मुद्दलातला दाउद मराठी आहे हेच कित्येकांच्या लक्षात येत नाही.
प्रतिसाद लिहिताना मी पण ही बाब विसरलो होतो. कासकर आडनाव असलेला हा मराठी माणूस आंतरराष्ट्रीय तस्करी करणारी बहुराष्ट्रीय टोळी चालवतो.
या चर्चेतले इतर लोक तस्कर व गुंडच राहीले. तर दाऊद आंतरराष्ट्रिय दहशतवादी बनला अन देशाचा मोठा शत्रु झाला.
त्याची मराठीपणाची ओळख बर्यापैकी पुसली गेली आहे असे वाटते.
जालावर हाय का हा पिच्चर मला बघायचा आहे.
चित्रपट परिक्षणात मूख्य कथानक सोडून इतर मसाला भरल्यामुळे चित्रपट मध्यंतरानंतर रटाळ होतो असे वाचले आहे. अॅटम साँग आणि अन्य भडक (उघडी-नागडी) दुश्यांमुळे (आता असे प्रसंग कोणत्या चित्रपटात नाही, हा भागही आहेच) चित्रपटानं मार खाल्लाय असंही वाचनात आलं. एक चांगला शिकला सवरेला एक सरळ मुलगा आणि पुढे काय वाढून ठेवतो ते बघायला हवेच. जॉन आब्राहमची भूमिका बघायला आवडेलच.
-दिलीप बिरुटे
सर, तुम्ही आमचं आशास्थान... काहीतरी संस्कारक्षम लिहाल , इथल्यांना मार्गदर्शन कराल असं वाटलं होतं...
तर असे हे गुंडांच्या उदात्तीकरणाचे सिनेमे तुम्ही पाहू नयेत असं वाटतं...
मनापासून लिहिलं सर... राग मानू नका... ;)
चित्रपट पाहिल्याशिवाय कसं कळणार चित्रपटात काय संदेश आहे ते ?
तेव्हा एकदा चित्रपट पाहतो आणि मग उदात्तीकरणाबद्दल ठरवतो.
आत्ताच चकती (सीडी)आणली आता पाहणं आलं. उद्या दुपारी हाणून देतो.
>>>मनापासून लिहिलं सर... राग मानू नका..
राग आला आहे. ;)
-दिलीप बिरुटे
घराची किल्ली तीन तास मिळायची शक्यता नसल्याने तेवढ्यात हा चित्रपट बघितला. तेवढाच जरा गारव्यात वेळ घालवता आला.
'जॉनी मेरा नाम'(बहुतेक) सदृष्य ब्याकग्राउंड मुजिक सुरुवातीला बरे वाटले, पण त्याचा सतत भडिमार नंतर असह्य वाटू लागला.
सनी लिओनी चे आयटम सोंग बरे वाटले, तिला नाचता येत नाही, त्याची भरपाई तिच्या पूर्वायुष्यातील अनुभवातून आलेल्या अविर्भावातून भरून काढण्याचा प्रयत्न दिसून आला. ना अरत्र ना परत्र.
कंगना अधून मधून सुरेख दिसली.
जान अब्राम्हण 'मनिया' म्हणून (या पिच्चर मधील 'मन्या' चा उच्चार) फारसा शोभत नाही असे मत झाले.
अनिल कपूर 'झकास' पण मनोज वाजपेयी सारख्याला किरकोळ रोल हे जरा खटकले.
दोनशे रुपये घालवून शेवटी घरी जाऊन झोपल्यावर अंमळ बरे वाटले.
ह्या विषयात रामदास काका जास्त सांगू शकतील.
मात्र मान्य सुर्वे हा फाटक रोबर होता , तो दरोडे टाकायचा मात्र हिंदू डॉन म्हणून त्याने डॉन तीन वर्षात स्वतःची संघटित टोळी ज्यात १०० ज्यावर माणसे पगारावर असणे असे कंपनी पद्धतीचे कार्य अजिबात नव्हते.
डी , मंचरेकर , नाईक , गवळी , छोटा राजन ह्यांच्या कंपन्या होत्या.
सवंग प्रसिद्धी साठी एकता ने दाउद व मन्या ह्यांच्यातल्या राडा झाल्याचे दाखवले.
सुरवातीच्या प्रसंगात दाउद ला शिव्या देणारा , त्याला आव्हान देणारा मन्या चे
प्रोमोज दाखवले.
ह्यामुळे डी कंपनी खवळली व त्यांनी बालाजी च्या कार्यालयात फोन करून त्यांना तंबी दिली. व त्यामुळे एका दिवसात दाउद चा नाम उल्लेख टाळून तेच प्रोमोज दूर केले.
मुळात दाउद महाराष्ट्रीय त्याने मुंबईत अनेक वर्ष पठाण समूहाचा गुन्हेगारी जगता वरील प्रभाव नष्ट केला.
