Welcome to misalpav.com
लेखक: सुबोध खरे | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

आपण सर्व गोष्टी लिहिल्या होत्याच. क्षमा करा मी अगोदरचे लेख वाचले नाहीत कदाचित हा धागा अनावश्यक आहे ( काढून टाकला तरी चालेल- सं मं ला विनंती )

आपले विवेचन सर्वस्पर्शी आहे. मला नैनिताल- कौसानी, मुन्नार- पेरियार, जमू- श्रीनगर, सिमला- चैल या मार्गावर असा त्रास झाला आहे. तेथील लोकानी " समोर पहा" असा सल्ला दिला.बाकी या सर्व प्रवासात नंतर हा त्रास झाला नाही पहिल्या दिवशीच होतो. असा अनुभव आला. आपली माहिती ज्ञानानंद देणारी आहे. धन्यवाद !

आल्याचा रस हा या मेंदूतील केंद्राला स्थिर करतो असे डॉक्टर शरदिनी डहाणुकर यांच्या गटाने मुंबईत के इ एम रुग्णालयात केलेल्या संशोधनात आढळून आले आहे. अरे वा... नविन माहिती कळली ! :)

धागा अनावश्यक नाही. तेव्हा बरीच चर्चा झाली होती, पण त्यात सगळ्यांचे अनुभव आणि गमतीजमतीही खूप होत्या. अशी शास्त्रीय माहिती तेव्हा फारशी पुढे आली नव्हती.

मला वाटतं दोन्ही धाग्यांचा उद्देश सारखा असला तरी माहिती शास्त्रीय आहे आणि नविन गोष्टी कळल्या आहेत. दोन्ही धागे आपोआप लिंक करायची सोय आहे की नाही माहित नाही.

कांही गोष्टी माहित होत्या त्यांची शास्त्रीय कारणे आज समजली. बोटीत, बस मध्ये गरगरायला लागल्यावर डोळे मिटून कांही फायदा होतो का?

डोळे मिटून घेतल्यास आपले डोके हलते आहे हे डोळ्याकडून मेंदूला जाणारे संदेश बंद होतात त्यामुळे मूळ अंतरकर्णाकडून जाणार्या संदेशाचे प्रबलीकरण( reinforcement) होत नाही त्यामुळे चक्कर येणे बरेच कमी होते. ज्या लोकांना चक्कर येत असेल त्यांनी पुढच्या सीट ला डोके टेकवून डोळे बंद करून घेतले तर गरगरणे आणि चक्कर येणे खूप कमी होते.

बरोबर हाच प्रयोग मी पेरियार ते कोट्टायम या प्रवासात केला. निसर्गसौंदर्य पहायला मिळाले नाही पण ओकारी टळली.

अतिशय महत्वाचा धागा ! ही समस्या मला अजिबात नाही,परंतू पत्नि व कन्येला हमखास बस मध्ये बसल्यावर होते. पत्निला तर कार मध्येही हा त्रास होतो. मुळ धागा व पॅलवान यांचा धागा आज वाचला, दोन्ही लेख व श्री नितिन थत्ते यांचा प्रतिसाद खुप उपयोगी आहे.

विमानामधे कान दुखायला लागतात त्यासाठी काय करावे...

डोक्याच्या कवटीतील हवेचा दाब आणि बाहेरील हवेचा दाब ह्यातील फरकामुळे कान/डोळे दुखतात असे ऐकले आहे. विशेषतः सायनसचा त्रास असेल, सर्दी, कफ असेल तर असे हमखास होते. त्यासाठी ऑट्रिव्हिन हे नेसल ड्रॉप्स बरोबर ठेवावे आणि नाकात २-२ ड्रॉप्स टाकावेत. बंद असलेले नांक उघडून तसेच घशातील युस्टेशियन ट्यूब्सचा मार्ग मो़कळा होऊन कान दुखणे टळते. हा स्वानुभव आहे.

