Welcome to misalpav.com
लेखक: प्रभाकर पेठकर | प्रसिद्ध:


Comments

खल्लास पाककृती! काका, दहिसरला एखादी शाखा सुरू करा लवकरच सामिष पदार्थांच्या रेस्तराँची (क्रॅब सूप सहित) :)

ह्येच म्हंतो दहिसरला शाखा सुरु कराच. :)

एकंदरीत दहिसर म्हणजे पाकनैपुण्याची खाण दिसते आहे. (अस्मादिकांच्या अपवादाने या नियमाला अधिक बळकटी यावी ;))

काल रात्रीच मटन खाताना आता मटन कमी खायला हवं असा दृढ निश्चय केला होता... आणि सकाळी सकाळी परत मटन रोगनजोश ? अप्रतिम !!

"तरण" वाली मटण डिश "करीम्स" मधे खाल्ली होती, एका मिपाकराबरोबर दिल्लीत.

मटण रोगनजोशची पाककृती अपेक्षित होतीच :) रंग व पाकृ दोन्ही जबरदस्त, तर्रीदार +१ फक्त काश्मिरी मटण रोगनजोश मध्ये सुंठपूड ही वापरतात असे वाचले होते.

सानिकास्वप्निल, काश्मिरी रोगनजोशच्या अनेक पाककृत्या आंतरजालावर तसेच लिखित साहित्यात आहेत. सुंठ पुड वापरून आहेत, तर प्रत्येक काश्मिरी पाककृतीत बडीशोप 'मस्ट' असते असे सांगणारेही भेटतात, टिव्ही शोज मध्ये दिसतात. मी अनेक प्रकारे करून पाहिली आहे. ही पाककृती मला त्यातल्यात्यात जास्त योग्य वाटली.

मटण शिजायला वेळ लागतो. म्हणून मटण आधीच घालून ते मसाल्यातच व्यवस्थित शिजवून घेतले आहे. पण (उकडलेला) बटाटा, पनीर, (उकडलेले) अंडे हे शिजलेलेच असल्याने, पाककृतीत जिथे मटण घातले आहे आणि ३-३ वेळा पाणी घालून शिजवले आहे त्या पायर्‍या वगळून नुसता मसाला बनवून घ्या. शेवटी गरम मसाला घालून मंद गॅसवर पाणी आटवून घ्या आणि नुसते मसाला आणि तुप उरले की त्यात उकडलेला बटाटा, पनीर किंवा उकडलेली अंडी घालून नुसते मिसळून घ्या. वरून कोथींबीर घालून सुशोभित करा.

आभार! नक्की करून बघेन बाकी फटुतला कातिल रंग केवळ तिखटामुळे + मसाल्यामुळे आला आहे हे केवळ तुम्ही सांगताय म्हणून खरं समजतो आहे. :)

>>हीच पाककृती उकडलेले बटाटे किंवा पनीर वगैरे वापरून शाकाहारी करता येईल. फक्त बटाटे शिजलेले असल्या कारणाने रस्सा पूर्ण शिजवून घ्यावा आणि शेवटी बटाटा मिसळावा. हे वाचून बरं वाटलं, या वीकांतास पनीरसोबत ही पाकृ करुन पाहीन.

झक्क्क्क्कास नक्की करुन खाणार अवांतर = १)बटाटे रोस्ट करुन घेतले तर....... अणि २) सोया चंक्स वापरुन............... कशी होईल याचा विचार करतोय

ये 'जोश' वाली तस्वीर ने तो दिल और दिमाग दोनो पर कब्जा कर लिया है| पण एक शंका - कुठलहि वाटण किंवा कांद्याची पेस्ट न वापरता मसाला/ग्रेव्हि ईतकि घट्ट होउ शकते का?

कुठलहि वाटण किंवा कांद्याची पेस्ट न वापरता मसाला/ग्रेव्हि ईतकि घट्ट होउ शकते का?
ह्यात जे दही वापरलं आहे त्यातील पाणी बाष्पीभूत होऊन त्याला चक्क्याचे रुप येते. शिवाय त्यात धणे पावडर + तिखट मिसळून, परतले जाऊन, घट्ट मसाल्याचे एक चविष्ट मिश्रण तयार होते.

छान पाककृती. मास-मटन खात नसल्याने अंडे घालून जरुर करून बघेन smiley बादवे, 'रोगन' म्हणजे काय नेमकं किंवा संपूर्ण शब्द 'रोगनजोश' चा काय अर्थ आहे? (मला ते 'रोगनजोश' नाव दिसलं की काहीतरी रोगट असंच वाटत आलंय नेहमी पण आज पाककृती पाहून बरे वाटले, अर्थ कळाल्यावर अजून बरे वाटेल :) .... )

'रोगन' म्हणजे 'तर्री' हे अत्ताच 'खादाड अमिता' ह्याच्या 'चिकन रोगनजोश' धाग्यावर वाचले. धन्यवाद, शंका निरसन झाले आहे/करुन घेतले आहे.