ह्यात सुरवातीला छोटा राजन , गवळी , रमा नाईक असे त्याला स्थानिक मराठी साथीदार लाभले हे सर्व मराठी तरुण गिरण्या बंद पडलेल्या मराठी कुटुंबातील बेरोजगार , असंतुष्ट ,होते. ह्याचेच प्रभावी चित्रण एन चंद्रा ह्यांनी
अंकुश व पुढे तेजाब मधून केले.
या इतिहासकथनाचा टोन बिगरी ते मॅट्रिकमधल्या दामलेमास्तरांच्या
"शहाजीचा मुलगा संभाजी याने मुसलमानांचा काटा काढला आणि स्वराज्य स्थापन केले" (यात अफजुलखानाच्या पोटापासून शाहिस्तेखानाच्या बोटापर्यंत सगळं आलं)
सारखा वाटला!
(ह. घ्या बर्का!)
ह्या पुस्तकात 'मुंबईज हॅडली चेस' नावाचे प्रकरण आहे.. मन्या सुर्वेच्या प्रकरणात पाणी घालून हा चित्रपट बनवला आहे..
सवंग प्रसिद्धी साठी एकता ने दाउद व मन्या ह्यांच्यातल्या राडा झाल्याचे दाखवले
मन्याने आलमजादा आणि औरंगजेब ह्यांच्या मदतीने दाऊदचा मोठा भाऊ साबिरला मारले.. फुलांनी सजवलेल्या गाडीने पाठलाग करुन त्याला ठोकण्यात आले. लेखकाच्या मते हा प्लान मन्याने चेसच्या एका कादंबरीतल्या वर्णनावरुन रचला.. त्यामुळे दाऊद आणि मन्यात वैर होते, हे खरंय..
बाकी पुस्तक बरंय..
>>> "शहाजीचा मुलगा संभाजी याने मुसलमानांचा काटा काढला आणि स्वराज्य स्थापन केले" (यात अफजुलखानाच्या पोटापासून शाहिस्तेखानाच्या बोटापर्यंत सगळं आलं)>>>>
आज ज्ञानात भर पडली :)
बाकी चालू द्या !!!
शहाजीला संभाजी नावाचा मुलगा होताच. शिवाजीचा मोठा भाऊ तो. त्याने अॅक्च्युअल स्वराज्य नसेल स्थापले, पण स्वराज्य स्थापनेचे बापाचे अॅम्बीशन पोरात नक्की उतरले असणार. स्वराज्यच्या अगदी प्राथमीक तयारीत असताना अफजलखानाने त्याचा काटा काढला.
अर्धवटराव
बाबा पाटील, आदर ठेवून जर छत्रपतींचा एकेरी उल्लेख केला तर अडचण असू नये. तसे तर आपल्या आईचा किंवा रामकृष्णादि देवांचा उल्लेखही एकेरीच केला जातो. शेवटी आदर महत्वाचा आहे. आदर ठेवून तो शिवाजी म्हटले काय किंवा शिवाजीमहाराज म्हटले काय, फरक पडू नये.
मला वाटलं परिक्षण लिहिलय की काय? एकंदरीतच असे शिनेमे पाहून थेट्राच्या बाहेर पडल्यावर घरी नीट पोहोचेपर्यंत भीती वाटत राहते म्हणून या सगळ्या प्रकरणात पडावेसे वाटत नाही. शिवाय नकोशी दुनिया इतकी भडक पद्धतीने दाखवलेली असते की विचारता सोय नाही. जाउ दे मेलं!
प्रतिक्रिया
सॉरी काही भाग डबल टाइप झालाय.
एकमात्र?
दावूद ला टक्कर देणारा एकमात्र
हा हा हा
ती पोस्ट तर डोक्यात गेली.
अरेच्या
छोटा राजन (दिपक निकाळजे)
धन्यवाद
पक्के का?
हो पक्के
चित्रपटाची ओळख कै जमली नै राव.
सर, तुम्ही आमचं आशास्थान...
खिक्क.
मन्या सुर्वे खुप जुना गुंड का
पण
@त्यानी मात्र तुमचे नाव ऐकले
त्यात विशेष ते काय? आता आम्ही
हाण्ण.....
आगरबाजारचा मन्या सुर्वे ना..?
घरी जाऊन झोपल्यावर अंमळ बरे वाटले.
>>कंगना अधून मधून सुरेख दिसली
तात्यांच्या वाक्यातला एक शब्द
थेटरात बघायची इच्छा नाही.
खरे खोटे दाऊद आणि पोलीसच जाणोत.
ह्या विषयात रामदास काका जास्त
निनादराव
शहाजीचा मुलगा शिवाजी
डोंगरी टू दुबई..
चिगो साहेब
औरंगजेब नाही
संभाजी?????
नई नई - गल्तीसे मिष्टेक!
पूर्णपणे असत्य नाहि ते विधान
१/२ साहेब....
भावना पोचल्या.
बाबा पाटील, आदर ठेवून जर
मला वाटलं परिक्षण लिहिलय की