के मोहबत एक एहसान की पावनसी कहाणी है,
कभी कबिरा दिवाना था, कभी मीरा दिवानी है
यहा सब लोक कहते है, मेरी आखो मे आसू है
जो तु समजे तो मोती है, जो ना समझे तो पाणी है
त्यांच्या कविता अगदी सहज, सोप्या शब्दात आणि गुणगुणाव्या अश्या असतात. सादरही छान करतात. फक्त कधीकधी वाहवत जातात ते. मग आपण कुणाबद्दल काय बोलतोय याचं भान नसतं त्यांना.
>>> फक्त कधीकधी वाहवत जातात ते. मग आपण कुणाबद्दल काय बोलतोय याचं भान नसतं त्यांना.
सहमत. आपले असंख्य चाहते आहेत आणि आपण काहीही बोलले की लोक त्याला दाद देतात असा एकदा समज झाला की व्यासपीठावरुन काहीही बोलल्या जातं. आणि अनेकदा असा माणूस तो कितीही चांगला बोलत असला तरी आपल्या मनातून उतरुन जातो.
-दिलीप बिरुटे
मस्त रसग्रहण! विनोदी कविता म्हणताना छान गंभीर कविता आहे.
मात्र धाग्याचे शीर्षक पाहून मिपाच्या सद्यस्थितीशी काही संबंध आहे का हा विचार डोक्यात आला होताच!
कॉमेडीबाजी व कविताच्या नादात हे महाशय वाहून जातात. कजरा रे गाण्यावरुन अभिषेक-ऐश्वर्या व अमिताभ यांच्याबद्दल तोडलेले तारे ऐकून जमल्यास कधी तर कविता बघू पण ह्यांचे भाषण किंवा सामाजिक मते ऐकायला हवीच असे नाही हे ठरवले.
वाहावत जातात हे मान्य.
'कोई दिवाना' च्या दोन ओळी म्हणायला जवळपास १५ मिनिटे घेतलीत.
बाकी ओंकारा मध्ये डॉलीचे वडील ओंकाराला अशाच अर्थाचे वाक्य बोलतात.
'जो अपनोंकी सगी ना हो सकी वो तेरी सगी क्या होगी'
कुमार विश्वास यांची शैली अशी आहे की, दोन ओळी म्हणाच्या जरासा पॉज घ्यायचा, प्रेक्षकात काही हालचाल होत असेल तर त्यावर कमेंट्स करायच्या. बोलता बोलता उत्तरप्रदेश, राजस्थान, इथल्या काही वैशिष्ट्यांचा उल्लेख करायचा त्यावर विनोद करायचा. शिटी वाजवली तर त्यावर कमेंटस करायच्या. विद्यापीठातील अध्यापक कसे गंभीर असतात त्यावर बोलायचे, विद्यार्थी वस्तीगृहात पहिल्यांदा येतो तेव्हा खोबर्याच्या तेलाची बाटली वगैरे अमूक अमूक घेऊन येतो नंतर त्याच्याकडे कशा वेगवेगळ्या बाटल्या सापडतात त्यावर कमेंटस करत करत प्रेक्षकांना मनमुराद हसवायचे अशी ती शैली आहे आणि मधेच मग निवेदन करता हू, आपको इस कविताकी चार लायने पसंद आयेगी. आणि मग तरुणांना आवडेल अशा दोन ओळींची निवड करायची. अर्थात जालावर याच शैलीतल्या म्हणजे तो कोणत्याही ओळी म्हणतांना एकच अशी शैली निवडतो असे दिसते. विनोदाची पेरणी करायची आणि मग मग आता काही कवितेच्या ओळी म्हणणार आहे, आपल्याला त्या आवडणार आहेत. आणि जर आपल्याला त्या ओळी आवडल्या नाहीत तर मी शायरी सोडून देईन. (सर्वच ठीकाणी हाच फॉर्मुला)
मेरा अपना तजुर्बा है, तुम्हे बतला रहा हु मै
कोयी लब छु गया था तब, के अब तक गा रहा हु मै.
आणि एकदा प्रेक्षकांची दाद मिळाली की मग पुन्हा मग मै आपके सामने कुछ कविताये पेश करता हू लेकीन कविताए के बारे मे लोग कहते है की आप प्रेमकीही कविता क्यो सुनाते हो. कुछ सामाजिक देश के बारे मे क्यु नही लिखते. मग तो म्हणतो, प्रेम हजारो साल पहले था, अब भी है, और कल भी रहेगा. पाकिस्तान तेरसट साल पहले नहीथा, आज है............आणि मग पॉज घ्यायचा. पब्लिक खळखळून दाद देते. आपण महाविद्यालयात शिकत असतांना जिच्यावर प्रेम करतो ती काही वर्षांनी भेटते तेव्हा ती तिच्या मुलाला म्हणते देखो बेटा मामा.... वगैरे.
बिछड के तुमसे प्यार मे कैसे जिया जाये बिना तडपे
जो मै खुद ही नही समजा वही समजा रहा हू मै.
किसी फ़त्तर मे मूरत है
कोयी फत्तर की मूरत है
लो हम ने देखली दुनिया, जो इतनी खूबसूरत है
जमाना अपनी समझे पर मुझे अपनी खबर ये है
तुझे मेरी जरुरत है मुझे तेरी जरुरत है.
कार्यक्रम सादर करतांना एक सोबती असतो मला वाटतं तो कवी असावा आणि ते ठरवून प्रेक्षकांची करमणूक करतात आणि ते इतकं सहजपणे होतं की ते लक्षात येत नाही. . मधे मधे बोलून त्याच्या मुद्द्याला पकडून विनोद करतात युपीचं शाळेतील इंग्रजी कसं आहे, प्राचार्य बनना चाहीहे मै ओ क्यु नही बनता. प्राध्यापक सतत गंभीरच का असतात वगैरे यावर विनोद मारुन पुन्हा निवेदन करता हू--
मेरे जीने मे मरने मे तुम्हारा नाम आयेगा
मे सांसे रोक लू फीर भी यही इल्जाम आयेगा.
