Welcome to misalpav.com
लेखक: saishwari | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

मिपावर स्वागत. जुन्या पिढीतले खडीवाले वैद्य तर माहीत असतील. च्यानल वर चमकणारे वैद्य शक्यतो टाळावेत असे वाटते. मिपावर पण काही वैद्य आहेत असे ऐकलेय. >>> काही चुकीचे लिहिले असल्यास दयाळू मिपाकर क्षमा करतील... ...सगळे मिपाकर दयाळू नाहीत बरें ! बाकी व्य नि. केलाय.

खेडूत यांनी पुणेकरांकडून जी अपेक्षा होती तेच वैद्य सुचवले आहेत पण पुढचा भाग सांगितलेला नाही. त्यांच्याकडून गुण आला नाही म्हणून वैतागून हे ख. वै. सोडून दुसरे चांगले वैद्य कोण असा धागा अनेक मिपाकरांना टाकावा लागतो. एखाद्या व्यावसायिकाची जागा खूप मोठी आहे आणि शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे म्हणून तो व्यावसायिक चांगला असेलच असे नाही.

'नर्मदेतला गोटा' ह्यांचे 'बिटविन द लाईन्स' चे जे वाचन असतेना त्याचे मला कायमच कौतुक वाटत आले आहे. आज राहवले नाही, त्यामुळे त्यांचे जाहिर कौतुक करत आहे. बाकी, saishwari ताई / माई / काकु इ. अहो, आंतरजालावर जे काय वाचायला मिळते ते सगळेच खरे मानून चालायचे नसते हो. चाळीस वर्ष तुम्ही विविध उपचार ट्राय करत असालच की. माझे ऐकाल तर दुसर्‍या त्वचारोग तज्ञाचा सल्ला (ते शेकंड ओपिनियन का काय ते) घ्या. जोडीला असले आयुर्वेद वैग्रे करायला, योगा करायला काय हरकत नाय. असो... उम्मीद पे दुनिया कायम है.

आणि second opinion म्हणाल तर alopathy उपचारांमध्ये असंतुलन संतुलित करण्यासाठी कायमचा उपाय नाही कारण सगळ्या डॉ. नी हि औषधे नेहमीच घ्यायला सांगितली आहेत आणि औषधे पण हीच दिली आहेत कंपनी बदलून.

वैयक्तिक चांगला वाईट काही अनुभव नाही. पण सकाळतर्फे फुकट येणारी फॅमिली डॉ़क्टर नावाची रद्दी पाहून आणि गर्भ संस्कार नावाच्या एका लठ्ठ आकाराच्या पण उपयोगितेच्या दृष्टिने अतिशय फेकू अशा पुस्तकाला पैसे वाया घालवून झाल्यावर तांबे यांच्या कडुन एरंडेल सुद्धा घेऊ नये असं मत झालं आहे. (अर्थात "ओ सजना" ऐकायला ऐरंडेलाचेही पैसे वाया घालवायला नकोत -- इति सर्वश्री तांबे) आणि तांबे यांचे कर्ते धर्ते कोण आहेत हे स्पष्ट असताना त्यात सत्या सत्यतेचा भाग किती हा वेगळाच मुद्दा आहे. असेही वाचले आहे की हे स्वतः डॉ. लावतात ते आयुर्वेदिक डॉक्टर म्हणून नव्हे. त्यांनी कुठेही वैद्यकीय पदवी घेतलेली नाही. आयुर्वेदाचा अभ्यास केला आहे.. त्यांची मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी आहे असे या दुव्यात म्हटले आहे. http://www.lifepositive.com/body/ayurveda/tambe.asp (पदवी / पदविका न घेता औषध देता येते का? आयुर्वेदिक असले तरी.. काही तर रजिस्ट्रेशन / सनद वगैरे असते असे ऐकले आहे).. बाकी व्य नि केला आहे..

+१ सहमत आहे. डॉ. कालाजी लोखंडे*. *ते पण म्याक्यानिकल मी पण म्याक्यानिकल म्हणून मी पण डॉ. पदवी लावली आहे.

+१. असेच म्हणतो. बाकी, मिपाकरांपैकी तांब्यांकडे गेलेल्या कुणाचा बरावाईट कसाही अनुभव आहे काय? असल्यास तेही वाचायला आवडेल.

पेरूगेट भावेस्कूलच्या समोर (राजाराम मंडळाकडे आणि विजय टॉकीजकडे जायच्या रस्त्यावर) वैद्य समीर जमदग्नी यांचं क्लिनिक आहे. माझा वैयक्तिक अनुभव चांगला आहे. पण माणूस अतिशय स्पष्टवक्ता आणि रोखठोक आहे. थोडं काही बोललेलं मनाला लागत असेल किंवा अपमान झाल्यासारखं वाटत असेल तर कृपया त्यांच्याकडे जाऊ नये. (या भागातले बहुतांश डॉक्टर असेच आहेत. पलिकडच्या बोळातले डॉ भट हे नेत्ररोगतज्ज्ञ पण त्यातलेच. गुण जबरदस्त पण आपली कातडी थोडी जाड हवी.)

सरांचा रिझल्ट्च्या बाबतीत प्रश्नच येत नाही,पण अधिक माहिती करता सांगतो आपल्या एका भुतपुर्व राष्ट्रपतींची देखिल उपचार सरांकडेच चालु होते आणी आहेत.

