कधी कधी वाटते अगदी ठरवुन, चुन्-चुन के वाट लावली पाहीजे अश्या लोकान्ची.
उदाहरणार्थ या केस मध्ये आपल्या एरियातल्या २-३ रिक्षा सर्वानी मिळुन ठराविक काळासाठी (२-३ महीने) बन्द करायच्या त्यानन्तर परत ठराविक दुसर्या रिक्षा. तोच न्याय दुकाने बन्द ठेवणारे दुकानदार याना पण देता येईल.
जस्ट वाईल्ड थॉट...
हा उपाय उत्तम आहे. काहीसा आदर्श आणि त्यामुळे शक्य कोटीतला नसला तरी असे प्रयोग मुंबईत झाले आहेत. बजा डालो किंवा तत्सम नावाने रिक्षा बंद (ग्राहकांच्या बाजूने) असा एकदिवसीय नैमित्तिक प्रयोग कमीजास्त प्रमाणात करुन झालेला आहे. मजबुरी असलेले लोक पुरेसे असतातच आणि ते रिक्षाने जातातच कोणत्याही परिस्थितीत. त्यामुळे अशा उलट दिशेच्या आंदोलनाचा जोरदार इम्पॅक्ट होत नाही. गरजू आणि पुरवठादार असा हा विषम सामना आहे.
काय कम्प्लेंट करायची ती करा. मी दंडाचे पैसे खिशात ठेवूनच रिक्षा रस्त्यावर काढतो असे थुंकल्याच्या टोनमधे म्हणणारे रिक्षावाले नेहमी दिसतात. माझ्या वाचण्यातच किमान दोन पॅसेंजर्सशी वाद करताना रिक्षावाल्यांनी त्यांना ठार मारल्याच्या घटना आहेत. माज प्रचंड आहे.
अशा वेळी हे माजचक्र तोडण्याचा एक मार्ग असा दिसतो की अनेक वर्षे बंद केले गेलेले नवे रिक्षा परवाने आरटीओने हजारोंच्या संख्येने खुले करावे. एका वर्षात ५ हजार नव्या रिक्षा जरी मुंबई किंवा पुण्याच्या रस्त्यावर उतरल्या तरी केवळ पुरवठा वाढल्याने, केवळ स्पर्धेपायी रिक्षावाले अक्षरशः नाक मुठीत धरुन "कुठे जायचेय तिथे सोडतो पण माझी रिक्षा करा" अशा स्टेजला येतील याची खात्री आहे. पण प्रदूषण आणि रहदारी वाढण्याची भीती पुढे करुन हे परवाने किमान दशकाहून जास्त रोखून धरण्यामागेही काहीतरी अंतर्गत फोर्सेस असतीलच.
+१
परवाने खुले करणे हा उत्तम उपाय आहे. त्याच बरोबर सहा आसनी रि़क्षां सारखे इतर पर्याय पण उपलब्ध असले पाहिजे.
पुण्यात जेव्हा सहा आसनी रिक्षा चालत होत्या तेव्हा रिक्षावाले आणि पी.एम.टी वाले पण जेरीला आले होते. प्रदुषण होते या कारणाखाली सहा आसनी रिक्षा हद्दपार झाली. सी.एन.जी.वर चालणारी सहा आसनी नाही का कुठे?
आपल्याला परवडत असेल तर आपण जरुर रिक्शाने प्रवास करा,पण एक शन्का आहे कि बन्गलोर मधे ज्या रिक्शा चालतात त्यात ईन्धन कोणते वापरतात्?कारण माझ्या माहिती प्रमाणे मुम्बई ,ठाणे,पुणे येथिल बहुतेक सर्व रिक्शा CNG वर चालतात आणि बन्गलोर शहरात तसेच उच्चवर्णिय लोक जास्त आहेत तसे माझ्या मते मुम्बई आणि महाराश्ट्रात नाहीत.
संप म्हणजे ज्या २-४ ठिकाणी सध्या रिक्षावाले येतात तेथेही यायला नाही म्हणणार का? :)
जोक्स अपार्ट, हे फक्त किमान भाडे वाढवण्यासंबंधी दिसते (दर किमीचा रेट नाही). त्याने जवळच्या अंतरावर जाणार्यांना रिक्षा मिळण्याचे प्रमाण वाढणार असेल तर लोकांना फायदाच होईल. 'मिनिमम' जास्त झाल्याने रिक्षावाले यायला तयार होतील कदाचित.
