलवा पूर्ण गार झालेला हवे) . त्यावर व्हिप केले क्रीम पसरावे व पिस्त्याचे काप लावावे. फ्रिजमध्ये सेट करण्यासाठी ठेवावे अर्धा-एक तास. सर्व्ह करतेवेळी सुरी कडेने फिरवून अलगद पेस्ट्री कटर काढावे. . तुमचे डेजर्ट खाण्यासाठी तयार आहे :) .

वाचने 14524
प्रतिक्रिया 49

प्रतिक्रिया

In reply to by मराठमोळा

तुम्ही सांगितल्यानतंर मला ही शिर्षक वाचून हसु आले :) गणपाभौंच्या ह्या धाग्याची आठवण झाली

In reply to by प्राजु

मस्त आयडीया आहे.. एकदम आवडली!! सह्ही!! करेनच असे नाही !! सोपंही आहे... नक्की करेनच असे नाही ;). - (आळशी) चुचु

सानिकाबाई, तुमच्या उत्साहाला आणि कल्पनाशक्तीला सादर प्रणाम!! बाकी काही बोलायची गरज नाहीच.

सानिकाताई, काय बोलु..... 'हॅट्स ऑफ' (गाजर हलवा विशेष आवडत नाहि पण ह्या कृती नुसार केल्याने आवडण्याची शक्यता आहे, लवकरच करुन बघेन :) )

In reply to by उदय के'सागर

गाजर हलवा विशेष आवडत नाहि
हिंदी शिणीमात हिरो व्हायची संधी गेली म्हणायची. बाकी.. खीर आवडते का हो तुम्हाला ?

In reply to by परिकथेतील राजकुमार

मला गाजराचा हलवा खूप आवडतो... तसेच आलू, कोबी, मुळा, इ. चे पराठे आवडतात. मला मिळेल शिणुमात हिरोईन व्हायची संधी?

In reply to by स्मिता.

हा हा हा :D एक नंबर.... पण शिणुमात होरोईन होण्यासाठी, हिरोईन ला ते अवडुन चालत नाहि... ते हिरोईन ला बनवता आले पहिजे (हिरो ला प्रेमाने म्हणायला "आज मैने तुम्हारे लिये 'गाजरका हलवा/आलू/ गोबी/ मुली का पराठा' बनाया हैं!"). आवडण्याची 'एलिजीबीलीटी' होरो ची असते ... यु नो - सो कॉल्ड भारतीय (बॉलीवुड) संस्कृती :P ...

मुडदा पडला गेला आहे, त्या कढईभर गाजराच्या किसावर तो पिवळाधमक तुपाचा चमचा कसला किल्लर आहे, बाकी काही बोलायची सोयच नाही, स्वप्निलभौ, तुमाला धीर धरवतो कसा ओ फोटो काढायला, का ते शेतात बैलाच्या तोंडाला जाळी बांधुन खुरपणी का काय करतात तसं असतं तुमच्याकडं,

In reply to by ५० फक्त

>>>शेतात बैलाच्या तोंडाला जाळी बांधुन सौ ५० फक्त काहीतरी पदार्थ बनवत आहेत आणि ५० फक्त स्वाईन फ्ल्यूच्या वेळची जाळी तोंडाला बांधून चुळबूळ करीत बसले आहेत असे चित्र डोळ्यापुढे आले. ;) कढईत हात घालायला 'विवक्षित कारणां'मुळं बंदी असल्याचं गोपनीय सूत्रांकडून समजतं. ;)

सिनेमात इतक्यावेळा "गाजर हलवा आणि मुळ्याचे परोठे" बघितले आहेत की, ते फक्त कलाकारान्चेच अन्न आहे असे वाटत होते.....पण "गाजर हलवा " अधिक मजेशिर करण्यात पण एक वेगळीच कला आहे.... खरेच पाक "शास्त्र " हे कधि कधि "कले" कडे पण झुकते.....

सानिकाजी का... ? का.. असे पदार्थ दाख्वुन आमचे आत्मे तळमळवता तुंम्ही? नाही नाही सहन होत हे आता! बघवत नाही हो शेवटच्या फोटुक्कडे
( त्या फोटुमुळेच तर पाच पाच मिनिटाला हे पान उघडतोय! ;) )
न्हाय यीसरायला यायचा ह्यो पदार्थ आता- "गाजराचा हलवा पाय !!" ;)

बेक्कार रेशिपी हाये :) सानिका, काय चालवलं आहेस तू? आता मला करायलाच लागणार आहे गाजर हलवा पाय ;)

विन्ट्रेश्टींग हो... तुम्ही आधी दिलेल्या काही पाककृती करुन पाहिल्यात आणि त्या चांगल्या झाल्या होत्या त्यामुळे ही पाकृ पण करून बघेन ( तुम्ही दिलीत म्हणून, एरवी मी फ्युजनच्या भानगडीत अजिबात पडले नसते... ) :)

त्या गणपा ला आणि हिला पण कुणीतरी धोपटूनकाढा रे !ऊत आणला आहे दोघांनी! रेसिपी बाकी टी. ओ .पी!!!!

कोणीतरी एक प्रोग्राम तयार करा रे. या काही लोकांचे धागे आले की "छान" "अप्रतिम" "मेलो" अशा प्रतिक्रिया धागा न उघडताच दिल्या जातील असा. रोज तेच काय लिहायचं?