मोल्सवर्थ काकांना प्रश्न विचारला. या लिंका आणि उत्तरं:
कोश (p. 187) [ kōśa ] m (S) A treasury. 2 A particular receptacle, of which five are enumerated; अन्नमय-प्राण- मय-मनोमय-विज्ञानमय-आनंदमय-कोश. 3 A dictionary or vocabulary. 4 A sheath, integument, investing membrane, tunicle, coating. 5 A scabbard. 6 The cod or cocoon of the spider कोळी. 7 A bud. Ex. कमळकोशींचा सुवास बरा ॥. 8 Judicial trial by ordeal--by fire, water, poison, the balance, boiling oil, drinking water that has been poured over his tutelar god or other idol or a Bráhman, and particularly this last form. 9 (क्रोश S) A measure of distance, a kos or cos. See कोस.
कोष (p. 187) [ kōṣa ] m (S) See कोश, except in the sense A measure of distance.
शब्दकोष: ज्ञेय (p. 913) [ jñēya ] a S (Possible, purposed, necessary &c.) to be known or understood. Ex. ह्या शब्दकोषांतील प्रत्येक शब्द ज्ञेय आहे एतज्ज्ञानानें जो ज्ञाता तोच सुज्ञ.
शब्दकोश: (p. 781) [ śabdakōśa ] or -कोष m (S) A repository of words, a dictionary or vocabulary.
शब्दकोष असा शब्द गूगलमधे शोधला तर साधारण 129,000 results मिळाले. शब्दकोश असा शब्द गूगलमधे शोधला तर साधारण 6,430,000 results मिळाले. शब्दकोषाच्या साधारण साडेचारपट अधिक.
निष्कर्षः मोल्सवर्थ - अभिजनांच्या भाषेत - कोश/शब्दकोश हा शब्द मूळ असल्याचं दिसतं. इंटरनेटवर लिखाण करणार्या लोकांचं - काही प्रमाणात बहुजन/आम आदमी-औरत - वापरानुसारही शब्दकोश हाच शब्द अधिक प्रचलित दिसतो.
आमच्या खडूस तरीही प्रिय मित्राचं मतही या अभिजन-बहुजनांसारखंच असल्यामुळे निदान मित्रप्रेम का अभिजन-बहुजन मत असा तिढा माझ्यासमोर नाही. अधूनमधून शब्दकोष असं लिहिलं गेलं तरी शेवटचा ष खोडून श लिहीण्याचा प्रयत्न मी करत राहिन. शब्दकोष असा शब्द चूक समजता येणार नाही हे या उपक्रमातून समजलं.
---
विज्ञान आणि वैज्ञानिकांमुळे समाजात घडत गेलेले बदल अशा अर्थाच्या लेखात अवांतर करण्याबाबत क्षमाप्रार्थी आहे. पण मराठी भाषेसाठी शुद्धलेखन हा एक महत्त्वाचा पैलू असल्यामुळे रहावलं नाही.
तिरके तिरके प्रतिसाद देण्याची परंपरा कधी रे मोडली? माझा इतिहासाचा अभ्यास कमी पडतोय.
अवांतरः मी पण तुला प्रॉमिस केलेलं खोद-शोधकाम अजून केलेलं नाहीये. ;-)
आवर्जून लिंका दिल्याबद्दल आभार.आम्ही मोल्सवर्थकाकांना विचारले नव्हते, तर संस्कृत शब्दकोश पाहिला होता. पण हरकत नाही, या निमित्ताने कळ्ळं काय आहे ते. बाकी "शब्दकोष" च्या लिंकमध्ये पाहिल्यास डिक्शनरी हाच अर्थ जाणवतोय. ज्ञेय या शब्दाचा अर्थ सांगताना डिक्शनरीचे उदाहरण दिलेय इतकेच. तस्मात मराठीतही दोन्ही पाठ वैध आहेत, फक्त "कोश" हा पाठ जास्त प्रचलित आहे असे म्हटले तर जास्त सयुक्तिक ठरेल.
एकंदरीत आपल्या श्रद्धा आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यांच्या व्याख्या किंचित वेगळ्या दिसतात. माझ्या व्याख्या मी स्पष्ट केल्या आहेत. आणि व्याख्यांपलिकडे त्यांचा अर्थ मला काय अभिप्रेत आहे ते लेखातल्या माहितीतून स्पष्ट व्हावंच.