वैद्य स.प्र.सरदेशमुख..आयुर्वेदातले पहिले पी.एच.डी. वाघोली आयुर्वेद कॉलेजचे सर्वेसर्वा..पण वेळ घेउन जा,सर स्वतःअसतील तरच जा,नाहीतर सगळा सावळा गोंधळ आहे.

आपल्यासाठी होमिओपॅथीचा देखील गुण येऊ शकेल असे वाटते. पुण्यात शनिपाराजवळ डॉ. उदय कुलकर्णी हे निष्णात होमिओपॅथी डॉक्टर आहेत. काही दिवस त्यांची ट्रीटमेंट घेऊन बघा.

पर्यायी वैद्यकशाखा म्हंणून आयुवेदा इतकी ( व इतकीच ) होमिओपाथी ही स्वीकारून पहा .चिंचवड येथे डो अशीक बोरा हे गेली ३० वर्षे होमिओपाथ म्हणून यशस्वी आहेत. कुरिअरनेही औषधे पाठवायची सोय आहे.

होमिओपथीसारखी "अ‍ॅट बेस्ट प्लासिबो आणि अ‍ॅट वर्स्ट क्वॅकरी" इतकेच म्हणता येणारी पथी लोकांनी आपल्या कोणत्याही विकारांसाठी (किमान शारिरीक विकारांसाठी) वापरु नये यासाठी विनंती करणं हे मला कधीकधी माझं कर्तव्य वाटतं. यावर अनेक आंतरजालीय वाद घालूनही पुन्हा एकदा न थकता म्हणू इच्छितो. होमिऑपथीवर विश्वास ठेवून अन्य पथी सोडण्यापूर्वी माहिती नीट मिळवा. हां, जर अन्य पथीसोबत साईड बाय साईड होमिओपथी चालू करणार असाल तर खुशाल करा. चारपाच साखरेच्या गोळ्यांनी अपाय काही नाही. :) हा धागा वाचा. मी आरोग्यतज्ञ मुळीच नाही, पण होमिओपथीची निरुपयुक्तता सिद्ध करायला आरोग्यतज्ञाइतक्या ज्ञानाची गरजही नाही असं स्पष्ट दिसतं. त्या लेव्हलच्या कितीतरी अलीकडच्या पातळीवरच ती फेल ठरते. धाग्यात मांडलेल्या मुद्द्याची उत्तरं कोणत्याही होमिओपथी समर्थकाने दिली तर तिथेच त्यातली विसंगती आणि अतार्किक भाग लक्षात येतो.

>>> मी आरोग्यतज्ञ मुळीच नाही, पण होमिओपथीची निरुपयुक्तता सिद्ध करायला आरोग्यतज्ञाइतक्या ज्ञानाची गरजही नाही असं स्पष्ट दिसतं. मला स्वतःला व कुटुंबातील सर्वांना होमिओपॅथीचे खूपच चांगले अनुभव आले आहेत. कावीळ, साधा ताप, सर्दी, जुनाट खोकला, केसात झालेली चाई, पोटदुखी, कांजिण्या इ. अनेक विकार होमिओपॅथीने पूर्ण बरे झाले आहेत. हा काही निव्वळ प्लासिबो परीणाम नाही. औषधांमुळेच हे आजार बरे झाले आहेत. ३-४ वर्षांहून लहान असलेल्या बाळाला आपण जे घेतो ते औषध आहे हे कळत नसते. ते मूल होमिओपॅथीच्या गोळ्या खाऊ समजून खाते. त्यामुळे त्याच्यावर प्लासिबो परीणाम व्हायची काहीच शक्यता नाही. पण इतक्या लहान बाळांचेही अनेक आजार होमिओपॅथीच्या सहाय्याने बरे झाले आहेत. होमिओपॅथीत आजार हळूहळू बरा होतो. त्यामुळे अत्यंत तीव्र स्वरूपाच्या आजारात होमिओपॅथी उपयोगाची नाही. अशा आजारात तातडीची शस्त्रक्रिया किंवा चटकन परीणाम करणारी वेदनाशमक औषधे किंवा स्टेरॉईड्स घ्यावी लागतात. पण आजाराच्या प्राथमिक स्वरूपात किंवा आजार तीव्र स्वरूपाचा नसेल, अनेक आजारांवर होमिओपॅथी नक्कीच गुणकारी आहे हा स्वानुभव आहे. एखादी शाखा निव्वळ प्लासिबो परीणाम म्हणून नाकारण्यापेक्षा स्वतःच त्या शाखेचा थोडा अभ्यास करून किंवा स्वतः पुरेसा अनुभव घेऊन नंतरच मत बनवावे ही नम्र विनंती. आजार अत्यंत तीव्र स्वरूपात असेल तर

