Welcome to misalpav.com
लेखक: वेताळ | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

किती सत्य आणि किती पूर्वग्रह आहे हे सांगणे कठीण आहे. तरी खालील दुवा वाचावा http://sabuindia.com/index.html

पूर्वीही ही माहिती वाचली होती. संपूर्ण अविश्वसनिय आहे. पूर्वीच्या काळी कधी कुठे ह्या पद्धतीने (त्यातील अतिशयोक्ती वगळून) साबुदाणा बनविला जात असेल तरी ते प्रमाण अतिशय तुरळक असणार. हल्लीच्या काळात हे शक्य वाटत नाही. बाकी प्रत्यक्ष काहीच पाहिलेले नाही, त्यामुळे हे सत्य आहे की निव्वळ खोडसाळपणा हे सांगणे कठीण आहे.

सेलममधे बर्‍यापैकी काळ राहिलेलो असल्याने आणि सेलम कोईंबतूर रस्त्यावर रोजचा प्रवास असल्याने या साबुदाणा फॅक्टरीजमधून अत्यंत घाण वास येतो हे शंभर टक्के सत्य आहे असं फर्स्ट हँड सांगू शकतो. त्यामुळे फर्मेंटेशन / कुजणे असा काहीतरी भाग नक्कीच यात असणार. पण बाकी किडे वगैरे काही माहीत नाही. पण तो प्रोसेसचा स्टँडर्ड भाग नक्कीच नसावा. वाईट ठिकाणी उत्पादन झालं तर कोणत्याही पदार्थाच्या बाबतीत असं होऊ शकतं. आमरसाचे पॅकिंग किंवा आंबापोळी, फणसपोळी बनवण्याच्या दुय्यम दर्जाच्या ठिकाणांमधे प्रत्येक आंबा / फणस पाहून न घेतल्याने आणि रसाची वेळोवेळी पाहणी न केल्याने त्यातही अळ्या वळवळताना पाहिल्या आहेत. नंतर तो रस घोटला जाऊन एकजीव होणे आणि उन्हात सुकल्यावर त्यात मिसळलेल्या अळ्याही सुकणे हे होतच असणार. चांगल्या दर्जाच्या फॅक्टरीत बनलेले सामान घ्यावे हे उत्तम. बर्‍याचदा आपण गावात बनलेले / घरगुती उत्पादन म्हणून उलट प्राधान्याने घेतो, पण मॅप्रो किंवा तत्सम फॅक्टरीत पाळले जाणारे नॉर्म्स अशा "घरगुती" पण व्यावसायिक उद्देशाने बनणार्‍या उत्पादनाबाबत पाळले जातातच असं नाही. साबुदाणा मळीचा हा वास मात्र उसाच्या मळीपेक्षाही जास्त घाणेरडा असतो.. एकदमच असह्य.

साबुदाणा हे बटाटयासारख्या गोड कंदापासून बनविले जाते.
साबुदाणा "टॅपिओका" नावाच्या झाडापासून बनवला जातो. हे झाड भारतात पोर्तुगीजांनी आणलं. त्यांनी आणलेल्या बटाट्याचा आणि साबुदाण्याचा शिरकाव उपासाच्या पदार्थांत कसा झाला हे मात्र नकळे. (माझ्या एका ब्राझीलियन मित्राने "आलगाडो" की काहीशा नावाचा पुडिंगसारखा प्रकार शिजवून आणला होता. त्यात टॅपिओका, दालचिनी हे रेड वाईनमध्ये शिजवलं होतं. सगळ्या लॅटिन अमेरिकनांनी जिभल्या चाटत त्याचा फडशा पाडला, पण माझ्या भारतीय जिभेला काही त्याची चव झेपली नाही.)

@त्यांनी आणलेल्या बटाट्याचा आणि साबुदाण्याचा शिरकाव उपासाच्या पदार्थांत कसा झाला हे मात्र नकळे. >>> या गोष्टिंना तात्विक कारण आहे... उपासाला ''खरकटं'' म्हणजेच धान्य/काहि भाज्या हे घटक चालत नाहीत असं ते तत्व... म्हणून उपवासाचा अजुन एक शब्द,ज्याला निराहार(गरजे इतके सहज पचणारे अन्न सेवन-ते ही एकदाच खाणे) असा आहे.अता यात फळं/दूध आणी उकडलेली कंदमुळं इत्यादीच पदार्थ येत होते/येत असावे. पण माणसातली तत्वनिष्ठ नावाची जमात जी आहे,तिच्या परम दयाळू मनांना ''हे'' असे शोध लागतात,त्यांना फक्त तत्व ''पाळल्याचं'' समाधान हवं असतं.त्यापाठिमागच्या ''व्यवहाराची'' वाट लागते की काय होतं याच्याशी काहिही देणं घेणं नसतं,त्यामुळे-साबुदाणा/बटाटे.रताळे-यांचे चमचमीत(पचायला जड असे) पदार्थ/शेंगदाण्याची उसळ/कुटाची आमटी/उपासाचं थालिपिठ असे वात-कारक/पित्त-वर्धक पदार्थ उपासाला केवळ ते धान्य-नसल्याच्या तात्विक कारणानी चालतात.(पोटाचे १२ का वाजेनात?) पण त्याच्या सेवनानी दुपारच्याला जी छान कचकावून झोप लागते,तिचा उपवासाशी-परमेश्वराच्या संन्निध जाऊन बसण्याशी/उपासना करण्याशी काय संमंध लागतो??? हे कोण सांगणार!? :( मला आपलं असं वाटतं की हे पदार्थ खायला अवडत असतील..मग त्रास होत असो अगर नसो,त्यासाठी ते हवे तेंव्हा करावे,आणी खावे...त्या साठी-
आज आमचा उपास आहे!!!
असं दांभिकपणानी बोलू नै...त्यांनी आपण मानत असलेल्या देवा/धर्माचा काय मान रहातो,हा ही विचार करावा! :)

मागे एकदा ई टिवि वर ७/१२ च्या बातम्या मध्ये बीड च्या काहि शेतकर्यांनी टाकलेल्या साबुदाणा कंदमुळाचे ऊत्पादन आणि प्रक्रिया प्रकल्पाची माहिती पाहिलि त्यात असे काहिहि नव्ह्ते... बाकि वास काय साखरेच्या मळीचा पण येतो.