एक एकदम अवांतर. मला हे मागेच बघितलं तेह्वा विचारायचं होतं, एक कुतुहल म्हणूनच केवळ.. तिकडे पण माझे मिपावरील लेखन किंवा मिपावरील नवे लेखन अशी स्वाक्षरी करता का हो?
अवांतर आहे हे कबूल केलंत म्हणून बरं झालं. खरडवही असताना धाग्यावर जाहीर विचारणा करण्याचं कारण काय हा प्रश्न आहेच. पण इथे विचारलंत म्हणून इथे सांगतो. मी 'तिकडे' किंवा 'दुसरीकडे कुठेतरी' काय करतो याविषयी तुम्ही कृपया प्रश्न विचारू नयेत. कारण ते माझं मिपाबाहेरचं व्यक्तिगत आयुष्य आहे. फक्त एवढंच सांगतो, की 'तिकडचे' संपादक असले वैयक्तिक आणि खोचक प्रश्न चालवून घेत नाहीत.
> फक्त एवढंच सांगतो, की 'तिकडचे' संपादक असले वैयक्तिक आणि खोचक प्रश्न चालवून घेत नाहीत.
इकडच्या संपादकांची व्यक्तीस्वातंत्र्यावर श्रद्धा आहे, त्यामुळे दुसर्या संस्थळाच्या जाहिराती चालवून घेतात.
मी मिपाची जाहिरातही करते. मिपावर येऊन, इथे लिहून, मिपावर व्यक्तीस्वातंत्र्याची गळचेपी होते, मतं मांडता येत नाहीत म्हणून वेगळं संस्थळ काढून लोकांना तिथे या म्हणून सांगत नाही.
सहमतीबद्दल आभार आणि जाहिरात पाहिल्याबद्दल डब्बल आभार.
मला वाटते इथे केवळ विवक्षित संकेतस्थळाची जाहिरात इतका तुमचा मुद्दा क्षुद्र नसून अशा जाहिरातींमधील व्यापक अन्योन्याश्रय अपेक्षित आहे. उदा. मिपावर लिहिताना ऐसीची जाहिरात केल्यास ऐसीवर लिहिताना मिपाची जाहिरात करावी वगैरे.
बरं हे असो. एक एकदम अवांतर. मला हे मागेच बघितलं तेह्वा विचारायचं होतं, एक कुतुहल म्हणूनच केवळ.. तिकडे पण माझे मिपावरील लेखन किंवा मिपावरील नवे लेखन अशी स्वाक्षरी करता का हो?
या मुद्द्याशी निदान तुम्ही स्वतः सुसंगत असावे या हेतूने छायाप्रकाश या संकेतस्थळावर तुम्ही मिपाची जाहिरात करावी असे सुचवावेसे वाटते. संवाद या संकेतस्थळावर मिपाची जाहिरात सापडली आहे.
या तिरप्या प्रतिसादांच्या निमित्ताने "कुणाला कशाचं तर बोडकीला केसांचं" ही म्हण* आठवली.
*श्रेय अव्हेरः अखिल सिंहगड रोड वडगांव धायरी (डीयेस्केसह) वारजे मराठी भाषा सेवा संघ
पण मर्यादा प्रत्येक गोष्टीला असतेच.
पण या (अन इतर काही) धाग्यांवरचे प्रतिसाद पाहता सगळ्याच गोष्टी मर्यादित नाहीत असं स्पष्ट होतं असं आमचं प्रायव्हेट मत आहे.. ;)
पण हा लढा श्रद्धेविरुद्ध विज्ञान असा नसुन भिती विरुद्ध जिज्ञासा असा आहे. धर्मसंस्थेच्या जोखडातुन माणसाची सुटका विज्ञानाने केली नाहि... मानवी मनातली जिज्ञासा/ज्ञानलालसा/लढाऊ वृत्ती त्याच मानवी मनातल्या भितीशी टकरावल्या व त्यातुन माणसाचा श्वास मोकळा झाला.
श्रद्धा व विज्ञान परस्परांविरुद्ध उभे ठाकुच शकत नाहित. त्यांचे मार्ग एकमेकांना कुठेच छेदत नाहित.
कार्यकारण भावावर विज्ञानाचा डोलारा उभा आहे, व तो अनादी अनंत आहे. पृथ्वी नामक एका ग्रहावर विशिष्ट रासायनीक देहधारक मानवाने आपल्या डोळ्यांनी या विज्ञानाचा एक छोटासा कवडसा बघितला. विज्ञानाच्या अतिविषाल पटावर हा कवडसा (क्वांटीटीव्ह दृष्टीने) अगदीच क्षुल्लक आहे.
