विजेचा कडकडाट होणे याला हिंदीत "बिजली कौंधना" असाही शब्दप्रयोग वापरात आहे.
ही कविता केवळ सुंदरच आहे. मला तरी त्यात शापवाणीपेक्षा "असं होईल" याची खात्री दिसते.
माझंही हे आवडतं गाणं. रसग्रहण आणि त्यापाठीमागची कथा दोन्ही आवडली.
याच्या एकदम विरोधी गाणं आहे, "तुम अपना रंज-ओ-गम अपनी परेशानी मुझे दे दो". त्याबद्दल थोडंसं इथं.
माझे अतिशय आवडते गाणे!!
रसग्रहण आवडले ( तसे आपले सर्वच लेखन आवडते शरद ).
ह्या कवितेची / गाण्यातील शेवट्ची ओळ जितकी प्रभावी आहे तितकी क्वचितच इतर ठिकाणी आढळेल. पण ती ओळ मला तरी कवितेतील नायिकेचा शाप किंवा तळतळाट वाटत नाहीत. हा तिचा वर्तमान काळातील अनुभव वाटतो. तिने त्याला पुढे काय वाढून ठेवले आहे याची पूर्व कल्पना देखील वाटत नाही. नायकाचे अंतर्मन त्याला खात असेल ह्या शक्यतेशी सहमत.
http://shabdkosh.raftaar.in/Meaning-of-%E0%A4%95%E0%A5%8C%E0%A4%82%E0%A4%A7-in-English
बिजली सारखा क्षणात चमकुन जाणारा विचार वगैरेपण म्हणु शकतो आपण.
बाकि फार दिवसांनी या ओळी पुन्हा आठवल्या. नक्की काय वाटल ते शब्द बद्ध करण अशक्य आहे. नकळत सुर उमटले मनात, न कळत रात्रीच्या 'बेला के फुल' चा घनदाट अंधार दाटला. न कळत बेडमध्ये रेडीओ (ट्रांझीस्टर) तसाच चालु राहुन लागलेली झोप.......बरच, बरच काही.
१९६१ वा जेंव्हा पहिल्यांदा हे गाणं ऐकलं असेल (त्याकाळी जिथेतिथे पानपट्टीच्या दुकानांवर अहोरत्र गाणी वाजत असायची, कुठेही जा, गाण्यांची सोबत असायचीच) तेंव्हापासून आजतागायत हे गाणं अति म्हणजे अतिच आवडतं आहे. सिनेमा अद्याप बघितलेला नाही, पण आतातरी बघायलाच हवा.
भालचंद्र नेमाड्यांचा कादंबरीतील (बिढार, जरीला, झूल पैकी कोणत्यातरी) एक पात्र (नाव विसरलो) या गाण्याने झपाटले गेलेले आहे, त्याच्यावर प्रेम करणार्या एका मुस्लिम मुलीला याने अव्हेरले, त्यानंतर जन्मभर त्याच्या मनात हे गाणे घुमत रहाते, आणि तो सतत बेचैन रहातो, असे काही आहे.
खरंचंच अगदी झपाटून टाकणारे 'हाँटिंग' गाणे आहे हे.
मूळ संदर्भ सिनेमा बघितल्यावरच कळेल, पण असे वाटते, की नायकाने अव्हेरलेल्या 'तिचा' हा स्वतःचा अनुभव असावा, आणि त्यामुळे नायकाचेही तसे होउ शकते, असे ती म्हणत असावी.
'अंधेरे छा रहे होंगे' म्हणजे जीवनात सगळीकडून निराशा, वैफल्य, प्रिय व्यक्तीचा वियोग, वा ओसरत्या तारुण्याची जाणीव, अश्या अगदी एकटे एकटे वाटण्याचे क्षणी अचानक "हमारी याद आयेगी" आणि ही आठवण, आपण केलेल्या अव्हेराची पश्चात्तापयुक्त जाणीव, ही उरल्या सुरल्या आशेची,प्रेमाची, जीवनाची पण राखरांगोळी करेल...
...स्नेहल भाटकर, मुबारक बेगम आणि केदार शर्मा या तिन्ही प्रतिभावंतांचे जेवढे कौतूक करावे, तेवढे थोडेच.
इथे कुणी जर थोडक्यात या सिनेमाची कथा दिली, तर समजायला आणखी मदत होईल.
अवांतरः माझा मुलगा अगदी लहान असताना "बाबा कभी तनहाली लावा" असे म्हणायचा. आता त्याचे मुलगा दोन वर्षांचा आहे, त्याला पण लावतो आता या गाण्याची चटक.
हे गाणे मलाही खूप आवडते. त्याची चाल इतर हिंदी सिनेमातील गीतांपेक्षा जरा
हटके असल्याने, ते कोणत्या रागावर आधारित आहे हे जाणकारांना विचारले. हे
गाणे फारसा प्रचलित नसलेला राग धानी वर आधारीत आहे असे समजले.
प्रतिक्रिया
छान रसग्रहण
+१
माझंही हे आवडतं गाणं. रसग्रहण
नियतीचा शाप..
अनेकदा हे गाणं ऐकलं आहे...
माझे अतिशय आवडते गाणे!!
कौंध साठी ही लिंक पहा सर.
१९६१ वा जेंव्हा पहिल्यांदा हे
राग धानी
शरदकाका,