Skip to main content

लिंबाचे लोणचे

लेखक जागु यांनी शुक्रवार, 25/05/2012 12:17 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः १० लिंब २ चमचे हळद दिड चमचे लाल तिखट पाव चमचा हिंग ८ चमचे मिठ ३-४ चमचे मोहरी डाळ दिड चमचा मेथी २ मोठ्या पळ्या तेल (मी जास्त लिंबांच केलय लोणच. मोजून बघा :हाहा:) पाककृती : प्रथम लिंबू स्वच्छ धुवून, पुसुन त्याच्या आपल्या आवडी प्रमाणे प्रत्येक लिंबाच्या ४ किंवा ८ फोडी करुन घ्या. आता एकीकडे मेथी थोड्या तेलावर भाजून वाटून घ्या. ती गार झाली की मिक्सरमध्ये तिची पुड करा. (साहित्याच्या फोटोत छोट्या वाटीत आहे) लिंबाच्या फोडींवर मिठ टाकुन कालवून ठेवा. १ पळीभर तेल चांगले गरम करून गॅस बंद करा व त्यात मोहरीची डाळ टाका. आता ही फोडनी पुर्ण थंड होऊ द्या. हिंग, हळद, मिरचीपुड, मेथीपुडवर ही थंड झालेली फोडणी ओतून मिसळा. आता हे मिश्रण मिठ चोळलेल्या लिंबांमध्ये एकजीव करा. आता ह्या मसाला मिश्रीत फोडी एका बरणीत दाबून दाबून भरा. राहीलेल तेल गरम करुन पुर्ण थंड करा व बरणीतील लोणच्यात ओता. झाकण घट्ट बंद करून ८-१० दिवस चांगले मुरल्यावर खायला घ्या. अधिक टिपा: लोणच्याचा तयार मसाला वापरू शकता पण त्यात माझ्यामते मजा येत नाही. मेथीपुड बाजारात मिळते पण घरी केलेल्या पुडीला जास्त खमंगपणा असतो. कोणत्याही लोणच्यात लोणच्याच्या फोडी बुडेपर्यंत तेल बरणीत घालावे म्हणजे लोणच्याला बुरशी चढत नाही.

वाचने 12355
प्रतिक्रिया 31

प्रतिक्रिया

मस्तच मला फार फार आवडतं लिंबाचं लोणचं आणि त्यातल्या त्यात फोडणीच्या भाताबरोबर खायला तर काय पा.तों.पा.सु... मस्तच गं :)

शेवटुन तीसरा आणि दूसरा फोटो पाहताना तोंडास प्रचंड पाणी सुटले. लिंबाच्या गोड्या लोणच्याची पाकृ असेल तर टाक.

In reply to by जागु

पाकृ माझ्याकडे आहे पण फोटोसाठि केमेरा नाहि .म्हणुन मी टाकलि नाही.

व्वा, त्या लिंबाच्या फोडिंचा फोटो पाहुन काय ग्गाग्गार वाटलं म्हणुन सांगू. :) सानिकाताईचि पाकृ पाहिल्यानंतर एकतर कमात लक्ष लागत नव्हतं.. कसंतरी कामाला सुरवात केली तर जागुतै ची पाकृ आली आणि अता पुन्हा 'जसै थे'... एकतर आधिच शुक्रवार.. कामाचा कंटाळा त्यात अश्या सुग्रणिंच्या पाकृ वाचुन आणि ते कातिल फोटो पाहुन अजुनच मन विचलीत होतं.. संपादकांना विनंती - सानिकातै, जागुतै, मृणालिनी, आणि गणपा ह्यांच्या ऐकमेकांच्या पाकृ मधे कृपया जरा २-३ दिवसांचे अंतर असावे ;) ... (पण त्यांच्यापैकी एकाची तरी पाकृ रोज येत राहो :))

मदनबाण येते ना आंबोशीचे लोणचे. आधी मला आंबोशी तयार करावी लागेल. पिंगू ठिक आहे ठेउन देते. अमृत, अमिता, मनिषा वल्ली धन्यवाद.

In reply to by RUPALI POYEKAR

जबरा, तुम्ही हे कसं ओळखु शकता सांगाल का जरा ? एखादं वेळा ट्राय करुन पाहेन म्हणतो.

In reply to by जागु

हा हा हा :) (इथे काम न करायला आणि ते टाळायला निमीत्तच लागतं ;) )

छान. आता या लोणच्याच्या पाच सहा बरण्या भराव्यात. पहिली या वर्षीसाठी घ्यावी. बाकीच्या थोडे जास्त मीठ घालून ठेवाव्यात.. त्या बरण्या ४, ५ किंवा ७,८ वर्षानी वगैरे उघडाव्यात.. छान काळे कुट्ट लोणचे तयार झालेले असते.. तोंडात ठेवल्यावर विरघळते.

झक्कास. एम्.पी.एल्. (मिसळ पाव लाजवाब) मध्ये अजून एक सिक्सर. कैरीच्या लोणच्याची तयारी केली आहेच आता लिंबंही आणावी म्हणतो. माझी आई ह्या लोणच्यात हिरव्या मिरच्याही घालायची. त्यामुले मस्त हिरव्यागाSSर मिरच्याही आणाव्या लागणार.