Welcome to misalpav.com
लेखक: विनायक प्रभू | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

बाबांना की नै मम्मा आवडत नाही. बाबांनी आणखीन सुंदर नविन मम्मा आणलीये.
को-पॅसेंजर म्हणायची!!! :)

त्या निष्पाप मुलाचं वाईट वाटलं. तरी त्याच्या मम्मीला बाबांचं एवढं काय कौतुक कळलं नाही.

हाहाहा! त्याची सतत आठवण रहावी म्हणून घेतलाय तो आयडी. नाहीतर हे असे प्रश्न पडतात!!! =))

>>ताईंचा चेहेरा अगदी निर्विकार होता. रोचक निरिक्षण! बर्‍याच शक्यता वाचकांवर सोडल्यात.. मज्जा! :)

लहान मुलांना अनेक गोष्टी स्कँड्युलस वाटत नाहीत. मोठ्यांना स्कँडलाईज झालेलं बघून पोरं शिकतात. या ताईंना अर्जुनाचं (पोरगा अभिमन्यू असेल तर त्याचे वडील अर्जुन) एवढं कौतुक का असावं हे समजलं नाही. सामान्यतः अशा परिस्थितीत अर्जुनाचा राग-राग सुरू झालेला दिसतो.
अरे ऑफिसला. तुझे बाबा जातात ना तसा.
बाबाच का ऑफिसला जातात, आई का नाही जात? -- हा प्रश्न तुम्हाला आहे मास्तर. खासगीत उत्तर दिलंत तरी चालेल.

खाजगीत कशाला? इथेच देतो. त्याचे काय आहे तै,Birds of same feathers किंवा एक ही डाल के चट्टे बट्टे. दुसरे कै नै.

राग का नसावा? १. संबध तुटल्यानंतर नैतिक जबाबदारी पाळली? २. मी मोकळी तू मोकळा हा मॅच्युअर अप्रोच.

मुलाबरोबर त्याची आई होती का आजी हे मला नीटसं समजलं नाही. पण त्याने फार फरक पडत नाही. नवरा-बायकोचे संबंध तुटलेले असताना, "मी मोकळी तू मोकळा" इतपत समजूतदारपणा असूनही पन्नास लोकांना नोकरी देण्याबद्दल एवढा अभिमान बाळगणं किंचित मजेशीर आणि बरचसं अनैसर्गिक वाटलं. एवढ्या समजूतदारपणाने वेगळी झालेली भारतीय जोडपी (घटस्फोटित अथवा प्रेमसंबंध तुटलेली) माझ्या पहाण्यात नाहीत; असण्याची शक्यता नाकारत नाही. बाकी ते birds of same feather बद्दल मलाच टंकाळा आला आहे. फोनवर/प्रत्यक्षात भेटू तेव्हा बोलू.

ते आबा नाहीत. त्यांना को पॅसेंजर म्हणायचे..ताई. "को पॅसेंजर मंजे काय" one who travels with us is a co passenger.. ताई
ताई खरंच हुशार आहेत. एक अंतर राखून ठेवले.
ताईंचा चेहेरा अगदी निर्विकार होता.
काय चुकले?

ताई (अभिमन्युच्या) कोण? यावर सगळं अवलंबून आहे. जर आई असेल तर प्रश्न चर्चेला येईल. केअर टेकर असेल तर चेहेर्‍यावर काय भाव दाखवणार?

आई असली तरी प्रवासात तिने कोणा अनोळखी व्यक्तीसमोर चेहर्‍यावर भाव दाखवावेत वा काहीच प्रतिक्रिया व्यक्त का व्यक्त करावी? उलट मुलाच्या मनात (आई हे गृहित धरुन) वडिलांबद्दल ती काहीही नकारात्मक पेरत नाहीये, असेही असू शकते आणि तो मॅच्युअर निर्णय असू शकतो. इतरांना भोचक चवकशा कशाला?

मुलगा थेट बाबानं दुसरी मम्मा आणली वगैरे बोलेल असं त्या बाईंना वाटलं नसेल. त्याबरोबरच आत कदाचित कुठंतरी त्या बाईंना आपल्या नवर्‍याचा अभिमान असेल, कदाचित नवरा बायकोच्या संबंधांमध्ये बाई चुकू शकते ह्याबद्दल हे तिला स्वतःला कुठंतरी मान्य असेल त्यामुळं त्रागा न करता ती निर्विकार चेहरा ठेवून बघत असेल. माणसाला एकदा चष्मा लागला की जाता जात नाही ब्वा. कोणी नेत्रतज्ज्ञ आहेत का????? ;)

