Skip to main content

वेज फ्राय

लेखक चटोरी वैशू यांनी बुधवार, 20/08/2008 10:22 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार! मी चटोरी वैशू.... मला मिपा खूप आवडली... आणि मी इकडे प्रवेश केला... माझी आवडती भाजी मी इथे देत आहे... बघा तुम्हाला आवडली तर... suggestions पण अपेक्षित आहे.... वेज फ्राय साहित्य : ३ बटाटे, १ पाव भेंडी, ५ मोठ्या मिरच्या, ८-९ पाकळ्या लसून, अर्धी वाटी मटार किंवा चवडीच्या शेन्गाचे दाणे, १/२ च. जिरे, १/२ मोहरी, हळ्द, मीठ, कोथिंबिर , तेल ३ टि.स्पून, मिर्चि पावडर चवीपुरता, १/२ गरम मसाला इ. कृती : बटाट्याचे सोलून पातळ पातळ काप करा (जास्त पातळ नाही किंवा जाड ही नाही... जे तेलात न करपता लगेच शिजतिल) . भेंडी ला मधुन चिर देवुन २ इंचाचे कापुन तूक्डे करा. मिरचिला पण भेंडी सारखेच चिरा... लसुण बारिक चिरुन घ्या... एका कढईत तेल तापवुन.जिरे-मोहरी घाला, ते तड्कले कि लसुण घाला, मग चिरलेल्या मिरचिचे तुकडे घाला, कापलेला बटाटा घाला... मटर घाला... हे सगळे अर्धवट शिजायला आल्यावर, त्यात मिरची पावडर, हळ्द, गरम मसाला घालून परतवा.मग भेंडीचे काप टाका, चवीनुसार मीठ घाला आणि सारखे भाजी ढवळत रहा, जो पर्यन्त भेंडी निट शिजत नाही . भाजी सारखी हलवत राहिल्यास भाजी कुरकुरीत होते. जेवायच्याआधी कोथिंबिर कापुन घाला...... आणि ..... टिप : पहिला घास घेताना "चटोरी वैशू" ची आठ्वण कढायला विसरु नका?

वाचने 6529
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

वैशू उत्तम.... फक्त भेन्डी ऐवजी दुसरे काहीतरी सुचवशील का? कारण मला अजिबात आवडत नाही {स्वार्थी पणा} बाकी रेसिपी खूप छान. श्रावण महिना सम्पल्यावर खायच्या काही रेसिपी आहेत का तुझ्याकडे?

अरे.. रे.. भेंडी तर सगळ्यांना आवडते... मग तुम्ही .... तोंडली चे पातळ काप टाकू श़कतात....

वैशू उत्तम.... पण मला बटाटे सोलतायेत नाहित... न सोलता टाकले तर चालतिल का? (म्हणे सालां मध्ये जिवन सत्व असते). बाकि सर्व उत्तम आहे.... (फोटो असता तर तोडांला पाणी सुटले असते.) (फोटो रेसिपि चा) ता. क. :- नॉनव्हेज रेसिपि श्रावण (म्हणजे गणपती ) झाल्यावर जरुर मि. पा. वर दाखव. आपला मुन्नाभाई

चवडीच्या शेन्गाचे दाणे, म्हणजे काय ते कळले नाही! तुम्हाला "चवळीची शेंग" असे म्हणायचे आहे का?