Welcome to misalpav.com
लेखक: DAGDU | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

कोणालाही काहीही लेबल चिकटवताना थोडासा विचार का नाही करत तुम्ही, माझ्या प्रश्ना मध्ये तुम्हाला काय वावगे दिसले? मला जो प्रश्न पडला होता तो मी इथे मांडला, मला काहीतरी योग्य उत्तर मिळेल ही अपेक्षा होती, परंतु बहुतेक सदस्य काहीबाही प्रतिसाद देत आहेत. बाकी विकास यांचा प्रतिसाद समतोल वाटला.

माफ करा :( धागा वाचल्यावाचल्या तशी शंका आली. जेन्युइन शंका असेल तर स्वागतच आहे. यापुढे सुधारणा केली जाईल.

मी लहान पणा पासून पाठ्यपुस्तकमधून वाचत आलो आहोत मग आत्ता देखील वाचुन सोडुन द्या ;)तसही आत्ता काही कोणती परीक्षा देणार आहात काय.. ?

>तुम्हाला व्हायचे असेल तर तुम्ही पण व्हा. फिस्सकन हसायला आलं. सही आहे =))

>>तुम्हाला व्हायचे असेल तर तुम्ही पण व्हा. अगदी अगदी !!

ज्याने चाकाचा शोध लावला तो खरा क्रांतिकारक. The man who discovered wheel, really created revolution. बा द वे ते नंतर

साबीर भाटिया म्हणजे गरमागरम टपालवाला का ! आय अ‍ॅम डॅम सिरीयस !

१८५७ पूर्वी भारतात इंग्रजांचा एकछत्री अंमल नव्हता.. त्यापूर्वी ईस्ट इंडिया कंपनीचे राज्य होते. १८५७ नंतर राणीचे राज्य आले. त्यानंतरचा हा पहिला उठाव. तुम्ही म्हणता तो न्याय लावयचा झाला तर १८५७ म्ह्ध्ये लढलेले सर्वच क्रांतिकारक होतील.

श्री. बॅटमॅन यांच्या भुमिकेशी सहमत. पण तरी देखील प्रश्न पडतो: जर पहील्यांदा क्रांती असे नाव ठेवल्या गेलेल्या मुलीचे, ते नाव हे वडीलांच्या ऐवजी, आई, आत्या, काका, मामा, मावशी, आजी, आजोबा यांच्यापैकी कोणी ठेवले असेल तर? मग अजून एक धागा काढावा लागेल. ;)

आद्य "क्रान्ति-कारक" = मनोज कुमार... त्याने एक छान सिनेमा काढला होता... क्रांती... नावाचा.. आणि हे सिनेमे वाले नेहमी म्हणातात....की ये मेरा प्रॉडक्शन है....

एक किंवा दोन, बस्स!! हि परिवार कल्याण मंत्रालयाची '३ टोमॅटो - १ बरणी'वाली जाहिरात आठवली. माझ्या एका मित्राकडे (३ भावंडे असल्याने) दर वेळी आमची बरणीच मोठी आहे असे वाक्य सदर जाहिरात लागल्यावर म्हंटले जायचे.

उमाजी नाईक खोमणे ह्यांच्याबद्दल जे काही जालावर वाचले त्यावरून त्यांनी किमान महाराष्ट्रात तरी ब्रिटीशांच्या विरोधात प्रथम लढा दिल्याचे दिसते. त्यांच्यावर १९६० साली गजानन जहागिरदार यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट देखील आहे. असेच मी मध्यंतरी एका कार्यक्रमात उत्तर भारतातील एका क्रांतिकारकाबद्दलही ऐकले होते. आत्ता नाव लक्षात नाही. त्यामुळे ब्रिटीशांच्या आगमनानंतर अनेकांनी मागेपुढे त्यांच्याशी लढे दिले असल्याचे लक्षात येते. त्यात १८५७ चे तमाम स्वातंत्र्यसैनिक देखील येतात. पण ते सर्व इस्ट इंडीया कंपनीच्या विरोधात होते हा एक भाग झाला. ब्रिटीशराज अस्तित्वात आल्यानंतर वासुदेव बळवंत फडक्यांनी एके ठिकाणी वाचल्याप्रमाणे, उमाजी नाईकांमधून प्रेरणा घेऊनच विविध जातींमधील लढवय्यांना एकत्र करून ब्रिटीश राज्याच्या (ईस्ट इंडीया कंपनिच्या नाही) विरोधात सशस्त्र लढा दिला. त्यातून पुढील अनेक क्रांतिकारकांनी प्रेरणा घेतली, केवळ महाराष्ट्रातीलच नाही. असे म्हणतात की आनंदमठ कांडंबरीत देखील काही प्रसंग हे फडक्यांच्या जीवनातील प्रसांगावर आधारीत होते. त्यामुळे त्यांना ब्रिटीश राज्याच्या विरुद्ध सशस्त्र लढा देणारा आद्यक्रांतिकारक समजले जाऊ लागले. तेव्हढ्यापुरतेच त्याचे महत्व आहे आणि द्यावे. नाहीतर असेच वाद घालायचे झाले तर स्वतःपेक्षा हजारो वर्षांनी मोठ्या असलेल्या देशाचे गांधी राष्ट्रपिता कसे आणि कस्तुरबांना राष्ट्रमाता का म्हणले जात नाही असे म्हणून पण वाद घालू लागाल आणि ते कुठल्या प्रेरणेतून म्हणले गेले या कडे दुर्लक्ष करू लागाल. असो.