स्वतःचे अनुभव शेअर केल्याबद्दल तुमचे आभार.
एखादी शाखा निव्वळ प्लासिबो परीणाम म्हणून नाकारण्यापेक्षा स्वतःच त्या शाखेचा थोडा अभ्यास करून किंवा स्वतः पुरेसा अनुभव घेऊन नंतरच मत बनवावे ही नम्र विनंती.
दोन्ही गोष्टी केल्या आहेत. मी घेतलेला क्वांटिटीबद्दलचा आक्षेप घेण्याइतका अभ्यास केला आहे. क्वालिटी (समजा प्रत्यक्ष औषध पोटात गेलं तर) त्याचा गुण येऊ शकेल हे गृहीत धरुन उलट त्याबाबत शंकासुद्धा उपस्थित केलेली नाही. बाकी जवळच्या नात्यात होमिओपथी डॉक्टर असल्याने होमिओपथी औषधोपचाराचा थेट व्यक्तिगत, फर्स्टहँड आणि इतरांच्या निरीक्षणाचा अनुभव अगदी लहानपणापासून घेतला आहे. प्लासेबो हा एक भाग झाला. लहान मुलांबाबत किंवा अगदी मोठ्यांबद्दलही अनेक रोग प्लासेबो इफेक्टशिवायही आपापल्या ठराविक मुदतीनंतर आपोआप बरे होतात (सेल्फ लिमिटिंग). बहुतांश सामान्य व्हायरल इन्फेक्शन्स यात येतात. त्यावर मॉडर्न मेडिसिनमधले उपचारही केवळ सिम्प्टमॅटिकच असतात. उपचारांसहित सात दिवसात आणि उपचाराविना आठवड्यात बरे होणारे असे रोग होमिओपथीनेच नव्हे अगदी घड्याळाकडे एकटक पाहणे या पथीनेही बरे होतील. प्लासेबो + सेल्फ लिमिटिंग अशा रोगांचे कॉम्बिनेशन होमिओपथी-यशस्वितेच्या कथांना हातभार लावते. मुळात त्यात औषधच अस्तित्वात नसते हा मुद्दा बिनतोड वाटतो.. त्यामुळे पुढे उपाय झाला असं म्हटलं तर मग मूळ द्रव्याचे "स्पिरिच्युअल / चुंबकीय / भारित करणारे" इ इ गुण पदार्थ नसतानाही पाण्याला भारुन राहतात वगैरे अशी थियरी मान्य करावी लागेल. सुपरनॅचरल एकदा का काहीतरी मानलं की तसं तर मग काय ताईत, खडे, नजर कवच हेही मानता येईल..

>>> लहान मुलांबाबत किंवा अगदी मोठ्यांबद्दलही अनेक रोग प्लासेबो इफेक्टशिवायही आपापल्या ठराविक मुदतीनंतर आपोआप बरे होतात (सेल्फ लिमिटिंग). बहुतांश सामान्य व्हायरल इन्फेक्शन्स यात येतात. त्यावर मॉडर्न मेडिसिनमधले उपचारही केवळ सिम्प्टमॅटिकच असतात. उपचारांसहित सात दिवसात आणि उपचाराविना आठवड्यात बरे होणारे असे रोग होमिओपथीनेच नव्हे अगदी घड्याळाकडे एकटक पाहणे या पथीनेही बरे होतील. कावीळ, पोटाचा जुनाट अल्सर, अनेक दिवसांपासून केसात असलेली चाई किंवा अ‍ॅन्टीबायोटिक्स घेऊनसुद्धा बरा न झालेला जुनाट खोकला हे निव्वळ प्लासिबो परीणामाने किंवा आपण औषध घेतले आहे या समजूतीने औषध न घेताच बरे होणारे आजार नव्हेत. हे ठराविक मुदतीनंतर आपोआप बरे होणार आजार सुद्धा नाहीत. तसे असते तर हे आजार कोणतेही औषध न घेता काही आठवड्यात पूर्ण बरे झाले असते. हे आजार म्हणजे सामान्य व्हायरल इन्फेक्शन नसते. हे बरेचसे गंभीर स्वरूपाचे आजार आहेत. कावीळीवर योग्य औषधयोजना न केल्यास मृत्यु ओढवू शकतो. अल्सरवर योग्य उपचार न घेतल्यास आतड्याची जखम वाढून शेवटी आतडे काढून टाकण्याची वेळ येऊ शकते. हे व इतर काही आजार होमिओपॅथी औषधयोजेनेने बरे झाल्याचा माझ्या कुटुंबात अनुभव आलेला आहे. होमिओपॅथी म्हणजे निव्वळ साखरेच्या गोळ्या असतात हा गैरसमज आहे. त्या गोळ्यांवर औषधी अर्क शिंपडलेला असतो. होमिओपॅथी म्हणजे भोंदूगिरी आहे किंवा होमिओपॅथी हे पूर्ण थोतांड आहे हे मत पूर्ण अयोग्य आहे.

