Welcome to misalpav.com
लेखक: पिंपातला उंदीर | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

कोसला वाचली होती पण अशा मुद्द्याचा विचार मनात कधी आला नव्हता बाकी, तुम्हाला जे सुचलं त्याला आपण मानलं. आणि समजा ते पात्र तसं आलं असतं तर काय झालं असतं ? गावगाड्यात वावरणारा पांडुरंगाला घरातल्या वातावरणातून जगण्याचे प्रश्न महत्त्वाचे वाटले आणि त्याभोवतीच तो घुटमळतो त्याला मुली जवळच्या कशा वाटतील ? बाकी, तुम्ही पुन्हा एकदा कोसला वाचायला लावता असे वाटले. -दिलीप बिरुटे

@बिरुटे सर धन्यवाद. पण पांडुरंग सांगवीकर हा सधन सुखवस्तू घरातला. त्यामुळे जगण्याचे थेट असे कुठलेच प्रश्न त्याला नव्हते. जगण्याचे प्रश्न म्हणजे नेमके कुठले हे स्पष्ट केले तर चांगले होईल : )

पांडुरंग सधन शेतकर्‍याचा मुलगा आहे ते माहिती आहे. एका खेड्यातून शहरात शिकायला गेलेला हा मुलगा म्हणून तो गावगाड्यातून आला आहे, असे मी म्हणतो. तरुणांचे जे प्रश्न आहेत ते सर्व तरुणांचे जे प्रश्न त्यालाही सतावतात, समाजातील भंपकपणाची त्याला चीड येते हे आणि अनेक सर्व प्रश्न त्याचे जगण्यासंबंधीच्या निमित्तानंच येतात अनेक गोष्टी त्याच्याभोवती फेर धरतात लग्न, शिक्षण, अध्यात्म, असे अनेक विषय...प्रश्नच आहेत. तो समाजापासून तुटतो, दु:खी होतो, त्याला सूड घ्यावा वाटतो... हे सर्व कोसलात आहे. पांडुरंग एका जिवाभावाच्या मित्राबरोबर मला वाटतं बोलतो म्हणून त्याला तशा अंगाने पाहणं मला काही झेपलं नाही. म्हणूनच म्हणालो की पुस्तक आणून तशा काही अर्थाने वाचावं लागतं की काय ? मिपाकर नंदन ने 'कोसला आणि कॅचर इन द राय'वर मागे लिहिलं होतं. अगदी तपशिलवार दोन कादंबर्‍याची तुलना केली होती. अधिक अधिकारवाणीनं नंदनचं मत वाचायला आणि तसं काही दिसतं का तेही समजून घ्यायला आवडेल...! अवांतर :'चिंटू'कार प्रभाकर वाडेकर कालवश :( -दिलीप बिरुटे

कोसलाचा वेगळ्या कोनातून विचार आवडला. अर्थातच एखाद्या साहित्यकृतीतून अनेक अर्थ काढता यावेत हे त्या साहित्यकृतीचं यश मानावं का याबद्दल मला जरा संभ्रम आहे, अनेक शक्यता व्यक्त करणारी कथा चांगली समजावी की सुस्पष्ट एकच अर्थ (जो कदाचित लेखकाला अभिप्रेत आहे तो) वाचकापर्यंत पोचवणारी कृती जास्त श्रेष्ठ समजावी? मुळात लेखकच असे लिहिताना संभ्रमात असेल तर? त्या काळात समलैंगिकता ही उच्चार सुद्धा न करण्याची गोष्ट होती. हिंदी सिनेमातही नायक आणि त्याचा मित्र यातली दोस्ती अनेकदा नायिकेपेक्षा जास्त जवळची वाटेल अशा प्रकारची दाखवली जायची. शक्य आहे की सांगवीकरवर अशाच सिनेमांचा प्रभव पडलेला असू शकतो, किंवा बिरुटे सर म्हणतात तसे जगणे हीच चैन असेल तर इतर गोष्टी पार दुय्यम वाटू लागतात...

