Welcome to misalpav.com
लेखक: नानबा | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

काय समजलांत !! आम्ही नेहमीच भेटतो, त्याचा वृत्तांत असा काय लिहायचां? इकडल्या कट्ट्यांचे वृत्तांत लिहायला सुरुवात केली तर अन्न हे पूर्णब्रह्म सारखं एक वेगळं सदर सुरु करावं लागेल.

आली का या सातवाहनाची सगळी गँग लगेच ??? आता ठामपावाले, बृमुंमनपावाले,मिभामनपावाले, कडोंमपावाले, विवमनपावाले इत्यादिना जमवणे आले..

ते अनुस्वाराचं नीट जमलंय ना पहावं म्हटलं एकदा, उगीच नंतर डॉक्शाला ताप नको ;) बाकी सातवाहन शब्दाची व्युत्पत्ती "(जिसके) साथ वाहन (लेके बाहेर पडते हैं ऐसा वो)" अशी आहे हेवेसांनल ;)

सध्या आयुष्यात करण्यासारखे बरेच काही असल्याने या वादात पडण्याची इच्छा नाही. अवांतर :- उगाच कुणाला फुकट*टपणा करून काड्या सारायची सुरसुरी आली असेल तर येऊ देत. लक्ष द्यायला तूर्तास टैम नाही आहे. अतिअवांतर :- हल्ली स्पष्ट बोलायचे ठरवले आहे. पोलिटिकल करेक्टनेस लारजेवर पाठवले आहे.

खरं तर कट्टा अजूनही बराच वेळ चालला असता पण मला बाराची शेवटची गाडी गाठायची होती त्यामुळे आवरते घ्यायला लागले. समोर मोठ्या पडद्यावर चाललेला सामना मुंबई इंडियन जिंकत होते. टेबलावर उत्तम नॉन व्हेज प्लैटर आणि उजवीकडे गझलचा लाईव्ह कार्यक्रम. वेळ कसा गेला ते कळलेच नाही. त्यातून मुक्त विहारींचा आग्रह म्हणजे सोने पे सुहागा. ( बिल सुद्धा त्यांनीच दिले मी म्हणे डोंबिवलीचा पाहुणा होतो). एखाद्या चविष्ट सुग्रास जेवणानंतर तोंड गोड करायला केशरी पेढा खाल्ल्यावर केशराची चव कशी जिभेवर रेंगाळावी तसे वाटले.

मी डोंबिवलीचा जावई असल्याने मुवि मला १०० टक्के वर्गणीत सूट देणार होते. ( जावयाचं काही घेउ नये असं आमचे श्वशुरही म्हणायचे) पण मुविनी सिक्सरच मारलेला दिसतोय ! वा वा धन्य ते डोंबोलीकर !!

बिल सुद्धा त्यांनीच दिले मी म्हणे डोंबिवलीचा पाहुणा होतो
आता पुढच्या डोंबिवली कट्ट्याला बरेच 'पाहुणे' जमणार तर! ;)

>>आता पुढच्या डोंबिवली कट्ट्याला बरेच 'पाहुणे' जमणार तर! जे कोणी मिपाकर येणार असतील त्यांच्या जाण्या येण्याचा खर्च (बोरिवलीपासुन डोंबिवलीपर्यंत मेरु एसी टॅक्सी) स्पा करणार आहे असं स्पाच मला म्हणाला आणि हे ऐकल्यावर माझ्या मनात लगेच स्पा आणि मुविंबद्दल अभिमान दाटुन आला. पुढील डोंबिवली कट्ट्याला आमची नक्की हजेरी.

आमची कोणत्याही कट्ट्याला स्वखर्चाने यायची तयारी आहे (बिल परस्पर भरले जाणार असेल तर). आर्मीत म्हणतात ना eat and sleep whenever you can and work if you have to.

इरसालबुवा आणि चौरा - अभ्यास वाढवा! ;-) "माझी दाताची ट्रीटमेंट आहे" हा मी आणि सूडने मिपामराठीला बहाल केलेला वाक्प्रचार आहे! तुम्हाला दर्द-ऐ-दात माहिती नाही..? (अरे ये PSPO नहीं जानता!!!!!) :-D

अरे व्वा..! मिपा सदस्यांची भेट आणि मुंबई इंडियन्सचा विजय.... खास उत्सवी वातावरण. नशिबवान आहात. अभिनंदन.

आव... तुमचा आत्मा कसा त्रुप्त हुनार ? आम्हाला डावी - उजवी बाजू समजतच नाय... केशोवर्तनावरून ओळख करुन देता काय ? म्हंजी ते लय सोप्प्प दिसतया… टोकदार मिशीवाले हे, बिनामिशीचे ते असं :)

@आम्हाला डावी - उजवी बाजू समजतच नाय... केशोवर्तनावरून ओळख करुन देता काय ? म्हंजी ते लय सोप्प्प दिसतया… टोकदार मिशीवाले हे, बिनामिशीचे ते असं >>> आपनास आम्चा फोटू बघायचा हाय काय? ;)

कट्टा वृत्तांत आवडला. डॉ.सुबोध खरे यांनाही कट्ट्यावर पाहतांना आनंद वाटला. मनातल्या मनात : हल्ली कोणत्याही धाग्यावर मूळ विषयावरील प्रतिसादांपेक्षा अवांतर उपप्रतिसाद फारच पडायला लागलेत वाटतं. असो, चालायचंच. -दिलीप बिरुटे