एक अनुभव. माझ्या भाच्याला (वय २१) शनिवार १९/१०/२०१३ या दिवशी संध्याकाळी ताप आला होता. रात्री झोपताना लिक्विड क्रोसिन दिल्यावर ताप थोडा कमी झाला, पण परत दुसर्‍या दिवशी ताप वाढला. त्याचे पाय सुद्धा खूप दुखायला लागले. चालताना त्रास व्हायला लागला. सोमवारी युरीनमधून रक्त जायला लागल्यावर संध्याकाळी लगेच एका नातेवाईक डॉक्टरांकडे नेलें. ते अत्यंत अनुभवी होमिओपॅथी डॉक्टर आहेत. तपासल्यावर त्यांनी डेंगूची शक्यता व्यक्त केली व लगेच दुसर्‍या दिवशी रक्त तपासायला सांगितले. डेंगू गृहीत धरून त्याच दिवशी संध्याकाळी औषध सुरू केले. दुसर्‍या दिवशी मंगळवारी सकाळी रक्त तपासल्यावर डेंगूचे निदान नक्की झाले. रक्तात प्लेटलेट्सची संख्या ४६००० इतकी कमी होती (सर्वसामान्य व्यक्तीत ३,००,०० - ४,५०,०० प्लेटलेट्स असतात). मंगळवारी संध्याकाळपर्यंत त्याचा ताप उतरला व बुधवारपर्यंत पाय दुखणे थांबून युरीनमधील रक्त जाणे थांबले. आता तो पूर्वीच्याच उत्साहाने वावरत होता. यावेळी अनेकांनी रूग्णालयात हलवून बाह्यरक्तातून प्लेटलेट्स भरायचा सल्ला दिला व अँटीबोयोटिक्समुळे डेंगू लवकर आटोक्यात येईल असे सांगितले. परंतु माझ्या औषधाने डेंगू बरा होईल असा डॉक्टरांचा विश्वास होता व वेळ पडल्यास मी रूग्णालयात नेण्यास सांगेन असे त्यांनी सांगितले. बुधवारी परत रक्त तपासल्यावर प्लेटलेट्स ३३००० पर्यंत कमी आल्या होत्या. बुधवारी त्यांनी औषध बदलून दिले. गुरूवारी परत रक्त तपासल्यानंतर प्लेटलेट्स ३१००० पर्यंत कमी आल्या होत्या. त्याच दिवशी मध्यरात्री काही कारणाने घोळणा फुटुन त्याच्या नाकातून रक्त वाहू लागले व १ तासानंतर ते कसेबसे थांबले. कमी प्लेटलेट्समुळे रक्त गोठण्याच्या प्रकियेवर परीणाम झाला होता. शुक्रवारी त्यांनी औषध बदलून दिले व लगेच शनिवारी रक्त तपासल्यावर प्लेटलेट्सची संख्या ८५००० वर जाऊन पोहोचली. त्यानंतर ३ दिवसांनी मंगळवार २९/१०/२०१३ ला रक्त तपासल्यावर प्लेटलेट्सची संख्या ३,२५,००० इतकी झाली (नॉर्मल संख्या). ताप आल्यापासून पहिले २ दिवस औषध नव्हते. तिसर्‍या दिवशी होमिओपॅथी औषध सुरू झाल्यावर ४ थ्या दिवशी ताप उतरून पाय दुखणे थांबले व युरीनमधून रक्त जाणे बंद झाले व एकूण १० व्या दिवशी प्लेटलेट्सची संख्या ३१००० वरून ३२५००० वर गेली. बाह्य रक्तातून प्लेटलेट्स न देता, अँटीबायोटिक्स व सलाईन न देता उपचार लागू पडले. 'प्लासिबो' इफेक्ट इतका जबरदस्त काम करतो याची मला कल्पनाच नव्हती. *clapping* *BRAVO* :BRAVO: :bravo: :clapping:

खरं आहे. डेंग्यू झालेले रूग्ण उगाचच रूग्णालयात भरती होऊन अँटीबायोटिक्स घेऊन रक्तात बाहेरून प्लेटलेट्स भरत बसतात आणि डॉक्टर, औषधे व रूग्णालयावर पैसे उधळतात. वर्तनानपत्रे व वाहिन्या उगाचच 'इतक्या जणांना डेंग्यूची लागण झाली, त्यातले इतके जण दगावले' अशा सनसनाटी बातम्या देऊन विनाकारण घबराट निर्माण करतात. डेंग्यू झाल्यावर त्याकडे दुर्लक्ष करून काहीही उपचार न करता नेहमीचाच दिनक्रम सुरू ठेवावा. डेंग्यू आपोआप बरा होईलच.

डेंग्यु निश्चितच प्राणघातक आहे,पण त्यावर हुकमी प्रतिजैविके नाही आहेत.दुसर म्हण़जे साधारणतः सात दिवसानंतर शरिरात त्याचे व्याधीप्रतिकार क्षमत्व तयार होते व प्लेटलेट्स वाढण्यास सुरुवात होते. डेंग्यु झालेले सगळेच रुग्न दगावत नाहीत. त्याची सगळी पॅथोलॉजी मी नाही टायपु शकत तसेच सुबोधसर सिनियर असल्यामुळे ते माझ्या पेक्षा अधिक चांगल्यारितीने समाजाउन सांगु शकतील.हव तर त्यांना व्य नी करा..धन्यवाद.

