Welcome to misalpav.com
लेखक: शरद | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

छान. अशीच माहिती मिळत राहो. एक शंका: ....नावजलेल्या भारतीय युद्धात कौरव-पांडव ( व त्यांचे थोडे नातेवाईक ) सोडले तर बाकीचे राजे युद्धाची खुमखुमी म्हणून आले होते की नाही ?... .... तर खरोखरच युद्धाची खुमखुमी म्हणून हे एवढे युद्ध झाले का? की त्याकाळचे आणखी व्यापक असे काही राजकारण त्यात होते, यावर प्रकाश टाकावा.

इरावती कर्वे यांचे "युगांत" वाचा. अप्रतिम एकदम सुंदर ओघवत्या भाषेत लिहिलेले पुस्तक आहे. त्याकाळच्या राजकारणाचे, समाजाचे आणि माणसांचे (महाभारताच्या सर्व महत्वाच्या पात्रांचे) उत्तम संशोधीत वर्णन पण एकाद्या सुंदर कादंबरीसारखे हातातून खाली न ठेवता वाचावे असे.

'युगांत' खरेतर दोन-तीनदा वाचले आहे, पण शेवटल्यांदा वाचूनही आता पंचवीसेक वर्षे झाली असतील, त्यामुळे विस्मरण झाले आहे. आता पुन्हा वाचतो. याखेरीज आणखी या विषयावर(महाभारतकालीन व्यापक राजकारण) कुठे आहे का काही?

नै राव. पर्व आवडले नाही आपल्याला. भैरप्पांसारखा ताकदवान लेखक महाभारताचा एका वेगळ्याच अंगाने शोध घेण्यात अपयशी ठरलाय असे मला वाटते. शिवाय पर्व ही कादंबरी असल्याने बरेच नाटकियीकरण केले गेलेले आहे. पण शिवाजी सावंतांच्या 'युगंधर' पेक्षा पर्व निश्चितच अधिक वाचनीय आहे. सावंतांनी तर कृष्णाचे भयानक उदात्तीकरण करून महाभारताची पूर्ण वाट लावून टाकलीय. बाकी दुर्गाबाईंचे 'व्यासपर्व' वाचायलाच हवे असे आहे.

महाभारताची कहाणी प्रत्यक्ष कशी घडली असेल याचा मागोवा पर्व सोडून अन्य कुठल्या कादंबरीत घेतला असेल असे वाटत नाही. त्यांनी थोडे स्वातंत्र्य घेतले असेलही, परंतु ती सोडून अन्यत्र कुठे त्या ताकदीचे चित्रण आढळले नाही.

:) मला तरी कंटाळवाणे वाटले नाही कुठेच. युद्धातली ग्लोरी काढल्यामुळे तसे झाले असण्याची शक्यता जास्त असावी. परत प्रत्येकाला एकेकदा का होईना कुणाच्या तरी दृष्टिकोनातून झोडलेले आहेच.

असुर हे असीरीयातले असे कुठे तरी वाचले होते. त्याबद्दल काही माहिती द्याल का?

त्याचे आई वडील इराण मधुन आलेत. त्यांच्या म्हणण्यानुसार ते मुसलमान नाहीत असीरीअन आहे. त्यांची भाषा वेगळी आहे. नावं ख्रिश्चन आहेत...ख्रिश्चनांचाच एक प्रकार आहे असं त्या मुलाची आई सांगत होती.

शक्य आहे... सिरियचे अरबीतले नाव "अस्सुरिया" असेच उच्चारले जाते. लिहिताना "अल् सुरिया" असे लिहितात. उच्चारताना (काही वेळेस लिहितानाही) अल् मधला ल् नंतर येणार्‍या व्यंजनाप्रमाणे बदलतो. जसे अल् नूर (प्रकाश) = अन्नूर, अल् दम्माम (दम्माम शहर) = अद्दमाम, इ. आता प्रश्न असा आहे की: (१) "अल् सुरिया" मुळे ही सुरभूमी / देवभूमी मानयची की (२) "अस्सुरिया" मुळे ही असूरभूमी मानायची ?

