Skip to main content

इश्कबाजांच्या मैफिलीत

लेखक अधिराज यांनी शनिवार, 09/02/2013 12:46 या दिवशी प्रकाशित केले.
इश्कबाजांच्या मैफिलीत तू असावीस गाजलेली नशा शायरीत आणताना तू असावीस लाजलेली. दो जीवांची स्पंदने ही असावी तुझ्यातच रुजलेली वसंतातले रंग लेऊन तू असावीस सजलेली. घेऊन चांदणे उशाला तू असावीस निजलेली धुंद जाणिवेच्या धारांमध्ये तू असावीस भिजलेली. विरहसमय आला तरी नसावी प्रेमवात विझलेली बहू पालटले ऋतू जरी नसावी गझल झिजलेली.
लेखनविषय:

वाचने 2036
प्रतिक्रिया 13

प्रतिक्रिया

In reply to by संजय क्षीरसागर

गझल नाविन्य संपलेली किंवा कंटाळवाणी झालेली नसावी ह्या अर्थी तो शब्द वापरला आहे. पण तुमचा "थांबलेली" बी चालायला हरकत नाही. तुमच्यासाठी काय पन!

In reply to by अधिराज

शब्द नज़ाकतदार हवा. कविता (किंवा गज़ल) सखीशी नातं असतं तशी असावी. सखी थांबते. तिचं नाविन्य संपत नाही, तिचा सहवास कधी कंटाळवाणा होत नाही. आपला तिच्याकडे पाहण्याचा नज़रिया नाविन्यपूर्ण लागतो. ती अस्तित्वाचं प्रकटरूप असते, नित्यनूतन! तुमच्यासाठी काय पन!... क्या बात है! म्हणून तर लिहीलं.

इश्कबाज ?? शब्द अंमळ खटकून गेला बॉ.

कधीकधी खटकतात. मागे एकदा,मी एका कुठेही झोप येऊ शकणार्‍या मित्राला 'इच्छाशयनी' म्हटले तर त्याने वेगळाच अर्थ घेतला.

अतिशय सुंदर जमलीये.
दो जीवांची स्पंदने ही असावी तुझ्यातच रुजलेली वसंतातले रंग लेऊन तू असावीस सजलेली.
एकदम खास!