श्री गुरुजी , डेंग्यू हा एका विषाणूमुळे होणारा आजार आहे आणी त्यामुळे रुग्णाच्या प्लेटलेट कमी होतात आणी त्याला रक्त स्त्राव होतो. भारतात ९ ० % लोकांना डेंग्यू साठी उपचार मिळत नाहीत आणी तरीही ते सुधारतात. जे सुधारत नाहीत ते नशिबाला बोल लावतात. याचे कारण जसे नाकातून रक्तस्त्राव होतो तसा मेंदूची रक्तवाहिनी फुटली तर रुग्णाला लकवा होतो आणी तो आयुष्यासाठी अपंग होऊ शकतो किंवा रक्तस्त्राव जास्त झाला तर प्राणावर बेतते. हि शक्यता १ टक्का लोकांमध्ये असते. प्लेटलेट चे आयुष्य ६ तास असते आणि कमी झालेल्या प्लेटलेट चोवीस तासात भरून निघतात. त्यामुळे आपला रोग आटोक्यात यायला लागला कि त्या आपोआप वाढतातच. फक्त आपण त्या एक टक्क्यात आहोत कि नाहीत हे ज्याचे त्याने ठरवावे ( किंवा ज्योतिषाचा आधार घ्यावा कि आपल्याला मृत्यू योग आहे किंवा कसे). आपल्या भाच्याला कोणताही उपचार न देता तो बरा होण्याची शक्यता ९९ टक्के होतीच. The characteristic symptoms of dengue are sudden-onset fever, headache (typically located behind the eyes), muscle and joint pains, and a rash. The alternative name for dengue, "breakbone fever", comes from the associated muscle and joint pains.[1][9] The course of infection is divided into three phases: febrile, critical, and recovery.[8] The febrile phase involves high fever, potentially over 40 °C (104 °F), and is associated with generalized pain and a headache; this usually lasts two to seven days.[8][9] Nausea and vomiting may also occur.[7] A rash occurs in 50–80% of those with symptoms[9][10] in the first or second day of symptoms as flushed skin, or later in the course of illness (days 4–7), as a measles-like rash.[10][11] Some petechiae (small red spots that do not disappear when the skin is pressed, which are caused by broken capillaries) can appear at this point,[8] as may some mild bleeding from the mucous membranes of the mouth and nose.[5][9] The fever itself is classically biphasic in nature, breaking and then returning for one or two days, although there is wide variation in how often this pattern actually happens.[11][12] In some people, the disease proceeds to a critical phase around the time fever resolves[7] and typically lasts one to two days. यानंतर तो रुग्ण स्वतःच्या प्रतीकारशक्तीने सुधारत जातो मग त्याला काही द्या किंवा देऊ नका. [8] During this phase there may be significant fluid accumulation in the chest and abdominal cavity due to increased capillary permeability and leakage. This leads to depletion of fluid from the circulation and decreased blood supply to vital organs.[8] During this phase, organ dysfunction and severe bleeding, typically from the gastrointestinal tract, may occur.[5][8] Shock (dengue shock syndrome) and hemorrhage (dengue hemorrhagic fever) occur in less than 5% of all cases of dengue,[5] however those who have previously been infected with other serotypes of dengue virus ("secondary infection") are at an increased risk. The recovery phase occurs next, with resorption of the leaked fluid into the bloodstream.[8] This usually lasts two to three days.[5] The improvement is often striking, and can be accompanied with severe itching and a slow heart rate. संदर्भ विकिपीडिया हा धोका आपण घेतलात ते स्वतःच्या जबाबदारी वर. कित्येक लोक विमा उतरवत नाहीत ते स्वतःच्या जबाबदारी वर आणि त्यांची मरण्याची शक्यता १ टक्क्यापेक्षा कमी असते. माझ्या दवाखान्याच्या समोर रेल्वे रूळ आहेत ते डोळे मिटून ओलांडल्यास मरण्याची शक्यता १ टक्का आहे ते सुरक्षित आहे किंवा नाही हे तुम्ही ठरवा असे मी माझ्या रुग्णांना सांगतो. असो आपल्याला होमियोपाथीचा उपयोग होत असेल तर किंवा आपला विश्वास असेल तर आपण त्याचा वापर जरूर करा. शेवटी कुणाच्याही कोंबड्याने का होईना उजाडल्याशी कारण. सर्दी खोकला एलर्जी सांधेदुखी इ साठी होमियोपथी घ्या किंवा घेऊ नका हे ज्याचे त्याने ठरवावे. पण जीवावर बेतणाऱ्या रोगासाठी यात कैन्सर, हृदय विकार मेनिन्जायटीस इ साठी धोका पत्करणे किती बरोबर आहे हे ज्याचे त्याने ठरवावे अधिक काय लिहू पण ते एक आधुनिक शास्त्र आहे हा त्या डॉक्टरांचा दावा त्यांनी सिद्ध करून दाखवावा केवळ मी अमुक तमुक ला बरे केले सगळे तज्ञ किंवा सुपर स्पेशालीस्ट न जे जमले माही ते मी केले अशी दर्पोक्ती करू नये. झाडून सर्व होमियोपाथ असे किस्से सांगत असतात. एक तरी आधुनिक वैद्यकाचा तज्ञ असे सांगताना आढळतो काय कि अमुक तमुक माणसाला होमियोपथी ने काही झाले नाही मी बरे केले. नाही. कारण ते गृहीतच असते. अधिक काय लिहावे

>>> याचे कारण जसे नाकातून रक्तस्त्राव होतो तसा मेंदूची रक्तवाहिनी फुटली तर रुग्णाला लकवा होतो आणी तो आयुष्यासाठी अपंग होऊ शकतो किंवा रक्तस्त्राव जास्त झाला तर प्राणावर बेतते. हि शक्यता १ टक्का लोकांमध्ये असते. माहितीबद्दल धन्यवाद. डेंग्यू झाल्यावर अपंग होण्याची किंवा मरण्याची शक्यता १ टक्के असणे हे खूपच जास्त प्रमाण आहे. त्यामुळे डेंग्यू झाल्यावर तो आपोआप बरा होईल या आशेवर न राहता उपचार घेणे आवश्यक आहे. निव्वळ प्लासिबो इफेक्टमुळे डेंग्यू, खोकला, अल्सरच्या/कोलायटिसच्या जखमा, कावीळ इ. विकार बरे होणे हे अशक्य वाटते. होमिओपॅथी हे आधुनिक शास्त्र आहे का नाही हे इतरांना ठरवू द्यात. वरील विकार होऊन होमिओपॅथीमुळे बरे झालेले बरेच पेशंट माझ्या माहितीतले आहेत. आणि हा त्या डॉक्टरांचा दावा नसून त्या त्या पेशंटची ही माहिती आहे. हे सर्वच जण व त्यांचे गंभीर विकार निव्वळ 'प्लासिबो' इफेक्टमुळे बरे होतात हा दावा खूपच धाडसी वाटतो.

