धन्यवाद !
अनोळखीच असते कारण आपण असे जंगलात साप शोधायला गेलो तर मिळायचे प्रमाण खूप कमी असते. पण ह्याच्या उलटे कॉंक्रीट च्या जंगलात ते आपल्या आजूबाजूलाच असल्यामुळे खूप वेळा आमना-सामना होतो.
मी त्यांचे पुस्तक वाचले नाही, पण मिळाले तर नक्की वाचीन. भारतामधले सर्प किंव्हा प्राणी -पक्षी संशोधक या वाहिनी साठी काम करत असतात, पण काहीच लोक पडद्यावर येतात.
मी जमेल त्याला त्याचे पुस्तक सुचवत असतो - इथे ते ई-बुक मिळेल. त्याने १० वी नंतर १ वर्ष हाच अनुभव घेण्यासाठी दिले होते.
http://www.gutenberg.org/ebooks/10347
+१००, लई भारी.
माझ्या लहानपंणी घरात आलेले दोन साप, माझ्या मांजरांनी फाडुन टाकलेले प्रत्यक्ष पाहिले, आणि त्यानंतर सापांबद्दल एक प्रकारची कणव भरुन राहिली मनात का कोण जाणे.
हो, मांजर सापांना अगदी हाल हाल करून मारते, कारण त्यांना याची भीती असते की, तो साप त्यांच्या पिल्लांना खाऊन टाकेल. तसेच मांजराच्या अंगावरच्या केंसामुळे त्याचे सापाच्या चाव्या पासून खूप वेळा संरक्षण होते.
मी लहान असताना आमच्याकडे एक मांजरी होती. ती घराबाहेर गवतात जाऊन तिथून मण्यारी पकडून घरात आणून आमच्या पुढ्यात एखादे गिफ्ट द्यावे तशी टाकायची. तिने माझ्या आठवणीत ९ मण्यारी मारल्या. इतर साप आमच्या पाठीमागे किती मारले असतील माहित नाही. तरी ती कधीही विषबाधा न होता १५ एक वर्षे जगली.
मास्तर लोक जास्त काही बोलायचे नाही कारण कॉलेज चे काम असायचे. सिंहगड कॉलेज हे डोंगरावर असल्याने तिथे सगळ्या प्रकारचे साप मिळायचे, नाग, घोणस (विषारी साप) पण मी तिकडे पकडले आहेत. तसेच आमचे हेड सर हे कोकणातले असल्याने त्यांना सापाबद्दल माहिती होती, त्यामुळे त्यांची मला पूर्ण सहमती असायची. कधी कधी तर सिंहगड च्या दुसऱ्या कॅम्पस (कोंढवा, कात्रज) मध्ये पण साप पकडायला जायचो.
एकदाच फक्त, रसायनच्या तासाकडे लक्ष न देता भिंती वरच्या पालीचे निरीक्षण करत होतो, तेंव्हा मात्र मास्तरीण बाईनी बेक्कार झाडले होते...ती पाल खरच खूप लोभस होती :)
मला साप हा प्रकार किव्हा प्राणी म्हणा खूप म्हणजे खूप आवडतो .
सापाच्या समोरून त्याच्या डोळ्यात रोखून बघण्यात एक निराळीच मजा येते.
आता नोकरी मुळे जमत नाही पण आधी गावी आणि शेतात खुपदा सापाशी फाल्तुक खेळ करून बघितले आहेत.
एक मात्र आहे कधी पकडू शकलो नाही एक दोनदा प्रयत्न केला पण लोकांनी डोक्याला नुसता शॉट दिला होता.
त्यमुळे प्रत्येक वेळी साप मारावाच लागायचा, ३ ४ नाग आणि ४ ५ इतर साप उगाचच मनात नसताना मारावे लागले
साला आमच्या घरात जेव्हा ६ ७ फुटाची पिवळी धमक धमन मारावी लागली होती तेव्हा माझ्याच डोळ्यात पाणी आले होते, अजून सुधा तो प्रसंग आठवतो आणि अपराधी असल्यासारखे वाटते
धन्यवाद् !
अपराधी वाटून घेऊ नका. कारण ज्यांना साप पकडता येत नाही, त्यांनी त्यांच्या घरात आलेला साप तो पकडण्या पेक्षा मारलेले बरे.(हे खूप विवादास्पत वाक्य आहे.) पण विषारी विषारी साप पकडताना चुकून दात जरी घासून गेला तरी जीवावर बेतू शकते. आणि विषारी सर्पदंशावर औषधे आहेत पण ती घेतल्यावर होणारे परिणाम जेवढे वाटतात तेवढे साधे नाहीत. सापांचे दुरून निरीक्षण करणार असाल तर जरूर करा पण खेळ म्हणून पण पकडायचा प्रयत्न करू नका.