लहुजी वस्ताद हे उमाजी नाईक यांच्या जरा अगोदर असल्याचे वाचले आहे आणि त्यांनीही ब्रिटिशांविरुद्ध लढा दिला होता असे वाचण्यात आले होते. आत्ता अधिक आठवत नाही.

धन्यवाद. चांगली माहिती मिळाली. (फक्त ते शालेय शिक्षणापासून वंचित कळाले नाही. साधारण १८०० साल असेल - तेव्हा आतासारख्या शाळा मुळातच नसतील ना?)

गुललोबाला विचारल्यावर उमाजी नाईक व वासुदेव बळवंत फडके, शिवाजी महाराज सोडुन खालील उत्तरे देखिल मिळाली मंगल पांडे स्वा. सावरकर राघोजी रामजी भांगरे संगोळी रायन्ना मदनलाल धिंग्रा राजाभाऊ पाटील पर्यटन व्यवसायातील आद्य क्रांतिकारक या सगळ्यांचा पण एकदा फैसला व्हायला हवा. त्यांनी कार्य बिर्य काय केले ते नंतर पाहू. त्या कार्या पासुन प्रेरणा घेणे तर नक्कीच महत्वाचे नाही.

या सगळ्यांचा पण एकदा फैसला व्हायला हवा. त्यांनी कार्य बिर्य काय केले ते नंतर पाहू. त्या कार्या पासुन प्रेरणा घेणे तर नक्कीच महत्वाचे नाही. शिवाय त्यांनी काय काम केले त्यापेक्षा ते कोणत्या जातीचे आहेत तेच काहीना महत्वाचे वाटते.

कि फाजीलपणाचा कळस ?

संपादित

तुमचा प्रश्न आणि तुम्हाला माहित झालेले उत्तर योग्यच आहे . (कुणाचाहि निषेध करुन कि-बोर्ड खराब करायचा नाहि) त्यामुळे बाकी चालू द्या

कुठल्याही विधानांबद्दल कसलाही आधार नसताना आणि कुठल्याही मुद्द्यांना उत्तरे न देणारे एका धाग्यावर समर्थन करायला आले जिथे धागा मुळात एका माहीतीवर आधारित आहे. त्यावर नीट उत्तरही दिले गेले आहे. धागाकर्ताही व्यवस्थित मुद्दा मांडतो आहे. पण लगेच आपली टिमकी वाजवायला पुढे. "तुम्हाला माहित झालेले उत्तर योग्यच आहे -- म्हणजे तुम्हाला स्वतःला जे हवे असेल तेच उत्तर योग्य आहे."

कुणी नीट उत्तर दिलेय? तुम्हाला स्वतःला जे हवे असेल तेच उत्तर योग्य आहे. मला कशाला हवे? वर जन्म आणि मरण तारखा दिलेल्या आहेत त्यावरून अनुमान काढणे हा साधारण माणसाचा साधा नियम आहे तो इथे इथल्या असामान्य माणसांकडून कसा मान्य केल्या जाईल? श्री छत्रपतिंच्या जन्मतारखेत गोंधळ घालणार्‍यां त्याना उपलब्ध करुन दिलेल्या तारखेवर विश्वास ठेवणे हे अशक्यप्रायच आहे