काळाच्या प्रवाहीपणावर श्रद्धेचा डोलारा उभा आहे. तो देखील अनादी अनंत आहे. त्याच पृथ्वी नामक ग्रहावरच्या मानवाने काळाचे सतत धावते रूप अनुभवले. पुढचे पाऊल टाकावेच लागते हे कंपल्शन अनुभवले. सृष्टीच्या अनादी अनंत पसार्याच्या मानाने हा अनुभव देखील क्षुल्लक आहे.
चर्च आदि व्यवस्थेने आपले हितसंबंध जोपासताना माणसाच्या जिज्ञासेला मारुन मुरकुटुन आपली बटीक बनवायचा प्रयत्न केला. तिच जिज्ञासा उफाळुन वर आलि व तिने धर्मसंस्थेचे सिंहासन मोडुन काढले.
आज विज्ञानाचे जे प्रचलीत प्रारुप आहे, कदाचीत एखादा निओ अॅण्डर्सन ते प्रारुप उद्या मोडुन काढेल.
मानवाला जर खरच सत्याची कास बाणवायची आहे, शोषण थांबवायचे आहे, स्वातंत्र्य उपभोगायचे आहे, तर त्याने सर्वप्रथम धर्म, श्रद्धा, विज्ञान वगैरे कुठल्याही संस्थेकडे अंगुलीनिर्देष करणे थांबवावे. माणसाचा खरा प्रॉब्लेम स्वतः माणुस आहे. मानवतेला अहितकारि स्वतः मानवता आहे. या एका प्रॉब्लेमकडे व्यवस्थीत लक्ष्य दिले तरी (सध्याचे) सर्व प्रश्न सुटतील (आणि कदाचीत नवे प्रश्न सुरु होतील). असो.
अर्धवटराव
+१
पाश्चात्य धर्मसंस्था किंवा तिचं स्ट्रक्चर हे जास्त करुन 'गॉड फिअरींग' अशा स्वरुपाचं आहे.
भारतीय तत्वज्ञान 'गॉड लव्हिंग' स्वरुपाचं सुद्धा आहे. बाकी चालू द्या.
तसंही चालेल.
भावना पोचल्या की झालं. जेव्हा हे तत्वज्ञान उदयाला आलं तेव्हा हिंदू वगैरे काहीच नव्हतं त्यामुळं भारतीय म्हणालो. असो.
आईबापाची भीती वाटत नाही. आदरयुक्त प्रेम वाटतं. तसंच काहीसं आहे.
अर्थात ह्यात श्रेणी आहेत. पण इथे तो विषय नाही. असो. :)
विज्ञानाने मानवी जीवन उज्ज्वल बनवले आहे. भीतीवर मात केली आहे. पण मृत्यूवर नाही.
समोर दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टीचे अगर घटनेचे स्पष्टीकरण विज्ञान देऊ शकतेच असे नाही. म्हणून ती घटना नाकारण्यात काय अर्थ आहे ? विज्ञान सांगू शकत नसलेल्या गोष्टींचे कारण अनुभूती देत असतील तर अनुभूती नाकारून तिला अंधश्रद्धा समजणे शहाणपणाचे आहे का ? उदा. एखादे अनोळखी काटेरी फळ खाण्यापूर्वी दुसऱ्या कुणी ते खाल्ले आहे अन ते विषारी नाही, या माहितीला श्रद्धा म्हणता येईल. त्यासाठी प्रयोगशाळेत नेऊन चिरफाड केलीच पाहिजे असे नाही.
तेव्हा धर्म श्रद्धा यांची ढापणे असू नयेत तसेच विज्ञानाचेही ढापण बनू नये याची खबरदारी घ्यायला हवी.
>>>रिचर्ड लेन्स्की नावाच्या जीवशास्त्रज्ञाने त्याआधीची वीस वर्षं एक प्रयोग चालू ठेवला होता. या प्रयोगाचं उद्दिष्ट होतं ते म्हणजे प्रयोगशाळेत उत्क्रांती घडताना प्रत्यक्ष पहाणं. यात त्याला घवघवीत यश आलं.
ह्याबद्दल अधिक माहिती कुठं मिळेल????
लेख एकदम आवडेश गुर्जी. ज्ञानात आणि विचारात भर पडली.
लेखाखालच्या प्रतिक्रियांमधून लेखासंदर्भात इतर माहितीची भर पडेल असे वाटले होते, पण तिथे 'मला बघा किती अक्कल आहे' हे दाखवण्याचीच चढाओढ दिसली.
