रासायनिक कीटकनाशकांचे दुष्परिणाम यावर खूप काही लिहिण्यासारखे आहे. पण आपण अमेरिकेकडून नको त्याच गोष्टी शिकतो. ओझोन थराचे नुकसान करणारे वायु प्रचंड प्रमाणात वापरले जात आहेत. एकूणच पर्यावरणाची हानी याबद्दल कोणाला काही पडलेले नाही अशी आपल्याकडची अवस्था आहे.
डीडीटीवर बंदी आणली असेल तर उत्तमच. पण तसलेच काहीतरी म्युन्सिपालिटीचे लोक नियमाने फवारत असतात. आणि तरी दरवर्षी मलेरिया, डेंग्युच्या साठी येतातच. केवळ पैशांसाठी गोव्याच्या गेल्या सरकारने खाणींना अंदाधुंद परवानग्या देताना गोव्यात ढाण्या वाघाचे अस्तित्वच नाकारले होते. ही आमच्या पुढार्यांची एकूण पर्यावरणविषयक जाण.
अमेरिकेडून नको असलेल्या अनेक गोष्टी आपण उचलतो आहोत, त्यात त्यांचे फसलेले आर्थिक धोरण सुद्धा आहे. पूर्ण बाजार नियंत्रित अमेरिकेतल्या मोठ्यामोठ्या बँका, वित्तीय संस्था अचानक बुडल्या आणि अमेरिका कर्जबाजारी म्हणण्याच्या अवस्थेला पोचली आहे तरी आपल्याकडच्या चांगल्या नफ्यात चालणार्या आणि त्याच वेळी दुर्बल घटकांना मदत करणार्या सरकारी बँका खाजगी क्षेत्रात नेण्याची धडपड चालू आहे.
सगळं वाचून उद्वेग येतो. पण आपण काय करू शकतो? एवढा मोठा लढा एकहाती सुरू करणारी रेचल कर्करोगाने मृत्यु पावली हे केवळ दुर्दैवच!
आजकाल बरेच जुने लेख वर काढले जाताहेत तर म्हटलं ह्या काहीशा दुर्लक्षित लेखावर अजून काही चर्चा होतेय का ते पहावे, म्हणून वर काढत आहे. धागा वर काढल्याबद्दल आगाऊ क्षमस्व!
विषय खरच अवघड आहे. डास, रोगजंतू, पिकांवरील कीड वगैरेचा नायनाट करुन लोकांचं जीव प्रत्यक्ष वाचवणारे खरे मानायचे कि त्यांचा व्यापार करण्यासाठीच ते बनवलं जातं हे खरं मानायचं? हाच प्रश्न जी.एम.ओ बद्दल (याविषयी घासु गुर्जींची फार सुंदर लेखमाला आहे मिपावर) ? मुळात व्यापारी वृत्तीच चुकीची मानायची ? त्या नफेखोर वृत्तीला उपाय म्हणुन सर्वकाहि सरकारी करावं तर सरकारी हुकुमशाहीचा धोका. व्यापार करावा, लोभ करु नये वगैरे गोष्टी थेअरी म्हणुन ठीक. प्रत्यक्षात आचरणात कसं आणायचं ? कुणी तसे नियम आणतो म्हटलं मॉरल पोलीसींग नको म्हणुन नाकं मुरडायला आपण तयार.
सामान्य माणसाने कितीही वैज्ञानीक विचार करुन निर्णय घेतो म्हटलं तरी रसायनांचा दूरगामी परिणाम वगैरे विषय त्याच्या डोक्याबाहेरचे आहेत. संबंधीत संस्थांच्या टेस्ट निकषांवर विश्वास ठेवण्यापलिकडे माणुस काहिच करु शकत नाहि. रासायनीक उद्योगांच्या नफेखोरीवर तावातावाने बोलणारा सामान्य माणुस कोणि जैवीक उत्पादनं वगैरे वापरा म्हटलं त्याला अवै़ज्ञानीक, सनातनी इ. विशेषणं वापरुन जगणं नकोसं कराण्यात देखील पुढे असतो.
याचा फैसला बहुतेक निसर्गच आपल्या पद्धतीने करेल, व तो स्विकारण्यापलिकडे माणसाच्या हातात काहिच नसेल.
प्रतिक्रिया
उत्तम लेख
उत्तम लिहिलं आहेस.
आजकाल बरेच जुने लेख वर काढले
क्या करे क्या ना करे...
रेचेल कार्सन बाई व त्यांच्या
अवांतर