कट्टावृत्तांताने आनंद झाला. फक्त ... एकीकडे मॅच आणि तिथेच दुसरीकडे गझलचा लाईव्ह कार्यक्रम ही अरेंजमेंट फार विचित्र वाटली. कोणीतरी हॉटेलात पैसा कमावण्यासाठी का होईना, गातोय आणि तिथेच लोक मॅचकडे प्रसंगोपात्त लक्ष लावून बसले आहेत याने एक ओळ गावी आणि तिकडे सिक्सर बसावा, की लोक याला दाद द्यायची सोडून मधेच तिकडे चियर करणार असं?? एकवेळ खाता पिता लाईव्ह गझल (कला) ऐकणं आता अ‍ॅक्सेप्ट केलं आहे पण त्यातही एकावेळी दोन ऑप्शन्स?

अहो दोन काय तीन ऑप्शन होते. एकीकडे मैच होती ती म्युट मध्ये होती आणी त्यासमोर फक्त क्रिकेट प्रेमी होते. मुक्त विहारिनी जागा पण अशी मोक्याची पकडली होती कि आम्हाला समोर मैच दिसत होती. उजवीकडे गझल पाहता आणी ऐकता येत होते. समोर नॉन व्हेज प्लैटर होता. (आणी पिणेकरांची पिण्याची सोय होती.)

छोटेखानी कट्टा छानच झालेला दिसतोय. अवांतरः कुठल्याही अधिवेशनाला एखाद्या पक्षाच्या वळचणीला लागण्याच्या नुसत्या शक्यतेच्या भीतीनेदेखील अधिवेशनाला जाणारांची गर्दी कमी होतेच. ;)

छान झालेला दिसतोय कट्टा. वर्णन वाचून डॉ.खर्‍यांना भेटण्याची इच्छा तीव्र झाली. पुढच्या वेळेस.

बर्‍याच दिवसांनी मिपाकरांच्या कट्ट्याचा वृत्तांत वाचायला मिळाला. उपस्थितांची संख्या नेहमीपेक्षा कमी असली तरी कट्टा जोरदार झालेला दिसतोय. यशस्वी आयोजनाबद्दल संबंधीतांचे अभिनंदन. डॉक्टर साहेबांना फोटोत प्रथमच बघून कल्पनेपेक्षा प्रत्यक्षातले व्यक्तिमत्व खूपच वेगळे निघाल्याचा धक्का बसला. ते डॉक्टर आहेत हे ठाऊक नसतं तर त्यांचा फोटो पाहून ते (डॉक्टर नसलेले) लष्करी अधिकारीच वाटले असते :-). बाकी मुविं यांचे मुलांच्या शेतीचे प्रयोग चांगलेच यशस्वी झाले असले तरी कर्मधर्मसंयोगाने डोक्यावरील केसांची शेती थांबून अनेक वर्षे झाले असल्याचे दिसत आहे ;-).

मित्रहो मला स्वतः ला असे वाटते आहे कि माझे कौतुक जर जास्तच होत आहे. कदाचित नवा सदस्य असल्याने असेल पण एक तर तेवढी माझी लायकी नाही आणि मला असे वाटत नाही कि कोणाचे ही व्यक्तीगत रित्या एवढे कौतुक करावे.कोणीही सदस्य मूळ संस्था किंवा समूहापेक्षा मोठा नसतो आणि नसावा. मी आपला आभारी आहे.

सुबोधजी मिपा वर कित्येक नव्या सदस्यांच रॅगिंग कसं कसं घेतलं जातं माहीत आहे ना.. तुम्ही खरचं तुमच्या क्षेत्रातील जाणकार आहात, तुमचे लिखाण, तुमचे अनुभव सगळ्यांनाच आवडतात.. आणि अशांच मिपाकर दिल खोलून कवतिक करतात.. :)

सुबोधजी, लष्करी अधिकाऱ्यापद्धल नेहमीच भितीयुक्त आदर वाटत आला आहे. आपण कदाचित या प्रतिक्रियांना आपले कौतुक म्हणत असाल. पुढल्या कट्टयावर आपणास भेटण्यास नक्किच उत्सुक आहे.

छान छान!! कट्टा वृत्तांत आवडला. सुबोध खरे यांना पाहतांना आनंद वाटला. मुवी तुम्ही चेपुवरच्या फोटोपेक्षा इथे वेगळे दिसताय. पुढच्या वेळेस डोंबिवलीत कट्टा झाल्यास नक्कीच येईन. :-)

नंदी पॅलेसच्या फार जुन्या आठवणी आहेत, आणि त्या पुन्हा उजळाव्या अशा नाहीत हे खरं कारण न येण्याचं, आणि हो कट्टा जरा कौटुंबिक झाला असे प्रतिसाद आले असते ते वेगळेच. असो, पुढच्या कट्ट्याला हजर राहण्यात येईल.

कट्टा झकास झालेला दिसतो. हा कट्टा मला जमणे कठीण होते. असो, पुढील कट्ट्याला भेट होईलच. अवांतर :- जुन्या कट्टे आयोजकांना मरगळ आली असताना नवीन कट्टे आयोजक तयार होत आहेत हे बघून आनंद झाला :-)