असो...
लेख आवडला. वरती अनेकांनी म्हणल्याप्रमाणे श्रद्धा शब्द पटला नाही. त्या संदर्भात लेखात आलेला धर्मसत्ता शब्दाचा वापर सांगावासा वाटतो. व्हॅटीकन आणि त्याला अनुषंगून असलेली चर्च व्यवस्था ही केवळ श्रद्धेवर आधारलेली नसून त्या व्यवस्थेच्या जन्मापासून सत्तेवर आधारलेली आहे. त्यामुळे "इन्क्विजिशन इज नॉट (ऑलवेज) अबाउट फेथ, इट इज (मेनीटाईम्स) अबाऊट पॉवर" :) असे म्हणावेसे वाटते.
पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे सामान्यांमध्ये स्वीकारलं गेलं.
ऑलमोस्ट सत्य आहे. पण श्रद्धेने म्हणा अथवा अज्ञानाने म्हणा, पण अजूनही सूर्य पृथ्वीभोवती फिरतो म्हणणारे आहेत!
त्या शिवाय Flat Earth Society खरेच अस्तित्वात आहे! त्यांचे विचार वाचण्यासारखे आहेत!
कमेंट आवडली बुवा !!
पण , तुम्ही तरी हे सिध्द करु शकता का कि पृथ्वी सुर्या भोवती फिरते , सुर्य पृथ्वी भोवती नाही ... ??
रादर इथे मिपावरच्यांना आपणा पैकी किती जणांनी हे सत्य पडताळुन पाहिले आहे ?
आजपर्यंत माझा वैयक्तिक अनुभव असा आहे कि ९९.९% लोकांची ही केवळ श्रध्दा आहे ... कोणीतरी सांगितलं म्हणुन आपलं मानलं ....कोणी पडताळुन नाही पाहिलं =))
पुरावा काय ? पुरावा काय ?
सत्य फार फिलॉसॉफिकल गोष्ट आहे ही .
एखादी गोष्ट सत्य आहे असं जेव्हा पण म्हणतो तेव्हा आपल्या मर्यादित ज्ञानाच्या कक्षेतच ते सत्य असते ...त्याच्या बाहेर नाही ... त्यामुळे एखादी गोष्ट जी आज सत्य वाटत आहे ते कदाचित उद्या असत्य ठरेल ( एक्सेप्ट मॅथेमॅटीक्स ) कारण ज्ञानाच्या कक्षा कायम रुंदावतच राहणार . जेव्हा आपण एखादी गोष्ट सत्य आहे असं म्हणत असतो तेव्हा नेहमीच " आपल्या मर्यादित ज्ञानाच्या आधारावर " हा टॅग असला पाहिजे ...
आणि इथेच तर ग्यानबाची मेख आहे ...जेव्हा हा टॅग लागतो तेव्हा ती गोष्ट श्रध्देच्या कक्षेत गेली नाही का !!!!
थोडक्यात विज्ञान असं काही असणं शक्यच नाही ... तुम्ही कधीच कोणत्याच गोष्टीविषयी अॅब्सोल्युटली शुअर होवु शकत नाही आणि झालात तरी वर म्हणल्या प्रमाणे "सद्य परीस्थितीत अॅट ताईम T = 0 , आणि मर्यादित अनुभवांच्या / ज्ञानाच्या आधारावर " हा टॅग कायम असणारच ... सगंळं आहे ती श्रध्दाच आहे !!
रेने देकार्त "मेडीटेशन्स ऑन फर्स्ट फिलॉसॉफी " मधे म्हणतो
" एकुणच सगळेच अनुभव हे इंदिर्यां मार्फत येत असतात , आणि इन्द्रियां मार्फत येणारे अनुभव डिल्युजनल असतात (जसे मृगजळ / पाण्यात सरळ काठी वाकडी दिसणे / पृथ्वी सपाट भासणे इ.इ. ) ... कदाचित हे सगलंच खोट आहे ...मी गाढ स्वप्नात निजलोय ... इतक्या गाढ की ह्या गोष्टी खर्या भासताहेत ... आणि "मी आहे (कारण मी हा विचार करतोय ) " ह्या व्यतिरिक्त हे बाकी काही सत्य आहे हे कोणत्याही प्रकारे प्रुव्ह करता येणार नाही . "
अच्छा, म्हणजे आता तुमची सत्याचीच व्याख्या वेगळी आहे
सत्याची व्याख्या अध्यात्मिक भाषेत : अॅबसल्यूट : समथींग दॅट डजंट चेंज अशी आहे.
