कार्यकर्ते परदेशात, अब नही लग रहा है दिल उनका अम्रिका मे, ने मजशी परत....., अशा बातम्या जालावर येत होत्या तेव्हा आम्हाला कळलं की कोणी मिपाकर अमेरिकेत कामानिमित्त गेले आहेत. मात्र पाहुनचाराच्या बातम्या कै अपडेट होत नव्हत्या. वृत्तांत कळला तो असा, धन्स.
>>> मालक, संपादक, आणि सल्लागार यांच्यातील सत्तावाटपबद्दलही काही प्रश्न उपस्थित झाले. पण त्यांना ज्या शिताफीने बगल मिळाली त्यावरून बिका हे थोर महात्मा गांधींप्रमाणे एक बॅरिस्टर महात्मा (श्रेयअव्हेर नरहर कुरुंदकर) आहेत याची प्रचिती आली.
लेखन वाचायला सुरुवात केली आणि काय काय मोकळया बाता झाल्या असतील अशा समीश्र भावनेने शेवटी शेवटी श्वास कोंडला होता लेखातील वरील दोन वाक्यानंतर तो मोकळा झाला. :)
-दिलीप बिरुटे
लेखन वाचायला सुरुवात केली आणि काय काय मोकळया बाता झाल्या असतील अशा समीश्र भावनेने शेवटी शेवटी श्वास कोंडला होता लेखातील वरील दोन वाक्यानंतर तो मोकळा झाला.
आता त्यांनी जर सगळं खर्रखुर्रं सांगून टाकलं असेल, तरी मी थोडीच ते कबूल करणार आहे? मी असंच लिहिणार की. ;)
बिपिन कार्यकर्त्यांसमवेत कांही घटका घालविल्या आहेत. मजा आली होती.
मुलाला खेळवताना कार्यकर्ते साहेबांनी जे त्याला वर उचलले आहे तसे मी करायला गेलो तर माझा शर्टही वर होऊन माझेही पोट दिसेल अशा विचारांनी असला अघोरी खेळ आपण खेळायचा नाही असा पक्का निश्चय केला. मुलाच्या चेहर्यावर, 'पाय आभाळाला टेकल्याचे', समाधान ओसंडून वाहते आहे.
कार्यकर्त्यांच्या भेटीचा वृत्तांत आवडला. आपल्याला हवी ती माणसे अमेरिकेत यायच्या सुमारास आपले बस्तान इष्ट कोष्टासारख्या वसंताल्हादी ठिकाणी ठेवायचे आणि आपल्याला नको ती माणसे (खरे तर त्यांची लायकी नसताना चुकुनमाकून) अमेरिकेत आली की दूर दुर्गम ठिकाणी पसार व्हायचे हे होष्टांचे कसबही स्पृहणीय आहे. असो. आमचाही व्हिसा दहा वर्षांचा मल्टिपल एंट्री आहे, त्यामुळे इष्ट कोष्टला अजूनी धोक्याचे वादळ घोंघावते आहेच हे सर्व गुन्हेगारांनी ध्यानात ठेवावे.
बाकी कार्यकर्यांच्या भेटीने तुम्हाला घरी एखादा सत्यनारायण किंवा लघुरुद्र केल्यासारखे वाटले असणार याबाबत शंका नाही. हा इसम अष्टसात्विकतेची पाटलूण आणि अध्यात्मिक उन्नतीचा सद्रा घालून वावरतो. त्याचा शिंपी तरी असल्या अवघड मट्रेलचे कपडे कसे शिवतो कोण जाणे! पण रावसाहेबांप्रमाणे -म्हणजे कृष्णराव हरीहर- आम्ही नव्हे!- यांचाही हस्तस्पर्शच असा की त्यांच्या हाती कण्हेरदेखील गुलाबासारखी वाटते. मग स्ट्रॉबेरी डायक्वेरी तर साक्षात अमृताहुनी गोड वाटली असणार यात नवल ते काय? बाकी 'भाकरी-मिसळ' हा मेनू आवडला. हा मेनू आणि या संकेतस्थळावर टाकलेला हा लेख यात काही बेरजेचे राजकारण नाही ना अशी शंका काही लोकांना येईल, पण त्याकडे दुर्लक्ष करावे. कार्यकर्त्यांना तुमच्याकडचे माफक का होईना पण अपेयपान चालते आणि मिसळीतली मिरचीही चालते आणि आमच्या मेल्या इंडियातल्या मैफिलीत बाकी ते लिंबूपाणी आणि बिनमसाल्याची डाळखिचडी यापुढे जात नाहीत हे आम्ही विसरणार नाही हा आमचा निरोप त्यांच्यापर्यंत पोचवावा.
