Welcome to misalpav.com
लेखक: दशानन | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

जसे मराठी भाषेत पुणेरी भाषा ही उत्तम व कोल्हापुरी म्हणजे.... तसेच
ओ दशानन साहेब रसरशीतपणा अन ..... यातला फरक कळतो का हो तुम्हाला? उगा नको त्याची तुलना करु नये. झाडाचा पिकला आंबा अन केमिकल्स लावुन पिकवलेल्या आंब्यातसुद्धा तुलना करायला जाउ नये. बाकि लिखाण नंबरी. अन का असु नये? पाणी कुठचं हाय? आता माझच बघा इतक ओघवत लिखाण अन अनुभव सोडुन मी भाषेतल्या एका शेर्‍यावर लिहित राह्यले. माणसांच तसच असत, जरा कुठ काय कमी असल की खोदुन खोदुन त्याच्यावरच विचारल जात, नाही तर विचार केला जातो. नजरेला पहिला काय कमी आहे तेच जाणवत. तुम्ही त्याच्या पल्याड जाउन एक कोवळा निरागस जीव रिझवु शकलात. अभिनंदन.

चेपु वर भले भले 'तुमच्यासाठी काय पण' चे बॅनर, इन्व्हिटेशन नि इथं बस मध्ये शेजारी मुलगी. मी तिची जागा पकडतो, ती माझी, डब्ब्यात काय ओळखा डोक्यात गोंधळ सुरु झाला अन वाचतावाचता वाक्य वाचलं.... >>>>ती चे नाव सरु, सरोजिनी. आडनाव व इतर गोष्टी विचारल्या नाही, नंतर विचारेन कधीतरी. असेल वय तीचे १०-१२ वर्ष. पुन्हा पहिल्यापासून वाचलं. आवडलंच. :)

सुंदर. लहान वयातील निष्पाप, निरागस मुलं-मुली त्यांच्या रम्य विश्वात आपल्याला घेऊन जातात. आपण काय रिझविणार त्यांना तेच आपल्याला तणावपूर्ण जीवनातून कांही क्षणांकरीता तरी बाहेर काढून आपल्याला अंतर्बाह्य उजळून टाकतात. छान आहेत तुमचे अनुभव.

खरं आहे काका, लहान मुले म्हणजे एखाद्या राक्षसाला निरागस अश्या बालपणात घेऊन जातात.. आता एक आहे माझ्या सोबत, माझ्या जवळ "आराध्या" ८ महिन्याची आहे पण.. जो काय लळा तीने लावला आहे, त्यातून मी माझे बालपण पुन्हा अनुभवतो आहे.. ती जवळ असली की मी मी नसतोच... तीच्याच वयाचा राजा असतो.. व तोच दंगा, तीच मस्ती आम्ही दोघे मिळून परत परत करतो.. अगदी रडण्यापासून ते मनसोक्त वेड्यासारखे हसण्यापर्यंत.. अजून फार फार तर महिनाभर असेल आमच्या सोबत मग ती पण जाईल... आपल्या स्वतःच्या नवीन घरी.. तीच्या बाबाने नवीन घर घेतले आहे, पण आहे तो पर्यंत हा आनंद का सोडा म्हणून शक्य असेल तेवढा वेळ घरी काढतो आहे, तेवढाच विरंगुळा :)