ऑट्रिव्हिन (xylometazoline) या औषधाने रक्त दाब वाढतो म्हणून हे औषध सर्व सामान्य माणसाने केंव्हाही घ्यावे असा सल्ला देणे कठीण आहे. याचे कारण लोकांचा अधिरेपणा. दोन दोन थेंब टाकून नाक साफ होत नाही म्हणून पुढच्या २ मिनिटात लोक अजून थेंब टाकतात आणि तरीरही होत नाही म्हणून परत एकदा थेंब टाकतात हा सहज येणारा अनुभव आहे आणि यामुळे रक्तदाब वाढून लोकांना डोके दुखणे चालू होते. दुर्दैवाने हि डोकेदुखी सर्दीची आहे असे गृहीत धरून लोक सर्दीची गोळी ( डी कोल्ड , कोल्डारीन किंवा तत्सम) घेतात. या गोळीत सुद्धा एफेड्रीन किंवा PPL( phenyl propanolamine) हे बंदी घातलेले औषध असते. अशी औषधे घेऊन एक ३२ वर्षाचा रुग्ण माझ्याकडे डोकेदुखीसाठी आला होता त्याचा रक्तदाब पहिला असता तो २०० /११० निघाला. यावर आपण काय औषधे घेत असे विचारल्यावर वरील माहिती बाहेर आली होती. त्याचा रक्त दाब नंतरच्या काही दिवसानी सामान्य झालेला आढळला. वरील औषध आपल्या फामिली डॉक्टर च्या सल्ल्याने घेणे या कारणास्तव मी साधे चोकोलेट किंवा च्युइंग गम खाण्याचा सल्ला देतो. कान साफ करणे यासाठी पहा https://en.wikipedia.org/wiki/Ear_clearing

लेख आणि प्रतिसादांतून चांगली माहिती मिळते आहे. अर्थात, नेहेमी प्रतिसाद दिला जातोच असे नाही. ;)
या गोळीत सुद्धा एफेड्रीन किंवा PPL( phenyl propanolamine) हे बंदी घातलेले औषध असते
तुम्ही उल्लेखलेल्या कोल्डारीन इ. गोळ्या अधिकृतपणे विकत मिळतात. मग त्यात हे बंदी घातलेले औषध कसे काय असते?

आपणहून औषधोपचार करण्याबाबत सहमत. नुकताच आलेला अनुभव-- रोहतांग पास येथे गेले असता खूप उंचीवरील हवेच्या कमतरतेमुळे त्रास होतो* असे सांगण्यात आले. तसेच परिचयातल्या व्यक्तीला लदाखमध्ये त्रास झाल्याची माहिती होती. त्यावर प्रतिबंधक उपाय म्हणून डायमॉक्स (acetazolamide) नावाची गोळी घेणे हा उपाय स्थानिक लोकांनी सांगितला. म्हणून आदल्यारात्री ती गोळी घेऊन गेलो. गोळी घेतलेल्या सर्वांना गुंगी आणि अ‍ॅसिडिटीचा बर्‍यापैकी त्रास झाला. (भीक नको कुत्रा आवर). *आम्ही नंतर याविषयी जालावर वाचन केले त्यात विशेष गंभीर सहसा होत नाही असे दिसले आणि आजार मुख्यत्वे गिर्यारोहकांना (चढण्याचे कष्ट आणि ऑक्सिजनची कमतरता) होतो असे दिसले.

डायमॉक्स ही गोळी एकदा काही कारणाने घेतली असता (डॉक्टरी सल्ल्यानेच) हातपाय बधीर झाले. बोटे, पावले अन चेहर्‍याला इतक्या मुंग्या आल्या की घबराटच झाली. तेव्हा डॉक्टरांकडे जाऊन हे काही झेपत नाही बुवा असे सांगितले. त्यांनी अर्धीच गोळी घ्या म्हटले तरी परिणाम तस्साच. तेव्हा काही औषधे काही जणांना पचनी पडत नाहीत हेच खरं.

