साला शब्द प्रसवावेत तर तात्यांच्या लेखणीनेच. आमचा तात्या लिहायला बसला, की शब्द न शब्द असे एका लायनीत आपला नंबर लागण्याचा नवस बोलत उभे राहतात. आलतू फालतू आंतरजालीय पांढर्यावर काळे करणार्यांचे ते कामच नाही.
छोटेखानी पण सुरेख अशा लेखात शब्दबद्ध केलेल्या भावना हृदयाला भिडल्या. लेखन वाचताना कधी मनातल्या मनात ३/४ चेहरे हे चित्रा जोशी म्हणून तरळून पण गेले, तर कधी माशाचा वास आणि ग्लास ओतलेल्या दारुचा आवाज कानावर येऊन गेला.
जियो तात्या !!
आता लवकरात लवकर 'ज्यो आन्टी' आणि 'मर्लीन बाबा' वर लेखन येऊ द्या.
च्यायला तात्या लिहायला बसले की किती वाचू आणि किती नको असं होतं. तुमची शैली ओघवती आहेच, पण त्यासोबत तुम्ही जे जिवंत वर्णन करता त्यामुळे ती घटना प्रत्यक्ष डोळ्यासमोर घडते आहे असं वाटतं.
ज्यो आन्टीचं व्यक्तीचित्र शोधा लवकर. सापडत नसेल तर मी येतो टंकून द्यायला.
घरी गाळलेली दारू पिण्याचं भाग्य एकदाच लाभलं आहे. साला बाकी सगळ्या नुसत्याच रंगित पाणी भरलेल्या बाटल्या वाटल्या होत्या तेव्हा.
आणि एकंदरीत तुमच्यातला जातिवंत खवय्या माहिती असल्याने तुम्ही मर्लीनच्या प्रेमात पडण्यापेक्षा तळलेल्या सुरमईच्या प्रेमात पडण्याचीच शक्यता जास्त वाटते आहे :-)
दादर आहे, डोंबिवली आहे, झालच तर परळही वा वा वा... येऊ द्या लवकर.
जाता जाता एकच प्रश्न - रोशनी कधी पूर्ण करताय तात्या?
व्यक्तिचित्र रेखाटावे तर तात्यांनीच, लेखणीतून हि माणसे जिवंत करणे हे अद्वितीय काम तात्या फक्त आणि फक्त तुम्हीच करू शकता. अप्रतिम. आणि त्यातुन हि स्वतःच्या बद्दल आलेल्या, अनुभवलेल्या अनेक भावनांना असे जगजाहीर करण्यास हि जिगर लागते. सुखावतो तुमचे लेखन वाचून, प्रत्येकी शब्दात स्वतःला शोधत.
टिव्हीवर किंवा कुठेही माधुरी दिक्षीत दिसली तरी अजुनही छातीतुन एक हलकीशी कळ जाते. प्रत्येकवेळा मनात येते..... जाउ दे. फक्त मनातल्या मनातच बोलायला जन्माला आलो आहोत आम्ही. साला प्रत्यक्ष बोलायची कुठे हिम्मतच झाली नाही.
तात्याबा, झकास झाले आहे प्रकटन.
प्रतिक्रिया
क्लास !
अगदी सहमत
+१
अप्रतिम.... हसुन हसुन वाट
हसुन हसुन वाट लागली
अप्रतिम.
वा तात्या
धन्यवाद
तात्या कच्चा माल
धन्यवाद जयपालराव..
सुरेखच जमलंय शोर्ट एन स्वीट
+१
माधुरी
चूभूदेघे...
मस्त हो तात्या....
टिव्हीवर किंवा कुठेही माधुरी
सर्व प्रतिसादी रसिकवरांचा
गाडी आणि स्टेशनं सगळंच हलतय
छान.
मस्त आहे लेख.