आमचाही व्हिसा दहा वर्षांचा मल्टिपल एंट्री आहे, त्यामुळे इष्ट कोष्टला अजूनी धोक्याचे वादळ घोंघावते आहेच हे सर्व गुन्हेगारांनी ध्यानात ठेवावे.
अहो, आम्हा इष्ट कोष्टियांना वादळांची सवय असते. त्यामुळे हरिकेन कट्रिनासारखंच हरिकेन सन्जोप आलं तर स्वागत करायला आमची फीमा तयार आहे.
हा इसम अष्टसात्विकतेची पाटलूण आणि अध्यात्मिक उन्नतीचा सद्रा घालून वावरतो.
हो, त्यांचे कपडे दिसायला साधे असले तरी एखाद्या स्थितप्रज्ञ योगी-महंताप्रमाणे त्यांच्या आंतरिक तेजापासून जनसामान्यांचं रक्षण करण्याची क्षमता बाळगून असतात. तळपत्या सूर्याकडे पहायचं तर लोकांना दर वेळी डोळ्यावर गॉगल चढवून का ठेवावा लागावा, या परोपकारी वृत्तीतून ते शरीरावर संरक्षक कवच घालून हिंडतात.
जोरदार वृत्तांत गुरुजी.
बाकी इतर बरेच डिटेल्स मिसिंग वाटत आहेत ;)
बादवे, एवढ्या लांब असुन कार्यकर्ते तुम्हाला भेटले ह्याचा हेवा वाटला, इथे आम्ही पुण्यात राहुन आम्हाला भेटायचे नाव नाही. ;)
- छोटा डॉन
शीर्षक आणि लेखकाचे नाव पाहिल्यानंतर हे लेखन 'साधू-संत येती घरा' टाईपचे असणार नाही, तर 'दारे खिडक्या बंद करा' असे धमाल असेल, असे वाटले होते. निराशा झाली. पारच सात्वीक...
फटू पाहून मात्र एक लक्षात आलं की एखाद्याला उचलून उलटं करायचं आणि त्याचे पाय छताला लावायचे ही खोड सार्वत्रिक दिसतीये. फक्त जालापुरती नाही.
अगदी येण्याच्या ऐनवक्ताला थोर बालिश्टर महात्मा बिनिपचंद्ररावजी कार्यकर्तेसाहेब ह्यांनी फोन करुन 'आम्ही राजनैतिक घडामोडी आणि निर्णयप्रक्रियेवर चर्चा करणार आहोत, तू येण्याची आवश्यकता नाही' असं सांगून माझा कांग्रेस कार्यकारिणीतून सुभाषबाबू करुन टाकला. (त्यामुळं घासुगुर्जींनी दिलेला एयरहोष्टेसला डोळा घालण्याचा चानस हुकला! :( )
>>तर शेजारूनच काहीतरी 'विठ्ठला, कोणता झेंडा घेऊ हाती....' असा कर्कश प्रश्न विचारणारा रिंगटोन वाजला.
आयला! एव्हढ्यातच रिंगटोन बदलेलं दिसतंय. आत्ताआत्तापर्यंत 'गोविंदा गोविंदा गोविंदा...गोऽविंऽदा' अशी होती ना?
