Welcome to misalpav.com
लेखक: किलमाऊस्की | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

हा भाग पण आवडला. गोल्ड रशच्या वेळी काहींनी उदा. लिव्हाय (बहुतेक) जीनच्या पँटी विकायला सुरुवात केली अन त्यातच स्वतः ची भरभराट केली अस ऐकुन आहे.

अलास्कातील गोल्ड रशचा पुढील टप्पा काय असणार याबद्दल या भागाने बरीच उत्कंठा वाढविलेली आहे. नाट्यमय शैलीने केलेले वर्णन आवडले. तत्कालिन जाहिरांतीच्या चित्रांनी रोचकता अधिक वाढवली आहे.

उत्तम लेखमाला. अशीच एक लेखमाला दक्षिण आफिक्रेतल्या सोने आणि हिर्‍यांच्या शोधांवर पण येऊ द्या.

हा भाग तर अजूनच भारी झालाय!!! रश रश नक्की म्हणतात कशाला त्याचे वर्णन लै प्रत्ययकारी झालेय. वरिजिनल फटू अन कात्रणे टाकल्यामुळे अजूनच मजा आलीये. अवांतरः तुमच्या नावामुळे तर या विषयात जास्त रस(श) नाहीये ना तुम्हाला ;)

पण प्रांजळपणे सांगतो अ‍ॅडव्हेंचर सब्जेक्ट हाताळाणे हेच मुळातच अतिशय मोजक्या स्त्रियांना झेपलेलं कार्य आहे. अन्यथा विषय, चर्चा कोणतीही असो "अबोलीछाप" त्यातुन निसटलेला नसतो असच दिसुन येत. पण ही लेखमाला एक सुखद धक्का आहे व अगदी पहिल्या भागापासुन या लेखमालेने जबरदस्त पकड घेतली आहे.

लेखिकेच्या नावाचा संदर्भ कळला नाही स्पश्ट झाल्यास बर होइल...
विषय अन लेखिकेचे नाव म्हंजे आयडी हे बघावे, स्पष्ट होईलच.
अन्यथा विषय, चर्चा कोणतीही असो "अबोलीछाप" त्यातुन निसटलेला नसतो असच दिसुन येत. पण ही लेखमाला एक सुखद धक्का आहे व अगदी पहिल्या भागापासुन या लेखमालेने जबरदस्त पकड घेतली आहे.
हे एक अतिशय रोचक निरीक्षण आहे. या लेखमालेबद्दल पूर्ण सहमत! काहीसा जजमेंटल असा "अबोली टच" कुठेही जाणवत नाही इथे. पण लेखमालेचे कौतुक या कारणासाठी करावे की कसे त्याबद्दल द्विधा मनःस्थितीत आहे.

लेखिकेचे नाव (अथवा आयडी) बघुन स्पश्ट मला झालं नाही म्हणुनच तर प्रांजळ कुतुहलाने विचारलं होत. क्लोंडायक = हेमांगीके ? (Klondike) = हेमांगीके ? गोल्ड = हेमांगीके ? रश = हेमांगीके ?
काहीसा जजमेंटल असा "अबोली टच" कुठेही जाणवत नाही इथे.
खरयं.
पण लेखमालेचे कौतुक या कारणासाठी करावे की कसे त्याबद्दल द्विधा मनःस्थितीत आहे.
स्त्रियां आणी **च्या भावना दुखावणार असे वाटत असेल तर नका कौतुक करु, सक्टी नॉय.

विषय सोन्याशी संबंधित आहे. लेखिकेचे नाव हेमांगीके. हेम=सोने. म्हणून तसे म्हणालो.
स्त्रियां आणी **च्या भावना दुखावणार असे वाटत असेल तर नका कौतुक करु, सक्टी नॉय.
चूक. मुद्दा तो नाही. एका पातळीपलीकडे चांगल्या लिखाणाचे कौतुक ते चांगले आहे म्हणूनच करावे असे माझे मत आहे. अबोली टच नाही हे एक वैशिष्ट्य म्हणता येईल, पण त्याला मुख्य फीचर बनवू नये असे मला वाटते. असो. अजून चर्चा केल्यास अवांतर होईल असे वाट्टे म्हणून तूर्त इथेच थांबतो.