इसको बोलताय रोगनजोश!!!! न्यूयॉर्कमधे पोर्ट ऑथॉरिटी बस स्टेशनच्या जवळ ४२ स्ट्रीटवर एका पाकव्याप्त काश्मिरी माणसाचं हॉटेल आहे/ होतं (नांवही बहुदा आझाद कश्मिर की कायससं होतं). तिथे पाहिलेल्या आणि अर्थातच हादडलेल्या मटन रोगनजोशची आठवण करून देणारी रेसेपी!!! जियो!!! सौ साल जियो!!! बाकी पेठकरसाब,
आजच्या आहार आणि उष्मांक नियंत्रणाच्या निकषांवर ही पाककृती 'वजनदार व्यक्तिमत्त्वांसाठी' अयोग्य ठरू शकते परंतु चवीच्या निकषांवर ती पुन्हा पुन्हा करून खावीशी वाटेल अशीच आहे.
"अशीच अमुची आई असती...." हे उष्मांकांच कळतं ज्ञान जर वळत असतं तर आम्ही वजनदार व्यक्तिमत्व कशाला झालो असतो? आम्ही आपले तुमच्या वाक्याच्या उत्तरार्धावर निष्ठा ठेवणारे!!! :)

असू शकेल, विंजिनेरसाब. तुम्ही दिलेल्या लिंकमध्ये रेस्टॉरंटचा फोटो न सापडल्यामुळे नक्की सांगता येत नाहीये. पुन्हा माझा अनुभव हा १९९२ साली मी जेंव्हा न्यूयॉर्कात रहात होतो तेंव्हाचा आहे. लिंकमधले अभिप्राय पहाता त्यानंतर आजवर पुलाखालून हडसनचं बरंच पाणी वाहून गेलेलं दिसतंय!! :) तरी लिंकबद्दल धन्यवाद.

श्री. पेठकर काका, पाकृ ब्येस्ट एकदम. व्हेज ऑप्शनबद्दल धन्यवाद.

नंदन, सानिकास्वप्निल, गणपा, सुहास झेले, नीलकांत, पैसा, इरसाल, कोमल, गवि, ऋषिकेश, सूड, jaypal, दिपक्.कुवेत, साती, Mrunalini, अधाशी उदय, गणपा, प्यारे१, रेवती, aparna akshay, ढालगज भवानी, मन्द्या, वेताळ, अर्धवटराव, पिवळा डांबिस, दशानन, मराठे, अभ्या.., पूजा पवार., कच्ची कैरी सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद. नंदन, सानिकास्वप्निल, गणपा, सुहास झेले - सूचना विचार करण्याजोगी नक्कीच आहे. आपले आशिर्वाद असू द्यात. नीलकांत - कमी खायला हवं न? मग कमी खा. दोन बाऊल्स बस झाले. पिवळा डांबिस साहेब -
...तर आम्ही वजनदार व्यक्तिमत्व कशाला झालो असतो?
कोणी समदु:खी भेटला की बरं वाटतं. चला एकमेकांच्या खांद्यावर डोके टेकून चार अश्रू ढाळूया आणि मटण रोगनजोशचा आस्वाद घेऊया.

>>>>चला एकमेकांच्या खांद्यावर डोके टेकून कसं शक्य आहे? जमेल? आय डाऊट! ;) त्यापेक्षा दोन दोन पेग मारा नि मटण रोगनजोशचा आस्वाद घ्या. :)

डाएट रोगनजोशचा वर्जिनल झब्बू पाहूनच गोड वाटले. रुमाली रोटी अन गोष्त रोगन जोश सिंप्ली लाजवाब. सोकाजीराव याच्या सोबत 'जाईल' अशी वाईन सुचवा हो.. काश्मिरात एक स्पेशल मेजवानी असते अन त्यात १००-सव्वाशे डीशेस वगैरे असतात असे ऐकून आहे.. त्याबद्दल डीट्टेलवार कुणी लिहिल का? अन अशी मेजवानी कोण कशी अ‍ॅरेंज करून देऊ शकेल इ. माहिती देता आली तर मंडळ आपले आभारी राहील..

पेठकरशेठ, तुमच्या या रेसेपीने (आणि विशेषकरून फोटोने)प्रेरीत होऊन काल मस्त ऑस्ट्रेलियन प्राईम मटण घेऊन आलोय, रोगनजोश करायला! रेसेपी केवळ वाचून लग्गेच करायची सुरसुरी येणं हे माझ्यासाठी दुर्मिळ! :) चांगलं झालं तर इथेच फोटो टाकतो. चांगलं झालं नाही तर तो दोष माझा...