बाकीच्या रोगांचं माहित नाही, पण कावीळ आपोआपच बरी होते. शरीरातल्या ज्या अवयवांच्या पेशी पटपट तयार होतात त्यात एक यकृत आहे. मेंदूच्या पेशी फारच कमी वेगाने/अजिबातच तयार होत नाहीत.
गंभीर विकार निव्वळ 'प्लासिबो' इफेक्टमुळे बरे होतात हा दावा खूपच धाडसी वाटतो.
होमेपदीच्या "औषधां"मधे पाणी आणि साखर वगळता अन्य काहीही नसतं. गविंनी या विषयावर अभ्यास करून चिक्कार लिहीलेलं आहे. ते जरूर वाचा.

डेंग्यू झाल्यावर तो आपोआप बरा होईल या आशेवर न राहता उपचार घेणे आवश्यक आहे. मान्य पण होमियोपथी मध्ये याच्यावर उपचार आहेत हे कुठे सिद्ध झाले आहे. जर असेल तर मला तसे संशोधन वाचायला आवडेल. मी अमुक तमुक इतके रोगी बरे केले असे वैयक्तिक दावे नव्हेत.शास्त्रीय संशोधन हवे. अन्यथा ९ ९ टक्क्यात तो आपोआप बरा होणार आहेच मग होमियोपथी वर तरी खर्च का करा. आधुनिक विज्ञानात असे स्पष्ट पणे म्हटले आहे कि या रोगावर नक्की उपाय आजतरी नाही पण रुग्णाच्या प्लेटलेत कमी झाल्या आणि अंतर्गत रक्तस्त्राव झाला तर तात्पुरता उपाय म्हणून प्लेटलेट चे रोपण करून रुग्ण नैसर्गिकरित्या बरा होईपर्यंत तग धरून ठेवावा लागतो. हे म्हणजे खोल जखमेला टाके घालेपर्यंत आपण स्वच्छ कापडाने जखम दाबून धरतो तसेच आहे. आधुनिक विज्ञान आपल्या मर्यादा ओळखून आहे आणि त्या मुक्तपणे स्वीकारण्यास हयगय करीत नाही. पण इतर लोक आमच्याकडे अमुक तमुक रोगाला औषध नाही असे कधीतरी सांगताना आढळतात काय? त्यांच्याकडे एड्स पासून कैन्सर पर्यंत सर्वांवर रामबाण उपाय असतोच. याला काय म्हणावे? दांभिकपणा? असो. बिनतोड युक्तिवाद करून समोरच्याला आपण गप्प करू शकतो पण त्याचा दृष्टीकोन बदलत नाही. असे असल्यामुळे मी सर्वसाधारणपणे वादात पडत नाही. त्यामुळे अधिक काय लिहावे. आपला नातेवाईक सापाच्या शेपटीवर पाय पडूनही न चावता सुरक्षित बाहेर पडला याबद्दल परमेश्वराचे जितके आभार मानावे तितके थोडे. श्रीगुरुजी, मी आपले उत्कृष्ट लिखाण आवर्जून वाचतो आणि त्याबद्दल मला अत्यंत आदर आहे. वरील वादाचा आणि त्याचा संबंध नाही.

होमिओपॅथीमध्ये काही ठराविक रोगांवर उपचार आहेत का नाहीत हे सिद्ध करणे हे त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचे काम आहे. होमिओपॅथीमुळे अनेक जुनाट व गंभीर रोग बरे झाल्याचा मला व माझ्या परिचयातील अनेकांना व्यक्तिगत अनुभव आहे. असे उपचार म्हणजे 'कावळा फांदीवर बसायला व फांदी तुटायला एकच गाठ पडली' अशा तर्‍हेचे योगायोग आहेत असे मी मानत नाही. कोणतेही औषध नसलेल्या निव्वळ साबुदाण्याच्या गोळ्या घेऊन प्लासिबो इफेक्टमुळे रूग्ण बरे होतात असे मी तरी समजत नाही. कावीळ, डेंग्यू, एक्झिमासारखे त्वचारोग, चाई, अल्सरेटिव्ह कोलायटीस, दीर्घकालीन खोकला इ. विकार प्लासिबो इफेक्टमुळे बरे होणे अशक्य आहे. असो. तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद.

