Welcome to misalpav.com
लेखक: दशानन | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

अतिशय हृद्य आठवणी! अगदी मनाच्या तळापासून लिहिलेलं कळतं आहे. फार छान!

एकदम लंपन वगैरे आठवला
असेच म्हणते.. छानच झालाय हाही भाग.. पुभाप्र

लेख आवडला. खटल्याचं,शेतीवाडी असणारं ज्याचं आजोळ असेल त्याच्या आठवणी जवळपास अशाच असणार.सुन्दर. चित्रगुप्त जी लेखात जी दुसरी भाषा आहे ती कोणती ? कानडी का ?

सुरेख लेखन. अतिशय आवडले.....आजोळची आठवण आली....सुट्टीत मामाच्या गावाला जायचे वेध लागायचे...., कधी एकदा परीक्षा होतेय आणी आम्ही जातोय असे व्हायचे. पण आता आपल्याच मुलांना मामाच्या गावाला जायला नको असते, त्यांचे त्यांचे मित्रम्ंडळ, मोबाईल, कॉम्प्युटर..गेम्स,.. एवढे असले की बास..ही मंडळी घराबाहेर पडायचे नाव घेत नाहीत. आई नको ना जायला मामाच्या गावाला --तिथे आमाला करमत नाही, असे ही आपलीच मुले आपल्याला सांगत असतात, त्यामुळे आम्हाला पण माहेरी जास्त जायला मिळत नाही. कारण घरात मुलांच्याजवळ कोण असा प्रश्न येतो.

आता ती मामाची घरं राहीली नाहीत हो, माझे दोन्ही भाचे गेली महिनाभर घरी आहेत. किती वेळ देऊ शकलो याचा विचार केल्यावर समजले आपण त्यांना साधा एक तास देऊ शकलो नाही आहोत... काळ बदलला आहे.. आपण पण बदलायला हवे. आनंदासाठी आहेत गतकाळातील आठवणी सोबत आपल्या!

धन्यवाद मंडळी.. प्रत्येक प्रतिसादानंतर धन्य झालो हे लिहण्यात अर्थ नाही म्हणून सर्वाचे एकत्र आभार व्यक्त करतो आहे. जरा कामातून मोकळा झालो की पुढील भाग येईलच.

दशानना दशानना करतो रे प्रार्थना सदैव असे लिहित रहा पूर्ण कर कामना ! दशानन आपला पिंड ट्रेकरचा की साहितत्यिकाचा ??