Welcome to misalpav.com
लेखक: lakhu risbud | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

भारत पाकिस्तानवर कधीही हल्ला करणार नाही... हे त्याच एकमेव वाक्यच पुरेसं आहे, त्याचा वास्तववादी द्रुश्टीकोन स्पश्ट करायला.

१ कोटी रुपयामध्ये पाकिस्तानात तुम्ही कोणतीही गोष्ट विकत घेऊ शकता अगदी अणुबॉम्ब सुद्धा. अंबानी आणि टाटा याना सांगून पाकिस्तानचे सगळे अणू बॉम्ब विकत घ्यावेत का? नाही एक मोठा प्रश्न नाहीसा होईल ; )

सध्या आपल्या देशातील स्थिती एव्हडी विदरक आहे की ही तुलना कितीहि चान्गली असली तरी सद्य परिस्थितीत दोन्ही देश एकाच माळेचे मणी आहेत असे वाटते,त्यातल्या त्यात भारताची बाजु थोडी उजवी आहे हेही नसे थोड्के.

परिस्थिति विदारक आहे हे सत्य, पण ही परिस्थिति लोकनियुक्त सरकार बदलू शकते हा विश्वास अणि हि स्थिती भारतातच आहे. दोन्ही देश एकच माळेचे मनी म्हणणे जरा अतिशयोक्त वाटत नाही का ? तारेक फतेह यांचे दोन्ही व्हिडीओ पाहिल्यावर याची खात्री पटेल.

नाही आपण माझे अर्धे वाक्य घेतलेत्,मी पुढे असेही लिहिले आहे की भारताची बाजु थोडी उजवी आहे.पण सद्य स्थितीतील लोकनियुक्त सरकार कडुण ही अपेक्शा करणे हाच मोठा विनोद आहे,आणि जनतेचा कौल कुणाच्या बाजुने जातो यावर हे अवलम्बुन असते.

भारत पाकिस्तानवर कधीही हल्ला करणार नाही...
हा हा हा! कोणी सांगितलं तुम्हाला? असो. बाकी लेखातील अनेक तपशील रोचक आहेत तर काही निराधार आहेत. चालायचेच! असो.

आपला इतिहास हेच सांगतो,हल्ला करायचा असता तर कारगिल,संसदेवरील हल्ला,मुंबई २६-११ तेव्हांच केला असता. केला नाही याला आपले तेव्हाचे निर्णय न घेण्याचा क्षमता नसणारे नेतृत्व नसून पाकिस्तानवर हल्ला करून भारता साठी अमेरिके प्रमाणे अफगाणिस्तान किवा इराक तयार न करणे हा विचार असू शकत नाही का ? तसेच तेल समृद्ध मध्य पूर्व देशांना न दुखावणे (कारण पाकिस्तानी लगेच इस्लाम खतरेमे अशी आरोळी ठोकून सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न करणार).भारताचा विरोध पाकिस्तानला नसून पाकिस्तानातील भारत विरोधी शक्तींना आहे. आधीच अंतर्गत यादाविसारखी स्थिती कायम असते तेव्हा हल्ला करून त्या सगळ्यांना एकत्र आणण्यात काय अर्थ आहे ? तो देश तिथल्या अंतर्गत कारणांमुळेच खिळखिळा झालेला आहे आणि तुटु शकतो .पहिल्यांदाच तिथे लष्कराने लोकनियुक्त सरकारला एवढ्या दीर्घ काळासाठी सत्तेवर राहून दिले आहे,कदाचित माध्यमांच्या सहज उपलब्धते मुळे जगात काय चालले(विशेषतः भारतात ) आहे ते तिथल्या सामान्य जनतेला लगेच कळते त्यामुळे असेल म्हणा परंतु लष्कराला सत्तांतर सहज शक्य वाटले नसावे.११ मे ला होणाऱ्या निवडणुकांमधून नवाझ शरीफ यांच्या मुस्लिम लीग ला सत्ता मिळाली तर परिस्थिती मध्ये सुधारणा होणार अशी आशा.

साहेब हा लेख कोणी संघीय/सेना कार्यकर्त्याने लिहिलेला नाहीये तर ज्याचा जन्म आणि शिक्षण पाकिस्तानात झाले त्यांनी लिहिलेला आहे.आणि त्यामुळेच हे मुद्दे वेगळे ठरत नाहीत का?

लेख कोणी संघीय/सेना कार्यकर्त्याने लिहिलेला नाहीये उगाच सेना कार्यकर्त्याला संघाच्या बरोबर बसवू नका... सेना हा राजकीय पक्ष आहे. म्हणूनच त्यात अनेक दुर्गुण आहेत. ती चर्चा आत्ता नाही करत.

पाकिस्तान विरोध हा दोन्ही गटांकडे सारख्याच तीव्रतेचा मुद्दा आहे त्या अनुषंगाने म्हंटले होते. संघाला आणि शिवसेनेला एकाच तराजूत तोलल्याने राग आला असल्यास क्षमस्व.

पाकिस्तानात ८० टक्क्यांपेक्षा जास्त अभूतपूर्व असे मतदान झाले आणि तेही दहशतवाद्यांच्या धमक्यांना न जुमानता. तिथल्या जनतेला लोकशाही आणि बदलत्या काळाचे संकेत आत्ता कळाले म्हणायचे.इतर राजकारण्यांच्या तुलनेत मवाळ आणि पुरोगामी दृष्टी असणार्या नवाझ शरीफ यांच्या पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझ गट(पीएमएल-एन) पक्षाकडे सत्ता येणार. चला आता शेजाऱ्याच्या घरात शांतता येण्याची लक्षणे असल्याने तो आता आपल्याला पण शांतपणे जगू देवो हीच अपेक्षा !