अ‍ॅलोपॅथीवाले बहुतेक जणं होमिओपॅथीला 'प्लासिबो इफेक्ट'च्या नांवाने दूषणे देत असतात. पण, 'प्लासिबो इफेक्टने माझे ६० टक्के पेशंट बरे होतात' असा दावा कधीच कुठला अ‍ॅलोपॅथीचा डॉक्टर करीत नाही. प्लॅसिबो इफेक्ट हा सर्वच पॅथींमध्ये महत्त्वाचे काम करीत असतो. पण होमिओपॅथीला १००% प्लासिबो इफेक्टचे लेबल लाऊन अ‍ॅलोपॅथीवाले नाकारत आले आहेत. ३-४ वर्षांपूर्वी मी स्वतः माझ्या फ्रोझन शोल्डर आणि टेनिस एल्बोने हैराण होतो. अ‍ॅलोपॅथीच्या तज्ञांकडून (एम डी) उपचार आणि भरपूर खर्च करूनही कणभर फरक पडला नाही. हे सर्व डॉक्टर मला माझ्या व्याधीतून मला बरे करतील असा मला १००% विश्वास होता. पण प्लासिबो इफेक्ट कांही झाला नाही. नंतर एका मित्राच्या सांगण्यावरून एका वैदूला भेटायला गेलो (होमिओपॅथी डॉक्टर नाही. ) माझा त्या वर शून्य विश्वास होता पण पिडीत होतो. काहीही उपचार करून घ्यायला तयार होतो. आणि चमत्कार व्हावा तसा माझा वर्षभराचा त्रास १० दिवसांत पूर्ण नाहीसा झाला. आता पुन्ह होमिऑपॅथीकडे वळूया. नुसत्या प्लॅसिबो इफेक्ट्वर एखादी पॅथी इतकी शतकं कार्यरत राहील? मला शंका आहे.

पॅथी कुठलीच पुर्णतः बरोबर नसते आणी चुकही नसते.स्किन मध्ये खरच होमिओपॅथीचे रिझ्लट्स खुप चांगले आहेत.जुनाट आजारांवर आयुर्वेदाशिवाय पर्याय नाही आणी अ‍ॅक्युट कंडीशन मध्ये अ‍ॅलोपॅथी हवी,निर्णय स्वातंत्र शेवट त्या रुग्नाचेच असते.कारण कुठलाही डॉक्टर कितीही दुसर्‍याच्या पॅथीविषयी बोंबलला तरी पेशंट त्याला हवे तेच करतो.

'प्लासिबो इफेक्टने माझे ६० टक्के पेशंट बरे होतात' असा दावा कधीच कुठला अ‍ॅलोपॅथीचा डॉक्टर करीत नाही.
संख्याशास्त्र अशा प्रकारे काम करत नाही. वैद्यक तर नाहीच नाही. औषध घेणे आणि बरे होणे या दोन गोष्टींमधे कार्यकारणभाव आहे म्हणून शुद्ध, १००% प्लासिबो नाकारता येतो. होमेपदी आणि तत्सम "उपचारां"मधे असा कार्यकारणभावच नाही म्हणून तो शुद्ध, १००% प्लासिबो समजला जातो.
... माझा वर्षभराचा त्रास १० दिवसांत पूर्ण नाहीसा झाला.
हे वर्णन वाचून, मॉडर्न मेडिसीनचा परिणाम किंचित उशीराने (delay) दिसायला लागला असेल आणि वैदूने त्याचं क्रेडीट लाटलं याची फार शक्यता वाटते आहे. अनुप यांच्या प्रतिसादाबद्दल
गवि होमिओपदीचे डॉक्टर आहेत का?
I hope not! :) बारावीपर्यंतचं रसायनशास्त्र शिकलं आणि होमेपदीची "औषधं" कशी बनवतात हे माहित असलं तरीही होमेपदीची औषधं पाणी आणि साखर वगळता काहीही नसतात हे समजेल. Avogadro number बद्दल विकीवाचनातूनही उलगडा होऊ शकेल. गविंनी होमेपदीच्या याच बोगसपणाबद्दल बरंच लिहीलेलं आहे. आनंदी गोपाळ यांनीही मागे कुठेतरी होमेपदीला वैद्यक पायाच नाही, किंवा आहे तो कचकड्याचा आहे याबद्दल लिहीलेलं आहे. (वेळ होईल तेव्हा लिंका शोधून देते.) ते स्वतः सर्जन, वैद्यकीय व्यावसायिक आहेत.

(सर्वसामान्य व्यक्तीत ३,००,०० - ४,५०,०० प्लेटलेट्स असतात).
३०००० (तीस हजार) ते ४५००० (पंचेचाळीस हजार) की ३००००० (तीन लाख) ते ४५०००० (साडेचार लाख)?

… ठाण्यामध्ये आयुर्वेदिक वैद्य कोणी आहेत का? त्वचा, केस, आणि इतर रोगावरचे जालीम उपाय सांगू शकतील… विशेषत: मधुमेहसाठी…माझा आयुर्वेदावर गाढ विश्वास आहे… पण रामबाण उपाय लागू झाला पहिजे…. सुज्ञांनी तज्ञांची माहिती नमुद करावी…

अन्नाचे पाचन झाल्यावर उरलेले अपच्य पूर्णपणे शरीराबाहेर न टाकले गेल्यासही बऱ्याच व्याधि होतात .पुनर्नवादि अथवा मंजिष्टादि काढा डोळे मिटून (म्हणजे जास्ती चिकित्सा न करता) एक आठवडा घेऊन पाहा .