पैसा ताई कलाकृती मधून अनेक अर्थ निघन हा अनेक वेळा महान कलाकृतीच लक्षण मानल जात. अकिरा कुरोसावाची फिल्म राशोमान जी जगातल्या सर्वोत्कृष्ट कलाकृती मध्ये मानली जाते तिचा शेवट पण तसा ओपन एंडेड आहे. अनेक शक्यता असल्यावर अन्वयार्थ लावण्याची जबाबदारी येते ती वाचक / प्रेक्षक यांच्यावर. And that's the beauty. तुमच मत पण विचार करायला लावणार आहे पण

राशोमान सारखी कलाकृती जेव्हा त्याच उद्देशाने तयार होते तेव्हा ती नि:संशय महान बनते हे नक्कीच. ते अनेकदा ती कलाकृती सादर करणार्‍या कलाकाराच्या क्षमतेवर अवलंबून असते. पण जेव्हा लेखकाचा स्वतःचा उद्देश तसा नसेल तर ती कलाकृती फसली असे म्हणता येईल. कदाचित लेखक स्वत:च गोंधळलेला असेल तर कलाकृती गोंधळलेली वाटेल. तरीही एखाद्या कलाकृतीमुळे रसिकाला येणारी अनुभूती माणसागणिक बदलू शकेल. ते त्या वाचणार्‍याच्या विचारावर आकलनशक्तीवर अवलंबून असेल. 'कोसला' च्या बाबतीत तुम्ही म्हणताय तसे स्वतः नेमाडे याबद्दल काही बोलत नाहीत तोपर्यंत आपण असे अंदाजच व्यक्त करू शकतो. त्यातले तुम्ही दिलेले अनेक उल्लेख असे गोंधळवणारे आहेत हे नक्कीच.

विचार करण्यासारखे आहे, कादंबरी परत वाचावी लागेल असे वाटते. पूर्वी वाचली होती तेव्हा मी बरीच लहान होते आणि अशी काही शक्यता ध्यानी येण्याइतकी प्रगल्भता नव्हती असे वाटते. >>कलाकृती मधून अनेक अर्थ निघन हा अनेक वेळा महान कलाकृतीच लक्षण मानल जात. हम्म, इंटरेस्टिंग.

दुसरे उदाहरण - शटर आयलंद नावाचा विन्ग्रजी सिनेमा, किवा झालच तर इन्सेप्शन.

हं.... विचारात पाडणारा प्रश्न... पण मला नाही वाटत सांगवीकर समलैंगिक असेल असं. तुम्ही दिलेले सुरेश वगैरेचे उल्लेख बरोबर आहेत, पण आयुष्याच्या एका टप्प्यावर समलिंगाच्या व्यक्तीबद्दल आकर्षण वाटणे आणि समलैंगिक "असणे" यात फरक आहे. बरं ते आकर्षण जरी सातत्याने वाटत राहिलं, तर किमान ते स्वतःशी कबूल करण्याइतका प्रांजळपणा* पांडुरंगकडे असेल असं वाटत नाही. (पण हा कदाचित मी लावलेल्या कोसलाच्या अन्वयार्थाचा परिणाम असेल.) "कमिंग आउट ऑफ द क्लोजेट" जगासाठी तर सोडाच, पण स्वतः पांडुरंगसाठी तरी होताना दिसत नाही. अजून एक शुद्ध वैयक्तिक मतः समजा नेमाड्यांना पांडुरंगला समलैंगिक दाखवायचं असतं, तर कदाचित कादंबरी वेगळ्या वाटेने गेली असती. *अधिक योग्य शब्द न सुचल्याने

+१. कोसलात तसे दिलेले उल्लेख किती, त्यांची सूचकतेमधीलही स्पष्टता किती हे पाहिल्यास जनरलायझेशन अंमळ जास्तच वाटते.