दुसरे म्हणजे रिक्षाभाडे वाढण्याला मार्केट फोर्सेस ची मर्यादा आहेच. लांबच्या अंतरावर जायला आतासुद्धा कधीकधी टॅक्सी सर्विस बरी पडते. त्यामुळे ही भाडी फार वाढण्याला आपोआपच मर्यादा येतील.
रावसाहेब प्रत्येक रिक्षा आणी टैक्सी वाल्याला महीन तीस हजार रुपये मिळालेच पाहिजेत अशी पण मागणी करीत आहेत. हे वाचून मला आमच्या सर्व सैनिकांना बंदुका मोडा आणी रिक्षा हातात घ्या असा सल्ला द्यावासा वाटला कारण सैनिकाला पण पंधरा हजारच पगार आहे. कशाला बोंबलत हाडे गोठवणाऱ्या थंडीत किंवा जळणाऱ्या उन्हात लष्कराच्या भाकर्या भाजा?
देशभक्ती गेली खड्ड्यात.
इतर नोकरदार लोकांना मिळते त्या अंतराने व त्या प्रमाणात? काही बाबतीत रिक्षावाल्यांचे इतर सरकारी नोकरांशी साम्य आहे
माझ्या मते सरसकट भाडेवाढ नाही पण किमान भाडे जास्त असणे किंवा कमी अंतराला प्रतिकिमी जास्त भाडे असणे व जास्त अंतराला ते कमी होत जाणे हे योग्य आहे. त्याने प्रवाशांनाही रिक्षा मिळणे सोपे होईल.
१८ १९ २० जून या तारखा हवामानाच्या अंदाजावरुन ठरवल्या आहेत का? मुसळधार पाऊस आणि पीक अवरला भरतीच्या वेळा असं काही कॉम्बिनेशन असेल आणि त्या वेळी तशीही रिक्षा रस्त्यावर काढणं तापदायक होईल असा अंदाज आला असावा.. :)
बाकी रिक्षावाल्यांबद्दल मजसकट बहुतांश लोकांमधे तीव्र घाऊक संताप आहे हे सत्यच आहे.
मुख्यमंत्र्यांकडून आम्हाला किमान भाडे वाढवून मिळणार असे आश्वासन मागिल महिन्यात देण्यात आले होते. मात्र हे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी बिलकूल पाळलेले नाही.
हे नक्की किती आश्वासनं देतात आणी किती पाळतात?
रिक्षात बसणे सध्या(ही) विमानापेक्षाही महाग आहे.
समजा मुंबई ते दिल्ली रिक्षा केली तर प्रति किमी १० रुपये ह्या हिशोबाने सधारण १५ हजार रुपये होतील. तेच रेल्वेचे फर्स्ट ए सी चे तिकेट ३ हजारात तर विमानाचे तिकिट ६-८ हजारात मिळुन जाईल !!
आता ह्या रुक्षावाल्यांना किमान २५ रुपये भाडे पाहिजे ...अरे हे हॅलिकॉप्टर किंव्वा क्रुझशी स्पर्धा करत आहेत काय ??
रोचक..
शिवाय अशा महागड्या १५००० रुपयांच्या रिक्षाने दिल्लीला गेल्यास विमानापेक्षा किती जास्त वेळ लागेल हाही महत्वाचा मुद्दा आहे.
१. विमान हा रिक्षापेक्षा स्वस्त आणि अत्यंत जास्त वेगवान मार्ग आहे.
२. पायलटने भाडे नाकारण्याची घटना अद्याप ऐकिवात नाही.
३. मीटरमधे मारणे किंवा तत्सम भानगडी नाहीत.
त्यामुळे विमान निश्चित अधिक उपयुक्त. मात्र विमानतळापर्यंत पोचण्यासाठी (स्वतःचा ड्रायव्हर नसल्यास) रिक्षा अथवा तिची चुलतबहीण टॅक्सी घ्यावीच लागेल. अन्यथा कारचे विमानतळावरील दोनतीन दिवसांचे पार्किंग हे वरील सर्व खर्चांपेक्षा महाग लागेल.