कधीतरी एकदा कारणपरत्वे ऑट्रिव्हिन ड्रॉप्स वापरले. अत्यंत जादुई परिणाम झाल्याने परत एकदा वापरले. नाक ताबडतोब खुलत असल्याने प्रत्येक वेळी वापरणे सुरु झाले. नंतर लक्षात आले की सर्दी वगैरे नसतानाही ऑट्रिव्हिन नाही टाकले की नाक बंद राहते. श्वासच येत नाही. त्यामुळे झोपताना नाईलाजाने सुटका म्हणून थेंब टाकणे सुरु झाले. आता ऑट्रिव्हिन स्प्रेने नाक धुतल्याशिवाय रात्री झोपण्याची कल्पनाच करवत नाही. मेडिकल दुकानांमधे हे ओव्हर द काउंटर मिळत असल्याने ही अ‍ॅडिक्टिव्ह पोटेन्शियलची कल्पना आली नव्हती. आता सुटणे कठीण झालेय. नवीन ऑट्रिव्हिनच्या पोस्टरवजा जाहिरातीत एक मिनिटांत नाक मोकळे होण्याची "गॅरंटी" दिली आहे. हे सुटणे कठीण झाले आहे आता.. चांगलाच फसलो.

गवि, ऑट्रिव्हीन बंद करा. 'इकॉर्टीन' (की 'इप्कॉर्टीन') नांवाचे ड्रॉप्स मिळतात ते, डॉक्टरशी सल्लामसलत करून, वापरा. ऑट्रिव्हिनवर अवलंबितता सुरू होते पण इकॉर्टीन बाबत तसे होत नाही. हे एका इएन्टी सर्जनने मला सुचविले होते. मला त्याचा फायदा झाला. तसेही, नांक बंद होण़्यावर आयुर्वेदात औषधे आहेत. आयुर्वेदीक औषधोपचार करून पाहा. उपयोग होईल. माझे ऑट्रीव्हिन असेच सुटले. आता कुठलेही नेसल ड्रॉप्स लागत नाहीत. इथे इकॉर्टीन मिळत नसल्याने अगदी सर्दी झाल्यास ऑट्रिव्हिन अल्प काळासाठी वापरतो.

'इकॉर्टीन' (की 'इप्कॉर्टीन')बहुधा एफकॉर्लीन असावे. कॉर्टीन' या औषधात सुद्धा (कॉर्टीको) स्टीरोईड असते तेंव्हा डॉक्टरच्या सल्ल्या शिवाय न घेणे. स्टीरोईड चे आपले साईड इफेक्ट्स असतात.

ऑट्रिव्हिन (xylometazoline) या औषधाने रक्त दाब वाढतो म्हणून हे औषध सर्व सामान्य माणसाने केंव्हाही घ्यावे असा सल्ला देणे कठीण आहे.
मला रक्तदाब विषयी माहिती नव्हती. पण अनेक वर्षे वापरून मला तरी रक्तदाबाचा त्रास झाला नाही. (म्हणजे इतरांनाही होणार नाही असा माझा दावा नाही.) असो. आता नव्याने ही माहिती कळली आहे. कुठलेही औषध डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय जास्त काळाकरीता घेत राहू नये हे तर खरे आहेच. पण ऑट्रिव्हिन जर एवढे धोकादायक औषध असेल तर, औषधालयात ते डॉक्टरांच्या अधिकृत चिठ्ठीशिवाय, का विकले जाते?

आजची विमाने हि हवेचा दाब नियंत्रित केलेली असतात तरीही जेंव्हा विमान वेगाने वर जाते किंवा खाली येते तेंव्हा आपल्या कानावर पडणारा हवेचा दाब वेगाने कमी जास्त होतो. मुळात कानाच्या पडद्यावर पडणारा दाब दोन्ही बाजूना( बाहेर आणि शरीराच्या आतल्या) समान करण्यासाठी कानाच्या आत एक नळी बसवलेली असते तिला युस्तेशियन( EUSTECHIAN TUBE) नलिका म्हणतात. हि नळी कानाच्या आतल्या भागाला घशाशी जोडते आणी आपण जेंव्हा लाळ गिळतो तेंव्हा ती उघडते आणी कानाच्या दोन्ही बाजूंचा दाब समान करते. यामुळे घास किंवा लाळ गिळल्या वर आपल्याला कधी कधी कानात आवाज आल्यासारखे जाणवते. विमान वेगाने खाली आले किंवा वर गेले तर कानाच्या पडद्यावरचा दाब अनुक्रमे जास्त आणी कमी होतो त्यामुळे कानाचा पडदा आत किंवा बाहेर ओढला जातो म्हणून कान दुखतो. यासाठीच विमानात गोळ्या किंवा चॉकलेत देण्याची पद्धत आहे ज्यामुळे आपली लाळ गिळताना कानाच्या पडद्यावरचा दाब एक समान होऊन कान दुखत नाही. त्यामुळे जेंव्हा हवाई सुंदरी येते तेंव्हा न लाजता किंवा संकोच न करता बचकभर गोळ्या घेऊन खिशात ठेवाव्या आणी विमान चढता उतरताना खात राहावे दुसरा अतिशय साधा उपाय म्हणजे चुईंग गम चघळणे. एवढे करून हि जर कान दुखत असेल तर आपल्या कानाला आजार झाला आहे हे समजून डॉक्टरला दाखवणे

