Welcome to misalpav.com
लेखक: संचित | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

ही लोकं हे प्रकार कसे करतात आणि का करतात ते माहिती नाही. ते इथले जाणकार सांगतीलच. पण आम्हाला बुवा असे शोज बघायला आवडतात. ते काहीतरी बकवास चर्चा किंवा फुटकळ नाच-गाण्याचे प्रोग्राम बघण्यापेक्षा हे खूप बरं!!! :)

अहो आजकाल सगळे लोक इंडोस्कोपी करतात ते काय आहे? एवढेच कि लोकांना घशात बधिर करण्याच्या औषधाचा फवारा मारला जातो. हौदिनी सवयीने लपकणारी तलवार गिळत असे. बाकी काचा खाणे किंवा दगड गिळणे हे एक मी पण कोणीतरी आहे हे सिद्ध करण्यासाठी केलेला प्रयत्न आहे. मी सर्वात लांब थुकू शकतो किंवा मी सर्वात लांब मुतू शकतो हा त्यातलाच प्रकार. घटम भिंद्यात पटं छिंद्यात कुर्यात रासभ रोहणम येनकेन प्रकारेण प्रसिद्धः पुरुषो भवेत.

बाकी काचा खाणे किंवा दगड गिळणे हे एक मी पण कोणीतरी आहे हे सिद्ध करण्यासाठी केलेला प्रयत्न आहे. मी सर्वात लांब थुकू शकतो किंवा मी सर्वात लांब मुतू शकतो हा त्यातलाच प्रकार.
जबरदस्त ! साला तत्वज्ञान तत्वज्ञान म्हणतात ते हेच. चला, ह्या धाग्याच्या निमित्ताने आम्हाला साक्षात्कार झाला. काही काही लोकं, मी अर्धे जग हिंडलोय, आणि मी फलान्या फल्याना ठिकाणी आयुष्य घालवलय, मी अमक्या तमक्याचे आयुष्य वाचलवलंय, मी अमक्या तमक्या हापिसराला नडलोय असे काय काय सांगत / लिहित हिंडत असतात. तो पण ह्यातलाच प्रकार असणार असे आता वाटायला लागले आहे.

कौतुक असते लोकांना, आपल्याला काही जगावेगळे जमते याचे. नाकाल जीभ लावणे, कान हलवणे, भुवया उडवणे किंवा एकावेळी एकच भुवई उडवणे, हाताची बोटे कडाकडा मोडणे, नाकातून सिगारेटचा धूर काढणे वगैरे वगैरे गोष्टींचे लोकांना कौतुक असते, तर ज्या एखाद्याला साक्षात्कार होतो की आपण यापेक्षाही काहीतरी भव्यदिव्य करू शकतो तर माणसे आयुष्तातील वेळ अन शक्ती खर्च करतात या साठी .. अन यात काही वावगे नाही, माझ्या अंगात असा एखादा अमानवीयान अचाट कलागुण असता तर मी देखील याच मार्गाला लागलो असतो.. बाकी जेव्हा हे लहानपणी पहिल्यांदा केले जाते तेव्हा पाठीत आईचा धपाटा पडतो की बापाची कौतुकाची थाप हे देखील मॅटर करते.

माझा अंधश्रद्धा निर्मुलन समितीत असलेला मित्र महेश भागवत असे ट्युब च्या काचा खाण्याचा जाहीर कार्यक्रम करीत असे. या मागे कोणतीही दैवी शक्ती नाही असा संदेश या कार्यक्रमातून देत असे. सध्या तो हैद्राबाद चा जॉईंट पोलिस कमिशनर आहे.

लहानपणापासून त्यांच्या मनावर जगात अशक्य असे काहीही नाही हे ठसवण्यात येत असावे.

"साप, विंचू यात स्वत:ला फसवतात". कॄपया या वाक्याचा अर्थ कुणी सांगू शकेल का???? बाकी काचा, तलवारी खाल्लेल्या प्रत्यक्ष बघितलेल्या आहेत. आणि ते लोक सगळे गरीब, रस्त्यावर खेळ करणारे होते. कुणीही गिनीज बुकात वगैरे जाण्यासाठी करत नव्हते. असो. वरच्या वाक्याचा अर्थ कुणी सांगितला तर अनंत उपकार होतील. तेवढीच आमच्या ज्ञानात भर.

फसवतात च्या ऐवजी अडकवून घेतात - असे असावे असे वाटते. 'साप, विंचू यामध्ये स्वत:ला अडकवून घेतात'

>>"साप, विंचू यात स्वत:ला फसवतात". हिंदाळलेलं मराठी बाकी काही नाही...;)