ही बाई जिवंत असताना सगळे तिला बिनडोक म्हणायचे. ती हात धरते कारण ती रस्ता चुकते. आता ज्या भुताला मुंडकं नाही त्याला डोळे नाहीत, डोळे नाहीत तर दिसत नाहीत, पण परोपकार नावाची गोष्टच मुळी मानवात नाहीच.
कस काय जमत तुम्हाला राव...
आजकाल भूतलोकातही युरोझोन सारखे प्रॉब्लेम सुरू झालेले दिसतात. नाही म्हणजे पूर्वीसारखं माणसांना कःपदार्थ समजून फक्त घाबरवयाचं सोडून माणूस-भूत संबंध सुधारण्याचे प्रयत्न सुरू झाले म्हणून संशय येतोय !! ;)
पण खुसखुशीत भाषेतले हे नविन "ज्ञान" आवडले :). तुमची भुतातल्या रूपातली भुते परवडली अशी माणसाच्या रुपातली भुते त्रास देतात ;) त्यांच्यावरचा काही उतारा असल्यास सांगा. मिपावरची एक कोंबडीची आणि एक नारळाची पाकृ तुमच्यावरून ओवाळून टाकू बघा :)
भूत-माणूस संघटनेचा विजय असो ! अरे हा टीव्ही कसा काय आपोआप सुरू झाला??? पळा...
कर्णपिशाच्चाची बाधा होते?
मी तर ऐकले होते कर्णपिशाच्च वश होते.
अवांतरः काही संस्थळांवर काही खास व्यक्तीना कर्णपिशाच्च वश असते. त्याना वैयक्तीक सम्देशही दिसु शकतात.
काही संस्थळांवर काही खास व्यक्तीना कर्णपिशाच्च वश असते. त्याना वैयक्तीक सम्देशही दिसु शकतात.
'ऐकू शकतात' असे म्हणायचे आहे का ? कर्णपिशाच्च 'दाखवत' नाही, 'ऐकवते'.
बाकी लेख छान. प्रश्न झाले.. उत्तर झाले.. आता अपेक्षीत २१.. पुरवणी वैग्रे पण येऊ द्या.
आपले प्रश्न आणि अडचणी मिपा कटट्यावर मुद्देसूद मांडल्याबद्दल हाडापासून आभार .मानवलोक आपल्याला लागणाऱ्या वस्तु नियमाने अमावस्येला देण्यात टाळाटाळ आणि कंजूसी करतात याची मला फारच चीड येते .पुढेमागे सुधारतील अशी आशा करतो .मानवजात दिवसेंदिवस सुखासाठी भगतांना न विचारता एका छोट्या उजेड पडणाऱ्या डबीतून कोणाशी बोलत असते ?
प्रतिक्रिया
:)
कस काय जमत तुम्हाला राव...
आजकाल भूतलोकातही युरोझोन
कर्णपिशाच्चाची बाधा होते?
काजुभौ
आपले प्रश्न आणि अडचणी मिपा