विषय सोन्याशी संबंधित आहे. लेखिकेचे नाव हेमांगीके. हेम=सोने. म्हणून तसे म्हणालो.
अच्छा. छानच माहिती, आत्ता डोक्यात उजेड पडला. तुमच्या मुळ अवांतराशी अतिशय सहमत. फार सुरेख.
एका पातळीपलीकडे चांगल्या लिखाणाचे कौतुक ते चांगले आहे म्हणूनच करावे असे माझे मत आहे.
होय. सहमत.
अबोली टच नाही हे एक वैशिष्ट्य म्हणता येईल, पण त्याला मुख्य फीचर बनवू नये असे मला वाटते. असो. अजून चर्चा केल्यास अवांतर होईल असे वाट्टे म्हणून तूर्त इथेच थांबतो.
चुक. अबोली टच असणे हे जर तुमच्या लेखी वैगुण्य ठरत असेल तरच अबोली टच नाही हे एक वैशिष्ट्य ठरत. मी मात्र याकडे एखाद्या लिखाणाची/विषयाची गरज "अबोली टच" आहे की नाही इतक्याच निकोपतेने बघतो. आणि लेखिकेने तो या लेखमालेमधे टाळुन विषयाला अतिशय योग्य न्याय दिला आहे जे फार कमी स्त्रि लेखकांकडुन घडते म्हणून अबोली टच टाळला याचे विषेश कौतुक करायला हवेच हवे. तुम्ही सहज बघु शकता की स्त्रियांचे या लेखमालेत विषेश प्रतिसाद नाहीत ? कारण काय ? तर अबोली टच मिसींग... जणू स्त्रिची लेखमाला म्हणजे तेच लिहलं पाहिजे असा अट्टहास. हीच लेखमाला पुरूषाने लिहली असती तर ... ? म्हणूनच म्हटलं होत की स्त्रियां आणी **च्या भावना दुखावणार असे वाटत असेल तर नका कौतुक करु, सक्टी नॉय. पण हेमांगिके यांनी अबोली टच टाळायचे जे धाडस दाखवले त्याबद्दल विषेश कौतुक झालेच पाहिजे. कारण लिखाण चांगले असुनही केवळ अबोली टच मिसींग असल्याने स्त्रियां आणी **नी प्रतिसाद देण्यात हात आखडते घेतलेत हे वास्तव मला आवडले नाही.

अबोली टच असणे हे जर तुमच्या लेखी वैगुण्य ठरत असेल तरच अबोली टच नाही हे एक वैशिष्ट्य ठरत. मी मात्र याकडे एखाद्या लिखाणाची/विषयाची गरज "अबोली टच" आहे की नाही इतक्याच निकोपतेने बघतो. आणि लेखिकेने तो या लेखमालेमधे टाळुन विषयाला अतिशय योग्य न्याय दिला आहे जे फार कमी स्त्रि लेखकांकडुन घडते म्हणून अबोली टच टाळला याचे विषेश कौतुक करायला हवेच हवे.
असो.अबोली टच हे वैगुण्य नसून तो कुठेही पुसता न येणे हे वैगुण्य असे मी म्हणेन बाकी मी थोडा असहमत आहे हायलाईटेड भागाशी. पण कौतुक का करावे याबद्दल मतभेद असले तरी कौतुकाबद्दल मतभेद नाहीत हेही नसे थोडके :)
तुम्ही सहज बघु शकता की स्त्रियांचे या लेखमालेत विषेश प्रतिसाद नाहीत ? कारण काय ? तर अबोली टच मिसींग... जणू स्त्रिची लेखमाला म्हणजे तेच लिहलं पाहिजे असा अट्टहास. हीच लेखमाला पुरूषाने लिहली असती तर ... ? म्हणूनच म्हटलं होत की स्त्रियां आणी **च्या भावना दुखावणार असे वाटत असेल तर नका कौतुक करु, सक्टी नॉय. पण हेमांगिके यांनी अबोली टच टाळायचे जे धाडस दाखवले त्याबद्दल विषेश कौतुक झालेच पाहिजे. कारण लिखाण चांगले असुनही केवळ अबोली टच मिसींग असल्याने स्त्रियां आणी **नी प्रतिसाद देण्यात हात आखडते घेतलेत हे वास्तव मला आवडले नाही.
हम्म, असो. :)