माहीतीपूर्ण धागा. मला लहानपणी एसटी (अगदी बैलगाडीसुद्धा :)) लागायची नाही. शाळेच्या सहलींना कित्येक मैत्रिणी एसटी लागते या एका कारणाने यायच्या नाहीत - म्ह्णून मी स्वत:ला नशिबवान समजायचे कि असा त्रास होत नाही. आता परिस्थिती एकदम उलटी आहे, कधी कधी कार लागते - मागच्या दोन-तीन वेळेस हमखास विमानात त्रास होऊ लागला (मळमळणे, डोके जड होणे इ.) हे कशाने होत असेल आणि यावर उपाय काय करावा? (कान वगैरे दुखल्याचे नाही आठवत.)

सहमत लहानपणी आपल्याला कायपण लागायचे नाही. आता ३० ओलांडली व लागायला लागले. ह्या शास्त्रीय माहितीचा उपयोग नक्कीच होईन आम्लपित्त झालेल्या लोकांना बस किंवा बोट हमखास लागते का

आम्लपित्त आणि बस लागणे हे दोन वेगळे विकार आहेत. एकमेकांचा संबंध नाही. म्हणून आम्लपित्तावरचे उपाय कामी येत नाहीत.

एकदम सहमत. फक्त एक फरक कि आम्ल पित्त झालेल्या लोकांच्या पोटात आम्ल अगोदरच तयार असते आणि त्याने त्यांचे जठर अगोदरच नाजूक स्थितीत असते त्यामुळे थोडीशी जरी अस्वस्थता वा व्यत्यय आला तरी लगेच उलटीची भावना होते. बाकी चक्कर येण्याचा आणि आम्ल पित्ताचा संबंध नाही. ( कित्येक आम्ल पित्ताचे लोक त्यातून मुक्तता मिळवण्यास उलटी करत असतात)

चूकून ऑलिम्पिक आणि बस लागणे असे वाचले. धागा लागला बहुतेक

जांभई म्हटलं की मिसळीवर एखाद्या गोर्‍या माणसाचा जांभई देतानाचा फोटो टाकण्याची पद्धत आहे.

मलाही कधीच एस टी बैलगाडी, महिंद्राच्या जीपडीतूनही घाटरस्त्यातून खूप फिरलो पण कधी लागली नाही पण विमानात मात्र कान किंवा कानशीले दुखु लागतात असा अनुभव आला यापुढे गोळ्या, चिंगम यांचा वापर करून पाहीन. उपयुक्त माहिती दिलीत आपण