खरं आहे!
त्याबरोबरच आत कदाचित कुठंतरी त्या बाईंना आपल्या नवर्‍याचा अभिमान असेल,
ज्या पत्नीला नवर्‍याचा अभिमान आहे ती कशाला डिवोर्स घेईल?
कदाचित नवरा बायकोच्या संबंधांमध्ये बाई चुकू शकते ह्याबद्दल हे तिला स्वतःला कुठंतरी मान्य असेल
शाब्बास! इतका समंजसपणा असल्यावर डिवोर्स होतो?
मुलगा थेट बाबानं दुसरी मम्मा आणली वगैरे बोलेल असं त्या बाईंना वाटलं नसेल.
इतकी सूज्ञ पत्नी अशा वेळी निर्विकार राहील? अनाहूतपणे ती नवर्‍याच्या बाजूनं काही तरी बोलेल.

कोण प्रभू सर का? हा. आलो आलो. साहेब, एक्स्क्यूज मी. सर बोलावत आहेत. मी एक काम करतो. को पॅसेंजरचा नंबर घेतला का विचारतो. घेतला असेल तर तुम्हाला फॉरवर्ड करतो. नाहीतर आपण सगळे मिळून फोन करु. सोक्षमोक्ष लावूनच टाकू. असं कसं निर्विकार राहतात लोक? श्श्श्श्या! पण नंबर नसेल घेतला तर काय करता येईल? काही सुचतंय का बरं?

ज्या पत्नीला आपल्या नवर्‍याविषयी अजूनही आपुलकी आहे ती स्वतःच्या मुलाला पहिल्या वाक्यालाच अडवेल.त्या क्षणी ती सर्व प्रसंग सावरेल. इतक्या पुढच्या गोष्टी ती त्याला इतरांसमोर बोलूच देणार नाही. प्रश्न चष्म्याचा नसावा, गैरसमजाचा आहे. तो एकदा दूर झाला की नीट वाचता येतं आणि लेखनाचा नेमका अर्थ कळतो.

एक काम करुया. "बाबांना की नै मम्मा आवडत नाही. बाबांनी आणखीन सुंदर नविन मम्मा आणलीये. माला टॉइज पाठवतात आणि मम्माला मनी. बाबा महाडला, मी आणि मम्मा ठाण्याला". मनातल्या मनात म्हणा. किती वेळ लागतो? १० सेकंद? तेवढ्या वेळात त्या स्त्रीनं मुलाला कशा पद्धतीनं अडवायला हवं होतं? मुलाचं तोंड हातानं बंद करणं? गप्प बस असं डाफरुन? त्यापेक्षा चेहरा निर्विकार ठेवणं जास्त मॅच्युरिटीचं नाही वाटत? वैयक्तिक विचारतोय : हल्ली दूध घरच्या बैलाचं असतं का?

तो मुलगा सार्‍या प्रवासात एकदाही त्या स्त्रीला मम्मा म्हणाला नाहीये. आणि तसं ही बैलाला कळायला वेळ लागतो. सगळी वाक्य बोलायला किती सेकंद लागतात हा प्रश्नच नाही. सुरूवात होता क्षणी माणसाच्या लक्षात येतं की विषय कुठं चालला आहे.

माझं निरिक्षण सरळ होतं :
तो मुलगा सार्‍या प्रवासात एकदाही त्या स्त्रीला मम्मा म्हणाला नाहीये.
आणि आता तुम्ही म्हणताय :
छोटू चे ते वाक्य " मम्मा माला भुक लागली" असे होते
हे संवादातलं पहिलंच वाक्य आहे! ते वाक्य अचूक असतं तर या पोस्टवर मी एकही प्रतिसाद दिला नसता. माझ्या एका साध्याश्या विनोदावर (ज्याचा कुणावर काहीही व्यक्तिगत रोख नव्हता) सभासदांनी किती वैयक्तिक राळ उडवली ते मात्र पाहण्यासारखं आहे.

ताईंचा चेहेरा अगदी निर्विकार होता.
हा पोस्टचा शेवट आहे. ती संबंधित नसेल तर चेहरा निर्विकार असण्यात काही विषेश नाही. आई असेल तर डिवोर्सी असून नवर्‍याचं कौतुक कसं ?(पन्नास वर्कर कामाला असतात म्हणावे.. कौतुक ओसंडुन जात होते.) असा साधा प्रश्न आहे आणि वरचे काही प्रतिसाद त्या अंगानं आहेत. चवकशी भोचक असणं हा मात्र पाहणार्‍याचा दृष्टीकोन आहे.