तुमच्या सत्याच्या व्याख्याचा अर्थ : रिअॅलिटी किंवा वास्तविकता असा आहे (उदा. या लेखात - पृथ्वी सूर्याभोवती फिरते).
बायबलचा एक परिच्छेद सांगा जो कधीच मोडीत निघू शकणार नाही
तुमच्या लेखाचा निष्कर्श पुन्हा पाहा :
बायबलमधलं लिखाण हे शाश्वत सत्य करण्याच्या प्रयत्नांची ढाल अनेक अशाश्वत वाटणाऱ्या पण अस्सल सत्याच्या प्रहारांनी मोडून पडली आहे. हा खरा सत्याचा विजय आहे.
बायबल हा धर्मग्रंथ आहे. खगोलशास्त्राचा काही भाग त्याला जोडला होता, तो अर्थात विज्ञानानं चूक ठरवला आहे. पण बायबलचा उद्देश वैज्ञानिक तथ्यांचा उहापोह नाही तर सत्याचा (अबसल्यूट) उलगडा करणं आहे.
माझं म्हणणं इतकंच आहे की विज्ञानाच्या आजच्या प्रगल्भ अवस्थेत देखील `बायबलमधे सांगितलेल्या मार्गानं सत्याचा उलगडा होईल' या जनधराणेला विज्ञान शह देऊ शकत नाही. आणि पुढेही देऊ शकणार नाही कारण विज्ञान वास्तविकतेचा उलगडा करणारं शास्त्र आहे आणि धर्म सत्याचा उलगडा करणारं.
(१८ मे ला एका वेगळ्या संदर्भात मोदकला लिहीलेली खरड इथे शब्दशः लागू होत असल्यानं टाकतोय.)
अध्यात्मातल्या काही शब्दांचा इतका सुमारपणे वापर होतो की त्याचा खरा अर्थ लागत नाही, लागला तर त्याचा विपरीत उपयोग होतो.
उदा: अपरोक्ष म्हणजे साक्षात. अ- परोक्ष डोळ्यांच्या पलिकडे नाही असे ते. आपण एक्क्झॅक्ट उलटा अर्थ अपरोक्ष म्हणजे माझ्या मागे असा काढतो.
तसेच सत्य म्हणजे जे आहे, आहे नि आहे असे ते. त्रिकालाबाधित असे ते. असं काही असतं का? तर असतं.
मिथ्या म्हणजे आज आहे, पूर्वी आज आहे तसं नव्हतं अथवा अजिबातच नव्हतं उद्या कसं असेल ते ठाऊक नाही.
******************************
बाकी उडालेला प्रतिसाद वाचला होता. त्यामध्ये लेखकाच्या स्वतःला हवे त्या प्रकारे व्यक्त होण्याच्या स्वातंत्र्यावर बंदी आणू पाहणार्या एका तालिबानी विचारसरणीच्या प्रतिसादक आयडी पासून घासकडवींनी स्वतःचे संरक्षण करु शकण्याच्या शक्यतेबद्दल सहानुभूती व्यक्त करण्याचा माझा अधिकार तुम्ही हिरावून घेऊ पाहत आहात का?
बाकी धर्म न मानणे हा एक प्रकारे धर्म बनू पाहतो. धर्मसंस्थेबद्दल केलं गेलेलं लिखाण हेच बायबल बनू पाहतं, प्रयोगशाळा प्रार्थनास्थळं नि विज्ञान हा मंत्र बनतो तेव्हा धर्म मानणार्या नि न मानणार्यामध्ये नक्की काय फरक राहतो असं वरच्या वाक्यात म्हणायचं होतं.
घासकडवींसाठी सत्यान्वेषण करायला व्यक्तीगत अनुभव कुचकामी आहेत.
स्ट्रॉबेरी ज्यूस / पेढा कसा होता? 'छान होता' असं म्हणताना म्हणजे नेमकं काय? याचं स्पष्टीकरण कुणी देऊ शकत नाही. त्याचा अनुभवच घेतला गेला पाहिजे.
अथातो ब्रह्मजिज्ञासा म्हणता ना व्यक्तीचं शरीर हीच प्रयोगशाळा असते. इंद्रियांच्या पलिकडं असलेलं काही असतं ह्याचा नकार देताना वरच्या पेढ्याच्या अनुभवानं मिळणारं सुख हे अत्यंत वैयक्तिक असतं म्हणून नाकारावं का ?