विमानात मात्र कान दुखणे फार वेगळॅ. ह्याचा बोट / गाडी लागण्याशी काही संबंध नाही. विमान वर जाताना आणि उतरताना हवेचा दाब कामी / जास्त होतो. कानामध्ये मध्यकर्णाची पोकळी आणि घसा (व पर्यायाने बाहेरील वातावरण) यांना जोडणारी युस्टॅशियन ट्युब नावाची नळी असते आणि तिच्यामुळे कानाच्या पडद्याच्या दोन्हीकडचा हवेचा दाब समान ठेवला जातो. काही कारणाने (खोकला, पडसे, इ. ने) जर सुजेमुळे किंवा अगदी घशातल्या जाड म्युकसने (शेंबडाने) ती नळी बंद झाली असली तर कानाचा पडदा बाहेर / आत खेचला जाउन त्याच्यावर पडलेल्या ताणामुळे कळ लागते. उपायः १. प्रथम नाक चिमटीत पकडून आणि तोंड बंद करून नाकातून जोराने श्वास बाहेर टाकण्याचा प्रयत्न करावा. बर्‍याचदा येवढ्यानेच युस्टॅशियन ट्युब मोकळी होऊन बरे वाटते. हा अनुभव कधी कधी घाटातून चारचाकीने / रेल्वेने जातानाही होऊ शकतो... कारण तेच. त्यावेळेस बहुतेक येवढेच पुरते. २. विमानप्रवासात हवेच्या दाबातला फरक फार मोठा असतो. त्यामुळे जर वरच्या प्रयत्नाने फरक पडला नाही (विशेषतः खोकला, पडसे असेल) तर मात्र खूप बळजबरी करू नये ! कानाच्या पडद्याला दुखापत होउ शकते. खोकला, पडसे असले तर खबरदारी म्हणून "Otrivin ((xylometazoline nasal drops)" नावाचे नाकात टाकायचे थेंब मिळतात ते जवळ ठेवावे व प्रतिबंधक उपाय म्हणून (विमान उडण्याच्या अगोदर पाच मिनिटे आणि उतरण्यासाठी "कुर्सीकी पेटी" बांधायची घोषणा झाली की लगेच) दोन दोन थेंब प्रत्यक नाकपुडीत टाकावे. त्रास होणार नाही. *** खास सूचना*** लहान मुलांसाठी वेगळे (पेडियाट्रीक) थेंब असतात. तेच वापरावे. नाईलाजास्तव चार पेडियाट्रीक थेब मोठ्या माणसाला चालतील पण मोठ्या माणसांचे थेंब लहान मुलांना अजिबात वापरू नयेत. मात्र दोघांकरता वेगळी औषधे खरेदी करणे हेच सर्वोत्तम.

अरेच्च्या वर डॉ साहेबांनी युस्टॅशियन ट्युबबद्दल अगोदरच लिहिलेले दिसते... तेव्हा पुनरावृत्तिबद्दल दिलगिर आहे. पण Otrivin (xylometazoline nasal drops) चा मुद्दा नविन आणि खूप उपयोगीआहे.

एक शंका. युस्टॅशियन ट्युबच्या कार्यामध्ये कानातला मळ (इअर वॅक्स) कॉप्लीकेशन्स वाढवतो की याचा काहीच संबंध नाही..? कानात मळ जास्ती असेल तर घाटामध्ये / विमानात कानाला दडे बसण्याचा त्रास होतो असे ऐकले आहे. तसेच कानातला मळ नैसर्गीकरीत्या कानातूनच पडून जातो की तो नियमीतपणे सॉलीवॅक्स सारखे औषध कानात घालून बाहेर पडू द्यावा / ENT तज्ञाला भेटावे..? जाता जाता - Ear wax melts many a 'fauji' dream