डॉ. दिवेकरांचा मला स्वतःला आणि माझ्या कुटुंबियातील अनेक जणांना चांगला अनुभव आला. प्रत्येकाची समस्या निराळी होती, त्यामुळे तुम्ही विचारलेल्या त्रासाचा अनुभव नाही पण इतकेच सांगते की मी हामेरीकेतल्या स्पेशालिस्ट पूढे मी हात टेकले होते ३-३.५ ट्रिटमेंट घेऊन पण समस्या बिकट होत गेली, त्रासही वाढत गेला. त्यांच्याकडे गेलात तर वेळ जास्त काढुन जा, प्रत्येक पेशंटला ते भरपूर वेळ देतात, ते बोलतात, पेशंटचेही सगळे ऐकतात :) दिवेकरांच्या पत्नीसुद्दा आयुर्वेदिक वैद्य आहेत. दिपबंगल्याजवळ आहे त्यांचा दवाखाना (020) 25671391.

ताबे कडून एकदा शतावरी क्ल्प घेतले होते तर त्यात बारीक किडे सारखे काहीतरी होते. तेव्हा पासुन नाही घेत काही त्याच्याकडून.

दररोज ४-५ किमी धावलात तर सगळेच आजार सूंबाल्या करतील. बाकी आमचा एक दोस्त जो आयुर्वेदिक डॉक्टर आहे तो नर्तक्गिरी चौक,पुणे येथे प्रॅक्टिस करतो. अधिक माहिती हवी असेल तर खरड करावी.

उगाच अँजेलिना ताईंनी डबल मॅस्टेक्टमी केली. रोज चार-पाच किमी धावली असती ... तिची अडचण वेगळीच असणार. अमेरिकेत अंतरं मैल, यार्ड, फुटात मोजतात. ४-५ किमी कधी झाले तिला समजलं नसेल. (अवांतरः अशाच प्रकारचा विनोद आचार्य अत्र्यांनी 'साष्टांग नमस्कार' या नाटकात केला आहे.) विनोदाचा भाग वगळता मूळ धाग्याबद्दल, वाचन आणि स्वानुभवातून काही मतप्रदर्शन. मी वैद्यकीय डॉक्टर नाही. ५-१०% स्त्रियांना पॉलिसिस्टीक ओव्हरीजची काही-ना-काही लक्षणं दिसतात असं डॉक्टर आणि आंजाकडून समजलं आहे. याची लक्षणं वेगवेगळी असतात, विकीपीडीयाच्या या लिंकेवर बरीच माहिती आहे. या लक्षणांपैकी एक चेहेर्‍यावर पुरळ, पिंपल्स, एक्ने येणं असंही एक लक्षण आहे. त्यामुळे या प्रकाराबद्दल अजिबात डिप्रेस होऊ नका, तुमच्यासारखे बरेच लोक त्रस्त आहेत. शरीरातलं हॉर्मोन्सचं प्रमाण मोजण्याचं तंत्रज्ञान २०व्या शतकात रोझालिन यालो आणि सोल बर्सन यांनी शोधलं. (यालो यांना मिळालेलं १९७७ सालचं, जन्माने अमेरिकन स्त्रीला मिळालेलं पहिलं नोबेल.) तोपर्यंत सर्व प्रकारचे डॉक्टर्स या क्षेत्रात चाचपडतच होते. त्यानुसार, या संशोधनानंतर आयुर्वेदात काही बदल झाले आहेत का याचा एकदा विचार करा ही विनंती. (माझा आयुर्वेदिक डॉक्टरांबद्दल असणारा अनुभव, विशेषतः हॉर्मोन्स संदर्भातला, अतिशय निराशाजनक आहे. एक तरूण आणि एक अनुभवी वैद्य जोडप्याने शब्दशः हजारो रुपये खर्चायला लावून एकही लक्षण बरं केलं नाहीच. स्वस्त 'अ‍ॅलोपॅथिक' औषधं मात्र मस्त निघाली; दुसर्‍या बाबतीत असे प्राथमिक निष्कर्ष आहेत. हॉर्मोन्ससंदर्भातली औषधं वर्षानुवर्ष घ्यावी लागू शकतात, त्याची तयारी ठेवा.) तुम्हां सर्वांना ही लक्षणं दूर होण्यासाठी शुभेच्छा. हॉर्मोन्सचं प्रमाण व्यवस्थित झाले तर उत्तमच.

… ठाण्यामध्ये आयुर्वेदिक वैद्य कोणी आहेत का? त्वचा, केस, आणि इतर रोगावरचे जालीम उपाय सांगू शकतील… विशेषत: मधुमेहसाठी…माझा आयुर्वेदावर गाढ विश्वास आहे… पण रामबाण उपाय लागू झाला पहिजे…. सुज्ञांनी तज्ञांची माहिती नमुद करावी…

माझा एलोपथिक (एक नव्हे , अनेक डॉ. )चा अनुभव अतिशय निराशजनक आहे. आयुर्वेदीक चा अनुभव आतापर्यंत मात्र खुप चांगला आला आहे पण ते वैद्य नाशीक मधील आहेत

पुण्यातलं माहीती नाही पण नाशकात योगविद्या धाम नावाची संस्था आहे. मला तिथे पाठ अन कंबरदुखी वर चांगला गुण आला. ते १० दिवसांच शिबीर असतं. त्यात योग, आयुर्वेदिक उपचार - एक डॉक्टर आहे इ. चा समावेश होतो. काय खावं हे सुद्धा सांगतात अन १० दिवस योग्य तेच जेवण असतं.