Welcome to misalpav.com
लेखक: चिंतातुर जंतू | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

श्रद्धांजली आवडली.पटली देखील. आत्ता मी त्यांच्याशी मनातल्या मनात बोलतो आहे. श्रामो अहो तुम्हाला श्रद्धांजली वाहताना आमच्या अंनिस तल्या लोकांनी त्याला श्रद्धांजली न म्हणता आदरांजली म्हणल असत. श्रद्धा शब्दाच वावड आहे ना! त्यावर श्रामो मंद मिश्किल हसले असते

पण मी तर लाल सलाम ठोकणार होतो. मग म्हटलं की ते अगदीच माओवादी होईल आणि मग इतक्या डावीकडे माझं वळणं मोडकांना रुचणार नाही. त्यापेक्षा किंचित उजवीकडे वळलेलं काय वाईट?

वाचत आहे. श्रामोंशी व्यक्तिगत परिचय होण्याची शक्यता निर्माण होऊनही ते झालं नाही. आता अशा लेखनातूनच त्यांना थोडफार समजून घेता येईल.

असेच म्हणतो. मिपापेक्षाही पुस्तकविश्वच्या माध्यमातूनच त्यांच्याशी संपर्क असे. पण प्रत्यक्ष भेटणे राहूनच गेले.

पर्फ़ेक्ट! ***
"आणि गंमत म्हणजे कदाचित मोडकांची ओळख होण्यापूर्वी मी त्या माणसाला 'तुला काही कळत नाही; तू मूर्खासारखं बोलतोयस' असं उद्दामपणे तोंडावर सांगितलं असतं आणि स्वत:कडे कटूपणा ओढवून घेतला असता. म्हणजे कळत-नकळत माझ्यावर त्यांच्या शैलीचा प्रभाव पडला होता आणि बहुतेक हेसुद्धा लक्षात येऊन ते त्यांचं गोड हसू खुदकन हसत असणार."
सतत दुसर्‍यांना 'मोठे व्हा' म्हणणारा हा माणूस पक्का कृतीशील असल्यामुळे अनेकांना असं मोठं करूनही गेला...

मी मोडकांना एकदाच भेटलो आहे, पण चिं. जं. नी वर्णन केलेलीच व्यक्ति आठवत होती गेले दोन दिवस भर. बिका, चिं. जं., मोदक आणि श्रामोंचे इतर अनेक सुहृद: तुमच्या वैयक्तिक हानीची केवळ कल्पनाच करू शकतो, मनापासून सांत्वन! (वयाच्या पंचेचाळीशीत अशी लाखमोलाची माणसं निघून जातात, आणि आम्ही पुढच्या पंचवार्षिकात, दशकात, यंव करू आणि त्यंव करू म्हणून वेळ काढतो! आयुष्यात काही भलं करायची वेळ असेल तर ती आत्ता आहे, उद्या-परवा नाही, याची प्रकर्षाने जाणीव झाली!)

"जे घडत आहे, ते फक्त पाहत रहा, रिअ‍ॅक्ट होऊ नकोस. शांत रहा, मी आहे सोबत. डोक्यात कुठले विचार घेऊन नकोस. भाड्या, एवढी भटकंती केली आहेस, त्यातील काही छानसे आठवत पडून रहा. समजले!" ३१ डिसेंबर २००९, जेव्हा मला अपघात झाला, जिवावरचे पायावर निभावले तेव्हा श्रामो घरातील एका मोठ्या व्यक्तीसारखे माझ्या सोबत होते.. तसे ही माझ्या घरी मोठे कोण आहे. माझी एवढी गुपिते श्रामोंना माहीत होती की मी त्यांना म्हणत असे श्रामो एखादं गुपित विसरलो तर तुम्हला विचारेन, लगेच सांगाल. "राजे, जगायला शिक, खूप मस्ती झाली आयुष्यासोबत. स्थिर हो, स्थिर हो." बेंगलोरला शिफ्ट झाल्यावर त्यांना हे सांगण्यासाठी फोन केला तेव्हा म्हणाले होते. "लग्न केलेस चांगले केलेस, पण तिच्या आई-वडिलांचे मन नाही वळवू शकलास तर मग तुला राजे का म्हणायचे.." - श्रामो परवाच तर लग्नाला येण्याचे जमवतो म्हणाला होता राव! या सहा महिन्यात २ हक्काचे काका गमावले! (श्रामो मला म्हणायचा, मी काका काय, लेका तु माझ्याच वयाचा आहेस, मला माहीत आहे..)