एकदम सहमत. एक जरी घोणस चावलेला माणूस तुम्ही पाहिलात तर त्याच्या अंगावर आलेले रक्ताचे फोड किंवा सुजलेला पाय पाहिला तर आयुष्यात सापाशी खेळ करायला कोणी जाणार नाही. अगदी ६ इंच लांबीचे फुरसे चावले तरी होणारी विषबाधा आणि तडफड पहिली कि कोकणात लोक साप दिसला कि का मारतात ते पटेल.
http://www.indiamike.com/india/health-and-well-being-in-india-f2/snakebite-first-aid-t34506/
साप म्हणू नये धाकला
नवरा म्हणू नये आपला
"एका रानवेड्याची शोधयात्रा " खूप प्रेरणादायी पुस्तक आहे. भारतात परीक्षेत नापास झाले की तुम्हाला जे काही सहन करायला लागते, त्याला तोडच नाही. ती पण शाळा कॉलेज ची परीक्षा, तुम्ही स्वतः बरोबर जसे काय आजूबाजूच्या १० लोकांचे आयुष्य उध्वस्त केले असे समजून लोकं टोमणे मारतात किंवा लुक्स देतात.
सुरेख लेखन !
साप दिसला की आधी लोक मारायला धावतात ! :( असे सापांनी केले असते तर ? माणुस दिलाच की चाव ! ;)
घोरपडीवरुन आठवले... मध्यंतरी गणपती मधे आपच्या इथे अचानक एक मोठ्ठाली घोरपड प्रकट झाली होती,तिचा एक फोटो मोठ्या मुश्किलीने काढला होता,घरच्या संगणकात सापडला तर इथे देइन म्हणतो.
झकास फोटो आहे. मी दरवेळी घोरपड पकडताना हाच विचार करायचो "की हि घोरपड येथे आली कशी ? "
मित्रमंडळ रोड च्या बैठ्या घरांमध्ये एका बाथरूम मध्ये एक घोरपड होती, मला त्या माणसाने, फोन वर एक मोठी पाल आहे किंवा तसाच एक मोठा सरडा आहे असे सांगितले होते...;)
एकदम पटणारे विधान,
जगाची सर्वात जास्त आणी खरी ओळख तुम्ही जेंव्हा खाली पडता तेंव्हाच होते.
आणी जेंव्हा जगाने तुम्हाला मोडीत काढलेले असते तेंव्हा स्वतःची सुद्धा खरी ओळख आपल्याला होते.
उभ्या आयुष्यात एक वर्ष या अनुभवासाठी काहीच नाही.
खरं तर प्रत्येकाने आपले शिक्षण संपल्यावर नोकरीला लागण्यापूर्वी एक वर्ष आपल्याला काय करायचे आहे हे हुडकण्यासाठी किंवा आपल्या मनाला हवे तसे जगण्यासाठी वापरले तर त्याचे आयुष्य समृद्ध होईल.
असो अतिशय छान आणी प्रामाणिक लिखाण.
लिहिते रहा
जेडी, तुमच्या कामाबद्दल आणि लेखणीतून इथपर्यंत पोहोचवल्याबद्दल खास धन्यवाद आहेतच पण अजून एक महत्त्वाच..
अभ्यासात एक वर्ष पलटी खाल्याने निराश न होता नवीन, वेगळं काहीतरी शिकून धडाडीने उभ राहिलात, वेळ आणि उर्जा फुकट न घालवता आयुष्यभर (आणि इथे तर समाजाला) उपयोगी पडेल अशी कला शिकून वापरलीत ह्याच खूप कौतुक वाटतं. टिळकांसारखं (एक पूर्ण वर्ष त्यांनी व्यायामाला दिलं) किंवा वरती जसा कुंटेचा उल्लेख आलाय.. तसंच, तुमच्या सारख्यांची अशी वेगळी वाट (अपघाताने का होईना) पकडून वेळेचा सदुपयोग करण्याची जिद्द, तुमचं मार्गदर्शन परिक्षेत अयशस्वी होऊन् वर्ष जाण्यामुळे नैराश्याच्या आहारी जाऊ शकणार्या मुलांना व्हायला हवं असं कळकळून वाटतं.
- (असं वर्ष/ वेळ हाताशी न मिळाल्याची खंत वाटणारा) उपास
धन्यवाद् !
खरे आहे तुमचे म्हणणे, एकदा पडल्यावर पुन्हा ज्या उमेदीने आपण काम करायला लागतो याला तोड नसते.पण मला याचे वाईट वाटते की छोट्या परीक्षेतले पण अपयश आपल्या एकडे फुकटच जास्त मोठें केले जाते. आणि त्यामुळे काही मुले त्या अघोरी वेळे मधून बाहेर येऊ शकतात, पण काही पूर्ण पणे खचून जातात.