बाकी, कट्टा जोरदार झाला असणार ह्यात काही शंका नाहीच. पण....इतकं अष्टसात्विक भावानं लिहिलंय, तर तुमचाही एक फोटू टाकायचा की राव तो स्वागत करतानाचा...नवेकोरे कपडे, डोक्याला करकरीत भट्टीची पांढरीफेक गांधीटोपी, खांद्यावर उपरणं अन जिलेबीवर पाक थबथबलेला असतो तसे चेहर्यावर थबथबलेला भक्तीभाव! :D
अवांतर - ह्या बिपिनदाला पोरं छताला टेकवायची काय हौस असते काय कळत नाय बॉ! :)
माझा कांग्रेस कार्यकारिणीतून सुभाषबाबू करुन टाकला.
मग एक मुक्तीसेना वगैरे स्थापन करा. साठेक वर्षांनी तुमच्यावर 'आमी धॉमॉल मुलगा बोलेछी' नावाचा सिनेमा निघेल!
तर तुमचाही एक फोटू टाकायचा की राव तो स्वागत करतानाचा...
लक्ष्मणाला जसे फक्त सीतेचे पाय दिसायचे तसे माझ्या कॅमेराला केवळ बिपिनदा दिसले. माझ्याकडे बघण्याची त्याची इच्छाच झाली नाही. अर्थात एखाददोन एकत्र फोटो काढलेले आहेत, पुढेमागे पोलिटिकल कॅपिटल म्हणून वापरायला.
थोडा कंटाळवाणा वाटला. धड उपहासही नाही आणि खरेपणाही नाही. मध्येच कुठेतरी लटकल्यासारखा झालाय. बाकी बाळसं उतरणे आणि भाकरीविषयी सहमती ;)
(स्वगतः ढब्बे, हा लेख पल्याडला का नसावा बरे ?)
धड उपहासही नाही आणि खरेपणाही नाही. मध्येच कुठेतरी लटकल्यासारखा झालाय.
धन्यवाद. बिकांच्या भेटीच्या आठवणी ताज्या असताना काल रात्री भराभर लिहून काढला म्हणून काही गोष्टी राहून गेलेल्या आहेत. नमनालाच घडाभर तेल टाकलं, त्यामुळे कमी भजी तळली गेली असावीच. आठवतील तसे नवीन घाणे काढतो. असे लेख फार उशीरा आले तर 'बैल गेला अन् झोपा केला' सारखे होतात. (बिका गेले अन्... असं लिहायचा मोह आवरला)
>>निघायच्या वेळी 'आपण बिपिनकाकाला ठेवून घेऊया' असा हट्टही केला.
बिपिनचंद्ररावजी कार्यकर्तेसाहेब हा मोठा माणूस खरा! आई-वडलांना नावाने हाक मारणारा पोरगा ज्यांना काका म्हणतो तो म्हणजे कोणी महान विभूतीच असला पाहिजे.
पण अगदी साधा माणूस हो; 'तत्त्वतः सारखेच' असं साधं लोकशाही तत्त्व खरडीतूनही शिकवतो. गुर्जींच्या घरी एवढं बिझी शेड्यूल असतानाही 'सही बदल' असा सोपा सल्ला सुचवून माझी अडचण दूर केली.
(पुन्हा एकदा प्रयत्न करून पाहू या प्रशंसेचा.)
अमेरिकेत इष्ट कोष्ट आणि वेश्ट कोष्ट यांच्यात सतत चालू असणार्या चढाओढीत बिकांच्या दौर्यामुळे पारडे इष्ट ठिकाणी झुकले आहे, हे निरीक्षण नोंदवावेसे वाटले :)
लवकरच घ्यायला हवी. आपल्या किनार्यावर कार्यकर्त्यांनी पायधूळ आतापर्यंत झाडली नसली, तरी एक युवा नेते (देशाचे आशास्थान, तरुणींचे स्फूर्तिस्थान, खरडींचे आश्रयस्थान इ. इ.) येणार असल्याची खबर आहे. त्यांच्या स्वागताची रंगीत तालीम म्हणून लवकरच षोकसभा आयोजित करायला हवी :)
*'षोक अनावर झाला' ही प्रसिद्ध उ. सं. डु. आठवली ;)
एक युवा नेते (देशाचे आशास्थान, तरुणींचे स्फूर्तिस्थान, खरडींचे आश्रयस्थान इ. इ.) येणार असल्याची खबर आहे. त्यांच्या स्वागताची रंगीत तालीम म्हणून लवकरच षोकसभा आयोजित करायला हवी.
