Skip to main content

तंदूर कोळंबी

लेखक मराठमोळा यांनी गुरुवार, 12/07/2012 06:41 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, महत्वाची सूचना: मुख्य पानावर सारखे माझे नाव आणि धागे दिसल्याने कुणाला त्रास होत असेल तर सॉरी.. :) काही गोष्टी अनिवार्य असतास. समजून घ्याल अशी मायबाप वाचकांकडून अपेक्षा. कोळंबीचा हा माझा सर्वात आवडता प्रकार आहे. तंदूर कोळंबी नुसतं म्हंटल तरी तोंडाला पाणी सुटतं. पटकन साहित्य घ्या. साहित्याचा अन कृतीचा फोटु न दाखवता हाटेलसारखं डायरेक्ट फायनल डिशच तुमच्या समोर ठेवणार हाय. :) साहित्यः १. पावशेर कोळंबी २. एका लिंबाचा रस ३. लाल तिखट १-२ टे.स्पून ४. काश्मिरी लाल तिखट १ टे.स्पून ५. एक पळी वितळलेले बटर ६. आलं पेस्ट १ टे.स्पून ७. लसूण पेस्ट १ टे.स्पून ८. एव्हरेस्ट तंदूर मसाला २ टे.स्पून ९. मीठ चवीनुसार १०. अर्धा कांदा उभा चिरून कृती: १. कोळंबी स्वच्छ धुवुन घ्या आणि धागा काढुन घ्या. २. लिंबाचा रस, लाल तिखट, काश्मिरी तिखट, आल आणि लसूण पेस्ट, मीठ, तंदूर मसाला आणि बटर चांगले एकजीव करुन घ्या. ३. या मिश्रणात कोळंबी मरीनेट करा. कमीत कमी १ तास. ४. ओव्हन १५० डिग्रीवर प्री-हीट करा १० मिनिटे. ५. ट्रे वर अ‍ॅल्युमिनिअम फॉईल पसरवा. ६. आता फॉईलवर कोळंबी पसरवून ठेवा. ७. १८० डिग्रीवर फॅन फोर्स्ड मोडमधे १५-२० मिनिटे ठेवा. दर ५ मिनिटांनी कोळंबीची बाजू बदलत रहा. इथे जरा अंदाजानेच आणि लक्ष ठेवून वेळ किती ते ठरवा. ८. कांदा पाण्यात धुवुन घ्या. त्यात मीठ आणि थोडे काश्मिरी तिखट घाला. ९. कांदा, लिंबू आणि कोळंबी प्लेटमधे ठेवून सजवा आणि लुटा मस्त आनंद.

वाचने 6926
प्रतिक्रिया 14

प्रतिक्रिया

तुम्हाला नेमका गुरुवारच सापडला काय ? हे इथे टाकायला ! आज काय बोलु शकत नाय, बाकीची प्रतिक्रिया उद्या.

मस्त रे भाउ ,एक्दम झक्कास ,तोंडाला पुर आला... :tongue: असले धागे असतील तर सारख सारख तुमच नाव असायला कोणाची काय हरकत असणार आहे हो... ;)

In reply to by शिल्पा ब

छान. कोणी करुन देणार असेल तर अजुन छान. हो ! पण त्यासाठी तुम्हाला भाव खावा लागेल .मग तुमचे अहो करतील की ... :)

तुझे लेख सतत बोर्डावर दिसतात म्हणून काही जण आणि जणी मिपावर यायचं बंद झाल्यात अशी माहिती मिळाली आहे.

In reply to by नाना चेंगट

अरे वा बरं झालं!!! :) बर्‍याच जणांचा कपटावाचून.... हे आपलं.. सुंठावावून खोकला गेल्यासारखं झालं असेल मग... ;)

In reply to by स्पंदना

कोळंबी म्हंटल की निम्म्मी लढाई हरतो आपण तर ब्वा! लढाई कसली खाण्याची की करण्याची... ;)