मला हा प्राणी भयंकर किळसवाणा वाटतो... भितीच वाटते म्हणा ना. आणि असे साप वगैरे पकडण्याची कामं करणार्यांचं फार कौतुक वाटतं.
लगे रहो जेडी भाय.
अवांतरः तुमच्या कामाप्रमाणेच तुमचं नाव देखील भारी आहे... जेडी... व्वाह.
अर्धवटराव
मी ज्यांना आत्ता पर्यंत भेटलो आहे त्यातला ९५% लोकांना सरपटणारे प्राणी किळसवाणे वाटतात.( अगदी माझ्या घरी पण आधी हीच परिस्थिती होती ) त्यामुळे मी हे वाक्य खूप वेळा ऐकले आहे. पण ही किळस किंवा भीती आपल्याला सापाबद्दल असलेल्या अज्ञानामुळे आणि पारंपारिक कल्पनेमुळे जास्त वाटते, असा माझा अनुभव आहे.
ही किळस किंवा भीती आपल्याला सापाबद्दल असलेल्या अज्ञानामुळे आणि पारंपारिक कल्पनेमुळे जास्त वाटते
अगदी बरोबर.. सापांबद्दल खूप अज्ञान आहे.. घोणसाची सावली पडली तरी अंग कुसायला लागते.. हिरवी सर्पटोळ डोक्यावर नेम धरुन उडी मारते आणि माणूस तत्काळ मरतो असे बरेच प्रकार अजुनही ऐकायला मिळतात.. विशेषतः कोकणात..
मला व्यक्तिशः सापांबद्दल खूप आकर्षण आहे.. झू मध्ये अजगर, साप हातात घेउन फोटो काढायची एक संधी मिळाली होती.. अजिबात ओला कींवा बुळबुळीत स्पर्श नव्हता.. एकदम मऊ प्लास्टीक सारखा वाटत होता..
आपल्या बॉलिवूडने आणि हॉलीवूडने जेवढी अंधश्रद्धा सापाविषयी पसरवली आहे की त्याला तोडच नाही. माझा स्वतः चा अश्या चित्रपटावर बेक्कार राग आहे.
सर्वसामान्य लोकांपर्यंत बॉलीवूड-हॉलीवूड चे सिनेमे पोहचत असल्यामुळे खूप लोकं नागीण- अनाकोंडा सारख्या सिनेमा वरती डोळे झाकून विश्वास ठेवतात. "तुमची गर्ल फ्रेंड सर्पकन्या आहे का ?" हा प्रश्न मला सुशिक्षित लोकांनी विचारला आहे. ;)
काही लोक असेच सिनेमे बघून गुप्तधनासाठी मोठ्या सापांची बिळे पण शोधतात आणि अपघात करून बसतात.
प्रतिक्रिया
आधीप्रमाणेच मस्त भाग.
एकदम सुरेख.
धन्यवाद !
सहज शैलीतलं; नव्या जगाची ओळख
वाचतोय
एक नंबर...
मस्त!
मी त्यांचे पुस्तक वाचले नाही,
Free from School by Rahul Alvares
धन्यवाद ! पुस्तक वाचण्यात
मस्त अनुभव आहेत.
अत्यंत उत्तम!
अमेरिकेमध्ये सध्या उन्हाळा
दोनिही गोष्टी वाचल्या.......
अतिशय उत्तम!!!! याला म्हणतात
+१००, लई भारी.
अर्र तसा साप बिचाराच असतो
हो, मांजर सापांना अगदी हाल
अगदी!
हो ना...
बेश्टे बे जेडी
मास्तर लोक जास्त काही
ती पाल खरच खूप लोभस होती
मग
फारच भारी लिवलयं
मला साप हा प्रकार किव्हा
धन्यवाद् !
घरात आलेला साप पकडण्या पेक्षा मारलेला बरा
साप म्हणू नये धाकला
हाही भाग आवडला.
वा! वाचायला आवडतंय.
"एका रानवेड्याची शोधयात्रा "
सुरेख लेखन !
घोरपड.
झकास फोटो आहे. मी दरवेळी
वा!
छान
मस्त!
मी जेवढे जगण्याविषयी काही शिकलो
आवडला
लेखनशैली आणि अनुभव दोन्ही
झक्कासच!
सुंदर आणि अनुभवसंपन्न.. तसंच स्फूर्तिदायकसुद्धा..
धन्यवाद् !
+१
साप !!!
मी ज्यांना आत्ता पर्यंत भेटलो
ही किळस किंवा भीती आपल्याला
नाग डूख धरण्याच्या तर कैक
आपल्या बॉलिवूडने आणि
Pagination