अतिशय सुंदर.. खरं सांगायचं तर मला तुमच्या सर्व लेखांत हा लेख खुपच आवडला.. मला सुद्धा असचं वाटतं की हे सगळेच आवाज हरवल्यात जमा आहेत.
माझ्या लहानपणी भल्या पहाटे पिंगळा (पक्षी नाही हं) दारी यायचा. हाती कंदील, ओठी अभंग अन् अंगावर घोंगडे घेतलेला पिंगळा अताशा दिसतच नाही. त्याच्या पहिल्या प्रहराच्या अभंगांचा आवाज हरवला आहे.
पिंगळ्या नंतर जरा उजाडलं की यायचा वासुदेव. टाळ चिपळ्या वाजवणारा, "वासुदेव आला हो वासुदेव आला" म्हणत स्वतः भोवतीच एखादी गिरकी घेणारा, पांढरा कुडता, धोतर आणि मोरपिसाची टोपी घालणारा वासुदेव खुप आशिर्वाद द्यायचा तेव्हा वेगळाच आनंद व्हायचा. त्याच्या टाळ-चिपळ्यांच्या आवाजाने तर कायमचीच सुट्टी घेतली असावी असं वाटतं :(
रात्र झाली की घराजवळच्या डोंगरावरून कोल्हेकुई ऐकू यायची (हो तेव्हा सातार्यात माणसांची वर्दळ नव्हती) आणि भीती वाटून पट्कन झोप पण यायची.
खरे तर हा लेख अगदी लेटेस्ट नाहिये, मध्यंतरी लिहिलेला, बस थोडीशी छेडछाड करून याला अंड्याच्या फंड्यामध्ये घेतला. तुर्तास वैयक्तिक कामात व्यस्त असल्याने काही सुचायला मागत नाहिये.
आपण वाचता, आवडते त्याबद्दल धन्यवाद. :)
पण एक आवाज मात्र या अंड्याला परत आणायला आवडेल, अन तो म्हणजे त्याचा स्वत:चा आवाज. मोठा होता होता तो देखील कुठेतरी दबला आहे. समाजाने प्रौढांसाठी बनवलेले शिष्टाचार पाळायच्या नादात या अंड्याने शेवटची दिलखुलास आरोळी केव्हा ठोकली होती हे आता तोच विसरला आहे. भारतीय संघ क्रिकेटचा सामना हरताना बघून टीव्ही समोर उभे राहून आपल्याच खेळाडूंना हलक्याश्या आवाजात घातलेली एक कचकचीत शिवी, तोच सामना जिंकल्यावर फटाक्यांनाही लाजवेल असा केलेला जल्लोष, तसाच काहीसा किंवा त्यापेक्षाही भारी असा जल्लोष जो शेजारच्या वाडीतील पतंग गुल केल्यावर व्हायचा, त्याच पतंग उडवायच्या गच्चीतून खालच्या हॉटेलवाल्या सदूशेठला दोन कटींग वरती पाठवायचा दिलेला आवाज, सबंध वाडीतील बत्ती गुल झाल्यावर उत्स्फुर्तपणे होणारा मुलांचा एकच कल्ला ज्यात अंड्याचाही एकेकाळी सिंहगर्जनेचा वाटा होता. हे सारे आवाज एकदा गवसले की मग कानांवर पडणारे इतर नवेजुने आवाज पुन्हा तसेच उपभोगता येतील, अन त्यापैकी कुठलाही हरवलेला आवाज चुटपुट लाऊन जाणार नाही याची अंड्याला खात्री आहे.
प्रतिक्रिया
सुंदरच!
अतिशय सुंदर.. खरं सांगायचं तर
मलाही हा भाग अतिशय
जबरदस्त लिहिलाय हा भाग … बराच
खरे तर हा लेख अगदी लेटेस्ट
हा भाग जास्तच जब्री. विशेषतः
+१
वा..! जियो...
खूप मस्त.
छान आहे!!
आभार सर्वांचे च !
मस्त