मोदक
Primary tabs
काल मी रात्री मोदक केले होते.
गणपतीच्या दिवसात एकदातरी करावेत अस वाटल म्हणुन,तर त्याची पा.कॄ. देत आहे.
मला माहीतेय की मोदक सगळ्यांनाच करता येतात पण मी पहील्यांदाच केले, ते सुद्धा सुचतील तसे :)
सांगायला कोणी नव्हत कसे करायचे म्हणुन.
आणि इथे ही पा.कॄ. टाकावीशी वाट्टेय कारण "मी " केले कोणी सांगीतले नाही.
सारण :-
१ नारळ खोवलेला, १ वाटी गुळ, २-३ वेलदोडे.
कृती :-
नारळाचा चव एका पातेल्यात गरम करत ठेवावा त्यात गुळ घालुन ते मिश्रण एकजीव करावे आणि शीजवत ठेवावे.
त्याचा रंग बदलला की त्यात वेलदोड्याची पुड करुन घालावी.
हे झालं सारण तयार :)
पारीसाठी :-
१ भांड तांदुळाची पीठी, थोड मीठ्,चमचाभर तेल (लहान चमचा),१ भांड पाणी (जीतकी पीठी तितकच पाणी घ्यावे.)
कृती :-
एका भांड्यात भांडभर पाणी उकळत ठेवावे.त्याला १ उकळी आली की त्यात चिमुटभ्र मीठ आणि तेल घालावे.
अजुन १ उकळी येऊ द्यावी. मग त्यात तांदुळाची पीठी घालावी आणि २ वाफा आणाव्यात. (पीठीचा रंग थोडा बदलतो.)
ही झाली पारी.
आता पारीच पीठ मळुन घ्यावे (हाताला चि़कटणार नाही इतपत)
मोदक करायला घ्यावे.
आणि उकड्त ठेवावे,मी कुकरमधे ठेवले होते १५ मिनिटं.
अजुन ह्यात काही बदल असेल तर सांगा :)
हा हा हा !!
स्वयंपाक घरात पाय ठेवण्यासाठी मस्त कारण भेटलं आहे... धन्यु ऋचा !!!
तयार करुन मग सांगतो कसा लागतो मोदक !!
राज जैन
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आमचा ब्लॉग
काल रात्री केलेस आणि आज लगेच रेसिपी लिहिलीस यावरून नक्कीच छान झालेले दिसतात...
प्रथमच आणि कोणाचीही मदत न घेता केलेस यातच सर्व काही आले..:)
त्या स्वातीसारखेच ही स्वातीही म्हणते आहे..
वा ऋचा,अभिनंदन!
स्वाती
अजूनपर्यंत मी स्वतः एकटीनी मोदक नाही केलेले ... पण कधीतरी ट्रायायला पाहिजेत.
(आणि स्वागत अशा पाकृंचं!)
अजूनपर्यंत मी स्वतः एकटीनी मोदक नाही केलेले ... पण कधीतरी ट्रायायला पाहिजेत.
माला का वाटतंय .. आज्जी माझ्यावर प्रयोग करणार आहे म्हणून ...
असो ... थट्टा पुरे .. ऋचे ... थोडे मोदक तुच देना पाठवून अफ्रिकेत ... मला मोदक फार आवडतात ... उकडीचे किंवा पेढ्याचे ..
यम्मी (ही आज्जी नव्हे ,,. ही प्रतिक्रिया आहे , पदार्थ आवाडल्याची)
-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात
मोदक कुकरमध्ये ठेवताना त्याखाली एक केळीच्या पानाचा तुकडा ठेवावा.(३"X३") त्याचे फायदे असे:=
१) मोदक मोदकपात्रास चिकटत नाहीत.
२) केळीच्या पानांचा सुंदर स्वाद मोदकांना येतो.
३) केळीचे पान गरम झाल्याने त्याला स्पर्श करणार्या अन्नाचे पचन सहज होते. (म्हणून केळीच्या पानांवर जेवण्याची पद्धत आहे).
३) केळीचे पान गरम झाल्याने त्याला स्पर्श करणार्या अन्नाचे पचन सहज होते. (म्हणून केळीच्या पानांवर जेवण्याची पद्धत आहे).
काका हे मला माहित नव्हतं. धन्यवाद माहितीबद्दल.
(स्वयंघोषित पुतणी) अदिती
अरे १ सांगायला विसरले.
केळीच पान चाळणीत ठेऊन ती कुकर मधे ठेवली.
"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
पारीचे आधण ठेवताना, त्यात तेला ऐवजी लोणी सुद्धा वापरतात....
ह्याने मोदक मऊ होतो आणि बाधत पण नाही.
आणि केळीच्या पानावर ठेवण्यापुर्वी मोदक पाण्यात बुडवावा म्हणजे तो पानाला चिकटत नाही.
--@-- स्नेहश्री रहाळ्कर.--@--
आनंदाचे क्षण असतातच जगण्यासाठी
दुःखाचे क्षण असतातच विसरण्यासाठी
पण खुप काही देउन जातात हे
आयुष्यात पुढे जाण्यासाठी
अभिनंदन आणि पाकृबद्दल धन्यवाद. पाककृतीचं नाव वाचूनच आज मटामधल्या एका लेखात वाचलेलं खल्लास वाक्य आठवलं -
"सौंदर्यामध्ये मस्तानी , स्थापत्यामध्ये मुमताजमहाल , स्वयंपाकामध्ये मोदक आणि संगीतामध्ये हा मालकंस यांना तोड नाही."
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
अरे वा! काल रात्री टाटा मोटर्सच्या मालकांना मोदक मिळाले वाटत! मज्जा आहे बॉ :)
तात्या.
सहीये ऋचा! मीपण करून बघणार आता मोदक. :)
केलेस की मला बोलव :)
नक्की. (कसेही झाले तरी खावे लागतील हां ऍड्या, नाही खाल्लेस तर गळ्यात बांधीन. :))
नारळाचा चव परतताना त्यात २/३ चमचे तुप घालुन बघ.
सारण छान लागते.
:)
बाकी मोदक तु पहिल्यांदा केलेस आणि तुला ते जमले हे खुप छान. :)
नारळाचा चव परतताना त्यात २/३ चमचे तुप घालुन बघ.
तसेच खवा सुद्धा घालावा. मस्त लागतात मोदक.
गुलकंद घातला तर अतिशय सुरेख स्वाद येतो. सारण एकदम वेगळं लागतं..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
मी पण अजून एकदाही केले नाहीयेत मोदक. आता नक्की करुन पाहीन
बाकी, या मापाचे किती मोदक झाले?
-वर्षा
>>बाकी, या मापाचे किती मोदक झाले?
ह्या मापात साधारण १२-१३ मोदक होतात
आणि १ लहानशी करंजी पण होते :)
"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
अरे वा.. ऋचा तुला भरपूर धन्यवाद! मला कधीपासून करायचेत, पण मुहुर्त लागत नव्हता! आता आज किंवा उद्या नक्की करणार! पहील्यांदाच करणार मी ही.. आय होप जमतील.!