ह्याचं उत्तर नाकारावं असं असेल तर पुढची चर्चा करुन उपयोग होत नाही.
विज्ञान म्हणतं दाखवा. अध्यात्म म्हणतं अनुभवा.
असो.
बाकी नंतर. :)
`बायबलमधे सांगितलेल्या मार्गानं सत्याचा उलगडा होईल' या जनधराणेला विज्ञान शह देऊ शकत नाही.
पुन्हा सांगतो, एकतरी उदाहरण द्या राव. हे विधान नुसतंच विधान आहे - अगदी अॅब्सोल्यूट सत्य असल्याच्या थाटात ते वावरत. तुम्ही सुरूवातीला 'विज्ञान धारणा बदलू शकणार नाही म्हटलं'. मी त्या विपरित उदाहरणं दिली. मग तुम्ही 'बायबल मोडीत निघणार नाही' म्हटलं. मी मोडीत निघण्याची व्याख्या विचारली. तुम्ही सांगितली नाही. पुन्हा तेच वाक्य लिहिलंत. मग मी बायबलमधल्या एकतरी परिच्छेद दाखवा म्हणालो. आता तुम्ही म्हणता की 'बायबलचा मार्ग योग्य आहे ही लोकांच्या मनातली धारणा बदलू शकणार नाही' हे वाक्य अधिक स्पष्ट आहे, सुरूवातीलाच लिहिलं असतं तर चर्चा इतकी आडवळणांनी गेली नसती. तरीही या वाक्याला आधार काय? बायबलने सांगितलेला मार्ग नक्की कुठचा - जो बदलणं शक्य नाही? याबद्दल जर दोन शब्द लिहिलेत तर बरं होईल. नाहीतर चर्चा करण्यात काय अर्थ? नुसते शब्दांचे विशविशीत ढग तयार होतात.
प्रयोगशाळा प्रार्थनास्थळं नि विज्ञान हा मंत्र बनतो तेव्हा धर्म मानणार्या नि न मानणार्यामध्ये नक्की काय फरक राहतो असं वरच्या वाक्यात म्हणायचं होतं.
प्रार्थनास्थळं? अहो, प्रयोगशाळा या प्रार्थनास्थळांच्या बरोब्बर उलट्या असतात. प्रत्येकाला तिथे जाऊन, नवीन प्रयोग करून ज्ञानात भर टाकण्याची, चुकीचे विचार निपटून टाकण्याची मुभा असते. प्रार्थनास्थळात 'प्रश्न विचारणं सोडा, आणि या देवाची प्रार्थना करा' अशी अपेक्षा असते. प्रार्थनास्थळाचं - चर्चचं - इन्स्टिट्यूशनलायझेशन झाल्यावर ज्ञानाचा प्रवाह गोठला. बायबल सांगतं पृथ्वीभोवती सूर्य फिरतो, मग ते तसंच असलं पाहिजे - जो कोणी विपरित सांगेल त्याचा मुडदा पाडा, त्याला जाळून टाका - ही पद्धत आली. हे अढळपद जाऊन सत्यशोधनाला, प्रस्थापित विचारांपेक्षा वेगळे विचार मांडण्याला संरक्षण आणि सन्मान प्राप्त झाला - हाच सत्याचा विजय.
इतिहासाने जर काही शिकवलेलं असेल तर हे की 'ज्या विचाराने म्हटलं की संपूर्ण सत्य गवसलेलं आहे, त्यामुळे ते बदलणं शक्य नाही, आणि ते शोधण्याचा मार्ग आमच्या प्रांतातून जातो - तो विचार अप्रवाही आणि म्हणूनच मृत डबक्यासारखा ठरतो.'
माझं म्हणणं इतकंच आहे की विज्ञानाच्या आजच्या प्रगल्भ अवस्थेत देखील `बायबलमधे सांगितलेल्या मार्गानं सत्याचा उलगडा होईल' या जनधराणेला विज्ञान शह देऊ शकत नाही. आणि पुढेही देऊ शकणार नाही कारण विज्ञान वास्तविकतेचा उलगडा करणारं शास्त्र आहे आणि धर्म सत्याचा उलगडा करणारं.