अगदी पायलटने व्यक्तिशः भाडे नाकारण्याची नसली तरी विमान कंपनीने (युरोपात) अर्ध्या वाटेत विमान एका विमानतळावर विमान उतरवून प्रवाशांकडे पैशांची मागणी केली होती. कारण होते प्रवांशांना ज्या ट्रॅव्हल एजंटने तिकीटे विकली होती त्याने ते पैसे विमान कंपनीत जमा केले नव्हते.
अर्ध्या वाटेत एका विमानतळावर विमान उतरवून सर्व पैसे मिळाल्याखेरीज विमान पुढे जाणार नाही असे सर्व प्रवाशांना सांगण्यात आले. नंतर एका प्लॅस्टीकच्या पिशवीत प्रत्येक प्रवाशाकडून पुन्हा तिकिटाचे पैसे वसूल झाल्या नंतरच विमान पुन्हा उडाले आणि गंतव्य स्थळी पोहोचले.
गंतव्य स्थळी प्रवाशांनी त्या ट्रॅव्हल कंपनीच्या कचेरी समोर जोरदार निदर्शने केली शेवटी पोलीसांना पाचारण करण्यात आले.
तुलना रोचक आहे पण...
चार्टर्ड वाहनाची (ज्यात आपल्याखेरीज दुसरे कोणी नसते) आणि सार्वजनिक वाहनाच्या खर्चाची तुलना कशी होऊ शकते? चार्टर्ड विमान आणि रिक्षा याम्ची तुलना करा पाहू.
खोक्याबाहेरचे असले तरी ते चुकीचे आहे . कारण चार्टर्ड प्लेन हे पर्सनली ओन्ड् असतात , रिक्षा नाही . त्यामुळे कोणी खाजगी वापरासाठी रिक्षा वापरत असेल तर चार्टड प्लेन शे तुलना योग्य आहे .
इतर वेळी रिक्षाला आपण भाडे देतो जसे नॉरमल प्लेनला भाडे देतो .... थोडक्यात रिक्षा आणि नॉर्मल प्लेन हीच तुलना योग्य आहे .
कसे काय?
मी प्रायव्हेट प्लेनविषयी बोलत नाहीये.... चार्टर्ड प्लेन विषयी बोलतो आहे.
म्हणजे ते गिरिजा यांच्या मालकीचे असते आणि ते नितिन थत्ते भाड्याने घेऊ शकतो.
आज एका रिक्षावाल्याशी बोललो. रावला शिव्या घालत होता. म्हणाला मागच्यावेळी भाडेवाढ केली तर २-३ महिने धंदा मंद होता. म्हणाला आता २५ केले तर कुणी रिक्षात बसणारच नाही, उपाशी रहावं लागेल. रिक्षा सि. एन. जी. वर चालवून पेट्रोलचे पैसे का घेता विचारलं तर गप्प बसला.
वसई विरार येथे महापलिकेने जी खाजगी बस व्यवस्था सुरु केली आहे तसेच ईथेही सुरु करावे म्हणजे रिक्शावाल्यान्ची अरेरावी तरी कमी होइल्,कारण मुम्बई मध्ये बेस्ट वाह्तुक अपुरि पडत असल्याने रिक्शावल्यन्चे फावते तसेच बेस्ट कर्मचारी आणि रिक्शा युनिअन यान्चे सन्गन्मत असल्याचे वाटते.
अगदी रास्त मुद्दा आहे. लोकांना इतकी टोकाची चीड ही भाडेवाढीच्या मागणीची नाहीये.. रिक्षावाल्यांचे अतिशय चीड आणणारे वर्तन हे प्रत्येकाने इतके अनुभवले आहे की त्यात दुमत होत नाही.