कानातला मळ हा बहिर्कर्णात (ear canal) असतो. बहिर्कर्ण आणि मध्यकर्ण हे कानाच्या पडद्याने (ear drum) विभागलेले असतात. युस्टॅशियन ट्युब मध्यकर्णाला घशाबरोबर जोडते. खालच्या चित्रात ही रचना दिसते आहे...   (चित्र आंतरजालाच्या सौजन्याने) त्यामुळे युस्टॅशियन ट्युबच्या कार्यामध्ये कानातल्या मळाचा प्रत्यक्ष संबध नाही. कानातला मळ (वॅक्स) हा बहिर्कणाच्या त्वचेने निर्माण केलेले तेल साठल्याने बनतो. त्यासाठी अंघोळीच्या वेळेस कान नियमित पाणी आणि साबणाने साफ केले तरी नॉर्मल कानासाठी पुरेसे असते. न दुखणार्‍यात कानात जर घट्ट मळ असेल तर कधीकाळी एखाद्या वेळेला मळ मउ करणारे सॉलीवॅक्स सारखे औषध वापरले तर ठीक आहे... ते एकदा वापरल्यावर कानाची नियमीत काळजी घेऊन ते परत वापरण्याची गरज पडणार नाही अशी खबरदारी घेणे जास्त चांगले. खूप दिवस कान साफ न केल्याने कानातला मळ खूप घट्ट झाला असल्यास अथवा कानातून स्त्राव होत असला अथवा कान दुखत असल्यास इन्फेक्शन असण्याची शक्यता असू शकते आणि कानाचा पडदा फाटलेला असण्याची शक्यता असते. तेव्हा मात्र इतर काही न करता सरळ कान-नाक-घसा तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.. जाता जाता: Ear wax melts many a 'fauji' dream केवळ कानातल्या मळामुळे कोणाला वैद्यकीय तपासणीत बाद करत नाहीत... बर्‍याचदा अशा वेळेस फाटलेला कानाचा पडदा अथवा इतर काही महत्वाचे कारण असते.

सुबोध खरे ह्यांच्या प्रतिसादा आधी ह्या प्रतिसादात दोन्ही मुद्दे, युस्टेशियन ट्यूब आणि ऑट्रीव्हीन येऊन गेले आहेत. सुबोध खरे ह्यांची माहिती जास्त शास्त्रीय आहे, तेंव्हा विश्वसनिय.

नमस्कार साहेब! जर १९८० साली एम डी (मेडिसिन) झालेल्या आणि काही वर्षे एमबीबीएस च्या विद्यार्थ्यांना शिकवले असणार्‍या वैद्यकीय व्यावसाईकाचा वैद्यकीय सल्ला तुम्हाला शास्त्रीय आणि विश्वसनिय वाटत असला, तर माझा सल्ला योग्य मानायला हरकत नाही.

सुबोध खरे ह्यांची माहिती जास्त शास्त्रीय आहे, तेंव्हा विश्वसनिय.
ह्यात तुमचा सल्ला आणि सुबोध खरे ह्यांचा सल्ला अशी तुलना नसून. माझी माहिती आणि सुबोध खरे ह्यांची माहिती अशी तुलना आहे. त्या मध्ये सुबोध खरे ह्यांची माहिती शास्त्रीय अभ्यासातून आलेली असल्याने माझ्या माहिती पेक्षा जास्त विश्वसनिय असे मी म्हंटले आहे. तुमची माहिती अविश्वसनिय आहे असे मी म्हंटलेले नाही. गैरसमज नसावा.

प्रथम नाक चिमटीत पकडून आणि तोंड बंद करून नाकातून जोराने श्वास बाहेर टाकण्याचा प्रयत्न करावा
असे कधीही करु नये.. सर्दि झाल्यावर नाक मोकळे करण्यासाठी असे करण्याच्या नादात अस्मादिकांच्या कानाच्या पडद्याला भोक पडले होते.. 'tympanoplasty' करावी लागली होती. अति जोरात नाक शिंकरणे कानाच्या पडद्याला फार घातक आहे..

मला वाटते तुम्ही माझा प्रतिसाद पूर्णपणे वाचला नाही... जर वरच्या प्रयत्नाने फरक पडला नाही (विशेषतः खोकला, पडसे असेल) तर मात्र खूप बळजबरी करू नये ! कानाच्या पडद्याला दुखापत होउ शकते. अतिरेक सगळीकडेच मारक ठरतो... अगदी चांगल्या गोष्टींचा सुद्धा. अतिरेकाने नुकसान झाले म्हणुन दुसरे टोक पकडणेही विरुद्ध दिशेने केलेला अतिरेक होय !

अत्यंत चांगली आणि व्यवस्थित मांडणी करून दिलेली माहिती या लेखात वाचायला मिळाली. माझा अनुभव असा आहे की कानावर प्रेशर आल्यासारखा भास व्हायचा आणि आवंढा गिळला की तो नाहीसा होत असे. हा उपाय मला अचानकच सापडला होता. त्याचे शास्त्रीय कारण कळले.