हिंदी चित्रपटवाल्या बिनडोकांनी गे' व्यक्तिमत्त्वांचा विनोद निर्मितीसाठी उपयोग सुरू केल्यापासून (अपवाद ऋतुपर्णो घोषच्या 'मेमरीज इन मार्चचा', पण इथेही पिफ्फसारख्या ठिकाणी देखील प्रेक्षकांना अस्थानी हसताना पासून पूर्वग्रह हेच बलवान असतात याचा प्रत्यय आला, पण ते असो.) किंवा तथाकथित स्वातंत्र्यवाद्यांनी स्वातंत्र्याची सांगड 'होमोफिबिया'शी घातल्यापासून जिथे तिथे या गे असण्याचे/नसण्याचे मूल्यमापन सुरू झालेले दिसते. पांडुरंग 'गे' आहे की नाही याबाबत मत व्यक्त करायचे त्याने करावे पण इथे कार्यकारणभावाची जी भयंकर गल्लत होते आहे तेवढ्याच मुद्द्याबाबत मी बोलतोय. कॉलेज मध्ये असताना मुली दिसल्या की पांडुरंग आपला रस्ता बदलतो. सहली ला गेल्यावर मुली पासून दूर पळण्याला प्राधान्य देतो. प्रसंग कुठलाही असो आपण मूलीना शरण जात नाही असा सार्थ अभिमान त्याला असतो. नाही म्हणायला रमि नावाची एक मुलगी त्याच्या आयुष्यात येते. पण तिला असणार्‍या फुफ्फुस च्या विकारामुळे निव्वळ सहानुभूती पोटी पांडुरंग तिला बोलतो . एकूणच करमणूक म्हणून पण मुली वैतागच असे पांडुरंग चे मत.>> यातून फारतर पांडुरंगाला स्त्रीद्वेष्टा म्हणता येईल वा त्याला फीमेल-फोबिया आहे असे म्हणता येईल. भारतासारख्या लैंगिक-दमन-संस्कृती देशात असे हजारो पांडुरंग सापडतील. तेवढ्यावरून त्याचे 'गे' असणे सिद्ध होत नाही. (उरलेले सुरेशबाबतचे विवेचन अलाहिदा). 'गे' प्रवृत्ती निर्णायकरित्या सिद्ध करण्यासाठी समलैंगिक आकर्षण सिद्ध करावे लागेल (विरुद्धलिंगी तिरस्कार पुरेसा नाही!!!) एखाद्या साहित्यिक कृतीने, चित्रपटाने, ध्वनिमुद्रिकेने मला/समाजाला/लेखकाला काय दिले, तिचा/त्याचा त्या त्या माध्यमात परिणाम वा स्थान याची चर्चा करणे समजू शकतो. एखादे पात्र समलैंगिक आहे की नाही याची चर्चा नक्की काय साध्य करते? कदाचित धागाकर्त्याने 'समजा तो समलैंगिक असेल तर त्या कादंबरीच्या आकलनात असा असा फरक पडतो, पारंपारिक/आजवरचे आकलन असे असे उघडे पडते वा बाधित होते' हे मांडून दाखवले असते तर काही उजेड पडला असता. अन्यथा हा धागा नुसतेच निरर्थक चर्चेचे गुर्‍हाळ चालू केल्यास कारणीभूत होईल नि लेखकाला फारतर प्रतिसाद मोजून आपले लेखन लैच प्रतिसादांचे धनी झाले म्हणून कॉलर वर करून हिंडायला सहाय्यभूत होईल इतकेच. या संदर्भात अन्यत्र 'डोरियन ग्रे' चा उल्लेख झाला आहे. डोरियन ग्रे ही कादंबरी माझ्या अतिशय आवडती आहे. केवळ लेखकाच्या नावावरून नि त्याच्याबद्दलच्या कथित प्रवादांवरून त्यात समलैंगिकता आहे असे म्हणावे हे थोडे अन्यायकारक आहे असा माझा समज आहे समलैंगिकतेचा आरोप (आरोपण या अर्थी, गुन्हा या अर्थी नव्हे) फक्त बेसिलच्या डोरियनबद्दलच्या भावनांबाबत करता येऊ शकतो. पण तिथेही तो फक्त डोरियनच्या चित्राबद्दल (खुद्द डोरियनबद्दल नव्हे) बोलतो आहे. 'मी या चित्रात स्वतःला फारच जास्त ओतले आहे.' असे त्याचे वाक्य आहे. कदाचित हे एखाद्या गायकाला, कलाकाराला बेसिलची भावना अधिक चांगल्या प्रकारे समजू शकेल. एखादी कलाकृती जीव ओतून करावी नि प्रेक्षकांसमोर ठेवताच त्यांनी तिची निर्दयपणे चिकित्सा करावी हे अतिशय वेदनादायी असते. माझ्या मते केवळ याच भावनेतून बेसिलने डोरियनच्या चित्राला प्रदर्शनात ठेवण्यास नकार दिला आहे. या पलिकडे वैयक्तिक, भावनिक पातळीवर दोघांचे कोणतेही बंध निर्माण झालेले दिसत नाहीत. याउलट डॉ. हेन्री नि डोरियन यांच्यात एकप्रकारे मेंटॉर नि प्रोटेजी या स्वरूपाचे नाते दिसते, पण ते ही अ-भावनिक दिसते.