चांगल्या रिक्षावाल्याचा अनुभव हा खरोखर अपवाद म्हणूनच असतो. रिक्षावाल्यांचा माजोरीपणा तुम्ही खरंच अनुभवला नाहीये का? ते ज्या पद्धतीने भाडी नाकारतात किंवा अडवणूक करतात ते पाहता तरीही त्यांच्याविषयी सहानुभूति वाटावी हे पटतं का? रिक्षावाले थोडेसेही सौजन्याने आणि व्यावसायिक रितीने वागले तरी पूर्ण समाजची सहानुभूति ताबडतोब स्वतःकडे वळवू शकतील. चांगले वागले, पॅसेंजरची सोय पाहिली, जो धंदा निवडलाय तो विनातक्रार नीटपणे नियम पाळून केला तर नागरिकसुद्धा त्यांना पाठिंबा देतील. पण अज्ञात कारणाने बहुतांश रिक्षावाले माजोरडे बनले आहेत हे खरं.
माजोरीपणाचा अनुभव अनेकदा घेतला आहे. कधी कधी चांगुलपणाचा ( म्हणजे माजोरीपणाच्या अभावाचा) देखिल... तुम्ही म्हणता तस सरसकट माजोरीपणाचं कारण काय असावं याचा विचार केला पहिजे. मला वाटतं या व्यवसायतून मिळणारा पैसा कमी असावा आणि मिळकत वाढवायचा दुसरा उपाय मिळत नसावा म्हणून बहुतांश रिक्षावाले माज करतात. यावर एक उपाय म्हणजे दरवर्षी ५-७% दरवाढ हा असू शकतो. आणि याउपर देखिल त्रास देत असतील तर वर उल्लेखल्याप्रमाणे काही उपाय करता येतील.
बाकी रिक्षावाल्यांचं आर्थिक गणित जाणुन घ्यायला आवडेल. आठवड्यातून सहा दिवस रोज ८-९ तास रिक्षा चालवून महिन्याला किती पैसे मिळत असतील?
सहा दिवस रोज ८-९ तास रिक्षावाले बाहेर असतील. पण त्यातला बराचसा वेळ पत्ते खेळणे, रिक्षा स्टॅण्डच्या जवळच्या दुकानात, टपर्यावर जाउन टाईमपास करणे, झोपणे, जवळच्या भाड्याला नकार देणे, कंपूबाजी करून स्टॅण्डवर नवीन उभ्या राहणार्या रिक्षावाल्याना त्रास देणे यातच जात असलेला पाहीलाय.
मला वाटते अॅक्चुली ते (बहुतांश) हार्ड्ली ३-४ तास काम करत असावेत.
गवि म्हणतात त्याप्रमाणे नम्रपणे आणि चोख काम केल्यास चांगले उत्पन्न मिळू शकेल.
हल्लीची कांही माहिती नाही.
पण, मुंबईत शिवसेनेच्या मदतीने मराठी तरूणांना रिक्षा परवाने मिळाले (त्या काळी) त्यात कांही माझे शाळकरी मित्र होते.
तेंव्हाही हे रिक्षावाले बोरीवली पश्चिमहून दहिसर पश्चिम (अंदाजे ५ कि.मी.)यायचे नाहीत. कारण द्यायचे, परतीचे भाडे मिळत नाही. (तशी वस्तुस्थिती नव्हती). दहिसर पश्चिमहून दहिसर पूर्व यायचे नाहीत. कारण पुन्हा तेच. परतीचे भाडे मिळत नाही. (वस्तुस्थिती: दहिसर पूर्वहून बोरिवली पूर्व आणि बोरिवली पूर्व ते बोरिवली पश्चिम अशी गिर्हाईके मुबलक प्रमाणात असायची.)
माझा एक मित्र दिवसाला १००/- मिळाले (१९७५च्या काळच्या आर्थिक परिस्थिती नुसार) की १/२ किलो मटण आणि एक देशी दारूची बाटली घेऊन घरी जायचा. त्या दिवसासाठी रिक्षा बंद. बायकोला मटण बनवायला फर्मवायचा आणि स्वतः मदिरा आस्वाद घेत टिव्ही बघत बसायचा. जेवण झाले की झोपायचा. संध्याकाळ झाली की मित्रांसमवेत नाक्यावर.
कधी कधी विमानतळाचे भाडे मिळाले तर हे १००/- रु. चे उद्दीष्ट सकाळी ९ वाजताच साध्य व्हायचे.