पन्नास वर्कर कामाला असतात म्हणावे.. कौतुक ओसंडुन जात होते. - हाही पाहणार्‍याचा दृष्टीकोनच आहे. व्यक्ती पत्नी आहे हे गृहीत धरुन, कदाचित त्यांचा दृष्टीकोन - जे काही मतभेद, बेबनाव आहेत ते त्यांच्यात आणि नवर्‍यात असू द्यावेत व मुलाला त्याची काही झळ बसायला नको असा असू नाही का शकत? मुलगा लहान आहे, बालबुद्धी अतिशय सत्य बोलते. उलट तिथे मुलाच्या म्हणण्यावर काहीच नकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त न करण्याच्या व स्वतःचा आब राखून राहण्याच्या वृत्तीचे कौतुक वाटते.

कुठल्या जगात राहता?
"बाबांना की नै मम्मा आवडत नाही. बाबांनी आणखीन सुंदर नविन मम्मा आणलीये. माला टॉइज पाठवतात आणि मम्माला मनी. बाबा महाडला, मी आणि मम्मा ठाण्याला".
याचा उघड अर्थ ती स्त्री त्याची आई नाही असा होतो. नाही तर समोर असणार्‍या आईला मुलानं एकदा तरी सरळ `हिला' म्हटलं असतं. त्यानं सतत `मम्मा' असा (तृतीय पुरूषी) उल्लेख केला नसता.

साधी गोष्ट आहे : नवर्‍याबद्दल आपुलकी असलेली आई स्वतःच्या मुलाला पहिल्या वाक्यालाच अडवेल! ती इतरांसमोर असा तमाशा होऊ देणार नाही.

एखादी उघड गोष्ट अमान्य करण्यात आपण उगीच दुसर्‍यावर अहंकार वगैरे कल्पना लादून, स्वतःचा `मी' कसा वाचवतो हा आहे.

एखादी उघड गोष्ट अमान्य करण्यात काय उघड गोष्ट आहे..? "मला" पण कळूदे, संपूर्ण लेख वाचूनही "माझ्या" वाचण्यात काही गफलत होते आहे का.. **************** आमची येष्टी...???? आता मास्तरांनी रिंगणात प्रवेश घेतला. (पुलंच्या म्हैस मधून साभार!)

स्वतःचे चपखल वर्णन करु शकल्याबद्दल. भल्याभल्यांना जमत नाही म्हणे. अवांतर: आईच म्हणे की लेकराची. असो, असो.

पहिला नमस्कार गुर्जींना. भिडलं लिहिलं अन आम्हालाही पोहोचलं. प्रसंग छोटासाच पण इतक्या लहाण मुलाच्या तोंडुन ऐकताना आपल्या भावभावना डचमळतात. नव्याने चालायला बोलायला शिकताना समोर येणारे शब्द तसेच्या तसे उच्चारत बाळ बोलुन गेल. त्यात भावनांची फोडणी घालायला त्याला अजुन जमणार नाही , ते त्याच वयही नाही. जे काही शिकवणं आहे या प्रसंगाच्या आधीच, ते बरच काही सांगुन जात 'त्या' बाईंबद्दल. सरळ साधी फॅक्टस सांगण चाललय. इवॅपोरेट म्हणजे पाण्याला पंख फुटतात अन त्याचे ढग होतात अस मी सांगितल असत. तेव्हढा आयुष्यात रस आहे, लहानग्याच कल्पना विश्व ही गोष्ट स्विकरुन गेलं असत. तसच 'आबा' को-पॅसेंजर असणं हे ही ती तेव्हढ्याच अलिप्ततेने सांगते आहे. आपले आजोबा ना? अस वगैरे पाल्हाळ नाही आहे. म्हणजे अगदी शेवटी बसणारा धक्का हळु हळु का असेना पण पहिल्या वाक्यापासुनच बसतो आहे. गुर्जी __/\__

विनायकराव लिखाण आणि निरीक्षण तेंडुलकरांची आठवण करून देतंय ,सार्वजनिक वाहनाने प्रवास डुलक्या घेत चालूच ठेवा नंतर लिहित राहा . पूर्वी राजांच्या बऱ्याच राण्या असायच्याच पण एक मी तरी राहीन नाहीतर ही असं कधिच झालं नाही .प्रत्येकीला छोटे मोठे महाल वाडे हेतेच . साधा सायकलवरून पाव विकणाऱ्याच्या चार बायका असतात . नवीन केली की तिच्या हाताला मेंदी आणि पहिलीच्या हातात विम पाउडर असे सर्वच पुरुष करत नाहित . एका प्रसिध्द आणि मान्यवर मराठी निर्मात्याने तीन केल्या पण कधिच चर्चेत प्रकरणं आली नाहित .'दिल' और 'दौलत' आहे तर 'दर्द' गायब . अभिमन्युही लहान वयातच 'समजदार' वाटतोय .ताईंचा चेहरा नाही पाहिला तरी वाईट वाटायला नको ,संवादातला दृष्टिकोन महत्वाचा वाटतो .

