Skip to main content

व्हेज कटलेट

लेखक Pearl यांनी शनिवार, 04/02/2012 07:23 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः शिजवलेले बटाटे ३/४, २ वाट्या शिजवलेले (मटार + गाजर + कॉर्न + श्रावण घेवडा शेंगा), बारीक रवा, तेल, तिखट, मीठ, धनेपूड, जिरेपूड, बारीक चिरलेला लसूण, ब्रेड २/३, किंचित मिरपूड(ऑप्शनल) क्रुती: १)एका बाउलमध्ये शिजवलेले बटाटे मॅश करून घ्या. दुसर्‍या बाउलमध्ये शिजवलेले (मटार + गाजर + कॉर्न + श्रावण घेवडा शेंगा) मॅश करून घ्या. आणि आता ते चांगले एकत्र करा. २) ब्रेड ओले करून लगेच पिळून घेऊन वरील मिश्रणात घालून चांगले एकत्र करा. मग त्यात चवीनुसार तिखट, मीठ, धनेपूड, जिरेपूड, मिरपूड आणि बारीक चिरलेला लसूण घाला. आणि मिश्रण एकजीव करा. ३) आता त्याचे कटलेट बनवून, बारीक रव्यात घोळवून शॅलोफ्राय करून टोमॅटो केचप बरोबर खा. photo1 ही पाकृ आहे हेल्दी आणि स्नॅकसाठी बेस्ट. करायला सोपी आणि छान आहे याची टेस्ट (माझीही १ जिलबी ;-))

वाचने 11298
प्रतिक्रिया 27

प्रतिक्रिया

- ही लिंक अर्धवट कॉपी झाली आहे. पुन्हा एकदा पहा. अवांतर - सगळं करुन खाउन झाल्यावर फोटोची आठवण आली असेल, मग फोटो नाही अपलोडवला असा कावा आहे की काय अशी शंका येत आहे.

In reply to by Pearl

कंपुला आणि वल्लीला घाबरुन.. न दिसणा-या कटलेट वर एक लेटकट विडंबन टाकलं म्हणजे पंचाईत व्हायची ना.

आपणच लेखाला जिलबी कशाला म्हणताय? त्यापेक्षा खर्‍याच जिलब्यांची पाककृती द्या ना!

In reply to by प्रचेतस

हा गोंधळ होणार माहितीच होतं. (म्हणून मुद्दाम तसं लिहिलं होतं) वल्ली, लक्षात ठेवा सौ म्हणजे "सौजन्य". १० वेळा लिहून दाखवा बघू!

In reply to by पैसा

आम्हाला आपला सौ. चा प्रचलित अर्थच माहीत होता जो लवकरच स्पाकाकांच्या आयुष्यात प्रवेश करणार होता. आणि हो पाककृती बेस्टच, सुरुवातीच्या स्टेप्सचे थोडे अजून फोटो हवे होते.

In reply to by प्रचेतस

पैसातै, तुम्हाला चिसौका (चिरंजीव सौभाग्यवती कांक्षिणा) लिहायचं होतं असं वाट्टंय ? बाकी रत्नांग्री तुम्हाला जास्त जवळ, त्यामुळं तुम्हाला जास्त माहिती.

In reply to by ५० फक्त

५०, अहो काय हे? डायरेक सौभाग्यवती कांक्षिणा????? स्पावड्याच्या असल्या आवडी माहिती नव्हत्या ब्वा. ;)

In reply to by मयुरपिंपळे

कस्तुरी मॄगाला कोठे माहीत असते की त्याच्या जवळ कस्तुरी असते ते .. :bigsmile: असेच काहीसे तुम्चे पण झाले आहे मयुरजि....... साधारण्तः नवकवि जे काव्य..? प्रसवतात त्याला जिलब्या टाकणे म्हणतात.पिंपळे तुम्हि पण छान जिलब्या बनवता..

In reply to by पिंगू

कटलेट आणि जिलब्या दोन्ही लहान आकाराच्या दिसताहेत.. कटलेट लहान आकाराचे आहेत कारण ते कमी तेलात नीट शॅलोफ्राय व्हावेत म्हणून. आणि जिलब्यांच म्हणाल तर त्या मोठया आकाराच्या झाल्या तर 'कटलेट नको जिलब्या आवरा' असे मिपाकर म्हणतील ;-)