पुढे भय्ये आले. त्यांनी बहुतांश मराठी रिक्षाचालकांना घरबसल्या दररोजचे १००/- रु. दिले आणि रिक्षा आपल्या ताब्यात घेतल्या. मराठी तरूण पुन्हा बेरोजगार पण कांही न करता १००/- मिळवायला लागला. पैसे उडवले आणि कांही वर्षांनी रिक्षा बिघडून (पेट्रोल मध्ये केरोसिन मिसळून) घरी परतल्या. नंतर त्याच रिक्षा भय्यांनी अत्यंत्य पडत्या भावात विकत घेतल्या. ते मालक बनले. मराठी तरूण पुन्हा एकदा रस्त्यावर आला. चुक कोणाची???
भय्ये आल्यानंतर (उरलेले) सर्व मराठी रिक्षावाले सुधारले. कुठलेही भाडे न नाकारता सांगाल तिथे यायला लागले. सद्ध्या आपल्या रिक्षांची बर्यापैकी काळजी घेताना दिसतात. पण एकदा घुसलेले हे भय्ये संख्येने वाढताना दिसताहेत. (रिक्षाही वाढल्या आहेत.)
पुण्याच्या रिक्षावाल्यां इतका माज मुंबईत दिसून येत नाही. त्याला बहुतेक, ह्या व्यवसायातील भय्यांचा शिरकाव आणि मराठींचा मोडून काढलेला एकाधिकार, हेच कारण असावे.
रिक्षावाल्यांचा मुजोरीपणा जगजाहीर आहेच. बेंगळूरूमधील रिक्षावाले पुण्यामुंबैवाल्यांपेक्षा अजून लै माजोरी आहेत.
पण अलीकडे एक अतिशय चांगले पाऊल सुरू झालेय.
http://autowale.in/
डायल इन रिक्षा. पुण्यातही यांची सर्व्हिस आहे. इतकी भारी नसली तरी ठीकठाक आहे असे एका पार्टिसिपंट रिक्षावाल्याकडूनच कळाले होते.
समजा की रिक्षावाला तुमच्या आम्च्या सारखा ८ तास काम (+ काही ओव्हर टाईम) करतो .
मुंबैत ताशी २० च्या स्पीडने रिक्षा ताबलली तरी दिवसाचे १६० किमी झाले .
आजच्या हिशेबाने म्हणजे १० रु प्रति किमी (आणि जवळ जवळची १ १ किमी अंतरातली भाडी उचलली तर १५ रुपये !!) ह्या हिशेबाने १६०० रुपये झाले.
समजा रिक्षा ३ रुपायला १ किमी ह्या हिशेबाने मायलेज देते तर ४८० रुपये पेट्रोल (/सीएन्जी) , १२०रुपये डेली मेन्टेनस पकडला तरी रिक्षावाल्यांना दिवसाला १००० रुपये सुटतात म्हणजे महिन्याचे ३०००० रुपये , आणि रिक्षाला १०००० रु पेक्षा जास्त ईएमआय पडत असेल असे वाट्ट नाही. (स्कॉर्पियो येते १० हजार ईएमआयमधे ! )
तात्पर्यः रिक्षावाल्यांनी २० हजार रुपये महिन्याला सध्या मिळत आहेतच . ह्यांच्या अपेक्षा तरी काय आहेत नक्की? किंवा ह्यांचे गणित तरी काय आहे नक्की ??
शरदरावांची न्युसन्स पावर लय वाढुन राहिलिये बस्स बाकी काही नाही ...
इतर सामाजिक कारणे असु शकतात...
अजुन हे एक रफ कॅल्कुलेशन
रिक्षावाल्याची निव्वळ मासिक प्राप्ती= २००००
त्यातले १बी एच के रेन्ट (ठाणे) =८०००
४ जणांच्या कुटुंबाचा जेवणाचा खर्च =१५००*४=६०००
कपडेलत्ते खर्च = १०००
इन्टर्तेन्मेन्ट / मेडिकल इमर्जन्सीज =१०००
मुलांच्या शिक्षणाचा खर्च = २०००
तर २ हजार रुपये नक्कीच शिल्लक राहतील ...(पण तेवढे कदाचित दारुत जात असल्याने सेव्हींग्स ० .)