हर एक धडकन मे जब तुम हो तो फीर अपराध क्या मेरा
अगर राधा पुकारेगी तो फीर घनशाम आयेगा.
असो, गेली दोन दिवस कुमार विश्वासमय झालो होतो. आपणही त्याच्या परिचयाला दाद दिली, त्याच्या निमित्तानं आमच्या लेखनाला दाद दिली मनःपूर्वक आभार.
-दिलीप बिरुटे
साधारतः तीन वर्षापुर्वी कुमार विश्वासांच्या वरील कवितेचं उत्तम सादरीकरण मी ऐकलं होतं. कविता नवीन तरीही ताबडतोब ठाव घेणारी होती ;) सादरकर्ता उत्तम होता त्यामुळे लागलीच बोल लिहून घेऊन आणि कविचं नाव गुगलबाबाल रगडंलं. उत्तम कविता आणि समोरील प्रेक्षकवर्गाचा उत्तम पध्दतीने घेतलेला ठाव हे कुमार विश्वासांचं बलस्थान आहे.
परत एकदा त्यांच्या कविता ऐकाव्याश्या वाटल्या. धन्यवाद सर.
तुमच्या कवीमित्राच्या कवितेचा खुप पूर्वी मी मराठीत भावानुवाद केला होता. :)
कुणी बेभान म्हणतं मला, कुणी वेडं समजतं मला
धरतीच्या उमाळ्याला आकाशीचा नभच समजलेला
कसा तुझ्यापासून दूर मी, अन माझ्यापासून दूर तू
दुराव्यातील हा जिव्हाळा फक्त आपल्याला कळलेला
प्रेम तुझ्या माझ्या विश्वासाची एक पवित्र गाथा आहे
कधी कबीर तर कधी मीरेचीही तशीही हीच कथा आहे
सगळेच म्हणतात इथे, माझे डोळे आसवांनी भरलेले
कळलं तुला तर मोती, नाही तर पाण्याचा साठा आहे
आहे वेदनांचा सागर ह्र्दयात, पण मला रडायचं नाही
माझे अश्रु तुझ्या प्रेमाची निशाणी, जी हरवायची नाही
माझी ओढ तुला कळो किंवा नाही, पण थोडं ऐक तू
जी गोष्ट माझी झाली नाही, ती तुझीही व्हायची नाही
भुंगा जर कधी कमळ फुलावर बसला तर पाप घडलं
आम्ही एखादं स्वप्न जिवापाड जपलं तर पाप घडलं
कालपर्यंत तल्लिन होऊन ते ऐकत होते प्रेमाचे किस्से
आणि आम्ही खरंच कुणावर प्रेम केलं तर पाप घडलं
"कोई खामोश है इतना बहाने भूल आया हूँ
किसी की इक तरन्नुम में तराने भूल आया हूँ
मेरी अब राह मत तकना कभी ए आसमाँ वालों
मैं इक चिड़िया की आँखों में उड़ाने भूल आया हूँ"
अजुन एक....
'थी खून से लथपथ काया, फिर भी बन्दूक उठा कर
दस दस को एक ने मारा, फिर गिर गए होश गँवा कर
जब अंत समय आया तो, कह गए कि अब मरते हैं
खुश रहना देश के प्यारों, अब हम तो सफ़र करते हैं'
'थी खून से लथपथ काया, फिर भी बन्दूक उठा कर
दस दस को एक ने मारा, फिर गिर गए होश गँवा कर
जब अंत समय आया तो, कह गए कि अब मरते हैं
खुश रहना देश के प्यारों, अब हम तो सफ़र करते हैं'
कवि प्रदीप ना?
'थी खून से लथपथ काया, फिर भी बन्दूक उठा कर
दस दस को एक ने मारा, फिर गिर गए होश गँवा कर
जब अंत समय आया तो, कह गए कि अब मरते हैं
खुश रहना देश के प्यारों, अब हम तो सफ़र करते हैं'
हो प्रदीपच ...
खर तर एका विडिओ डॉ. च्या तोंडी ऐकलं होतं....
त्यामुळे मोठी चुक झाली.
क्षमस्वः
प्रतिक्रिया
के मोहबत एक एहसान की पावनसी
धन्यवाद
सहमत
सहमत.
पीठावरुन काहीही बोलल्या जातं.
भारि आहे हा माणुस आणि त्याचं
छान.
असेच म्हणते.
वा! वा!! सर तुम्हीपण लिहीते
+१
वा!
छान ओळ्ख.....!
मिपावर येत चला. लिहित चला.
बरोबर..
सर, छान लिहिलंय...
कुमार विश्वासबद्दल ऐकून होतो
कॉमेडी + कविता
+११११
इंट्रेष्टिंग! इकडे लक्ष दिले
छान ओळख करून दिलीत..
चांगला लेख आहे. सदर
आवडली
त्यांचे रनटाईम जोक जाम मस्त
वाह
आभार दोस्त हो....
अतिशय छान...
सुरेख बिरुटे साहेब
कुमार विश्वास
डॉ. कुमार विश्वासची काय पोझीशन आहे.
तुमच्या कवीमित्राच्या कवितेचा
भारी जमलंय..
वाहवत जात असेलही, पण कुमार
काही दिवसांपुर्वी ऐकलेली त्यांचिच कविता
मस्त !
.
कवि प्रदीप ना?
माफ करा चुकुन चुक झाली....
आपण तर बुव पंखे आहोत