त्यामुळे विज्ञान आणि धर्म अशी तुलनाच अयोग्य आहे. विज्ञान माणसाच्या व्यक्तिमत्वाचा भ्रम दूर करू शकत नाही. मानशास्त्र ही जरी विज्ञानाची शाखा मानली तरी तो विषय मानसशास्त्राचा नसून अध्यात्माचा आहे. मानसशास्त्र व्यक्तिमत्वाची घडण आणि तिचं करेक्शन करण्याचा प्रयत्न आहे तर अध्यात्म व्यक्तिमत्वापासनं मुक्ती देतं.
बायबलने सांगितलेला मार्ग नक्की कुठचा - जो बदलणं शक्य नाही?
क्रिस्टशिअॅनिटी मधे दोन अत्यंत महत्त्वाच्या अध्यात्मिक प्रक्रिया आहेत : एक : कन्फेशन (ज्यात व्यक्तिमत्वावरचं संपूर्ण भूतकाळाचं ओझं दूर करण्याची किमया आहे) आणि दोन : सर्विस (यामुळे तुम्ही स्वतःच्या कोषातून बाहेर येता आणि अस्तित्वाशी आपल्या संलग्नतेची तुम्हाला जाणिव निर्माण होऊ शकते)
या दोन्हीही प्रक्रिया अत्यंत व्यक्तिसापेक्ष आहेत आणि त्या वैज्ञानिक कक्षेच्या संपूर्णपणे बाहेर आहेत.
तस्मात, बायबलची बेसिक शिकवण, त्यात सांगितलेल्या या दोन महत्वाच्या प्रक्रिया कधीही बाद ठरू शकत नाहीत.
महत्त्वाच्या अध्यात्मिक प्रक्रिया आहेत : एक : कन्फेशन (ज्यात व्यक्तिमत्वावरचं संपूर्ण भूतकाळाचं ओझं दूर करण्याची किमया आहे) आणि दोन : सर्विस
कन्फेशन मित्राकडे किंवा सायकीअॅट्रिस्टकडे करून तोच फायदा होत नाही का? त्यासाठी ही विचित्र संस्था का आवश्यक आहे? आणि सर्विसचं म्हटलं बायबलमध्ये सांगितलेली माहिती आणि कथा पुन्हा पुन्हा घोळवून त्यातून हवा तो अर्थ सांगण्याची प्रक्रिया आहे.
बरं, या इतक्या फायदेशीर गोष्टी आहेत, तर मग लोकं चर्चमध्ये जायची कमी का झालेली आहेत?
इथे लिहिलेलं आहे -
"In 1990, 20.4% of the population attended an Orthodox Christian church on any given weekend. In 2000, that percentage dropped to 18.7% and to 17.7% by 2004."
मला असं वाटतं आहे की तुम्हाला जे 'होऊ नये' असं वाटतं आहे (बायबलचा पगडा कमी होणं) ते फक्त तुम्ही 'कधीच होणार नाही' अशा स्वरूपात सांगत आहात. याला विशफुल थिंकिंग म्हणतात. 'सत्य' काय आहे ते समजून घ्या.
मला असं वाटतं आहे की तुम्हाला जे 'होऊ नये' असं वाटतं आहे (बायबलचा पगडा कमी होणं) ते फक्त तुम्ही 'कधीच होणार नाही' अशा स्वरूपात सांगत आहात
बायबलचा पगडा कमी होऊ नये असं मला वाटत नाही. संपूर्ण मानवता निधर्मी व्हावी असं वाटतं पण तो वेगळा विषय आहे.
कन्फेशन मित्राकडे किंवा सायकीअॅट्रिस्टकडे करून तोच फायदा होत नाही का? त्यासाठी ही विचित्र संस्था का आवश्यक आहे? आणि सर्विसचं म्हटलं बायबलमध्ये सांगितलेली माहिती आणि कथा पुन्हा पुन्हा घोळवून त्यातून हवा तो अर्थ सांगण्याची प्रक्रिया आहे.
कन्फेशन हा सायकिअॅट्रीचा विषय नाही. तुम्हाला `व्यक्तिमत्व' म्हणजे काय हेच कळत नाही तर त्यापासनं मुक्ती कळणं शक्य नाही.
कारण कन्फेशन, सर्विस यानंतरची शेवटची पायरी `दाय विल बी डन' ही आहे. मी त्याविषयी लिहीलं की तुम्ही पुन्हा संपूर्ण समर्पण म्हणजे काय? विचारणार.