जरूर! रंगीत तालीम तो करेंगेही.
लेकिन उनको आने तो दो. षोकसभा तो क्या मोरक्कन हॉस्पिटॅलिटी भी मौजूद करेंगे!!! ;)
बिकाला देखील नेलं असतं, पण त्याच्या नशिबात घासूगुर्जी होते!
असतं एकेकाचं नशीब!!!!
:)
बिकाला देखील नेलं असतं, पण त्याच्या नशिबात घासूगुर्जी होते!
असतं एकेकाचं नशीब!!!!
बिकांना कसली मोरक्कोची कौतुकं सांगता? त्याने आख्खा आफ्रिका पायाखाली घातलेला आहे. तिथल्या सर्व ठिकाणच्या हॉस्पिटॅलिट्यांचा लुफ्त लुटवला आहे. त्यांच्या सज्जनतेच्या बुरख्याच्या आत रसिकतेचा खूप हुस्न दडलेला आहे.
बिकांना कसली मोरक्कोची कौतुकं सांगता? त्याने आख्खा आफ्रिका पायाखाली घातलेला आहे. तिथल्या सर्व ठिकाणच्या हॉस्पिटॅलिट्यांचा लुफ्त लुटवला आहे. त्यांच्या सज्जनतेच्या बुरख्याच्या आत रसिकतेचा खूप हुस्न दडलेला आहे.
होय का? अख्खा आफ्रिका का?
हे माहिती नव्हतं!!! मानलं बुवा!!!!
बाकी तुम्ही प्रतिसाद देण्याच्या उत्साहात तुमच्या बिकामित्राचं नेसूंचं भर मिपाबाजारात उलगडतांय!!!
:)
कुणीतरी म्हंटलंच आहे, "व्हेन यू हॅव फ्रेंन्डस लाईक दीज.....!!!!"
बिका, वरील ओळ पूर्ण कर पाहू!!!!!
:)
अहो त्यांनी सांगितलं तेच मी रीपीट करतोय. गाडीत बसल्याबसल्या बिकांनी पहिली गोष्ट काय सांगितली असेल तर त्यांना अमेरिकेचा व्हिसा मिळण्यासाठी काय काय खटपटी कराव्या लागल्या त्या. जी काय कागदपत्रं गोळा करावी लागली ती सगळी असली तरी नक्की तिथे जाऊन काय करायचं आहे याची उत्तरं ते आदल्या रात्रभर घोकत होते. पण मुख्य पंचाइत आली ती म्हणजे त्यांनी आत्तापर्यंत मिपावर मिरवलेल्या 'शेखी'मुळे. ते काय ते खोबार, अरबस्तान, नायजेरिया, घाना, वगैरे वगैरे ठिकाणी जाऊन राहून आलेले आहेत. मिपावर टाकलेले अनुभव काय अमेरिकन सीआयएने वाचले नसतील असं वाटतं का तुम्हाला? इतक्या टेररिस्ट देशांमध्ये जाऊन आले आहेत त्यामुळे ते नुसते साधेसुधे टेररिस्ट नाहीत, तर अनेक देशांमधल्या टेररिस्ट सेल्स कोऑर्डिनेट करणारे कोणीतरी हाय लेव्हलचे आहेत असं वाटलं. त्यात त्यांचाही काही दोष नाही, त्यांच्याकडे पाहिलं कीच हा माणूस कोणीतरी वरच्या लेव्हलचा, सरकारं चालवणारा/पाडणारा, आणि अध्यात-मध्यात नाही असं लोकांना सहज पटवून देणारा असणार असा संशय येतोच. मग आयताच हा माणूस अमेरिकन कॉन्सुलेटच्या भूमीवर म्हणजे साक्षात अमेरिकेत आला आहे हे पाहून त्यांना तिथेच ठेवून घेऊन डिप्लोमॅटिक डफल बॅगमधून अमेरिकेत आणि तिथून नंतर ग्वाटानामो बे ला पाठवण्याचा प्लॅन होता, पण कसेबसे सुटले. (त्यांना सांगितलं नाही, पण मीच आमच्या मध्यरात्री डिपार्टमेंट ऑफ स्टेट आणि होमलॅंड सिक्युरिटीमधली माझी कनेक्शनं वापरून त्यांना सोडायला लावलं होतं... बिकांसाठी काय वाटेल ते. पण म्हटलं त्यांना सांगून ओशाळं का करा?)