इंटरेस्टिंग! अल् मध्ये संधीमुळे असाही बदल होऊ शकतो हे माहितीच नव्हते. मजा आहे :)
आता प्रश्न असा आहे की: (१) "अल् सुरिया" मुळे ही सुरभूमी / देवभूमी मानयची की (२) "अस्सुरिया" मुळे ही असूरभूमी मानायची ?
अवघड प्रश्न, टु से द लीस्टः नेम ऑफ सिरिया हे विकी आर्टिकल पाहिले. सिरिया अन असिरिया ह्या दोन्ही संज्ञा थोड्याफार फरकाने एकाच प्रदेशाला वापरल्या जात होत्या असे दिसते. असीरियाचे विकी आर्टिकल पाहता याबद्दल काही दिसत नाही. कुठे काही दिसले तर जरूर सांगतो. पण सध्या तरी काही दिसत नाही. वेदकालीन भारताशी समकालीन संस्कृतींसंदर्भात मला माहिती असलेल्या एखाददुसर्‍या पुस्तकातही यासंबंधी विशेष काही दिलेले आठवत नाही. इथे जाणकार अजून सांगतीलच. विशेषतः शरद यांच्या प्रतिसादाच्या प्रतीक्षेत.

आताचे जॉर्डन, लेबॅनॉन, सिरिया, इराक या देशांच्या भूमीवरचे इस्लामपूर्व संस्कृतीचे सर्व अवशेष, काही रोमन अवशेष वगळता, नष्ट केले गेले आहेत. मात्र याला एक फार मोठा अपवाद आहे. जॉर्डनच्या जगप्रसिद्ध पेत्रा व्हॅलीत इस्लामपूर्व संस्कृतीचे अवशेष आहेत. त्यांत रोमनपूर्व आणि रोमन अशा दोन्ही संस्कृतींची सरमिसळ दिसते. तेथे माणसे मृत झाल्यावर त्यांचे दहन करून नंतर अस्थी /राख डोंगराच्या खडकांत कोरलेल्या थडग्यांच्या दरवाज्यावर कोरलेल्या कलशात ठेवण्याची प्रथा होती. तसेच पेत्रा व्हॅलीच्या वेशीवर आपल्याकडे गावाच्या वेशीवर असते तशी गावाचे रक्षण करणार्‍या देवाची मुर्ती आहे... आणि मुख्य म्हणजे त्या देवाशेजारी त्याच्या पत्नीचीही मुर्ती कोरलेली आहे !

फटूबद्दल धन्यवाद :) देवाशेजारी पत्नीची मूर्तीही कोरलेली असणे हे रोचक आहे! बाकी इस्लामपूर्व अवशेष नष्ट करण्याबद्दल बोलावे तितके थोडेच आहे. प्रत्यक्ष प्रेषित महंमदाच्या आईचे थडगेही सौदीत उद्ध्वस्त केले तिथे बाकी अवशेषांची काय कथा? अन जॉर्डनमधल्या त्या पेट्रा /अल खजानेह् बद्दलही कधी लिहा अशी विनंती. इंडियाना जोन्स वगैरे पिच्चरमध्ये पाहून तो भाग लै लै आवडला आहे. :)

जॉर्डन लिखाणाच्या यादीत समाविष्ट आहेच. सद्या मिपावर लिहायचा उत्साह वाढल्याने "वेळ कमी सहली फार" असे झाले आहे :) पण जॉर्डनकाभी नंबर जरूर आयेगा +D

पण आर्य दक्षिणेकडच्या द्रविड लोकाणा त्यांच्या झिंझाळे केस काळा वर्ण आणि शरीर्यष्टीमुळे असुर म्हणत अशी पण थियरी ऐकली आहे. जसे की रावण