Skip to main content

सुपरबॉल स्पेशल - ओनियन रिंग्ज

लेखक स्वाती२ यांनी सोमवार, 06/02/2012 05:40 या दिवशी प्रकाशित केले.
यावर्षी सुपरबॉल इंडियानापोलिसच्या लुकस ऑइल स्टेडियममधे खेळला जातोय. त्यामूळे पार्टीचा उत्साह वेगळाच! यावर्षी पार्टीसाठी - ओवन बेक्ड ओनियन रिंग्ज! साहित्यः १/२ कप लो फॅट दही १/२ कप ब्रेड क्रंब्ज १/२ कप कॉर्न मिल २ यलो ओनियन ( स्वीट ओनियन मिळाल्यास उत्तम) १/४ चमचा मीठ १/२ चमचा तिखट थोडे तेल तेलाचा स्प्रे कृती : ओवन ४०० फॅ. ला तापत ठेवावा. कुकी ट्रेला फॉइल लावून घ्यावी.फॉइलला तेलाचा हात लावावा. कांद्याचे साल काढून त्याच्या साधारण १/४ इंचाच्या चकत्या कापाव्यात. या चकत्या हाताने वेगळ्या करुन त्यातील मोठ्या आणि मध्यम आकाराच्या रिंग्ज घ्याव्यात. एका बोल मधे १/२ कप दही काट्याने फेटून घ्यावे. दुसर्‍या बोलमधे कॉर्नमिल, ब्रेडक्रंब्ज, तिखट, मीठ एकत्र करावे. यातील निम्मे मिश्रण बाजूला ठेवावे. कांद्याची रिंग दह्यात बुडवावी. सगळ्या बाजूने दही लागले की काट्याने उचलून ब्रेडक्रंब्जच्या मिश्रणात टाकावी. बोल हलवून मिश्रण रिंगला लावून घ्यावे. दुसर्‍या कोरड्या काट्याने रिंग उचलून तयार ट्रेवर ठेवावी. अशा सगळ्या रिंग्ज ट्रेवर लावाव्या. साधारण एका कांद्यानंतर मिश्रणात गुठळ्या होतात. असे गुठल्या झालेले मिश्रण टाकून द्यावे आणि बाजूला ठेवलेले मिश्रण वापरायला घ्यावे. रिंग्जवर तेलाचा स्प्रे मारून ट्रे तापलेल्या ओवनमधे १५-१७ मिनिटे ठेवावा. गरम गरम रिंग्ज बियर बरोबर सर्व कराव्या.

वाचने 7459
प्रतिक्रिया 21

प्रतिक्रिया

छान पाकृ! शेवटचा फटू आणि शेवटचे वाक्य मनाला गुदगुल्या करणारं.;) आत्ता प्रतिसाद टाईप करताना टिव्हीवर बर्गर किंगची अनियन रिंगांचीच झायरात चालू आहे.

कितीतरी दिवसांपासून माझ्या मनात होतं की ही पाककृती घरी करावी आणि मिपावर टाकावी. तुम्ही टाकल्याबद्दल अभिनंदन. येत्या विकांती वेळ मिळाल्यास ह्या पाककृतीचे भारतीय चवीचे व्हर्जन टाकण्यात येईल. - पिंगू

शेवटची ओळ आवडली .. पण "गुठल्या झालेले मिश्रण टाकून द्यावे " हे कय आमच्या काटकसरी मनाला पटले नाही

डीप फ्राय केलेल्या ओनियन रिंग पेक्षा हा पर्याय बरा वाटतो. :) अश्याच प्रकारे कांदाभजी करायची पद्धत असेल तर कळवा रे कुणी तरी. ;)

In reply to by गणपा

>>अश्याच प्रकारे कांदाभजी करायची पद्धत असेल तर कळवा रे कुणी तरी काय चेष्टा करता गणपाभौ !

In reply to by सूड

चेष्टा नाय बे! त्ये गनपा काय पन करतंय! सोत्ताच करून दावंल त्यो येक दिवस!

In reply to by बिपिन कार्यकर्ते

तेच म्हणायचंय हो, गणपाभौने अशा रेशिप्या विचारणं म्हण्जे आनपूर्णेन भाजीला फोडणी कशी द्यायची विचारल्यासारखं आहे. ;)

In reply to by सूड

काही म्हणा, चेपुवरचे फटु बघून वाटतंय की, गणपा साडी नेसून (बनवाबनवीच्या सचिनसारखा शंतनु'चा' बायको 'सुधा' बनून) भाजीला फोडणी देताना भारीच वाटेल....!

छान आहेत ओनियन रिंग्ज, अशा प्रकारे करुन बघते :) बीयर बॅटरमधल्या ओनियन रिंग्ज पण छान लागतात ;)