अबोली टच हे वैगुण्य नसून तो कुठेही पुसता न येणे हे वैगुण्य असे मी म्हणेन
अस मानताय तर वैगुण्यावर मात करुन लेखन केलय त्यांच्या कौतुक वर्षावात वैगुण्यावर मातकेल्या बद्दल आपण द्विधामनःस्थिती बाळगणे जास्त अनाकलनिय.
मी थोडा असहमत आहे हायलाईटेड भागाशी
अगदी संपुर्ण असहमत असाल तरी आश्चर्य वाटणार नाही. हा गैरसमज केवळ स्त्रिया व जेष्ठांनी राखलाय असं नाही तर द्विधा मनःस्थितीचे लोकही त्याला बळी पडलेत, फक्त त्यांना काऊंट करत नाही कारण त्याची सध्यस्थितीत विषेश आवश्यक्ता नाही इतकच.
पण कौतुक का करावे याबद्दल मतभेद असले तरी कौतुकाबद्दल मतभेद नाहीत हेही नसे थोडके
हेहेहे... एकदा द्विधा मनःस्थितीतुन बाहेर पडल्यावर आपोआप सगळ्याच बाबतीत एकमत झालेले असेल १००%.

लेखिकेचे नाव (अथवा आयडी) बघुन स्पश्ट मला झालं नाही म्हणुनच तर प्रांजळ कुतुहलाने विचारलं होत.
वर स्पष्टीकरण आलच आहे. माझ्या नावाचा अर्थ "सोन्याचं अंग असलेली" (आणि प्रत्यक्ष जीवनात सोन्याच्या दागिन्यांचा तिटकारा असलेली :-P) तुम्ही केलेल्या कौतुकासाठी मनःपूर्वक धन्यवाद :-) बाकी क्लोंडायकमधल्या अबोली गटाबद्द्ल येईलच पुढच्या काही भागात.

अवांतरः तुमच्या नावामुळे तर या विषयात जास्त रस(श) नाहीये ना तुम्हाला smiley
हाहाहा... हे भारीच्चे !!! माझ्याही लक्षात आलं नव्हतं.

हं …. चार्ली चाप्लीन याच्या गोल्ड रश चित्रपटा मधील काही प्रसंगांची,व्यक्तीची आत्ता संगती लागली

पुभाप्र आवांतर : क्लोंडायक मधली एखादी अलुव्हियल सोन्याने भरलेली जागा चुकून विसरून राहिली असली तर सांगा... सगळ्या मिपाकरांना घेवून जावे म्हणतो +D सहलीचे सोने होईल ;)

मस्त लेखमाला जमलीय. ते अबोलीटच वैगैरे सोडून देता तुम्ही तत्कालीन जाहीरातींचे जे नमुने दिलेत ते विशेष आवडले. पुढील भागांना खूप खूप शुभेच्छा. (तुमच्या अ‍ॅझ्टेक लेखमालेतील चित्रे पण अशीच माहीतीपूर्ण होती)

अतिशय सुंदर लेखमाला. सावकाश वाचण्यासाठी म्हणून ठेवून दिला होता लेख. मस्त वाटला. अवांतरः गोल्ड वरून मॅकेन्नाज गोल्ड देखील आठवला.

अतिअवांतरः मॅकेन्नाज गोल्ड = मकुअण्णांचं सोनं गन्स ऑफ नेव्हरॉन = नरवणेंच्या बंदुका असे दिव्य पीसेस ऑफ लिट्रेचर कधीकाळी वाचले होते. कळायचं बंद झालं तेच्यायला =))

बॅट्या त्याचा हिंदीत डब काय होता म्हायतीय का? मस्तान का सोना. :) मी बघितला हाय तो डब. लैच पुस्तकी संवाद होते.

तुमचे हे माहितीपूर्ण पण रंजक असलेले लेख नेहमीच खूप आवडतात. पंधरा वर्षांचा अनुभव मिरवणारी जाहिरात आवडली. आम्हाला आपले हे युकॉन गोल्ड बटाटे माहिती होते :) http://en.wikipedia.org/wiki/Yukon_Gold_potato

तुझे या पुर्वीचे सगळे ले़ख अप्रतीम होते त्यात हा अजुन एक भर. खुप छान लिहीतेस. असेच लिहीत रहा. पुढिल लि़खाणास लक्ष लक्ष शुभेच्छा

गोल्डरश वाचताना अ‍ॅड्रिनॅलिन रश होत आहे !! मस्तच लिहित आहात . पुढील भागाच्या प्रतिक्षेत !! ( अवांतर : क्लोंडायक सारखी जागा भारतात कुठे आहे का हो ? ;) एकवेळ सोनं नसले तरी चालेल पण काहीतरी नवीन शोधण्याचा एक्स्प्लोअर करण्याच्या कल्पनेनेही रोमांच उभे राहतात :) )