बाकी तुम्ही प्रतिसाद देण्याच्या उत्साहात तुमच्या बिकामित्राचं नेसूंचं भर मिपाबाजारात उलगडतांय!!!
घ्या, म्हणजे मित्रासाठी एवढं काहीतरी करायचं आणि इतरांकडून अशी दळभद्री बोलणी ऐकून घ्यायची! याचसाठी का माझा जन्म झाला? धरतीमाते, मला पोटात का घेतलं नाहीस गं, बिका यायच्या आधीच...
स्वत:च स्वत:ला तार्किक, डोळस, लढाऊ आणि हुच्च समजणारे लोक वाद अंगाशी आला की फेसबुकीय लढाईतून पळ काढतात शिवाय समोरच्याला ब्लॉक करतात, हे पाहून विस्मयचकित झालो आहे.
काय रे ही सही! तू म्हणजे सह्याजीराव आहेस अगदी! त्या प्रसंगाला मी मूक साक्षीदार होते बरं! =))
जाऊ दे हो. चालायचं. मातीच्या ** गळून पडतात शेवटी.
आम्ही मूर्ख आहोत (हे त्यांचंच मत) पण ज्यांच्याकडं आशेनं पहावं असे लोक देखील असं करु लागले म्हणून विस्मयचकित झालो. खरंच.
नव्या जर्सी पर्यंत येउनही बिका शेठनी त्यांची कृपा(काक)दृष्टी बॉस्ट्न कडे न वळवल्याबद्दल जाहिर निषेध. तो धम्या रडतोच आहे 'बस ने कसा येउ' वगैरे करत, आता कार्यकर्तेच अस करायला लागल्यावर आम्ही भक्तांनी कुणाच्या तोंडाकडे पहायच ऑं ?
(अवांतरः पल्याडच्या गुर्जींना बिकाच्या आगमनाचा पत्ता आणि अल्याडच्या 'जुने अणे जाणिते' लोकांना का नसावा बुवा? ) :)
प्रतिक्रिया
थोर आहात,
:) भारीचं की
हाच तो न दिसणारा फोटो असावा..
अर्रे वा.....
लेखन वाचायला सुरुवात केली आणि
लै भारी लेख
एकदा ते
तेव्हा
मस्त वृत्तांत. आवडला. आणखीन
छान.
छान.
कार्यकर्ते
आमचाही व्हिसा दहा वर्षांचा
जोरदार ...
लुक हु इज टॉकिंग
तिसरा फोटो फार आवडला.
मस्त व्रुत्तांत..
कार्यकर्त्यांसाठी
वा वा! कार्यकर्त्यांची पायधूळ
घासुजी, तुमचं भाग्य खरच थोर
अगदी लैच ओळखीचा
शीर्षक
ह्म्म...बघून घेऊ!!!!
जबराट..
माझा कांग्रेस कार्यकारिणीतून
लेख
धड उपहासही नाही आणि खरेपणाही
ह्य्म्म
वृत्तांत फारच खुमासदार झाला
वृत्तांत फारच खुमासदार झाला
मोठ्ठा माणूस
वा, वा, वा
गुर्जी धन्य झाले!
षोक
पिंडाकाका 'शोक' सभेचं थोळ्याच
हां हां, जरूर करेंगे!
बिकाला देखील नेलं असतं, पण
त्यांच्या सज्जनतेच्या
काय सांगता?
होय का? अख्खा आफ्रिका का?
धरतीमाते, मला पोटात का घेतलं
हा हा हा
कार्यकर्ते येती घरा = मला वाटल कोणा राजकिय पार्टीचे किंवा
चान चान!
=))
जाऊ दे हो. चालायचं. मातीच्या
चॉलबे ना
अत्यंत सुरेख वृत्तांत
जबरदस्त वृत्तांत.....
भाग्यवान.
Pagination