आणि २ हजार महिन्याला साठवुन कोणी मध्यमवर्गीय नक्कीच होवुशकत नाही ...किमान मुंबईत तर नक्कीच नाही ...
पण म्हणुन रिक्षावाल्यांना अवास्तव भाडेवाढ द्या ( अन मध्यमवर्गीय करा ) ही मागणी कैच्याकै आहे .
फक्त रिक्षा चालवणे ह्या एका स्किलवर लोकं मध्यम वर्गीय व्ह्यायला लागली तर समाजाच्या इक्विलिब्रियम अनबॅल्न्स होईल .
( अवांतर : रिक्षावाल्यांनी श्रीमंत होणे हे नॉन-परेटो ऑप्टिमल आहे कदाचित )
पण कुठचा रिक्षावाला श्रीमंत (किमानपक्षी मध्यमवर्गीय) झालेला दिसत नाही. हे बोलणे आक्षेपर्ह आहे,माझ्या माहितीतल्या काही जणान्नी व्यव्स्थीत धन्दा करुन एका रिक्शावर तीन रिक्शा खरेदी केल्या आहेत तसेच ब्लोक सुद्धा घेतले आहेत.माझ्या ओळ्खीचे एक गुजरथी रिक्शावाले काका तर Newzealand ला फिरुन आले आहेत्,कारण मी बर्याच वेळा त्यन्च्या रिक्शाचा उपयोग करत असे बर्याच दिव्सानी भेटले तेव्हा म्हणाले की Newzealand ला गेले होते.
रिक्षावाले इतके माजुरडे आहेत की त्यांना चांगला चोप द्यावा असे सारखे वाटते !
या रिक्षावाल्यांना इतका माज करता येतो याचे मुख्य कारण म्हणजे शहरात सार्वजनिक वाहुतुकीचे ३-१३ वाजलेले आहेत्,निदान ठाण्यात तरी ही वस्तुस्थिती आहे.शहाराच्या लोकसंख्येच्या गरजे नुसार परिवहन व्यवस्था सक्षम नाही.
ठाण्यात तो सॅटिस का फॅटिस प्रकल्प केला त्यामुळे तर पार वाट लागली आहे,बस स्थानक पुलावर आणि रिक्षातळ खाली अशी आखणी आहे,प्रचंड रांग असते रिक्षासाठी,कारण बस सेवा डब्बा आहे.:(
हा राव तर नुसता मोकाट सुटलाय असे वाटते !
प्रतिक्रिया
कधी कधी वाटते अगदी ठरवुन,
हा उपाय उत्तम आहे. काहीसा
+१
मनसे चा पुढचा खळ्ळ खट्याक कधी
केवळ माहितीसाठी
थत्ते साहेब
बंगलोरमध्ये चालणार्या रिक्षा
मला वाटलं ' वाट बघतोय
म्हणे मुख्यमन्त्र्यानी
लोकांना कळणार कसे?
रावसाहेब आणि त्याचा रिक्षावाला
इंधनदरवाढीव्यतिरिक्त वाढ
इंटरेस्टिंग प्रश्न
टॅक्सीप्रमाणेच रिक्षालासुद्धा
एलबीटी विषायांतर तर नाही ना ?
होय तसेच वाटतय
१८ १९ २० जून या तारखा
मुख्यमंत्र्यांकडून आम्हाला
एक अवांतर कॅल्कुलेशन
रोचक..
हाडांचे काय?
रोचक++
ऐकली आहे.
तुलना रोचक आहे पण...
खोक्याबाहेर!
खोक्याबाहेरचे
कसे काय?
आज एका रिक्षावाल्याशी बोललो.
वसई विरार
बहुतेक सर्व नोकरदारांना
अगदी रास्त मुद्दा आहे.
माजोरीपणाचा अनुभव अनेकदा
सहा दिवस रोज ८-९ तास
रिक्षावाल्यांचे गणित.
रिक्षावाल्यांचा मुजोरीपणा
रिक्शावल्यान्चे उत्पन्न
अजुन एक अंदाज
दिवसाला हजार रुपये....
कदाचित नाही
पण कुठचा रिक्षावाला श्रीमंत (किमानपक्षी मध्यमवर्गीय)
रिक्षावाले इतके माजुरडे आहेत