असो, एक ज्योक सांगतो त्यानं उलगडा झाला तर पाहा :
एक शिक्षिका वर्गात सांगते की मानवी जीवनात क्रांती घडवणार्या न्यूटनच्या एका शोधाबद्दल आज आपण शिकणार आहोत. नंतर ती झाडावरचं सफरचंद खाली पडतांना पाहून गुरूत्वाकर्षणाचा शोध कसा लागला ते सांगते. मागच्या बाकावरचा एक मुलगा हात वर करतो.
काय? शिक्षिका विचारते.
`मॅम, गुरूत्वाकर्षणाचा शोध लागण्यापूर्वी सफरचंद खालून वर जात होती का?'
आय होप यू विल गेट द पॉइंट.
विज्ञान `वास्तविकतेचा' उलगडा करतं. पण तुम्हाला वास्तविकता आणि सत्य यातलाच फरक कळत नाहीये आणि अशा परिस्थितीत तुम्ही `मी बायबलचा पगडा कमी होणार नाही म्हणतोय' असा निष्कर्ष काढला आहे.
आणि खरी कमाल तर त्याही पुढे केली आहे. 'सत्य' काय आहे ते समजून घ्या' असं मला सांगताय!
सत्याची व्याख्या मी सुरूवातीलाच सांगितली आहे आणि ते न कळता तुम्ही वास्तविकतेला `सत्य' समजता आहात.
विज्ञानानं विमानाचा शोध लावून `गुरूत्वाकर्षणावर विजय मिळवला' असं वाटू शकतं. पण निसर्गानं तयार केलेलं इंधन वापरून विमान उडतं आहे आणि ज्या क्षणी इंधन संपेल तेंव्हा विमान खाली येईल ही वस्तुस्थिती आहे. याचा अर्थ विमान व्यर्थ आहे असा नाही तर ते गुरूत्वाकर्षण या अनिर्मित शक्तीच्या परिघातंच काम करतंय.
या आणि अशा अनेक अनिर्मित निसर्गानियमांवर विजय मिळवणं असा विज्ञानाचा अर्थ नाही जो तुम्ही तुमच्या आकलनानुसार शीर्षकापासून सत्याचा विजय - विज्ञान विरुद्ध श्रद्धा मांडायचा प्रयत्न करत आहात.
`दाय वील बी डन' चा अर्थ या अनाकलनीय, गूढ आणि रम्य अस्तित्वाप्रती संपूर्ण शरणांगती कारण वैज्ञानिक कल्पना सुचणं हे सुद्धा त्या अस्तित्वाचंच कार्य आहे. आणि त्या कल्पनांची परिपूर्ती ही सुद्धा अस्तित्वाच्याच आधिन आहे. अर्थात तुमच्या निष्कर्ष काढण्याच्या पद्धतीतून इतकं समग्र आकलन होणं अशक्य आहे.
प्रतिक्रिया
अभिजन, बहुजन आणि मित्रप्रेम
कैच्या कै!!
"निलंबाया दाही दिवश्या"?
:)
+३
आवर्जून लिंका दिल्याबद्दल
व्याख्या
> फक्त एवढंच सांगतो, की
सहमत
मी मिपाची जाहिरातही करते.
दुरुस्ती आवश्यक
छायाप्रकाशवर करता येत नाही,
निदान
येईल की. बरेच काही करता येईल.
या तिरप्या प्रतिसादांच्या
good to see you too.
हे
अजून बराच वाव आहे.
लिहिणारा आयडी किती तिरपा आहे
<<<<पण मर्यादा प्रत्येक
लेख आवडला...
एका अँगलने लेख उत्तम आहे.
मस्त लिहिले आहे.
+१
भारतीय ??
तसंही चालेल.
सार्थ प्रतिसाद.
+१
गालीलीयो आणि शिवाजी महाराज
लेख अतिशय आवडला.
>>>रिचर्ड लेन्स्की नावाच्या
ह्याबद्दल अधिक माहिती कुठं
धन्यवाद. वाचायला वेळ
उत्तम
सुंदर लेख आणि सुंदर चर्चा...
मस्त !
चांगला लेख
ओपन च्यॅलेंज
सत्य विज्ञान आणि श्रध्दा
वाचनीय
+१
सत्य आणि विज्ञान
+११११
+१००
+१००
कोण जिंकतय शेवटी? श्रद्धा की
क्षीरसागर व प्यारे यांना एकत्रित प्रतिसाद
'बायबलचा मार्ग योग्य आहे ही लोकांच्या मनातली धारणा
कंटाळा यायला लागला आहे
तुम्हाला एकतर समग्रतेनं विचार करता येत नाहीये किंवा काय लिहीलंय
Pagination