कादंबरी वाचली आहे. ज्या जमान्यात (म्हणजे काळात) पांडुरंग वाढतो आहे, त्या काळात मुल अन मुली इतक्या मोकळेपणाने मिसळत नव्हते. अन मित्राबरोबर भावनिकदृष्ट्या अ‍ॅटॅच असण याला लैंगिकता म्हणन ही फार मोठी गोष्ट झाली. आम्ही देखील मैत्रीणींबरोबर बरच काही शेअर करायचो. फार जवळची वाटायची मैत्रीण तेंव्हा. ते वयच तस एकांड असत. अन त्या हार्मोनल चेंजेस मधुन जाताना, असे एकांडे कुणा एखाद्यावर असे जीव ओवाळुन टाकतात की काय सांगाव. मला तरी कोसला वाचल्यावर मुलांच मोठ होण सुद्धा किती अवघड अन जीवघेण असत याची जाणिव झाली. तोवर पुरुष आहेत म्हणुन बरच सोप असाव जगण अस वाटायच. घरात भावांना मिळणार स्वातंत्र्य, जरा उजवी झुकते वागणुक या सगळ्यामुळे तसा विचार मनात यायचा, पण कोसलाने खरच खुप काही उलगडल. मला तर कोठेही पांडुरंग समलैगिक नाही वाटला. उलट दोन पुरुषांना एकमेकाच्या हव तेव्हढ जवळ येता येत नाही मध्येच त्याला तश्या संबंधांची पुसटशीही कल्प्ना नाही, वा आवड नाही हेच जाणवुन देते. शेवटी लग्न झाल की संसार अन पुढच्या सार्‍या गुंत्यात मैत्री हवी तितका वेळ मिळवु शकत नाही हे दर्शवणारे वाक्य तुम्ही अर्थ बदलुन इथे दिल्या सारखे वाटते आहे.

मला हे वाचून २ लिखाणे आठवली . १. साने गुरुजींच्या श्यामवर शांता गोखले ह्यांनी लिहिलेला समलिंगी-संशय घेणारा लेख. २. करीना माझी वियाग्रा ही माझी कथा. जिच्या नायकाला उतारवयात आपण समलिंगी होतो की काय असा संशय येतो! ( ही कथा तुम्ही वाचली नसलीत आणि तुम्हाला वाचायची इच्छा असेल तर mail Id कळंवा . मुद्दा असा आहे की समलिंगी आकर्षण हे सनातनी वातावरणात दाबून जाऊ शकते.

माझया या ब्लॉग वर सतीश तांबे यानी चपखल प्रतिक्रिया दिली होती. त्यांचा कोसला वरचा अभ्यास दांडगा आहे. प्रतिक्रिया खाली कॉपी पेस्ट करत आहे. मला हे वाचून २ लिखाणे आठवली . १. साने गुरुजींच्या श्यामवर शांता गोखले ह्यांनी लिहिलेला समलिंगी-संशय घेणारा लेख. २. करीना माझी वियाग्रा ही माझी कथा. जिच्या नायकाला उतारवयात आपण समलिंगी होतो की काय असा संशय येतो! ( ही कथा तुम्ही वाचली नसलीत आणि तुम्हाला वाचायची इच्छा असेल तर mail Id कळंवा . मुद्दा असा आहे की समलिंगी आकर्षण हे सनातनी वातावरणात दाबून जाऊ शकते.