इतकी उत्तुंग माणसे वावरतात मिपावर? आणि त्यांचा मला साधा परिचय देखील नाहि :( गप्पांचे फड वगैरे तर फार लांब राहिले. मी काय मिस् करतोय याची फार प्रखरतेने जाणिव होतेय :( अर्धवटराव

+१ "मी काय मिस् करतोय याची फार प्रखरतेने जाणिव होतेय"

चिं जं भावना पोहोचल्या. ४५ पर्यंत लग्न पोरं यावर लढाई जिंकल्याचा आव आणणारे आम्ही निदान श्रामोंच्या अयुष्यात थोडक का असेना पण डोकावु शकलो हेच फार मोठं आहे. मी शेतकरी असल्याने एकदा एक प्रतिसाद दिला होता धरणग्रस्तांच्या लेखावर अन तेथे श्रामो तू या बद्द्दल अजुन लिही अस म्हणाले होते, पण मनात इतका राग आहे ध्रणग्रस्तांचा प्रश्न हाताळणार्‍या प्रशासनाबद्दल की काहीच लिहावेसे वाटले नाही. आज वाटतय थोडा वेळ काढुन सांगायला हवे होते मला काय म्हणायच आहे ते ही. डाव्या बाजुबद्दल फारशी आत्मियता नसल्यानेही मी कायमच वाचन्मात्र रहाण पसंत केल, अगदी या जळत्या वास्तवाची प्रखर जाणिव असुनही, त्या जळत्या लाकडांचा एक भाग असुनही. श्रामोंबद्दलची आदरयुक्त भावना तुमच्या इतक्या ताकदीने माम्डालयला जमली नसती. तुमच्या इतका संबंधही नाही आला त्यांच्याशी. तुमच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत एव्हढच. तसही आज सकाळी चहा पिताना सहज एक वाक्य बोलुन गेले धन्याला," मेलं संपल! नवा धागा, नवे प्रतिसाद" पण हे म्हणताना किती दाटुन आलेलं आहे ते माझ मलाच माहित. नुसत्या वाचनाने माहित असलेला हा माणुस इतका स्पर्शुन जाइल हे खरच माहित नव्हत.

श्रामोंची एक कविता वाचून त्याना ती आवडल्याचा फोन केला होता. त्यांनी काय करतो ते सांगितल्यानंतर मी विचारले तुम्ही " साधना" मधे काम करता. श्रामो मिश्कील पणे म्हणले नाही नाही इथे ध चा म करा.

हे लिहील्याबद्दल धन्यवाद! अशा सगळ्या लिखाणातून तो माणूस उमजायला मदत होईल. आपण नेमकं काय गमावलंय हे अजून समजत जाईल.

श्रामोंविषयी इतरांचे मत जाणून घ्यायला कायमच आवडत आले आहे, आणि बर्‍याचदा ते समानच अस्ते असा अनुभव आहे. पण प्रामाणिक पणे सांगायचे झाले, तर हे लेखन म्हणजे ५ टक्के श्रामों विषयी आणि ९५ टक्के स्वतःची पाठ थोपटून घेणारे वाटले.

सहमत. पण हे मुद्दाम होत नसावे. अशा प्रसंगी कसे लिहावे ह्याचे सर्वांनाच ज्ञान असते असे नाही. त्यामुळे, लिखाणात वैयक्तिक अनुभवांचा जास्त प्रभाव असतो आणि वैयक्तिक अनुभव म्हंटले की स्वतःबद्दल लिहीणे हा त्या लेखनाचा अविभाज्य भाग बनतो. पण प्रत्येकाने वेगवेगळा धागा काढण्याऐवजी चिंतातूर जंतुं ह्यांच्या धाग्यावरच प्रतिसाद रुपात आपले लेखन केले असते तर ते जास्त औचित्यपूर्ण झाले असते.

मोडक वारले. वाईट झाले. रेड सन संदर्भातले त्यांचे लिखाण फार आवडले होते. स्वतःबद्दल जरा कमी लिहिले असते तर बरे झाले असते. मोडकांबद्दल आणखीन किती धागे निघणार? प्रत्येकजण आपली त्यांच्याशी कशी घसट होती हे सांगण्याचा प्रयत्न करतो आहे असे वाटते. एखाद्या व्यक्तीच्या जाण्याचा (अनवधानाने की जाणतेपणी ते ठाऊक नाही) असा वापर व्हावा हे खटकले.

>>अशा प्रसंगी कसे लिहावे ह्याचे सर्वांनाच ज्ञान असते असे नाही. त्यामुळे, लिखाणात वैयक्तिक अनुभवांचा जास्त प्रभाव असतो आणि वैयक्तिक अनुभव म्हंटले की स्वतःबद्दल लिहीणे हा त्या लेखनाचा अविभाज्य भाग बनतो.
हे लिखाण माझ्याविषयीच आहे. किंवा खरं तर माझ्या थिटेपणाविषयी किंवा कोतेपणाविषयी आहे. आणि त्याची जाहीर कबुली द्यायला मला ज्यामुळे भाग पडलं आहे ते कारण म्हणजे मोडकांचं अकाली निधन असं तुम्ही समजू शकता. असो.

बरेच महिन्यांनी.. जवळपास आठ महिन्यांनी मिपावर आलो. मिपा उघडताच श्रामोच्या आठवणींचे लेखन आणि श्रामो गेल्याची बातमी. मी हादरलोच. पूर्वी श्रामोंची आणि माझी काही कामानिमित्ताने अनेकवेळा भेट झाली होती. उमदा माणूस गेला. फार वाईट झालं. त्यांचे लेख, लेखन मला फार आवडायचे. मिपाकरांनी दिलेल्या प्रतिक्रिया, श्रामोच्या आठवणींचे लेखन वाचून श्रामो डोळ्यासमोर उभे राहतात. देव त्यांच्या आत्म्यास शान्ती देवो..