छोटू चे ते वाक्य " मम्मा माला भुक लागली" असे होते. यशोधरा व अपर्णा तुमच्या प्रतिक्रिया वाचल्यावर माझे बरेच गोंधळ दूर झाले. सहमत आणि धन्यवाद.

सार, अम्बल रिक्वेश्ट सार, प्ळिज डोण्ट राईट येन्नीतिंग क्रिप्टीक्क हेन्सफोर्थ येल्याबोरेट येवरीतिंग, सार. ;)

ती स्त्री आई होती हे स्पष्ट केल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही समाज बर्‍यापैकी जवळून पाहिला आहे ना? निदान तुम्हांला तरी त्या माऊलीचं सर्वांपासून एक अंतर राखून असणं समजू शकेल अशी एक आशा मला आहे. तिचं काही चुकलं असं मला अजिबात वाटत नाही. ती स्वतःला समाजाच्या एकूणच भोचकपणापासून सांभाळू पहात असेल. जरी तुम्ही आबांच्या वयाचे असलात तरी कधीतरी कुठे पहिल्यांदांच काही तासांच्या प्रवासात योगायोगाने तुम्ही एकत्र आला होता, तुमच्यावर एकदम विश्वास जर ती स्त्री टाकू शकत नसली तरी त्याबद्दल तिला दोष देता येईल असंही नाही. तुम्हांला काय वाटतं? तिच्या दृष्टीकोनातून कृपया विचार करुन पहा. तुमच्या जागी इतर कोणी असते तरीही ती तशीच वागली नसती का? लहानग्याच्या विश्वात बाबाला अजूनही एक स्थान आहे. ते स्थान ती मोडत नाहीये, ह्याबद्दल तर तिचं मनापासून कौतुक. माऊलीचं मन मोठं आहे. मोठ्या लोकांच्या हेव्यादाव्यात लहानग्याच विश्व करपू नये इतकी जाण असावी. स्वतःचं दु:ख, त्रास, मनस्ताप (होत नसेल?) बाजूला ठेवून ती मुलाच्या भावविश्वाला जपते. यथावकाश मुलाला कळेल तेह्वाही ती ते व्यवस्थित निभावून नेईल ह्याबद्दल मला तरी शंका नाही. ह्या अनुभवाबद्दल आणि सहमतीबद्दल धन्यवाद. अवांतरः ३ पासून २०० परेंत वाढलेल्या पसार्‍यावरही काही लेखन येऊ देत. वाचायला खूप आवडेल.

केमीकल फॅक्टरी आहे असे सांग आबांना.. ताईंचे प्रॉम्प्टींग. पन्नास वर्कर कामाला असतात म्हणावे.. कौतुक ओसंडुन जात होते.
कदाचित ताई त्या कारखान्यात बरोबरीच्या भागिदार असाव्यात. घटस्फोट झाला म्हणून भागिदारी निकालात निघत नाही. भागिदारी निकालात न काढण्याचा निर्णय झाला असावा. कौतुक ओसंडून जात होते ते कारखान्याच्या यशामुळे असेल. नवर्‍याबद्दल असेलच असे नाही. तसेच, जर एक व्यक्ती म्हणून नवर्‍याबद्दल कौतुक असेल तर, आपापसातल्या मतभेदांमुळे, लहानग्याच्या मनांत वडिल ह्या नात्याबद्दल कटूता निर्माण होऊ नये, त्याच्या भावनिक प्रगती आड ती कटूता येऊ नये असा विचार असेल. वडिलांच्या, व्यवसायातील, संघर्षाबद्दल सतत बोलून आणि त्यांच्या यशाबद्दल नेहमी कौतुकोद्गार काढून मुलाच्या मनात एक यशस्वी उद्योजक बनण्याची बीजे रोवण्याचाही संस्कार असू शकतो.

पावणे दोन वर्षाच्या मुलाने विज्ञान शिकणे, मिठ कसे तयार होते हे शिकणे...... परिस्थीती गंभिर होत चाललीय हे माहित आहे परंतू एवढी गंभिर? आनंद आहे आणि दु:ख आहे..... अवांतरः रेडी टू वर्क मुलेच जन्माला घातली तर? :)